देशी वधूंना चिनी वधूंची टक्कर - बातमी

(वर्जिनल ष्टोरी...)

***********************************
मुंबई - चिनी वस्तूंपाठोपाठ आता चिनी वधूंनीही भारतीय बाजारपेठेवर आक्रमण सुरू केले आहे. लगीनसराईच्या निमित्ताने "चिंक्‍स' म्हणून ओळखल्या जाणार्‍या चिनी वधू लग्नाच्या बाजारात उपलब्ध होत आहेत. शौकीन तरूण जिंदगी कुर्बान करण्यासाठी या वधूंनाच पसंती देत आहेत, असे आमचा शिलॉन्गचा वार्ताहर कळवतो.

लग्नाच्या बाजारात बीजींग-शांघायपासून थेट हुनानपर्यंतच्या मुली दाखल झाल्या आहेत. रंगरूपाने आणि स्वभावात या वधू निश्चितच भारतीय वधूंपेक्षा उजव्या ठरत आहेत. आपली वैशिष्ट्ये जपत पाच लाखांपेक्षा अधिक वधूंनी हा बाजार फुलला आहे. सर्वाधिक मागणी 'कंडा' जातीच्या वधूंना असली तरी "चिंक्‍स' ह्या चिनी वधू मुख्य आकर्षण आहेत.

पुण्यातील रोहिणी मासिकाच्या सौ. गणपुले यांनी ग्वांगझाऊहून बावीस-अठ्ठावीस वर्षांच्या काही "चिंक्‍स' आणून त्यांना पाळले. त्यापैकी पंचविशीखालच्या छोट्या "चिंक्‍स'ना लगीनसराईत तडाखेबंद डिमांड आहे. सव्वीस ते तीस वर्षांच्या मोठ्या "चिंक्‍स'चा भाव तुलनेने कमी आहे. हौस म्हणून सौ. गणपुले चीनमधील गावांमधून चिनी वधूंची खरेदी गेली चार वर्षांपासून करत आहेत. ""ग्वांगझाऊला चिंक्‍स तीन-चार हजारांना मिळतात. त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. गोरखपूरमार्गे रेल्वेने ती आणली जातात. इथल्या हवामानात त्यांची काळजी घेणे आणि त्यांचा आहार चांगला ठेवणे आवश्‍यक असते,'' असे गणपुलेताईंनी सांगितले. आतापर्यंत त्यांच्याकडील आठ "चिंक्‍स' बोहोल्यावर चढल्या आहेत. आता केवळ दोन उरल्या आहेत. "चिंक्‍स' बाजारात नवीन आहेत. मात्र, शौकीन मुलगे त्याच्याविषयी आवर्जून चौकशी करतात. नखर्‍यांमध्ये मात्र भारतीय मुलींपेक्षा ह्या वेगळ्या नाहीत. ""ह्या चिनी असल्या तरी इतर चिनी मालासारख्या बनावट नसून, "ओरिजिनल' आहेत,'' असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

उपवधू तरूणांमध्येही या मुलींना प्रथम पसंती आहे. "भारतीय मुली फार 'हाय मेंटेनान्स' असतात." त्या मानाने चिनी मुली सोशिक, कामसू असतात असे अमोल या तरुणांने बाजारपेठेत फिरता फिरता सांगितले. भारतीय मुलींचे खाण्यापिण्याचे फार नखरे सांभाळावे लागतात. बर्‍याच वेळा स्वतःच रांधून त्यांना घालावे लागते. तसेच मॅकडी, सीसीडीमध्ये वेळोवेळी न्यावे लागते. त्या मानाने चिंक्सचे लाड फारच कमी असतात. वेळप्रसंगी पाली, झुरळे यांवरही निभावून नेता येते, असे समजते. तसेच भारतीय मुलींसोबत 'सासू' हा एक त्रासदायक प्रकार वाट्याला येतो. सदानकदा मुलीकडे येऊन बसणे, 'ह्या'च्यापेक्षा तो आधी आलेला मुलगाच किती बरा होता हे सुचवत राहणे, मुलीच्या घरात नाक खुपसत राहणे इत्यादी गोष्टींचा सामना करावा लागतो. चिनी मुलींच्या आया हजारो मैलांवर रहात असल्यामुळे त्यांच्याबाबतीत हा त्रास फारच कमी आहे, असेही काहींनी सांगितले.

