कविता आणि वादळ

कविता

सगळे शब्द
ओंजळीत घेऊन
तू कागदावर शिंपडतेस...
आणि त्यातले
तुला नको असलेले शब्द
अलगद पुसून टाकतेस...
बाकी उरते
कागदावर
ती
कविता...

वादळ

कालच्या वादळात
बरंच काही उद्ध्वस्त झालं...
तुझी कविता
ती ही पडून फुटली...
आता
घरभर पसरलेले
हे शब्द
गोळा करण्यात
किती काळ जाईल
काय माहीत...

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

मनातलं वादळ कवितेत व्यवस्थित उतरलंय!.. मस्तच!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता आवडली !

अल्पाक्षरी अभिव्यक्ती आवडली.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.