Skip to main content

ख्रिसमस केक

साहित्य-
१५० ग्राम मैदा,
१५० ग्राम बटर,
१५० ग्राम साखर,
४ अंडी,
१ चहाचा चमचा बेकिंग पावडर,
२ ते ३ चहाचे चमचे रम,
२ ते ३ चहाचे चमचे कोको पावडर (अनशुगर्ड)जर शुगर्ड कोको/ड्रिंकिंग चॉकलेट पावडर असेल तर ५ ते ६ चमचे.
१ चमचा ब्रु किवा नेसकॅफे पावडर,
१ चमचा जायफळ पावडर,
१ ते २ चमचे दालचिनी पावडर
बदाम, काजू, अक्रोड,बेदाणे, ड्राइड चेरीज, ड्राईड प्लम्स इ.चे तुकडे साधारण वाटीभर,
४ ते ५ चहाचे चमचे दूध

कृती-
ड्राय फ्रूट्सचे तुकडे रममध्ये भिजवून ठेवा.
बटर फेसून घ्या, त्यात साखर घालून फेसा,नंतर त्यात अंडी टाकून फेसून घ्या.
मैदा,बेकिंग पावडर,कोको पावडर,कॉफी,जायफळ्,दालचिनीपूड हे सर्व एकत्र करा. त्यात चिमूटभर मीठ घाला.
हे सगळे वरील मिश्रणात घालून एकत्र करा आणि फेसा.
रममध्ये भिजत घातलेली ड्रायफ्रूट्स त्यात घाला, दूध घाला आणि सगळे नीट एकत्र करा.
केकपॅनला बटर लावून घ्या.त्यात हे मिश्रण ओता.
प्रिहिटेड अवन मध्ये १८० अंश से ला बेक करा.

5
Your rating: None Average: 5 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

पहिला प्रयोग

बरेच दिवस करायचा होता. आज वेळ गावला.
पात्राचा आकार वेगळा असल्याने आणि पहिल्यांदाच केलेला प्रयोग असल्याने धाकधुक होतीं, मात्र छान चव आली आहे. मुख्य म्हंजे फ्लफी झाला आहे (चव ख्रिसमस केक सारखी नसली तरी कॉफी+कोको केल्याने फारशी चिकित्सा न होता अर्ध्याहून अधिक केक गेल्या २० मिनिटात गटम् झाला आहे (डोळा मारत) )

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान दिसतोय. रम वापरलेली का?

छान दिसतोय. रम वापरलेली का? त्याशिवाय 'खास ख्रिसमस' चव येणार नाही.

Amazing Amy

केकमधे मीठ

केकमधे मीठ का?

फ्रॉस्टींगशिवाय ख्रिसमस केक म्हणजे मौज आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आह! माझा आवडता प्रकार! बाकी

आह! माझा आवडता प्रकार!
बाकी या केकला युरोपात 'रम'ची फोडणी देतात असं वाचलं आहे. खरं का? फोडणी देतात म्हणजे नुसती वर टाकून जाळतात का जेणेकरून केवळ गंध (अरोमा) शिल्लक राहिल

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाळगुटी

असा केक बनल्यानंतर लगेच म्हणजे गरमागरम असताना त्याला चमच्यानं थोडी रम पाजतात. ती आत मुरते आणि मग अर्थात केक आणखी चांगला लागतो.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||