ब्रेन गेन की वाढते ओझे?

बीबीसी वर भारतात परतणार्‍या व्यक्तिंपैकी काहिंच्या निवडक प्रतिक्रीयांचे संकलन केलेला लेख वाचनात आला. हे संकलन इथे वाचता येईल.
सदर लेखाच्या मते, अनेक परदेशस्थ भारतीय भारताच्या प्रगतीच्या वेगाकडे पाहून भारतात परतत आहेतच, त्याच बरोबर काही परदेशात जन्मलेल्या - मुळ भारतीय वंशाच्या व्यक्तीही भारतात येऊ लागल्या आहेत. भारताने ज्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा भारतीय नागरीक असतील अश्या परदेशी नागरीकांना 'आजीवन भारतीय व्हीजा' देण्याचे धोरण २००५ मध्ये अमलात आणल्यापासून साधारण ११लाख परदेशी नागरीकांनी त्याचा लाभ घेतला आहे.
या विषयावर बीबीसीने चालवलेली "द इंडियन ड्रीम" ही लेखमाला रोचक आणि वाचनीय आहे.

या संदर्भात दोनेक वर्शांपूर्वीच TOI मध्ये पंतप्रधानांनी भारतीयांनी ब्रेड ड्रेनला आता ब्रेन गेनमध्ये परीवर्तित केल्याचे सांगितले होते असे वाचल्याचे आठवले

या निमित्ताने व या संदर्भात चर्चेसाठी काही प्रश्न मांडतो आहे:

१. परदेशातून परत फिरणार्‍या भारतीय व्यक्तींचे प्रमाण प्रत्यक्षात खरोखरच वाढते आहे असे वाटते का?
२. परदेशातून परतणार्‍या भारतीयांची इथल्या मातीची ओढ एकवेळ समजून घेता यावी, मात्र इथे न जन्मलेल्या न वाढलेल्या परदेशी नागरीकांना (ज्यांचे आईवडीलही परदेशांत स्थायिक आहेत) इथे स्थायिक व्हावेसे का वाटत असेल?
३. या परतणार्‍या भारतीयांच्या किंवा परकीय व्यक्तींच्या भारतात येण्याने काही ब्रेन गेन होतो आहे असे वाटते का? का तिथे संधी न मिळालेल्या / संधी मिळू न शकणार्‍या व्यक्तीच परतत असाव्यात असे तुम्हाला वाटते का?
४. प्रश्न क्रं ३ अधिक व्यापक करायचा तर या अधिकच्या मनुष्यबळाने भारताला लाभ होईल की भारतावर विनाकारण ओझे वाढेल असे तुम्हाला वाटते?

इतर समांतर, पुरवणी मतांचे स्वागत आहेच. चर्चेदरम्यान वैयक्तिक टिका-टिपण्ण्या तसेच कोणत्याही देशासंबंधी घाऊक निष्कर्ष शक्य तितके टाळावेत आणि तथ्याधारित तर्कशुद्ध चर्चा करण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

१. परदेशातून परत फिरणार्‍या भारतीय व्यक्तींचे प्रमाण प्रत्यक्षात खरोखरच वाढते आहे असे वाटते का?

आकडेवारी नाही, पण वैयक्तिक निरीक्षण असं आहे की गेल्या साताठ वर्षांत माझ्या माहितीतले अनेक भारतीय लोक परत गेले. विशेषतः सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधले. भारतात अनेक संधी आहेत, 'स्वस्तात' घर घेऊन ठेवलेलं आहे, मुलं तीनचार वर्षांची झालेली आहेत अशा अनेकांनी आपलं चंबुगबाळं आवरलं. २००१ आणि २००८ च्या मंदींमुळे एकेकाळी अमेरिकेला असलेल्या वलयाला तडे गेले हेही एक कारण असावं.

२. परदेशातून परतणार्‍या भारतीयांची इथल्या मातीची ओढ एकवेळ समजून घेता यावी, मात्र इथे न जन्मलेल्या न वाढलेल्या परदेशी नागरीकांना (ज्यांचे आईवडीलही परदेशांत स्थायिक आहेत) इथे स्थायिक व्हावेसे का वाटत असेल?

हे कितपत खरं आहे याबाबत साशंक आहे. अपवादात्मक लोकांच्या मुलाखतींमुळे असं वाटत असावं.

