सर्जनशीलता व वेडेपणा

सर्जनशीलता व वेडेपणा किंवा (सौम्य शब्दात वेडसरपणा) यांच्यात काही संबंध असू शकेल का हा एक नेहमीच विचारला जाणारा प्रश्न आहे. हा प्रश्न विचारण्यात एक गर्भितार्थही दडलेला असतो. तो म्हणजे वेडेपणाशिवाय प्रतिभाशक्ती असू शकत नाही किंवा प्रतिभेचे पर्यावसान वेडेपणात होऊ शकते. प्रतिभावान वेडे असतात हे मिथ वर्षानुवर्षे नव्हे, तर पिढ्यान पिढ्या जपली जात आहे. त्यात थोडा फार सत्यांश असला तरी अशा प्रकारचे sweeping statements त्या संबंधित व्यक्तीला, त्यांच्यातील प्रतिभेला व एकूण समाजाला धोकादायक ठरू शकतात. सर्जनशील व्यक्तींमध्ये वेडसरपणाची झाक असते, या विधानाला कुठल्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही. चाकोरीपासून थोडा जरी वेगळेपणाने वागणाऱ्या वैज्ञानिकाला मॅड सायंटिस्ट हा न पुसणारा शिक्का नेहमी बसतोच. हा वेडेपणा केवऴ वैज्ञानिक वा गणितज्ञांनाच नव्हे तर अनेक प्रतिभाशाली कलावंत - कवी, लेखक, नाटककार, संगीत रचनाकार, चित्रकार - यांच्यावरही बसलेला आहे. शेक्सपीयरने मिडसमर नाइट्स ड्रीम या त्याच्या नाटकात कलावंत, कवी आणि वेडा यांच्यातील फरक निश्चित करत प्रतिभाशक्ती व वेडेपणा यांच्यात संबंध नाही, असे सांगण्याचा प्रयत्न करतो. तरीसुद्धा सर्जनशीलता व वेडेपणा हे मिथ अजूनही जोपासले जात आहे. कदाचित शेक्सपीयर या कामी कमी पडला असे आपण आता म्हणू शकतो.

चार्ल्स डिकेन्स, न्यूटन, चर्चिल या प्रतिभाशाली व्यक्ती मानसिक विकृतीचे बळी होते, असे मानसतज्ञांचे मत आहे. डिकेन्सला स्वत:ला कुठल्या ना कुठल्या गोष्टीत गुंतून राहण्याची गरज भासत होती. तो एकाच वेळी दोन दोन पुस्तकं लिहित असे. तो पत्रकार, नट, कादंबरीकार, व समाज सुधारक होता. या सर्व व्यापात असूनसुद्धा रोज तो 10-15 किमी चालण्याचा व्यायाम करत असे. थोडी जरी विश्रांती घेतली तरी आपण आजारी पडू याची त्याला भीती वाटत होती. विन्स्टन चर्चिलला बाल्कनीची वा उंच इमारतींची भीती वाटत होती. कुठल्याही क्षणी आपण वेडे होऊन उडी मारू असे त्याला वाटत होते. प्रतिभाशाली कवींच्या बाबतीत तर ते ठार वेडे आहेत याबद्दल बहुतेकांचे एकमत असते. त्यांच्या लहरी स्वभावामुळे त्यांच्या बोलण्या-वागण्यात सुसंबंद्धता नसते हे एकमेव कारण त्यांना वेडे ठरविण्यास पुरेसे ठरते.

