हसर्‍या चकल्या

सध्या, जिलब्यांच्या ऐवजी बर्‍याच चकल्या पडताहेत, म्हणून म्हटलं, आपणाही पाडाव्या

प्रेरणास्थानः अजाणता ही उत्कट कविता.

अजाणताच माझ्या हातून हसर्‍या चकल्या झाल्या होत्या.
तुझी आठवण यायची तेव्हा मी त्या न्याहाळून त्यांच्या चवीची कल्पना करायचे.
सगळं कसं शांत होतं, जणू गर्भित वादळाने आसमंत भरला होता, जेव्हा तू आलास
तुझ्या एकाच कोमल स्पर्शाने माझ्या समक्ष तू त्या चकल्यांचे तुकडे केलेस
ह्या आघातातून सावरत्ये तो पाहिलं की तू क्षुब्ध झाला आहेस
आणि माझ्या भोवती विखरून पडले आहेत चकल्यांचे असंख्य तुकडे
त्यातून वाट काढताना मी ओशाळवाणी होत्ये आणि तू ?
तू दूरवर, दुष्टपणे, खाताना आता मला दिसतोयस

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुमचं प्रेरणास्थान 'अजाणताच' ही कविता आहे असं समजते...(टायपो आहे तुम्ही लिहिलय त्यात).
वाचकांच्या सोयीसाठी लिंक तरी द्यायची होती तुम्ही त्या कवितेची !
हसर्या का होईना चकल्यातरी मिळाल्या....आणखी फराळ कधी आणि कोण पाडतय याची उत्सुकता वाढली आहे. प्रेरणास्थानं तशी कमी नाहित, नाही का :)?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या चकल्यांना हसरं म्हणणं अंमळ जीवावर आलंय. सध्या परदेशात बसून "कोणी चकल्या विकणार का, चकल्या?" असा गहनगूढ प्रश्न पडलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.