३. या परतणार्‍या भारतीयांच्या किंवा परकीय व्यक्तींच्या भारतात येण्याने काही ब्रेन गेन होतो आहे असे वाटते का? का तिथे संधी न मिळालेल्या / संधी मिळू न शकणार्‍या व्यक्तीच परतत असाव्यात असे तुम्हाला वाटते का?

ब्रेन ड्रेनची समस्या सत्तर ऐशीच्या दशकात होती तेवढी राहिलेली नाही. त्या काळच्या मानाने कितीतरी अधिक पट इंजिनियर आज तयार होतात. परदेशी जाणाऱ्यांची संख्या त्या प्रमाणात वाढलेली नसावी. त्यामुळे या परत येणाऱ्यांची व जाणारांची संख्या अधिक वजा केली तर पडणारा फरक नगण्य असावा.

४. प्रश्न क्रं ३ अधिक व्यापक करायचा तर या अधिकच्या मनुष्यबळाने भारताला लाभ होईल की भारतावर विनाकारण ओझे वाढेल असे तुम्हाला वाटते?

प्रश्न क्रं ३ व्यापक नसल्यामुळे पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारताने ज्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा भारतीय नागरीक असतील अश्या परदेशी नागरीकांना 'आजीवन भारतीय व्हीजा' देण्याचे धोरण २००५ मध्ये अमलात आणल्यापासून साधारण ११लाख परदेशी नागरीकांनी त्याचा लाभ घेतला आहे.

एक खुलासा असा करावासा वाटतो की, या व्हिसाचा भारतात कायमचं परत जाण्याशी अर्थाअर्थी काही संबंध नाही. भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना Overseas Citizenship of India (OCI) मिळू शकते. हा एकूण पासपोर्टसारखं दिसणारं एक रजिस्ट्रेशन कार्ड + परदेशी पासपोर्टमध्ये चिकटवलेला अाजन्म व्हिसा असा सरंजाम असतो. यामुळे भारतात जाण्याअाधी परदेशातल्या अापल्या वकिलातीकडे जाऊन व्हिसासाठी फॉर्म वगैरे भरणं अाणि तो वेळेवर मिळतो की नाही याची काळजी करणं वगैरे ताप वाचतो. सोय होत असल्यामुळे अनेक पूर्वाश्रमीचे भारतीय एकदाच OCI घेऊन टाकतात. पण त्यासाठी 'परत' गेलं पाहिजे असं मुळीच नाही; किंबहुना OCI घेऊन भारतात पुन्हा कधीही फिरकला नाहीत तरी कोणी काही विचारत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

यामुळे भारतात जाण्याअाधी परदेशातल्या अापल्या वकिलातीकडे जाऊन व्हिसासाठी फॉर्म वगैरे भरणं अाणि तो वेळेवर मिळतो की नाही याची काळजी करणं वगैरे ताप वाचतो.

शिवाय, (अमेरिकन नागरिकांकरिता) दीडशे डॉलरमध्ये दहा वर्षांचा टूरिस्ट व्हिसा (एका भेटीत सहा महिन्याहून अधिक काळ न राहण्याच्या आणि दोन भेटींमध्ये किमान दोन महिन्यांचे अंतर ठेवण्याच्या अटींवर) विरुद्ध पावणेतीनशे डॉलरमध्ये आजन्म व्हिसा (अशा कोणत्याही अटींशिवाय), यात आजन्म व्हिसा (एकदाचा*) दीर्घकालीन दृष्टिकोनातून फायदेशीर पडतो.

तसेच, बिगरअमेरिकन नागरिकांकरिता सहा महिन्यांहून अधिक काळाकरिता वैध असणार्‍या भारतीय टूरिस्ट व्हिसाची तरतूद तशीही नाही**. (फी धारकाच्या नागरिकत्वानुसार वेगवेगळी आहे.) त्यामुळे भारतीय वंशाच्या बिगरअमेरिकन बिगरभारतीयांना (दर वेळेस व्हिसा फी देत बसण्याऐवजी) ही सोय चांगलीच फायद्याची पडते.

===

* 'एकदाचा' हेही तितकेसे खरे नाही. वीस वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या धारकांकरिता प्रत्येक पासपोर्ट नूतनीकरणानंतर (सामान्यतः दर पाच वर्षांनंतर) बरीच कमी का होईना, पण नवीन फी आणि नवीन आवेदनपत्र भरून या "आजन्म" व्हीसाचे नूतनीकरण आवश्यक आहे. तसेच, वयाची पन्नाशी उलटल्यावर पुन्हा एकदा नूतनीकरण आवश्यक आहे.