मुळात सर्जनशील कृतीसाठी काही प्रेरणांची गरज भासते. शांत रीतीने समाधानी आयुष्य जगणार्‍यात अशा प्रेरणांचा अभाव असतो. त्यामुळे त्यांच्याकडून अत्युच्च प्रतीची वा अफलातून अशा कलाकृतीची अपेक्षा करणे चुकीचे ठरू शकेल. मनात अस्वस्थता असल्याशिवाय अत्युच्च कलाकृती शक्य नाही असेच आपल्याला वाटत आले आहे. वेडेपणाची झाक असलेले कलावंत एकाग्रचित्ताने एखाद्या गोष्टीच्या मागे लागून कलाकृती सादर करतात हा आपला अनुभव आहे. हेमिंग्वे, थॉमस चॅर्टन, व्हिर्जिनिया वूल्फ, सिल्विया प्लाथ, या कलावंतानी आत्महत्या केली. विलियम कॉलिन्स, विलियम कॉपर, जॉन क्लेर, एड्गर ऍलन पो, कॉल रिड्ज, टेनिसन, टॉलस्टॉय, रस्किन यांच्या डोक्यात आत्महत्येचे विचार घोळत होते. प्रसिद्ध लेखक, ग्राहम ग्रीन आत्महत्येचा विचार करत होता असे त्याच्या जवळच्या मित्रांचे म्हणणे होते. कलावंताच्या जगात 'वेड्या प्रतिभावंताची अनेक उदाहरणे आहेत. हेर्मन हेस, टेनेसी विलियम्स, एझ्र्रा पौंङ, चार्लस मिंगस्, मार्क रोटको, वाल्ट व्हिटमन, विन्सेंट गॉग, जार्जिया ओ कीफ, व्हिर्जिनिया वूल्फ, पॉल गॉगिन, कोल पोर्टर, ऍन सेक्स्टन, जॉन बेरिमन, गुस्टाव्ह मल्हर, विलियम ब्लेक, लॉर्ङ बैरन, इत्यादी प्रसिद्ध कलावंत कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या मनोविकृतीस बऴी पङलेले होते. ही वेडसरपणाची झाक अनेक नामवंत सेलिब्रिटीजमध्येसुद्धा आढळते. व काही सेलिब्रिटीज जीवनाला कंटाळून आत्महत्या केलेली उदाहरणं इतिहासाच्या पानात सापडतात. आपल्या येथेही गुरुदत्त, मीनाकुमारी यांची उदाहरणं आहेत. तत्वज्ञ व वैज्ञानिक यांना एकांत आवडतो. एकट्याने जीवन जगणे आवडते. विचार करण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी कुठलाही अडथळा नको असे त्यांना कदाचित वाटत असावे. त्यामुळे अनेक तत्वज्ञ व वैज्ञानिक कौटुंबिक सुखापासून वंचित राहतात. न्यूटन, दे कार्ते, पास्कल, हॉब्ज, नित्शे, कांट, स्पिनोझा हे आयुष्यभर अविवाहित होते. वैयक्तिक व व्यावहारिक संबंधापेक्षा अमूर्त विचारांशीच त्यांचा संबंध येत असल्यामुळे ते त्यातच मग्न होते.

आधुनिक निदान पद्धतीनुसार हे कलांवत वेङेपणातील अवसादावस्था (Manic Depression Illness) किंवा तीव्र विषण्णावस्था (Major Disorder) ह्या मनोविकृतीतील प्रकाराने ग्रस्त झालेले असतात. ह्या अवस्थेत रुग्णाची मनोदशा दोलायमान स्थितीत असते. त्यांच्यात एका प्रकारचा लहरीपणा असतो. व तो सारखा बदलत असतो. औदासीन्य, निष्क्रियता व अतीक्रियाशीलता ह्या दोन्ही टोकाच्या जवऴपासची वर्तणूक, वर्तणूकीतील सातत्याचा अभाव, वैचारिक गोंधऴ, निद्रानाश, हिंस्त्रपणा, आत्महत्या करण्याकङे कल, अस्वस्थ मनस्थिती, वस्तूंचा दुरूपयोग इत्यादी लक्षणे ह्या रूग्णामध्ये दिसून येतात. स्वमग्नता (autism), द्विधृवीय (bipolar) विकृती, छिन्नमानसिकता (schizophrenia), वाचन अक्षमता (dyslexia) आणि उन्माद भयगंड ( lyssophobia) याप्रकारच्या मानसिक विकृतीसुद्धा काही कलावंतामध्ये आढळल्या आहेत.

अनेक वैज्ञानिक सर्जनशीलता व वेङेपणा ह्यांच्या संबधाबद्दल संशोधन करत आहेत. आयोवा विघापीठाचे नॅन्सी अँडर्सन, जॉन हॉपकीन्स विघापीठातील के जॉनिसन मॉंटगोमोरी दांपत्य, अर्नाल्ङ लुड्विग इत्यादी संशोधकानी, अनेक अमेरीकन व युरोपियन कलावंतांच्या जीवनाचा अभ्यास करुन, सर्जनशीलता व वेडेपणा ह्यामध्ये संबंध असण्याची शक्यता आहे, असे सांगितले आहे. भावस्थितीतील विकृतीने (Mood Disorder). ग्रस्त असलेल्यांची संख्या एकूण मनोरूग्णांपैकी 6 टक्के आहे. हा रोग आयुष्याच्या उत्तरार्धात जास्त प्रभावी असतो. पण त्याची चाहूल वयाच्या विसाव्या वर्षीच लागते. आत्महत्या करणा-या मनोरुग्णामध्ये ह्या रोगाचे प्रमाण लक्षणीय असते.

अतीसर्जनशील व्यक्ती केव्हा ना केव्हा मनोविकृतीने ग्रस्त झालेली असते. पण ही विकृती खरोखरच सर्जनशीलतेला उपकारक ठरु शकते का? सौम्य प्रमाणातील वेङसरपणा (hypo-mania) सर्जनशीलता, विचारशक्ती, व भावावस्थेवर नक्कीच परीणाम करतो. अशा रुग्णांचा भाषेमध्यें एका प्रकारची लयबद्धता असते. चित्रविचित्र प्रतिमा त्यांच्या ङोऴ्यासमोर तरंगत असतात. दृष्यरुप/शब्दरुप देण्याची क्षमता त्यांच्यात असते.

वेडसरपणा व सर्जनशीलतेच्या अवस्थेमध्ये अनेक साम्यस्थळे सापङतात. निद्रानाश, एकाग्रचिताने न कंटाळता काम करण्याची क्षमता, वेगवेगळ्या प्रकारच्या भावनाविष्कारांचे अनुभव घेण्याची शक्ती इत्यादी गोष्टी ठऴकपणे दिसून येतात. एखाद्या छोट्या गोष्टीमध्ये चित्तथरारक नाट्यकल्पना करून त्यातून आनंद/प्रसिद्धी मिळवण्याची वृत्ती ह्यांच्यात असते. ह्यांचे अनुभवविश्व कॅलिडोस्कोपमधील आकृत्याप्रमाणे नटलेले असते.

परंतु ह्या प्रकारची मनोविकृती काही काऴापुरती मर्यादित न राहता त्यात वाढ होत गेल्यास शारिरीक व मानसिक प्रक्रियेवर असाधारण ताण पङण्याची शक्यता असते. योग्य उपचार नसेल तर शरीरावर प्राणघातक परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारच्या रूग्णांना पूर्णपणे दिलासा देणा-या उपचार पद्धतीची आवशकता आहे. परंतु सर्जनशीलतेच्याभोवती विणलेल्या मिथमुळे समाजाची भरपूर हानी होत आहे. कारण

* मानसिक विकाराचे उदात्तीकरण होत असल्यामुळे आजार कितपत गंभीर आहे याकडे दुर्लक्ष होण्याचा संभव असतो.
* या प्रकारच्या मिथ्यकावर विश्वास ठेऊन काही रुग्ण रोगोपचार करून घेण्यास नकार देतात. रोगोपचार केल्यास त्यांच्यातील सर्जनशीलता लोप पावेल अशी भीती त्यांच्या मनात दडलेली असते.
* Normal असलेल्या कलावंताला मनोविकार होण्याची भीती वाटू लागते.
* कलेतून मिळणार्‍या निखळ आनंदाला मुकण्याची शक्यता वाढते.

आपल्या वेडेपणात सर्जनशीलता आहे हा आभास कदाचित या विषयाबद्दलच्या romanticism मधून आलेला असेल. वेळीच निदान करून मनोदुर्दशेवर मात करता येणे शक्य आहे. सर्जनशील व्यक्तीच्या वेङसरपणाला रोमॅंटिक स्वरुप न देता सार्वजनिक आरोग्याचा भाग समजून उपचार पद्धती विस्तृत व अधिक बळकट करणे आवश्यक आहे.

