मार्गदर्शन हवे.

हा बहुतेक माझे संगणक वापराचे ज्ञान अति-जुजबी असल्याचा परिणाम असावा

हा बहुतेक माझे संगणक वापराचे ज्ञान अति-जुजबी असल्याचा परिणाम असावा पण लेख तयार करतांना चित्रे घालण्याच्या वेळी मला दोन अडचणी येत आहेत. त्यावरचा इलाज मला कळावा म्हणून हे लिहीत आहे.

चित्रे घालण्यासाठी L img आणि R img ही बटने वापरून मी चित्र डाव्या मार्जिनजवळ वा उजव्या मार्जिनजवळ ठेवू शकतो पण त्या दोघांच्या मधले सूर्योदयाचे चित्र असलेले बटन वापरूनहि मला चित्र पानाच्या मध्यावर आणता येत नाही. By default, ते डाव्या मार्जिनजवळच जात आहे. ह्याला उत्तर काय?

मला चित्राखाली त्याचे नाव द्यायचे आहे. 'ऐसीअक्षरे' मध्ये अशी सोय कोठे आहे?

घातलेली चित्रे Chrome आणि Firefox मध्ये दिसत आहेत पण IE मध्ये नाही. असे का?

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

आता जमलं

धन्यवाद, आता जमलं...

अक्षररंग

आता ही कुर्‍हाड प्रत्येक झाडावर चालवतो...

प्रतिसाद

प्रतिसाद देताना खाली Input Format वर क्लिक करून फुल एचटीएमएल ऑप्शन सिलेक्ट करत आहात का?

भानामती?

अक्षररंग

Source मधील कोड कॉपी-पेस्ट केले तरी अक्षररंगचा रंग काळाच आणि चित्र डाव्या मार्जिनवरच! काय भानामती आहे कळत नाही...

जमलं...

जमलं... जमतं की तुला! (डोळा मारत)

बहुदा

त्यासाठी इनपुट फॉरमॅट फुल एचटीएमेल करावा लागेल. इथे एक प्रयत्न करून पहाते.

अक्षररंग

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अडचण तशीच आहे...

<चित्र मधोमध आणण्यासाठी उजवीकडून दुसरं बटण, चित्र टाकण्याचा कोड टाकून सर्वात शेवटी वापरावं लागेल.>

तसे करून पाहिले त्यामुळे
div style="text-align: center;" <> ह्याच्या मधोमध
असे त्याने दाखविले पण उपयोग झाला नाही. Text मध्यावर आणण्यासाठीहि उपयोग झाला नाही.

अजून म्हणजे अक्षररंग बदलण्यासाठीच्या बटनाचाहि उपयोग करता येत नाही.

सूर्योदयाचे चित्र असणार्‍याने

सूर्योदयाचे चित्र असणार्‍याने चित्र मधे येत नाही, चित्राच्या आजूबाजूला मजकूर दिसत नाही एवढंच. चित्र मधोमध आणण्यासाठी उजवीकडून दुसरं बटण, चित्र टाकण्याचा कोड टाकून सर्वात शेवटी वापरावं लागेल.

IE मध्ये काहीतरी बग आहे, त्यामुळे चित्राची लांबी, रुंदी दिली नसेल आणि तरीही ती देण्याचा कोड तिथे असेल (उदा: img src ="something.jpg" width ="") तर IE ही चित्रं दाखवू शकत नाही, फाफॉ आणि क्रोम दाखवू शकतात. त्यासाठी असा लांबी, रुंदीचा रकाना रिकामा सोडायचा असेल तर तो काढूनच टाकला की IE तही चित्रं बरोबर दिसतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.