कांदासंस्थान का **संस्थान?

दि. ६ नोव्हेंबर, कांदा संस्थान - थेट टीका करण्यासाठी प्रसिद्ध असणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. de बंग यांनी कांदा संस्थान ग्रामपंचायतीला पुन्हा धारेवर धरले. कांदा संस्थानाची संभावना '**संस्थान' अशी करून श्री. de बंग यांनी पंचायतीच्या राजकीय नेतृत्त्वावर प्रचंड प्रमाणात टीका केली. कांदा संस्थान ग्रामपंचायतीचा पत्ता आता 'फोरास रोड' अथवा 'बुधवार पेठ' असा लिहावा असंही त्यांनी सुचवलं. श्री. de बंग यांनी अशी टीका करताना आकडेवारीही जाहीर केली. ग्रामपंचायतीमधे मुलींच्या लग्नाचं वय २४.३ वर्षापासून वाढून २४.५ वर्ष एवढं वाढलेलं आहे आणि मुलींनी आयपिल विकत घेण्याचं प्रमाण १.५% वरून १.६७ % एवढं वाढलेलं आहे याकडेही त्यांनी निर्देश केला. "ज्या माता-भगिनी आत्तापर्यंत फक्त 'व्हिस्पर' करत होत्या त्या आता मोठ्याने 'आयपिल'बद्दल बोलतात ही आपली सांस्कृतिक अधोगती नाही का?" असा थेट सवाल त्यांनी परिषदेत विचारला.

ग्रामपंचायतीची लोकसंख्या सव्वादोन हजार मानली तर पाच वर्षांपूर्वी फक्त १६ मुलींनी आयपिल विकत घेतली, तर आता या आकडेवारीनुसार १८ मुलींनी आयपिल घेतली. यात शेजारच्या ग्रामपंचायतीमधून आणलेल्या गोळ्यांचा समावेश नाही. मुलींच्या या बेजबाबदार वर्तनात पुरूष आणि वयस्कर महिलांचा समावेश नाही. या सर्वांचा समावेश केल्यास एकंदर कांदा संस्थानातल्या समाजाची नैतिकता किती खालावली आहे याचा अंदाज घेता येईल. त्याशिवाय मुलींच्या लग्नाचं वय गेल्या पाच वर्षात ०.२ वर्षांनी वाढलेलं आहे. आपल्या परंपरेत तर लग्नाआधी फुकट गेलेल्या प्रत्येक स्त्रीबीजाची तुलना मनुष्यवधाशी केलेली आहे. आपण आजचा विचार केला तरीही मुलींचं लग्नाचं वय वाढण्याचा सरळ परिणाम मुलांच्या लग्नाच्या वयावर होतो आहे आणि त्यामुळे बलात्काराचं प्रमाणही वाढतंय. समाजाच्या एवढ्या अधःपतनाला आजचे राजकारणी जबाबदार आहेत. आणि त्यापेक्षा मोठा दोषी आहे आपला मिडीया, माध्यमं.

आज माध्यमांमधे सतत दिसणार्‍या आयपिलच्या जाहिरातींमुळे मुलींना अशा गोष्टी अस्तित्वात आहेत याची कल्पना येते. पण त्याहीपेक्षा अधिक दोष आहे ते स्त्रियांची माध्यमांनी मांडलेली प्रतिमा. स्त्रियांनी शिकण्याला माझा विरोध नाही, पण म्हणून स्त्रियांनी स्वतःच्याच अब्रूवर असा घाला घालून घेणे योग्य नाही. अयोग्य संमतीवय लादण्याचे हे सर्व दुष्परीणाम आहेत. तेव्हाच "मग बलात्कारांचे काय?" असा प्रश्न तेव्हाच्या सरपंचांना विचारण्यात आला. पण या प्रश्नाचं समाधानाकारक उत्तर आत्तापर्यंत मिळालेलं नाही. बलात्कार आणि समाजाची एकंदर नैतिक अधोगती यावर स्त्रियांना ग्रामपंचायतीकडून काही मदत मिळणं मलातरी अशक्य वाटतं. स्त्रियांनी आणि नैतिकतेची चाड असणार्‍या सर्व समाजघटकांनी आता याविरोधात अत्यंत तीव्र लढा उभारणं अत्यावश्यक आहे. स्वातंत्र्यापासून आपण जे सामाजिक विकासाचे मॉडेल स्वीकारले आहे त्यात स्त्रियांचा विचार देवी असा न होता एक मनुष्य एवढाच होणार. राजकारण्यांना मतं हवी आहेत त्यामुळे ते असं करत आहेत आणि माध्यमांना पैसा हवा आहे जो स्त्रियांच्या वाढत्या क्रयशक्तीमधून मिळतो. या आयपिलसारख्या कंपन्या स्त्रियांकडून पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. या राजकीय आणि आर्थिक साम्राज्यांना धक्का द्यायचा असेल तर तीव्र लढ्याला पर्याय नाही. कांदा संस्थानातली ही अनैतिकतेची काळी जादूस्थानं नष्ट करण्यासाठी शक्ती आणायची कुठून?, असा उद्विग्न प्रश्न श्री. de बंग यांनी विचारला.