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (6 votes)

प्रतिक्रिया

"तत्वज्ञ व वैज्ञानिक यांना एकांत आवडतो. एकट्याने जीवन जगणे आवडते. विचार करण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी कुठलाही अडथळा नको असे त्यांना कदाचित वाटत असावे. त्यामुळे अनेक तत्वज्ञ व वैज्ञानिक कौटुंबिक सुखापासून वंचित राहतात. न्यूटन, दे कार्ते, पास्कल, हॉब्ज, नित्शे, कांट, स्पिनोझा हे आयुष्यभर अविवाहित होते. वैयक्तिक व व्यावहारिक संबंधापेक्षा अमूर्त विचारांशीच त्यांचा संबंध येत असल्यामुळे ते त्यातच मग्न होते."

हे वाचून बालगंधर्व सिनेमातला एक संवाद आठवला, 'सामान्य माणसांच्या जगातले नियम या देवलोकातल्या माणसाला लावले, हे चुकलंच', अशा काहीशा अर्थाचा.

इथे सौंदर्यसाम्राज्ञी मेरिलिन मन्रोचा उल्लेख अनवधानाने राहिला काय..?
“Imperfection is beauty, madness is genius and it's better to be absolutely ridiculous than absolutely boring.”
- असं म्हणणार्‍या मेरिलिनला स्वतःच्या भावावस्थांची कल्पना होती असं वाटतं.

लेखात उल्लेखलेल्या सर्जनशील कलावांतांना स्वतःच्या 'असं' असण्याची जाणीव होती का? आणि स्वीकार होता का?

(तपशीलातली एक चूक आढळली, मधुबाला आणि मीनाकुमारी या दोघीही आजारपणाच्या बळी ठरल्या. मधुबालाच्या ह्र्दयाला छिद्र होते.. आणि मीनकुमारी अतिमद्यपानाने लिव्हरचा त्रास होऊन मरण पावली. तिचे अतिमद्यपान वर दिलेल्या थिअरीशी सुसंगत असू शकते. पण या दोघींनी आत्म्हत्या केलेली नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"माझी चाहूल लागताच पक्षी घाबरुन आकाशात उडाला...
मी माझ्या सुभाषितांच्या वहीत एक नवीन वाक्य लिहिले:
... क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे विराटाकडे धाव घेतात..."

धन्यवाद!
आपण सुचविल्याप्रमाणे मधुबालाचे नाव काढून टाकले आहे.
अभिनेत्री मेरिलिन मन्रोप्रमाणे अमेरिका - युरोपमधील मनोरुग्ण सेलेब्रिटीजची यादी फार मोठी आहे. गूगल केल्यास याविषयी भरपूर माहिती मिळेल.
आपल्या येथेही अनेक मनोरुग्ण सेलेब्रिटीज असतील. परंतु त्यांची नावे शेवटपर्यंत गुलदस्तातच राहतात. त्यामुळे नक्की काय स्थिती आहे ते कळ्त नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेडेपणा व वेडसरपणा यात मला छटेचा फरक वाटतो. वेडसरपणा ही थोडी सौम्य छटा वाटते. एखाद्याच्या स्वच्छंदपणाची वा सर्जनशीलतेची दाद देताना 'वेडा माणुस आहे' अशी कौतुकमिश्रित शब्दांनी व्यक्त होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हल्लीच्या काळात एकूणच 'वेड्यासारखा' ध्यास घेऊन एखादे काम करणार्‍या व्यक्ती कमी झाल्या आहेत असे वाटते का?
किंवा समाजाला अधिक 'वेड्यां'ची गरज असावी असे वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

समाजाला अधिक 'वेड्यां'ची गरज असावी असे वाटते

मलाही असेच वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

किंवा समाजाला अधिक 'वेड्यां'ची गरज असावी असे वाटते

कधी 'न'व्या (न = २) बाजूचा विचार केला आहे काय? यात वेड्यांचीही काही बाजू असू शकते की नाही?