** भारतीय टूरिस्ट व्हिसा हा सामान्यतः सहा महिन्यांहून अधिक काळाकरिता जारी केला जात नाही. मात्र, भारत-अमेरिका द्विपक्षीय करारानुसार केवळ अमेरिकन नागरिकांकरिता (अधिक फी भरून) पाच किंवा दहा वर्षांच्या भारतीय टूरिस्ट/बिझनेस व्हिसाची तरतूद उपलब्ध आहे. मात्र, अशा व्हिसांच्या तरतुदींत, एका भेटीत सहा महिन्यांहून अधिक न राहण्याच्या आणि दोन भेटींत किमान दोन महिन्यांचे अंतर ठेवण्याच्या उपरोल्लेखित अटी अंतर्भूत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक खुलासा असा करावासा वाटतो की, या व्हिसाचा भारतात कायमचं परत जाण्याशी अर्थाअर्थी काही संबंध नाही.

वरील खुलाशात आपण म्हटल्याप्रमाणे भाग तर आहेच. याव्यतिरिक्त, भारतात कायमचे "परत" जाणार्‍यांमध्ये एक फार मोठा वर्ग असा आहे, जो ग्रीनकार्डधारक / तत्सम प्रकारे कायमस्वरूपी परदेशस्थित आहे. (यांशिवाय एच१-बी वगैरे किंवा तत्सम दीर्घकालीन व्हिसाधारक 'नेहमीचे यशस्वी'ही आहेतच.) हा वर्ग मूलतः भारतीय नागरिकांचा आहे; यांनी अजूनही भारतीयेतर नागरिकत्व घेतलेले नाही, आणि भारतीय नागरिकत्व सोडलेले नाही; ते भारतीय पासपोर्टधारक आहेत. ही मंडळी (भारतीय नागरिक असल्याकारणाने) 'आजन्म व्हिसा'करिता पात्रही नाहीत, आणि (पुन्हा, भारतीय नागरिक असल्याकारणाने) भारतात परतण्याकरिता यांना अशा 'आजन्म व्हिसा'ची गरजही नाही; नव्हे, केवळ पासपोर्टानिशी भारतात कधीही परतण्याचा त्यांचा हक्क आहे. अशा या फार मोठ्या वर्गाच्या भारतात "परतण्या"चा आणि "आजन्म व्हिसा"च्या तरतुदीचा काहीही संबंध असण्याचे काहीच कारण नसावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भयंकर तालिबानी प्रकार, मुसलमानांच्या मतासाठी चाटुगिरी, मोठ्ठाले घोटाळे, तळापर्यंत चालु असलेला भ्रष्टाचार वगैरे मुद्दे विचारात घेउन आम्ही सध्यातरी इथेच राहणार आहोत. लोक परतत असतील त्याला घरगुती वेग्रे कारण असणार किंवा अगदीच इथे नोकरी मिळत नाही अस असु शकतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे भारतात काही चांगलं व्हावं म्हणून इकडे येऊन काही योगदान द्यायचा विचार नाहीच तर तुमचा !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इथे निवडणूकांच्या वेळेस जेवढी करमणूक होते तेवढी भारतात होत नसेल. बलात्कारातून म्हणे ईश्वरी इच्छेनेच गर्भधारणा होते, उत्क्रांती झालीच नाही, कॅथलिक ख्रिश्चनांनी आईन रँडचं साहित्य वाचू नये, स्तनांच्या कॅन्सरची (का स्त्रियांमधे होणार्‍या इतर कोणत्याश्या कॅन्सरची) लस घेतली तर म्हणे शारीरिक बिघाड होतात असली करमणूक भारतात होत नाही ना!
बाकी आर्थिक बाजूच्या गमतीजमती नंदन किंवा इतर कोणी सांगू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बलात्कारातून म्हणे ईश्वरी इच्छेनेच गर्भधारणा होते

नव्हे, नव्हे.

१. बलात्कार हा गर्भधारणेचा एक मार्ग आहे.