चिनी वर बाजारात कधीपासून येऊ लागतील, याची चौकशी करताना्ही काही तरूणी आमच्या वार्ताहराला आढळल्या.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

जबरदस्त. आयला, इथे मौजमजामध्ये श्रेणी देण्याची सोय नाही, नाहीतर या धाग्याला किमान ४.१३ तरी तारे दिले असते.

कांदेवाडी (द अनियन) ष्टाइलचा लेख आवडला. सौ. गणपुले चिनी वधूंची खरेदी करतात वगैरे मस्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखातलं शेवटचं वाक्य काळजाला भिडलं.

वैराग्य पाळणाऱ्या भारत देशात वसंत पंचमीच्या निमित्ताने मैथुनाचे खूप समर्थन केले जाते. का नाही हा उत्सव सुद्धा हिंदू उत्सवाप्रमाणेच संस्कृती-फ्रेंडली पद्धतीने साजरा केला जावा. कल्पना जरा विचित्र वाटते ना, विशेष करून मैथुन करणाऱ्या लोकांना.
(श्रेयअव्हेर - makarand ghule)

मौजमजेलाही तारे देऊन हा धागाही विनोदी धाग्यांच्या रांगेत नेऊन बसवावा का? असा उपप्रश्न इथे विचारते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लै लै भारी!

त्या मानाने चिंक्सचे लाड फारच कमी असतात. वेळप्रसंगी पाली, झुरळे यांवरही निभावून नेता येते, असे समजते.

या वाक्यावर तर हहपुवा झाली
मस्तच!

४/५

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

घरच्याच पाली, झुरळांवर भागत असल्याने भाजी आणायला म्हणून बाजारात जात नाहीत. बाजारात न गेल्यामुळे भाजीबरोबर होणारी कपड्यांची वगैरे 'इतर' खरेदी वाचते हाही फायदा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भारतीय वधु पाली व झुरळांना घाबरतात हा त्यांचा आणखी एक मायनस पॉईंट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लगीनसराईच्या निमित्ताने "चिंक्‍स' म्हणून ओळखल्या जाणार्‍या चिनी वधू लग्नाच्या बाजारात उपलब्ध होत आहेत

अबब! हसून हसून वाट लागली.... अजून थोडा मोठा लिहला असता तरी हरकत न्हवती. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झर्बडस्ट
हहपुवा
मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गमतीत असले तरीही कुणा स्त्रीची खरेदी विक्री ही कल्पना किळसवाणीच. वाचून मलाच माझी लाज वाटली.
निषेध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लग्न हा बाजार आहे. त्यातून लग्न जर ठरवून होत असेल तर घासाघिस आणि खरेदी-विक्री होते हे सत्य टाळता येण्यासारखे नाही. वरचा लेख आवडला. पाली, झुरळे वगैरे मस्तच.

पुण्यातील रोहिणी मासिकाच्या सौ. गणपुले यांनी ग्वांगझाऊहून बावीस-अठ्ठावीस वर्षांच्या काही "चिंक्‍स' आणून त्यांना पाळले.

हे वाक्य सौ. गणपुले ब्रॉथेल चालवत असाव्यात का अशी शंका मनात आणणारे वाटले. तसे काही वाक्य स्पष्ट म्हणत नाही हे मान्य करते पण ते टाळता आले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आवडला' हे कळवल्याबद्दल धन्यवाद.
विडंबन लिहीताना त्यातले किंमतीचे, 'पाळण्या' बद्दलचे उल्लेख काहींना खटकतील असे वाटलेच होते. यासाठीच मूळ बातमीची लिंक सुरवातीलाच दिली होती. सदर विडंबन हे बातमीतील वाक्यांचे सहीसही भावांतर आहे. 'अ‍ॅरेंज्ड मॅरेज' या दिव्यातून गेलेल्या बहुतेकांना त्यात मुलींना, आणि मुलांनाही कसे वस्तूप्रमाणे जोखले जाते याचा अनुभव असणारच. 'रोहिणी' मराठी जगतात कशासाठी प्रसिद्ध आहे हे सर्वजण जाणतात. त्यामुळे ब्रॉदेलबिदेलच्या शंका येण्याचे कारण नसावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोहिणी मासिक हे मुलामुलींच्या स्थळांच्या माहितीचा व्यापार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रत्यक्ष मनुष्याचा नाही. भावांतरे करताना त्यातील विनोद हलक्या प्रतीचा होऊ नये असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यंग्यपूर्ण आहे असे समजले, पण तरी लेख आवडला नाही.