वेड्यांना समाजाची गरज असते किंवा कसे, हा खरा कळीचा मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेड्यांना समाजाची गरज असते किंवा कसे, हा खरा कळीचा मुद्दा आहे.

समजा त्यांना समाजाची गरज नाहीये. पण त्याने काय फरक पडतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरे आहे. त्यांना त्याने काहीच फरक पडू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याउलटही विचार करता येईल. उदाहरणार्थ, काळाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या व्यक्तींना अनेकदा तत्कालीन समाज वेडं ठरवत असतो. र. धों. कर्वे किंवा आगरकरांच्या हयातीत अनेकांना त्यांचे विचार म्हणजे त्यांच्या वेडेपणाचं लक्षण वाटलं असण्याची शक्यता आहे. असाही वेगळा विचार केला जात आहे की ज्यांना आपण मानसिक रुग्ण म्हणतो त्यांच्यात चांगल्या कामासाठी उपओगी पडू शकतील अशा काही क्षमता आहेत, पण आपलं मानसिक रोगांविषयीचं आकलन कमी असल्यामुळे आपण त्या ओळखू शकत नाही आहोत. उदारणार्थ, स्वमग्न लोकांविषयीचा हा लेख पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जरी रधों वा आगरकर त्या काळच्या समाजाच्या दृष्टीने वेडे वाटत असले तरी त्यांना आपण फार फार तर विक्षिप्त म्हणू शकतो; वेडे नव्हे. त्यांचे व्यवहार व वर्तणूक त्याकाळच्या समाजाच्या पठडीतल्या नव्हत्या हे एक त्याचे कारण असू शकेल. मानसिक विकारात भावस्थिती एका टोकापासून दुसऱ्या टोकाला पोचत असते. त्यामुळे त्यांच्या वर्तनात सातत्य नसते.परंतु रधों व आगरकर यांच्यात एका निर्दिष्ट उद्देशाबद्दल अट्टाहास होता, त्यात सातत्य होते व त्यासाठी कष्ट भोगण्याची मानसिक तयारी होती. गोपाळराव जोशी विक्षिप्त होते; परंतु प्रतिभावान होते असे म्हणता येत नाही.

प्रत्येक प्रतिभावान वेडा असतो वा प्रत्येक वेडा प्रतिभावान असतो असे नसून प्रतिभाशक्ती असलेल्या काही जणात, काही प्रमाणात, वेडसरपणाची झाक असते, हा निष्कर्ष योग्य ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिभाशक्ती असलेल्या काही जणात, काही प्रमाणात, वेडसरपणाची झाक असते,

एकाला हे विधान लागू होते. मि. पर्फेक्ट असं कुणि मी तरि पहिले नाही. मनोविकारांचा मागोवा वाचून प्रत्येकात काहिना कहि वेडेपण असते यावर माझा ठाम विश्वास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेडेपणा(सर्वसाधारणपणे वेडे हाच शब्द वापरला जातो, मी पठडीबाहेर वागणारे म्हणेन) आणि काळाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या व्यक्तीं या दोन वेगळ्या गोष्टींची गल्ल्त होते आहे असे मला वाटते. पठडीबाहेर वागणार्‍या व्यकती, या (काही ठरावीक गोष्टींबाबत)अतीसंवेदनाशील(sensory smart) असतात, तसेच काही गोष्टींबद्द्ल त्यांच्या जाणीवा बोथट असतात, म्हणूनच त्यांच्या त्याबाबतच्या प्रतिक्रिया तीव्र किंवा वेगळ्या असतात. याच अतीसंवेदनशीलतेमुळे त्यांना एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे शक्य होते.
पठडीबाहेर वागणार्‍यांचा एक प्रकार या लेखात लिहायचा राहुन गेला, तो म्हणजे Asperger's Syndrome. अनेक मोठ्या संशोधकांचे नाव(अल्बर्ट आईनस्टाईनसकट) या आजाराशी जोडले जाते. बर्‍याचदा Asperger's Syndrome आणि high functioning autism ची गल्लत केली जाते(मुळात high functioning ही सुद्धा एक (मला)बुचकळ्यात पाडणारी संज्ञा आहे).

कुठल्याही प्रकारे पठडीबाहेर वागणार्‍यांकरता उपचार असत नाहीत, त्यांच्या तसे वागण्याची कारणे आणि पद्धत समजावून घेऊन त्यांच्याच भाषेत त्यांच्याशी संवाद साधणार्‍या व्यक्तींची गरज असते. मागे एका हुषार स्वमग्न मुलाबरोबर काम करताना त्याच्या आईने केलेली तक्रार आठवते आहे. तिला आपल्या मुलाची लाज वाटत होती, कारण शाळेत गेल्यावर(तो दिवसाचा बराच काळ सर्वसामान्य मुलांच्या वर्गात आणि थोडावेळ खास वर्गात घालवत असे.) इतर मुलं/शिक्षक त्याला अभिवादन करत, त्याची दखल घेत नसे. मग तिच्यासमोरच दुसर्‍या दिवशीपासून त्याला नेहेमीचे 'हाय', 'हलो' न करता, मी 'लो फाईव्ह' द्यायला सुरुवात केली, ज्याची दखल त्याच्याकडून कायम घेतली गेली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादातले Asperger's Syndrome आणि high functioning autism हे सामान्यतः माहित नसणारे शब्दप्रयोग/ विकार (किंवा इतर काही योग्य शब्द?) आहेत. त्याबद्दल थोडं अधिक विस्ताराने लिहीता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Autism म्हणजेच ASD(Autism disorder spectrum), या तर्‍हेने वागणार्‍या व्यक्तींच्या जाणीवा, समज आणि skills यांचा आलेख खूप मोठा आहे. म्हणून यात low, medium आणि high functioning असे प्रकार धोबळ्मानाने पाडलेले आहेत. बोलता येणे हे high functioning असल्याचे महत्वाचे लक्षण मानले जाते. या व्यक्तींचा बुद्ध्यांक सर्वसाधारण किंवा त्याहून अधिक असतो. या व्यक्तींची social skills मात्र खूप कमी असतात.
Asperger's Syndrome मधेही high functioning autistic व्यक्तींची ही लक्षणे आढळतात. या व्यक्तींचा बुद्ध्यांक अधिक असतो, मात्र social skills मात्र खूपच कमी असतात. वागण्याच्या या दोन्ही तर्‍हा एकच आहेत किंवा नाहीत याबद्द्ल अनेक वर्षे वाद चालू आहे. शिवाय बर्‍याचदा अनेकदा तर्‍हांची सरमिसळही दिसून येते, अनेकदा Asperger's Syndrome असणार्‍या व्यक्तींमधे एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्द्ल खास आकर्षण दिसून येते. त्यामुळे आणि कमी social skills मुळे त्यांना तासन् तास एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे शक्य होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्जनशीलता आणि वेडेपणा यात काही नाते असावे असे मला वाटते. उच्च कोटीची प्रतिभा असणारे कलावंत सर्वार्थाने 'नॉर्मल' नसण्याची शक्यता अधिक असते. माझ्या मते तीव्र संवेदनशीलता हे याचे एक कारण असू शकेल. गुरुदत्त, मीनाकुमारी वगैरे नावे वर आली आहेत. शैलेंद्र, मंटो, मजाज, मदनमोहन वगैरे इतर नावेही लिहिता येतील. जीवनाचे विक्राळ, विद्रूप दर्शन सहन न झाल्याने व्यसनाधीन होणे किंवा कोणत्याही आविष्कारासाठी एखाद्या उत्तेजनेची गरज भासणे हे सर्जनशील लोकांमध्ये अगदी सहसा आढळणारे लक्षण आहे. कानकाप्या गॉफ, लिंगपिसाट मोंपासा, जुगारी दायस्तोवस्की वगैरे उदाहरणे आहेतच. दायस्तोवस्कीच्या उल्लेखाशिवाय ज्यांचे लिखाण पूर्ण होत नसे आणि ज्यांच्या उल्लेखाशिवाय माझे लिखाण पूर्ण होत नाही असे एक थोर कथालेखकही (व्यसनी नसले तरी) त्याच श्रेणीतले. खानोलकर, पानवलकर हेही त्याच रांगेतले. संपूर्नपणे 'नॉर्मल' आणि गप्पांचे फड जमवणारे, गर्दी सहन करु शकणारे; नव्हे गर्दी आवडणारे पुलंसारखे प्रतिभावंत अपवाद असतात असे मला वाटते. 'दी बॉर्डरलाईन बिटवीन बीईंग इनसेन अ‍ॅन्ड बीईंग जीनीअस इज व्हेरी थिन' हे मला पटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

कानकाप्या गॉफ, लिंगपिसाट मोंपासा, जुगारी दायस्तोवस्की

ही मंडळी नक्की कोण असावीत बुवा? वॅन गॉफ, मोपासाँ, दोस्तोयेवस्की वगैरे नावे ऐकली होती*. त्यांच्या नातेवाइकांपैकी वगैरे कोणी असावीत काय?
===
* तसे आम्ही ही अशी नावेच नुसती ऐकून असतो म्हणा! म्हणून तर ती सहसा** कोठे फेकण्याच्या*** भरीला पडत नाही. गप्प बसतो.

** तसे आम्हीही मूळचे महाराष्ट्रवंशीच. सबब, चूभूद्याघ्या.

*** तशी ही प्रथा महाराष्ट्रात सर्वप्रथम श्री. रा. रा. न. चिं. केळकर**** यांनी भर 'केसरी'च्या अग्रलेखात कोण्या श्री.'सॉमरसेट मॉघम' यांचा उल्लेख करून सुरू केली, असे आमच्या (दिवंगत) बुजुर्गांकडून विश्वसनीयरीत्या ऐकून आहोत. सबब, ही अत्यंत पुरातनकालापासून चालत आलेली अशी महाराष्ट्रातील एक प्रस्थापित जनरीत अत एव शिष्टसंमत आचार आहे, असे मानण्यास प्रत्यवाय नसावा. अर्थात, जनरीतीचे काटेकोर पालन हे केवळ समाजात वावरण्याच्या नियमास अनुसरून अत्यंत योग्य इतकेच नव्हे, तर प्रशंसनीय आणि अनुकरणीयही आहे, हे ओघानेच आले. सबब, महाराष्ट्राच्या तथा महाराष्ट्रसंस्कृतीच्या प्रस्तुत सुपुत्रास आमचे कोटिकोटि प्रणिपात!

**** हे आणखी एक नावही आम्ही केवळ ऐकून आहोत, हे कळविण्यास अतिशय आनंद होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक विषय आणि लेखन.
काही लोक, आपण वेडसर वागलो तर लोक आपल्याला प्रतिभावान समजतील अशी वेडी आशा बाळगून असलेले पाहिले आहेत !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही लोक, आपण वेडसर वागलो तर लोक आपल्याला प्रतिभावान समजतील अशी वेडी आशा बाळगून असलेले पाहिले आहेत !

हॅहॅहॅ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

काही लोक, आपण वेडसर वागलो तर लोक आपल्याला प्रतिभावान समजतील अशी वेडी आशा बाळगून असलेले पाहिले आहेत !

१. आशा ही वेडीच असते-तेव्हा द्विरुक्ती :;)

२. काही प्रमाणात तशी आशा सफल झाल्याचे पाहिले आहे, तेव्हा ती आशापण प्रतिभेचे लक्षण धरावे काय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सर्जनशील व्यक्तीच्या वेङसरपणाला रोमॅंटिक स्वरुप न देता सार्वजनिक आरोग्याचा भाग समजून उपचार पद्धती विस्तृत व अधिक बळकट करणे आवश्यक आहे.

हे पटले नाही. वेडेपणावर उपचार करायचा म्हणजे सर्जनशीलता संपवायची. हा क्रूरपणा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0