२. 'खर्‍याखुर्‍या' ('legitimate') बलात्कारातून स्त्रीस कधीही गर्भधारणा होऊ शकत नाही. त्याविरुद्ध तिच्या शरीरात यंत्रणा असते.

असो.

कॅथलिक ख्रिश्चनांनी आईन रँडचं साहित्य वाचू नये

हं?????

पॉल रायन मुसलमान झाल्याची बातमी आमच्यापर्यंत कशी काय पोहोचली नाही बुवा?

इथे निवडणूकांच्या वेळेस जेवढी करमणूक होते तेवढी भारतात होत नसेल.

भारतातच नव्हे, आजमितीस कदाचित जगाच्या पाठीवरच्या इतर कोणत्याच देशात होत नसेल.

(पण म्हणून त्यास घाबरून हा देश सोडून जर पळूनच जायचे असेल, तर भारतातच कशाला जायचे? उगाच भारतावरचे 'ओझे' कशाला वाढवायचे? त्यापेक्षा आमचा उत्तरेकडचा शेजारी आहे ना! 'आमच्या' वामपंथीयांचा 'कंट्री ऑफ चॉइस'!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा 'तुमचा' पॉल रायन:
No Catholic should follow Ayn Rand:

(माझ्यापर्यंत ही बातमी पोहोचली फेसबुकामुळे. फेसबुकावरची एक भक्त ख्रिश्चन 'मैत्रीण' "आता रोम यावर काय म्हणतंय या प्रतीक्षेत" असल्याचं दिसल्यामुळे कुतूहल वाढलं.)

आणि लेजिटीमेट बलात्कार हा इतिहास झाला. तुम्ही काही नवीन बातम्या वाचता का नाही? निदान 'द अनियन' तरी वाचा, मूळ बातम्यांमधे काय वाचण्यालायक आहे याचा अंदाज येत राहील. आणि हा 'तुमचा' रिचर्ड मरडॉक
'God Intended' A Pregnancy Caused By Rape, Indiana Candidate Says

पूरक वाचनः 'Mother Mary Was Essentially Raped,' Mourdock Says While Digging Self Into Deeper Hole

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा 'तुमचा' पॉल रायन:
No Catholic should follow Ayn Rand:

लेख वरवरच चाळला. परंतु प्रस्तुत विधान 'आमच्या' (?!!!!!) पॉल रायनाने केल्याचे आढळले नाही. किंबहुना, प्रस्तुत लेख हा पॉल रायनाच्या समर्थनात असल्याचाही सूर (निदान वरकरणी तरी) जाणवला नाही. (चूभूद्याघ्या.)

कदाचित सुरुवातीसच डकवलेल्या पॉल रायनाच्या छायाचित्रामुळे आपली अशी धारणा झाली असावी काय?

आणि लेजिटीमेट बलात्कार हा इतिहास झाला. तुम्ही काही नवीन बातम्या वाचता का नाही?

हो वाचतो की.

आणि हा 'तुमचा' रिचर्ड मरडॉक
'God Intended' A Pregnancy Caused By Rape, Indiana Candidate Says

हो वाचलेले आहे. परंतु यात नाविन्यपूर्ण असे काहीच नाही. किंबहुना 'खर्‍याखुर्‍या' ('legitimate') बलात्काराबद्दलचे जुने विधान अधिक चित्तथरारक, रोचक आणि उद्बोधक आहे, या आमच्या दाव्यास आम्ही अजूनही चिकटून आहोत.

बाकी, पूरक वाचन रोचक आहे, परंतु त्यातील दाव्यांशी आम्ही असहमत आहोत, असे नम्रपणे नमूद करू इच्छितो. किंबहुना, हा त्या 'पूरक' लेखात काढलेल्या निष्कर्षांप्रमाणे काही प्रकार नसून, 'अति घाई' (अथवा 'उतावीळपणा')च्या आविष्कारास वेगळ्या आवरणाखाली समाजात खपवून देण्याचा प्रकार असावा, अशी आमची अटकळ आहे. किंबहुना, संबंधित व्यक्तीचा लौकिक बाप आणि जैविक बाप ही एकच व्यक्ती असून, हा पूर्णतः 'कन्सेंटिंग अडल्ट्स'मधील स्वच्छ मामला असावा, अशी आम्हांस दाट शंका आहे. परंतु खुळचट सामाजिक समजुतींपायी इतक्या साध्यासुध्या गोष्टीस इतके विकृत स्वरूप एक तर रिपब्लिकन्स देऊ जाणोत, नाहीतर दुसरे ते एक व्हॅटिकन देऊ जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