अमेरिकेत होत असलेल्या अध्यक्षीय निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज कांदा संस्थानात पत्रकार परिषद घेण्यात आली. परिषद संबोधित करण्यासाठी कांदा संस्थानातील एकमेव अमेरिका-रिटर्ण्ड, श्रेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. de बंग यांना बोलवण्यात आले होते. निवडणूकीच्या निकालासंदर्भात श्री. de बंग यांनी समाधान व्यक्त केले. कांदा संस्थानातील गरोदर पालकांसाठी, विशेषतः स्त्रियांच्या सम्यक आरोग्यासाठी श्री. de बंग व्यायामशाळा आणि कार्यशाळा चालवतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक स्त्रियांनी प्रसूतीदरम्यान फायदा झाल्याचे नोंदवले आहे.

field_vote: 
1.75
Your rating: None Average: 1.8 (4 votes)

प्रतिक्रिया

आपल्या परंपरेत तर लग्नाआधी फुकट गेलेल्या प्रत्येक स्त्रीबीजाची तुलना मनुष्यवधाशी केलेली आहे

de बंग यांचे विचार सखोल व तार्किक आहेत. कांदा संस्थानाच्या ग्रामपंचायतीने खरे तर याची तातडीने दखल घ्यायला हवी. पण आपल्या इथे विद्वत्तेची चाड आहेच कुणाला. तसा कांदा स़ंस्थानने एक प्रयोग करायचे मध्यंतरी ठरवले होते कि सडलेल्या / किडलेल्या कांद्यापासून दारु तयार करायची. पण सडलेल्या डोक्याच्या काही बुद्धीवंतांनी तो प्रयोग हाणुन पाडला. खर तर निसर्गातल्या प्रत्येक पदार्थाचा पुनर्वापर झाला पाहिजे. पण लोकशाही म्हटल कि त्याला मर्यादा आलीच. अनेकांच्या डोक्यात भरण्यासाठी सडलेले कांदे कमी पडताहेत अशी ओरड या लोकांनी केली.
भारतात तयार होउ घातलेल्या 'उन्नयनी' या वारुणीची उत्पत्ती ही ओनियन पासून ओनियनी व त्याचा अपभंश उन्नयनी असा झाला आहे असा शोध काही पाश्चात्य विचारवंतांनी लावला आहे. तर या वारुणी ने बौद्धिक उन्नयन होते म्हणुन तिचे नाव उन्नयनी असे आहे असे प्रतिपादन या वारुणीच्या संस्थापकांनी केले आहे. ही वारुणी सध्या प्रायोगिक तत्वावर तयार असुन तिचे व्यापारात लवकरच रुपांतर होणार आहे. किती काळ हे सडके बुद्धीवंत विरोध करणार? एक ना एक दिवस तिचे व्यापारीकरण अटळ आहे.
सडेतोड बातमी बद्दल बातमीदाराचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आयपील, आयपीएल, मद्य, भ्रष्टाचार, फास्ट फूड, रेव्ह पार्टीज, स्कॅम्स, प्रदूषण या जीवनावश्यक गोष्टीच आहेत. त्या नसल्या तर जगण्यात अर्थ काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"**संस्थान " यात '**' च्या जागी काय अपेक्षित आहे ? तसंच "श्री. de बंग " हे सुद्धा कशाचं विडंबन आहे का? मला यांचा काहीच पत्ता न लागल्यानं मजा आली नाही वाचनात (अर्थात हे न समजणं माझ्या मर्यादित वाचनामुळे/जनसंपर्कामुळे असेल).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दबंग असं समजून वाचलं.

तरीपण मजा आली नाही. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खरोखरच कसलाही बोध झाला नाही. कांदासंस्थानच्या मुळच्या लेखाला काहीतरी पार्श्वभूमी होती आणि ती सगळ्यांना माहित होती पण या लेखातून तर काहीच कळत नाही. आय.पी.एल कुठून आले मधूनच?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेड पांघरून पेडगावला चाललाय का हो पिसाळलेला हत्ती? आय.पी.एल. नव्हे आय-पिल- हो, आय - पिल (जस्ट चिल!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉ. अभय बंग यांनी महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती त्यावर प्रतिक्रियात्मक असा हा लेख आहे असे वाटते. (?)
लेखाच्या लेखिकेला कांदा संस्थानाचे नाव बदलून धंदा संस्थान - नांदा संस्थान - खांदा (म्हणजे खणा या अर्थाने) संस्थान करावे असे उपरोधात्मक लिहायचे असावे.
पण लेख फसलेला आहे. म्हणजे हवा तसा खणखणीत झालेला नाही. आपले मत (समाजाच्या दृष्टीने योग्य असेल किंवा अयोग्य) आणखी जोरकसपणे आणि सुस्पष्टपणे मांडायला हवे होते.
म्हणजे - सध्या सीएनएन-आयबीएन या चॅनलच्या फर्स्ट लेडी असणार्‍या सागरीका घोष यांनी कधीकाळी मांडले होते तसे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'दा' हेच अक्षर हवं असेल तर तुम्ही म्हणता तसं धंदा, नांदा, खांदा वगैरे शक्य आहे. थोडं 'कठोर'ही होता येतं म्हणा. Wink
बाकी, लेखाविषयी सहमत. जुन्या काळच्या संपादकांच्या हाती लेख पडला असता त्यांनी तो वाचला असता. मग म्हणाले असते, 'हं, ठीक. ठेवा बाजूला. नवं काही तरी पहा...' स्वानुभव आहे.
ही यमी पाट्या का टाकायला लागलीये? बरं काम करणारी माणसं हे असं का करतात हे एक कोडंच आहे सालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदीत केल्यास थेट प्रक्रियेचा संबंध *दाला 'जो'डता'च' येतो. नाही का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंजूर.
माझा गोंधळ झाला, त्याचे एक उगाचच कारण इथं आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बैदवे कांदासंस्थान या शब्दाची व्युत्पत्ती कोणी सांगेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे पहा : http://www.theonion.com/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा धन्यवाद विसुनाना Smile

कांदा मुळा भाजी | अवघी फेकाई साची|| Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं