'शिवराय"

अवनी वरती नृप जाहले, अगणित आजवरी ।
परी शिवरायांसम नाही जाहला कोणी नृपकेसरी ॥

अगणित आले अगणित गेले नसे काही गणती ।
अमर जाहले शिवराय केली अघटित ऐसी कृती ॥

कड्या कपारी फिरूनी एक एक सवंगडी शोधीला ।
अमोघ वाणीने त्यांच्यातील मराठी बाणा जागविला ॥

शुन्यातूनी विश्व निर्मिले दिली झुंजार कडवी झुंज ।
टक्कर देऊनी महासाम्राजांशी उतरविला दुष्टांचा माज ॥

रयतेचा वाली गरिबांचा राजा सज्जनांचा कैवारी ।
ऐसी ख्याती शिवरायांची दुमदुमते भूवरी ॥

॥जय शिवराय, जय जिजाऊ ॥

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

आपल्या लेखनात काय लिहावे हा पूर्णपणे लेखकाच्या अधिकारातला विषय आहे पण ते कसे लिहावे ह्यावर लिहिण्यासाठी लेखक जो घाट निवडतो त्याचे नियम लागू पडतात. उदा. गंभीर प्रबंध लिहितांना थिल्लर, कुचेष्टेखोर, किंवा शिवराळ शब्द असू नयेत हा 'प्रबंध' ह्या घाटाचा नियम आहे. ह्या उलट नाटकातील संवाद रोजच्या भाषेत असावेत, प्रबंधाची भारदस्त भाषा तेथे शोभत नाही कारण 'नाटक' ह्या घाटाला ती मानवत नाही. (ह्याच कारणासाठी 'उंच माझा झोका'मधली अति-शुद्धलेखनी भाषा मला आवडत नाही.)

'कविता' ह्या घाटाचेहि असाच एक नियम आहे. कविता लयबद्ध असते हा तो मूलभूत नियम. ही लयबद्धता आणण्याचा जुना मार्ग म्हणजे कोठल्यातरी वृत्तात ती कविता बांधणे. तसे केले की त्या वृत्ताची लयबद्धता आपोआपच त्या कवितेत उतरते. ह्या वृत्तरचनेवर माधवराव पटवर्धनांसारखे आधुनिक विचारवंत टीका करतात तरीहि 'लयबद्धता' हा कवितेचा प्राण आहे ह्यावर त्यांचेहि दुमत नाही.

वरील 'कविते'मध्ये मला कसलीच लयबद्धता जाणवत नाही. 'अगणित आले अगणित गेले नसे काही गणती' आणि 'ऐसी ख्याती शिवरायांची दुमदुमते भूवरी' ह्या २७ मात्रांच्या दोन ओळी सोडल्या तर अक्षरांची ओढाताण केल्याखेरीज आणि २७ मात्रांच्या होल्डऑलमध्ये त्यांना कोंबून बसविल्याशिवाय वरच्यापैकी एकहि ओळ कवितेसारखी वाचता येत नाही. थोडेबहुत ह्रस्वदीर्घाचे स्वातन्त्र्य कवीला असते हे खरे आहे पण शब्दांची मोडतोड करण्याचे नाही.

अशा परिस्थितीत ह्या कृतीला कविता का म्हणावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्हटकर सर,
तुमचा मुद्दा पटला. तुमच्या अशा परिस्थितीत ह्या कृतीला कविता का म्हणावे? या प्रश्नावरुन मला एक उपप्रश्न सुचला आहे.
मुक्तछंद प्रकाराला तुम्ही कविता मानता का? तुमचे मत ऐकायला आवडेल.

शिवाजी महाराजांवर काव्य लिहिताना लेखणी जरा जास्तच भावनिक होते हे जरी खरे असले तरी कवितेचे मूलभूत नियम पाळले जावेत ही तुम्ही केलेली अपेक्षा योग्यच आहे.

