शंभर वर्षांपूर्वीच्या वृत्तांकनाचे नमुने हवे आहेत

वृत्तपत्रांतून मराठी बातम्या वाचता येऊ लागल्या त्याला आता कित्येक वर्षं झाली. या काळात वृत्तांकनाच्या शैलीत चांगलाच फरक पडला. सुमारे शंभर वर्षांपूर्वी मराठी वृत्तपत्रांत ज्या बातम्या दिल्या जात असत ती भाषा आणि आजची भाषा यांत काय फरक आहे ते दाखवण्यासाठी जुन्या बातम्यांच्या मजकुराचे नमुने हवे आहेत. आंतरजालावर कुठे असे नमुने उपलब्ध असले तर कृपया इथे दुवे द्यावेत. टंकलेला मजकूर किंवा स्कॅन केलेली पानं यांपैकी काहीही चालेल. स्कॅन असेल तर मजकूर वाचता येईल इतपत दर्जा चांगला हवा. ह्या दुव्यावर काही जुन्या वृत्तपत्रांची स्कॅन केलेली पानं मला सापडली, पण बर्‍याच पानांवरचा मजकूर वाचता येत नाही आहे, अन् जो वाचता येतो आहे त्यातला काळ अगदी सुरुवातीचा आहे (केसरीचा पहिला अंक वगैरे), किंवा अगदी नंतरचा आहे. मला विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या वृत्तपत्रीय लिखाणाचे नमुने हवे आहेत (सुमारे १९००-१९२०). धन्यवाद.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

माझ्याकडे चित्रमय जगत या मासिकाच्या १९२१ सालातील फलज्योतिष विषयावरील चिं वि वैद्यांचा लेखाची झेरॉक्स आहे. त्यात मुद्राराक्षसामुळे 'सन्मान्य ज्योतिषी' अशा उल्लेखा ऐवजी 'सामान्य ज्योतिषी' असा उल्लेख झाल्याचा खुलासा आहे. तो वाचल्यावर जरा करमणुक झाली.
पुण्यात लक्ष्मी रस्त्यावरील गोखले हॉल वरील ग्रंथालयातून तो मिळवला होता. जीर्ण कागदाचे तुकडे पडत होते.

चित्रमय जगत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आता हाताशी पुस्तक उपलब्ध नाही, पण 'लोकमान्य ते महात्मा'च्या पहिल्या खंडात लोकमान्यांच्या काळच्या वृत्तपत्राचे नमुने असू शकतात. खात्रीने सांगू शकत नाही, पण पानं चाळून अंदाज घेता येईल. त्यात अधेमधे नाटकांच्या जाहिरातींची बिलं, फार प्रसिद्ध नसणारी पदं, पोवाडे हे ही त्यात आहेत. कदाचित घाटपांडे काकांनी टाकलं आहे त्याप्रमाणे स्कॅन्ड चित्रं नसतील तर शोधणं त्रासदायक होईल; पण बहुदा केसरी आणि ब्राह्मणेतर वर्तमानपत्रं यांच्यातली तुलना, त्याप्रकारचं लिखाण, त्यांचा अन्वय अशा गोष्टी या ग्रंथात आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद. घाटपांड्यांनी शेअर केलेला मजकूर रोचक आहे, पण मला वार्तांंकनाचे नमुने हवे आहेत. वृत्तपत्रातली बातमी आणि लेख यांच्या शैली आणि भाषा वेगळ्या असल्यामुळे हा मजकूर मला फारसा उपयोगाचा नाही. जाहिराती आणि पदं वगैरेदेखील मिळाले तरी मला त्याचा उपयोग नाही. एखाद्या घटनेचं वार्तांकन कसं केलं जायचं हे मला हवं आहे. मला काय हवं आहे ते स्पष्ट होण्यासाठी उदाहरणार्थ आजच्या 'लोकसत्ता'मधली ही बातमी पाहा. त्यात येणारी अशी भाषा ही वार्तांकनाची भाषा आहे -

ताज्या घटनेचं वार्तांकन :

२६/११ च्या हल्ल्यानंतर गाजावाजा करीत स्थापन झालेल्या ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’च्या (एनएसजी) मरोळ येथील संकुलातील एका इमारतीला उद्घाटनानंतर अवघ्या आठ महिन्यांतच भेगा पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या इमारतीत राहणाऱ्या २४१ ‘ब्लॅक कॅट’ कमांडोंना याच संकुलातील तात्पुरत्या इमारतीत हलविण्यात आले आहे. या प्रकल्पाला सुरक्षिततेचे प्रमाणपत्र देणाऱ्या रुरकी आयआयटीचे तज्ज्ञ तात्काळ घटनास्थळी रवाना झाले आहेत.