legitimate बलात्कार म्हणजे कायदेशीर बलात्कार काय? (मला नक्की हा शब्दप्रयोगच समजलेला नाहीये.) बेकायदेशीर आणि कायदेशीर असे बलात्काराचे प्रकार मला माहीत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आय अतिशहाणा अँंड आय अप्रूव अबव्ह मेसेज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित भारतात काही चांगले झाल्यावर योगदान द्यायचा विचार असेल. (आयत्या बिळावर नागोबा ?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"भयंकर तालिबानी प्रकार, मुसलमानांच्या मतासाठी चाटुगिरी, मोठ्ठाले घोटाळे, तळापर्यंत चालु असलेला भ्रष्टाचार वगैरे ...."
हे भारताबद्द्ल लिहिताय का? असाल तर "भयंकर तालिबानी प्रकार" हे भारतात तुम्ही कुठे अनुभवलेत (आणि नेमकं काय अनुभवलय) हे जाणून घ्यायला आवडेल. आणि तुम्ही प्रत्यक्ष अनुभवले नसतील आणि ते दुसर्या कोणाला सहन करावे लागत आहेत हे पाहून तुम्हाला असह्य होत असेल तर तुमच्या भारतात न येण्याने/ राहाण्याने तुमचा त्रास कसा कमी होतोय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांच्या प्रतिसादातून मला 'कावीळ झालेल्याला जग पिवळे दिसते' या वाक्प्रचाराची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<<<आणि तुम्ही प्रत्यक्ष अनुभवले नसतील आणि ते दुसर्या कोणाला सहन करावे लागत आहेत हे पाहून तुम्हाला असह्य होत असेल तर तुमच्या भारतात न येण्याने/ राहाण्याने तुमचा त्रास कसा कमी होतोय?

मग काय सगळं अनुभव घेउनच पहावे की काय? जरा बातम्या वाचल्या / पाहील्या की कळेल मी काय म्हणतेय ते. बाकी दुर्दैवाने भ्रष्टाचाराचा अनुभव आहे. अन बाकी कशाचा प्रत्यक्ष अनुभव अन परीणाम नसेल तर उगाच घोटाळ्याच्या नावाने ओरडणार्‍यांना सांगाच तुम्ही...की काय बिघडतंय ? तुमचं कै जातंय का? असेल तर कसं? असो.
ज्याची त्याची वैचारीक क्षमता. बाकी योगदान देत होतो तेंव्हाच्या अनुभवावरुनच परत न येण्याचा निर्णय घेतलाय. तुम्हीच काय ते योगदान देउन पहा आता. बघा स्त्रीयांवर होणारे अत्याचार होताना कोण नुसतंच गंमत पहातंय का मदत करतंय? अरे हो, पुरुष असल्याने असा अनुभव घेता येणार नाही त्यामुळे फरक कैच पडत नै ही गोष्ट वेगळी हे विसरलेच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकीचं सगळं असोच, पण पुरूष आहेत म्हणून स्त्रियांवर होणार्‍या अन्यायांबद्दल अनुभव घेता येत नाही मग फरक पडत नाही हे विधान प्रचंड चूक आहे. स्त्रीशिक्षणासाठी आधी पत्नीला शिकवणारे आणि पुढे स्त्रियांसाठी शाळा उघडणारे महात्मा फुले, विधवांसाठी आश्रम उघडणारे अण्णा कर्वे, स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी संततीनियमनाचा प्रचार करणारे रधों यांच्यावर हा अन्याय आहेच. हुंडाबळी, बलात्काराच्या दाव्यांमधे स्त्रियांच्या (रास्त) बाजूने निकाल देणारे पुरूष न्यायाधीश, तपास करणारे पुरूष पोलिस अधिकारी वगैरे यांच्यावर हा अन्याय आहे. रोजच्या आयुष्यात जेंडर-बायस न बाळगणारे आणि तशी उक्ती-कृती असणारे तर कित्येक पुरूष माझ्या ओळखीचेही आहेत.