बाकी कवीच्या भावना कळल्या. अनिलसाहेब तुम्ही जरा कोल्हटकर सरांनी दिलेल्या सूचनेनुसार जरुर काव्य रचण्याचा प्रयत्न करा ही विनंती.
तुम्हाला लयबद्धता व छंदशात्राबद्दल सोप्या भाषेत संदर्भ हवा असेल तर "छन्दोरचना" हे माधव पटवर्धन यांचे पुस्तक जरुर पहा. खूप उपयोग होईल या पुस्तकाचा.
तुमचा ईमेल मला व्यनि करा. मी ईमेलद्वारे ते पुस्तक पाठवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्हटकर साहेब नि सागर धन्यवाद,
आपल्या सुचनेचे स्वागत.फक्त एक असे कि माझे शिक्षण जास्त नसल्यामुळे चुका होणारच पण आपल्यासारख्या जाण्कार लोकांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. मी केलेली कविता च असेल की नाही हे मलाच सांगता यायचे नाही. पण तो एक प्रामाणिक प्रयन्त नक्कीच असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक करून पाहू शकता तुम्ही. जी लय तुम्हाला अपेक्षित आहे, त्या लयीत कविता मोठ्याने म्हणून पाहा.
जिथे तुम्हाला, लयीत थाम्बावे लागत आहे, असे वाटते, तिथे प्रथम र्‍ह्स्व-दीर्घ बदलून पाहा.
जर त्यानेही लय अडखळत असेल तर शब्द बदलून पाहावे लागतील.
उदा.
अवनी वरती नृप जाहले, अगणित आजवरी ।
परी शिवरायांसम नाही जाहला कोणी नृपकेसरी ॥

याच ओळी
अवनीवरती राजे झाले, अगणित आजवरी ।
शिवरायांसम नाहि जाहला, कोणी नृपकेसरी ॥
अशा म्हणून पाहा. अधिक लय वाटते का ? असेल तर अशाच प्रकारचे बदल तुम्हाला इतरत्र करावे लागतील.

(अवनीवर सम्राट जाहले, अगणित आजवरी । , असेही म्हणू शकता.
खरे तर 'अवनी वरती' => 'अवनिवरती' असे हवे, पण उदाहरणासाठी ते तूर्तास बाजूस ठेवू.
)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद्,अमुकजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनिलजि,

कविता छान आहे. कवितेच्या व्याख्येमध्ये ती बसते का व छंदरचनेच्या परिक्षेस ती उतरते का हे तज्ञांना ठरवू देत. भावना पोहोचवण्यात तुम्ही कमी पडलात नाहीत, हे महत्वाचे.

सागरजी,

मला देखील 'छ्न्दोरचना' हे पटवर्धन यांचे पुस्तक आवडेल. पाठवू शकलात तार आभारी होईन. sanjeevchaubal2010@gmail.com

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा इंग्रजी ब्लॉग : http://countrysideamerica.blogspot.com/

अनिलजी आणि संजीवजी
तुम्हा दोघांना छन्दोरचना पुस्तकाची पीडीएफ पाठवली आहे.

ऐसी अक्षरे च्या अ‍ॅडमिन्स ना विनंती: अशा प्रकारची उपयोगी व मोजकी पीडीएफ स्वरुपातील पुस्तके उपलब्ध करुन देता येतील का? जी कायम संदर्भ म्हणून वाचकांना व लेखकांना वापरता येतील. आकारमानामुळे सर्वर वर लोड पडेल याची जाणीव आहे. तरीही निवडक पुस्तके देता आली तर उत्तम.

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा ग्रंथ आपल्या ऐसीअक्षरेचे सदस्य श्री.चित्तरंजन भट यांनी archive.org वर आधीच चढवला आहे, तेव्हा हा ग्रंथ इथे उपलब्ध आहे.

सदस्यांच्या सोयीसाठी, हाच दुवा मुखपृष्टावर मराठी संदर्भग्रंथ विभागातही उपलब्ध करून दिला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छन्दोरचनाचा दुवा ऐसी अक्षरे वर जोडल्याबद्दल धन्यवाद ऋ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद, सागरजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संजीवजी धन्यवाद, आपल्याला सागर यांनी पुस्तक पाठविलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋषीकेशजी धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0