लग्नाच्या बाजारात असलेल्यांकरिता "पशु/यंत्रवजा वस्तू" रूपककथा वापरली म्हणून काही मला किळस आली नाही. कारण पुष्कळदा प्रथेचे अमानुषपण अतिरंजित केले, तर गर्भितार्थात त्या प्रथेची प्रखर टीका असते.

शेवटच्या वाक्यात "भारतीय तरुणी सुद्धा चिनी युवकांना विकत घेऊ इच्छितात" असे म्हणून भारतीय स्त्रियांना काहीसे स्वतंत्र मनुष्यत्व दिलेले आहे. माझी नावड स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून नाही.

चिनी मनुष्यांना (स्त्रिया वा पुरुष, दोन्ही) खरेदी-विक्रीचा माल मानलेले आहे. अशा कथानकात व्यंग्याने कुठल्या अमानुष प्रथेची प्रखर टीका केलेली आहे? ते मुळीच समजत नाही. अशा प्रकारचा अस्फुट बाजार मला ठाऊकच नाही. त्यामुळे हे कथानक कुठल्याही अस्फुट बाजाराला "प्रत्यक्ष बाजार" रूपक देऊन पर्दाफाश करणारे वाटले नाही. (हेच कथानक अमेरिकन/युरोपियन गिर्‍हाईक आणि विक्रीस ठेवलेले चिनी/भारतीय/आफ्रिकन मजूर, अशा तर्‍हेने मांडले असते, तर व्यंग्य समजून आले असते. किंवा मुंबईस विक्रीकरिता आणलेले नेपाली/तेलुगु ग्रामीण लोक म्हणून असते, तरी व्यंग्य समजले असते. कारण आजच चालू असणार्‍या अस्फुट बाजाराचा गलिच्छपणा रूपकात स्पष्ट झाला असता. त्या बाजारांची प्रभावी टीका ठरली असती.)
अशी कुठलीच चौकट नसल्यामुळे हे कथानक निव्वळ किळसवाण्या मनुष्यविक्रीबाबत वाटले. या विडंबनाचा मूलस्रोत "चिनी बोकडांची विक्री" वाचला. किळस कमी करण्यासाठी तो संदर्भ पुरेसा नाही.

श्री. घासकडवी यांनी वरील लेखाची तुलना "दि अनियन" मधील लेखांशी केलेली आहे. मी त्या तुलनेशी असहमती नोंदवतो. (त्या विडंबनपत्रातील लेखन मला आवडते. परंतु कोणाचीसुद्धा नीच-मनाने नालस्ती केल्यासारखे मला त्यातील लेखांत जाणवत नाही. कोणाची नालस्ती केली असेल, तर "तशी नालस्ती करू नये; हे व्यंग्य तशा नालस्तीची टीका आहे" असा मथितार्थ स्पष्ट असतो.)

- - -
मोहजिरांशी मुंबईकर आगंतुकांची चढाओढ
मुंबईच्या बॉलिवूड चित्रपटांपाठोपाठ आजकाल कराचीत मुंबईकर बालकांचे आक्रमण चालू झाले आहे. स्थानिक मोहजिरांना हाणून त्यांचे खून करण्यापेक्षा कराचीकर सिंध्यांना हे मुंबईकर (स्थानिक भाषेत त्यांना "बाले" म्हणतात) लुसलुशीत आणि गंमतशीर वाटतात. ... ... कराचीकर मोहजिरांनी या वार्ताहाराला विचारणा केली आहे, की मुडदे पाडण्याकरिता घाटी त्यांना कधी उपलब्ध होतील...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>चिनी मनुष्यांना (स्त्रिया वा पुरुष, दोन्ही) खरेदी-विक्रीचा माल मानलेले आहे. अशा कथानकात व्यंग्याने कुठल्या अमानुष प्रथेची प्रखर टीका केलेली आहे? ते मुळीच समजत नाही. अशा प्रकारचा अस्फुट बाजार मला ठाऊकच नाही. त्यामुळे हे कथानक कुठल्याही अस्फुट बाजाराला "प्रत्यक्ष बाजार" रूपक देऊन पर्दाफाश करणारे वाटले नाही.
वर प्रियाली यांना दिलेल्या प्रतिक्रियेची पुनरुक्ती करीत नाही. आपल्याला या प्रकारचा बाजार ठाऊक नसेल, किंवा आपल्या खाजगी आयुष्यातला अनुभव वेगळा, कदाचित याहून वाईट असेल, याचा अर्थ या बाजारातली किळसवाणी व्यवहारिकता त्या बोकडबाजाराच्या किती जवळ जाणारी आहे, याची कल्पना आपण अधिकारवाणीने करू शकूच, असे नाही.
>>>अशी कुठलीच चौकट नसल्यामुळे हे कथानक निव्वळ किळसवाण्या मनुष्यविक्रीबाबत वाटले.
येथे वेश्याव्यवसायाचा वगैरे कोणताही संदर्भ नाही. सासू, बोहोल्यावर चढणे वगैरेतून हे पुरेसे क्लिअर होते आहे असे वाटते.