जोशात या सगळ्यांवर अन्याय होत नाही ना हे बघण्याची जबाबदारी जाणवत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या परतणार्या चिमुटभर (भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत) भारतियांमुळे काही मोठा फरक पडेल असं वाटत नाही.
कदाचित आता भारत सोडण्याच्या विचारात असलेल्यांची या परतणार्यांमुळे द्विधा मनस्थिती होऊ शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या परतणार्या चिमुटभर (भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत) भारतियांमुळे काही मोठा फरक पडेल असं वाटत नाही.

'उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया' ही गांधीजींच्या संदर्भातील उक्ती प्रसिद्धच आहे. (आणि सार्थ आहे.) मात्र, त्या प्रकाशात, गांधीजींच्याच संदर्भातील आणखी एक 'चिमूटभर' गोष्ट अंधारात राहते, दुर्लक्षिली जाते. ती म्हणजे, खुद्द गांधीजी.

तसे पहायला गेले, तर गांधीजींची गणना ही आद्य 'परतणार्‍या भारतीयां'मध्ये करता यावी. वस्तुतः, भारताच्या तत्कालीन लोकसंख्येच्या तुलनेतही एकटे गांधीजी हे सांख्यिकदृष्ट्या नगण्यच होते, आणि कदाचित तत्कालीन 'परतणार्‍या भारतीयां'ची संख्याही तशी चिमूटभरच असावी. मात्र, या 'चिमूटभरातीलही चिमूटभरा'ने भारतात एक फार मोठा दूरगामी फरक पाडलाच ना!

अर्थात, परतणार्‍या प्रत्येक भारतीयाची तुलना गांधीजींशी करण्याचा माझा मानस नाही. त्यांपैकी प्रत्येकजणच 'गांधीजी' अर्थातच नसेल. (एखादा 'टाटा'ही निघायचा; कोणी सांगावे!) मुद्दा दृष्टिकोनाचा आहे. परतणार्‍यांत पोटेंशियल 'गांधीजी' (किंवा 'टाटा') पहायचे, की येणार्‍याकडे फक्त 'आणखी एक संभाव्य ओझे' म्हणून पहायचे, हा खरा प्रश्न आहे. (व्यावहारिकदृष्ट्या, येणारे बहुतांश हे बहुधा यांपैकी कोणत्याच टोकाच्या क्याटेगरीत बसू नयेत. परंतु माणसाकडे एक उपयुक्त 'संसाधन' म्हणून पहायचे की 'ओझे' म्हणून पहायचे, हा मूलतः वृत्तीचा भाग आहे.)

अतिअवांतर: गांधीजींचे वजन (शारीरिक. राजकीय वजन जमेस धरू नये. ती गांधीजी भारतात परतल्याच्या बर्‍याच नंतरची गोष्ट आहे.) किती होते, याबद्दल मला कल्पना नाही. त्यामुळे भारतावरील 'ओझ्या'त त्यांचा हातभार किती असावा, याबद्दल काही विधान करू शकत नाही. (टाटांबद्दल डिट्टो.) मात्र, गांधीजींची काय किंवा टाटांची काय, अंगकाठी पाहून, त्यांच्यामुळे 'ओझ्या'त फार फरक पडला असावा, असे वरकरणी तरी वाटत नाही. अर्थात, गांधीजींच्या बाबतीत, गांधीजींच्या काठीचा यात विचार केलेला नाही. एखाद्या पुराणवस्तुसंग्रहालयात वगैरे उपलब्ध असल्यास, तिचे वजन करून ठरवावे लागेल. अस्तु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी येणार्यांच्या संख्येला 'चिमुटभर' म्हटलं आहे. म्हणण्याचा हेतू हा होता की, त्यांना ओझं वगैरे म्हणवसं का वाटत आहे कुणाला? उलट ते जर परकीय चलनातली संपत्ती घेऊन भारतात आले तर हा अनेक फायद्यांमधला एक फायदाच आहे भारताचा.
गांधी वगैरे उदाहरण पूर्ण अवांतर वाटलं (तुमचा गैरसमज झाल्यामुळे ते तुम्ही दिलं असं धरते). नुसते 'परत आले' म्हणजे त्यांना काहीतरी फार महान समजावं का? नाहीच म्हणेन...येऊन गांधी वगैरेंसारख काही कर्तृत्त्व दाखवलं तर उत्तमच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुसते 'परत आले' म्हणजे त्यांना काहीतरी फार महान समजावं का?