पार्श्वभूमी :

२६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबईत एनएसजीचे स्वतंत्र संकुल उभे केले जाईल, अशी घोषणा चिदम्बरम यांनी केली होती. राज्य शासनाने मरोळ येथील राज्य पोलिसांच्या मालकीच्या भूखंडातील २३ एकर जागा तात्काळ उपलब्धही करून दिली. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या संकुलाची उभारणी सुरू केली होती. तब्बल तीन वर्षांनंतर एनएसजीचे संकुल उभे राहिले.

त्यामुळे आता वर्ष पूर्ण व्हायच्या आतच या संकुलातील सर्व इमारतींची पुन्हा तपासणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

'भेगा पडल्या आहेत' असं न म्हणता 'पडल्याचे स्पष्ट झाले आहे' असं म्हणणं, 'घटनास्थळी रवाना झाले आहेत', 'सूत्रांनी स्पष्ट केले आहे', अशी वाक्यं जागोजागी पखरणं ही खास बातमीची शैली आहे. लेखकाची अनुपस्थिती ('मी'चा वापर नसणं), कर्तरीऐवजी कर्मणी प्रयोगाचा वापर (उदा : 'जागा उपलब्ध करून दिली') असेदेखील ह्या भाषेचे काही गुणधर्म आहेत. अशी वैशिष्ट्यं दाखवणारे त्या काळातले नमुने मला हवे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझे पणजोबा गणेश नारायण कोल्हटकर ह्यांनी सातारा गावात १८६७ साली 'महाराष्ट्र मित्र' नावाचे मराठी साप्ताहिक सुरू केले होते अणि त्यांचा १८९७च्या प्लेगमध्ये मृत्यु होईपर्यंत ते चालू होते. त्यांच्या हाताशी आलेल्या दोन मुलांचाहि त्याच प्लेगने बळी घेतल्यामुळे साप्ताहिक चालविण्यास कोणी उरले नाही आणि ते बंद झाले. दुदैवाने साप्ताहिकाचे काही अंक, जे ३०-४० वर्षांपर्यंत जीर्णावस्थेत टिकून होते, ते तदनंतर कोठेतरी गहाळ झाले.

माझे आजोबा चिंतामणराव कोल्हटकर ह्यांच्या 'बहुरुपी' ह्या आत्मचरित्रपर पुस्तकात 'महाराष्ट्र मित्र'च्या लिखाणाचा नमुना म्हणून एक उतारा दिला आहे. 'बहुरुपी'चे ते पान स्कॅन करून पुढे जोडत आहे. लिखाण १८९५ सालाचे आहे.

जुन्या पिढीतील पत्रकार रा.के. लेले ह्यांचे 'मराठी वृत्तपत्रांचा इतिहास' ह्या नावाचे ११७५ पानांचे पुस्तक काँटिनेन्टल प्रकाशनाने १९८४ साली प्रकाशित केले होते असे जालावर दिसले. त्या पुस्तकाचा शोध घेतल्यास काही माहिती मिळू शकेल असे वाटते.

मुंबईतील अमेरिकन मिशनरी सोसायटी कित्येक दशके 'ज्ञानोदय' नावाचे मासिक इंग्लिश आणि मराठी मजकुरासह छापत असे. त्याचे बरेचसे अंक books.google.com येथे 'full view' मध्ये उपलब्ध आहेत आणि त्यात बर्‍याच चालू घडामोडींचे वृत्तान्त छापले जात. उदा. येथे १८७४ सालचे अंक आहेत. तेहि पाहावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहिष्कृत भारत, आणि मूकनायक चे अंक महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आहेत. त्यात कदाचित हवी ती माहिती मिळू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी हे १९२० च्या नंतरचे आहेत, त्यामुळे वरचा प्रतिसाद कॅन्सल !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0