सारकॅझम / ब्लॅक ह्युमर हा तसा डायसी प्रकार, समोरच्याला विनोदाचे हाड नसले, तर त्याला त्यात विनोद न दिसता केवळ विखार दिसतो. हे थोडे पोपटाला मिरची खायला देण्यासारखे होते, त्याच्या शरीरावर कॅप्सियासिनचा कोणताही परिणाम होत नसल्यामुळे त्याला बिचार्याला तिची कोणतीही चव न लागता तो केवळ बेचव चारा उरतो. (प्राणिजगतातील दुसरी उपमा जास्त सयुक्तिक असून येथे देता येत नाही)

बाकी ते मोहाजीर वगैरे प्रकरण केवळ WTF? टाईपचे बुचकळ्यात पाडणारे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे अस्लं हाड बिड सापडवून इनोद हुतो काय? ३-४ हजारात चिंक्स मिळतात अन गोरखपूर मार्गे आणाव्या लागतात अन काळजी घ्यावी लागते, अन मार्केटात मागणी? अरे हाssड! च्याय्ला जिभेला काही हाड?

बादवे, हे सापडलं इनोदाचं हाडूक -
फनी बोन

बाकी ओरिजिनल बकरीची बातमी हाच मुळात जास्त चांगला विनोद होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लेख न आवडायला काहीच हरकत नाही. फक्त विनोदी लेखनातून 'व्यंग्याने कुठल्या अमानुष प्रथेची प्रखर टीका' किंवा 'रूपक देऊन पर्दाफाश' करण्याची आवश्यकता असते असं मला वाटत नाही. अशा प्रयोगशील लेखनाला 'जीवनासाठी कला' टाइप खांडेकरी निकष लावणं योग्य नाही. निव्वळ ऍब्सर्डिटी ही विनोदी ठरू शकते. विनोद नक्की कशाने घडतो या विषयाचा माझा अभ्यास नाही. पण आत्तापर्यंत अनेक गोष्टी निव्वळ ऍब्सर्ड, अतिशयोक्तिपूर्ण म्हणून गमतीदार वाटलेल्या आहेत. चिनी माल जर भरभरून येत असेल तर त्याची परिणती एखाद दिवस चिनी वधू येण्यात होईल असं म्हणणं ही अतिशयोक्ती आहे.

अनियनच्याच शैलीतला लेख आहे याबाबत मी ठाम आहे. ऍब्सर्ड, न घडलेल्या घटना बातमी स्वरूपात मांडणं ही अनियनची खासियत आहे. ते लेख 'सामान्य म्हणजे काय' याचा विचार करायला प्रवृत्त करतात. इथेही तसं झालेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विडंबन करताना देखिल काही संकेत पाळायला हरकत नाही.
चिनी मुली आणून पाळणे वैगेरे काहीतरीच संकल्पना वाटते.
(खुद्द चीनमध्येच १ अपत्याच्या सक्तीने लग्नाला मुली मिळत नाहीत मग व्हिएटनाम्,तैवानमधून मुली आणतात असं वाचल्याचं स्मरतं)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान विनोदी लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

या चीनी वधु टिकाऊ असतात का ? का मधुचंद्र झालयावर फेकुन द्यावे लागते?
बाकी युझ आणि थ्रो ही कल्पना जरा जास्तच वाटते बायको बद्दल नाही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0