मुळीच नाही. (अतिअवांतर: गांधीजीही बहुधा 'महान समजले जाण्या'करिता परत आले असावेत, असे वाटत नाही, किंवा ते 'परत आले' म्हणून महान, असाही दावा नाही.)

मात्र, 'ब्रेन गेन की ओझे' या काहीशा सरसकट (तथाकथित) प्रश्नाच्या संदर्भात, 'पाहणार्‍याच्या नजरेवर अवलंबून आहे' हा मुद्दा ठसवण्यासाठी ते उदाहरण आले.

सांगण्याचा मतलब, येणारे 'चिमूटभर' की 'पोतेभर' हा अत्यंत गौण प्रश्न आहे; त्यांना 'गेन' मानायचे, की 'ओझे', हे पाहणार्‍याच्या नजरेवर अवलंबून आहे. येणार्‍यातले सगळेच 'गांधीजी' नसतील, सगळेच 'टाटा' नसतील, किंबहुना बहुतांश नसतील. परंतु सगळ्यांची सरसकट 'ओझे' म्हणून संभावना करून त्यांना टाकाऊ ठरवताना त्यातील 'हिरे'ही कचर्‍याच्या बादलीत जातील, इतकेच.

दुसरे म्हणजे, येणारा प्रत्येकजण जरी 'हिरा' नसला, (पक्षी: 'ब्रेन गेन'मध्ये मोडणारा नसला), तरी 'टाकाऊ' (पक्षी: 'ओझे') निश्चितच नसेल. स्वतःच्या पोटापाण्याची व्यवस्था पाहण्याची पात्रता तर त्यात निश्चित असेल. (अन्यथा तो येणार नाही. कशाला येईल?) त्यामुळे, त्याचे 'ओझे' होण्याची शक्यता नाही; त्याकडे 'ओझे' म्हणून पाहणे हे केवळ कोत्या, झापडबंद वृत्तीचे द्योतक आहे. हं, त्याचे 'ओझे' तर निश्चित होणार नाही; मात्र, त्याचा 'फायदा' कसा करून घ्यायचा, हे मात्र 'योजका'वर अवलंबून आहे.

लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे. 'परत येणारे' भारतीय / भारतवंशीय हे 'निर्वासित' म्हणून येत नाही आहेत, आणि त्यांना कायमस्वरूपी येण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन भारत सरकार त्यांच्यावर कोणतेही उपकार करत नाही आहे, आणि भारतीय (विशेषतः निवासी भारतीय) जनता तर त्याहूनही उपकार करत नाही आहे. (पुढचा काही आरोप होण्याअगोदर, भारतात 'परत' येऊन अनिवासी भारतीय आणि/किंवा भारतवंशीय भारतावर उपकार करतात, असा दावा नाही, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. मात्र, निदान अनिवासी भारतीयांच्या बाबतीत तरी, तो त्यांचा हक्क आहे. आणि परकीय भारतवंशीयांच्या बाबतीत, तसा काही 'हक्क' जरी नसला, तरी, अशी सुविधा समजा रद्द केल्यास, वैयक्तिक हितसंबंधांत थोडा अडथळा आणि काही जणांच्या बाबतीत कदाचित थोडी भावनिक दुखापत याव्यतिरिक्त त्यांचे कोणतेही फार मोठे दूरगामी नुकसान होईल अशातला भाग नाही.) सबब, अशा 'परत येणार्‍यां'च्या बाबतीत, त्यांच्या 'ओझे' बनण्याच्या शक्यतेचाही विचार करणे हे कोतेपणाचेच नव्हे, तर तद्दन मूर्खपणाचे आहे, एवढेच म्हणायचे आहे. अधिक काही म्हणणे नाही.

म्हणण्याचा हेतू हा होता की, त्यांना ओझं वगैरे म्हणवसं का वाटत आहे कुणाला?

हाच माझाही प्रश्न आहे. मात्र, तो 'येणारे चिमूटभर आहेत' या कारणास्तव नाही.

उलट ते जर परकीय चलनातली संपत्ती घेऊन भारतात आले तर हा अनेक फायद्यांमधला एक फायदाच आहे भारताचा.

'परकीय चलनाची आवक' हा 'फायदा' हे जर येणार्‍यांना 'ओझे' न मानण्याचे कारण असेल, तर ते तितकेसे तर्कास धरून नाही, असे सुचवू इच्छितो. कारण, त्या न्यायाने, ही (आणि आणखीही) मंडळी कायमची भारताबाहेर राहण्यात भारताचा अधिक फायदा आहे.

विचार करा. कायमचा 'परत येणारा' हा एकदाच काय ती परकीय चलनातील संपत्ती परत आणेल. त्यापुढे तो परकीय चलनात अधिक संपत्ती बनवू शकणार नाही. उलट कायमचे बाहेर राहणारा जर बाहेरून सारखा चलन पाठवत राहिला, तर तो चलनाचा कायमचा स्रोत होऊन बसेल.

अर्थात, एकदा(चा) परतणारा हा कदाचित एका वेळी मोठी रक्कम आणेल, हे मान्य आहे, पण तरीही, त्या एका येणार्‍यापेक्षा बाहेर जाणारे अनेकजण थोडीथोडी करत अधिक संपत्ती पाठवू शकतील, आणि पाठवत राहतील, अशी शंका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्याशी बहुतांशी सहमत....
पण शेवटच्या मुद्द्यांशी एक मुख्य असहमती:
प्रत्यक्ष माणसाने भारतात राहून होणारं योगदान हे पैशांमध्ये मोजता येणार नाही असं मला वाटतं.
भारता बाहेर राहून (कमवून) भारतामध्ये पैसे पाठवून आपण काही (भारतासाठी) करतो आहोत (तेही भारतात जो राहातोय त्याच्यापेक्षा जास्त !) हा फक्त या बाहेर रहाणार्याचा भ्रम आहे किंवा स्वतःचं बाहेर रहाणं 'जस्टिफाय' करणं आहे (तेही कोणीही ते जस्टिफाय करा असं म्हटलेलं नसताना) असंच मी म्हणेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारताबाहेर राहून पैसे मिळवून आणि ते भारतात पाठवून अनिवासी भारतीय आणि/किंवा भारतवंशीय (किमानपक्षी, जे कोणी असे पैसे भारतात पाठवतात, असे अनिवासी भारतीय आणि/किंवा भारतवंशीय) हे भारतासाठी काही करतात (आणि/किंवा निवासी भारतीयांपेक्षा अधिक करतात) असा दावाही नाही, आणि तो मुद्दाही नाही.

मात्र, भारतात कायमचे 'परतणारा' मनुष्य हा परकीय चलनाच्या स्वरूपात मोठी संपत्ती आणेल, हा जर भारताचा तदानुषंगिक 'फायदा' मानायचा झाला, तर असा 'फायदा' हा एक मनुष्य कायमचा 'परत' येण्यापेक्षा तोच मनुष्य (अधिक आणखीही असेच अनेक मनुष्य) कायमचे भारताबाहेर राहिल्यास कदाचित सांख्यिकदृष्ट्या बर्‍याच पटींनी अधिक असेल, एवढेच म्हणणे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरं... तुमच्या आधीच्या प्रतिसादावरून तुमचा हा मुद्दा असल्याचा माझा समज झाला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारता बाहेर राहून (कमवून) भारतामध्ये पैसे पाठवून निदान मी तरी स्वतःसाठीच रिटायरमेंटची तरतूद करतो. (८% फिक्स्ड व्याज, साधारण १० टक्क्यांपर्यंत ष्टॉक मार्केटमधून परतावा, फंक्शनल आणि लोकशाहीवादी सरकार वगैरे इतरत्र नसावे). भारतमातेचा उद्धार वगैरे उदात्त भावना मनात नाही हे प्रामाणिकपणे कबूल करावेसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

३. या परतणार्‍या भारतीयांच्या किंवा परकीय व्यक्तींच्या भारतात येण्याने काही ब्रेन गेन होतो आहे असे वाटते का? का तिथे संधी न मिळालेल्या / संधी मिळू न शकणार्‍या व्यक्तीच परतत असाव्यात असे तुम्हाला वाटते का?

या निमित्ताने, 'परतणारे भारतीय आणि/किंवा भारतात येऊ पाहणारे भारतवंशीय परकीय हे यापुढचे बिहारी आहेत काय?' असा पुढील चर्चेचा विषय आत्तापासूनच मांडू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे Brain होते ते ( ज्यांना चांगली बुद्धी होती ते ) तिकडेच राहीले. बाकिचे परत आले.
Software मधले लोक परत आले तर अजिबात BrainGain म्हणता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0