श्रेणीसंकल्पनेची माहिती

(नवीन संपादित केलेला भाग ठळक फॉण्टमधे दिलेला आहे.)
०. श्रेणी या प्रकाराची आवश्यकता काय आहे?
साधारण काही वर्षांच्या मराठी आंतरजालावरच्या सफरीतून हे लक्षात आलं आहे की अनेक प्रतिक्रिया उत्तम असतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रतिक्रिया सामान्य आणि इतर थोडक्या प्रतिक्रिया खोडसाळ, भडकाऊ आणि/किंवा अवांतर असतात. अनेकांना या तिसर्‍या प्रकारच्या प्रतिक्रिया वाचण्याची इच्छा नसते. अशा प्रतिक्रिया संस्थळावर का टिकतात? कारण अनेकदा त्यांत काढण्यासारखं काही नसतं.
ज्यांना या दुसर्‍या आणि तिसर्‍या किंवा तिसर्‍याच प्रकारच्या प्रतिक्रिया बघायच्या नाहीत त्यांच्यासाठी ही एक सोय आहे. त्यांनी आपला 'थ्रेशोल्ड' वर ठेवला की त्यांना अशा प्रतिक्रिया वाचाव्या लागणार नाहीत. त्या सर्व प्रतिक्रिया मिटलेल्या/कोलॅप्स्ड दिसतील. त्यांच्या विषयावर क्लिक केल्यास अशा प्रतिक्रिया दिसू शकतात. ज्यांना प्रत्येक अक्षर-न्-अक्षर वाचायचं आहे त्यांनी आपला 'थ्रेशोल्ड' खाली -१ एवढा ठेवावा; त्यांना सर्व प्रतिक्रिया दिसतील.
या प्रणालीमुळे संस्थळाच्या रोजच्या कारभारात अधिकाधिक लोकांना सहभागी होता येतं. त्याशिवाय अनेकदा आधीच आलेल्या प्रतिसादात आपण वेगळी भर घालण्यासारखं काही नसतं. अशा वेळेस आपण वाचनीय प्रतिसादांना चांगली श्रेणी देऊन मतप्रदर्शन करू शकतो. क्वचित असलेल्या खोडसाळपणाला उघड नावं ठेवून (त्यांच्याकडे लक्ष देऊन उत्तेजन देण्याची) गरज नसते. अशा प्रतिसादांना दोन क्लिकमधे योग्य श्रेणी देऊन आपण त्यांची बोळवण करू शकतो.

आवडलेल्या प्रतिसादाचं कमी कष्टांत मूल्यमापन करून शिवाय सहमती किंवा +१ नोंदवणं शक्य होतं.

१. मला प्रतिसादांच्या विषयाच्या पुढे (स्कोरः २) असं काही दिसत आहे. हे काय आहे?
ही प्रतिसादांची श्रेणी आहे. (स्कोरः २) यापुढे माहितीपूर्ण, रोचक किंवा असं काही विशेषण दिसलं नाही याचा अर्थ हा की या प्रतिसादकाच्या प्रतिसादांची श्रेणी वरची आहे. यातल्या काही संकल्पना: (स्कोर: २) यातला दोन हे प्रतिसादाचं 'मूल्य' आहे. आधीच्या प्रतिसादकांनी काय श्रेणी दिलेली आहे हे आपल्याला आता दिसत नाही, फक्त स्कोर दिसत रहातो.

२. 'श्रेणी' म्हणजे नक्की काय?
सुरुवातीला, प्रतिसादकांची पाटी कोरी असताना त्यांच्या प्रतिसादांचं मूल्य १ असतं. ज्या प्रतिसादकांना 'माहितीपूर्ण', 'रोचक', 'मार्मिक' अशा उत्तम श्रेणी सातत्यानं मिळत राहतात, त्यांच्या प्रतिसादांचं मूल्य वाढत रहातं. ज्या प्रतिसादकांच्या श्रेणी सातत्यानं 'अवांतर', 'खोडसाळ' किंवा 'भडकाऊ' अशा येतात त्यांच्या प्रतिसादांचं मूल्य कमी होत राहतं. प्रतिसाद देतेवेळी सर्व प्रतिसादांची श्रेणी ० आणि २ यामधे असते. त्यापुढे श्रेणीदात्यांनी दिलेल्या श्रेणीप्रमाणे प्रत्येक प्रतिसादाचं मूल्य बदलत राहतं.
२अ. कोणत्या श्रेणी आहेत, त्यांचा अर्थ काय आणि त्यांची मूल्यं काय आहेत?

श्रेणीचे नाव श्रेणीचे मूल्य थोडक्यात माहिती
सर्वसाधारण +१ खूप चांगलाही नाही आणि अजिबात वाईट नाही असा 'नॉर्मल' प्रतिसाद
मार्मिक +१ मुद्द्यावर व्यवस्थित बोट ठेवणारा प्रतिसाद
रोचक +१ इंटरेस्टींग. असे प्रतिसाद कदाचित आपल्या विचारांच्या विरोधात विचार, मतप्रदर्शन करणारेही असू शकतात.
माहितीपूर्ण +१ नावावरून बोध व्हावा
विनोदी +१ नावावरून बोध व्हावा
खवचट +१ नावावरून बोध व्हावा
अवांतर -१ धाग्याशी असंबद्ध आणि ज्यात काहीही माहिती, विचार, विनोद नाही पण असा आव आणलेला आहे असा प्रतिसाद
भडकाऊ -१ एका विशिष्ट विचारानेच, इतरांना भडकवण्यासाठी दिलेला अविवेकी आणि खोडसाळ प्रतिसाद
खोडसाळ -१ व्यक्तिगत टीका, खोड्या काढणारा प्रतिसाद
निरर्थक -१ धाग्याशी असंबद्ध आणि काहीही विचार नसणारा प्रतिसाद
उपेक्षित +१ इंग्लिशमधे under-rated. प्रतिसाद चांगला आहे पण त्याकडे पुरेसं लक्ष गेलेलं/दिलेलं नाही.

कैच्याकै ही श्रेणी काढलेली आहे; खवचट अशी नवीन सकारात्मक श्रेणी आहे. नकारात्मक आणि कमी वापर असणार्‍या श्रेणी ड्रॉप डाऊन मेन्यूच्या तळाशी ढकलल्या आहेत.

३. धाग्यांच्या खाली काही खोके आहेत ते काय आहेत?

 • थ्रेशोल्ड: यातून आपल्याला किती प्रतिक्रिया वाचायच्या आहेत ते ठरवता येतं. सर्व धाग्यांसाठी आणि कोर्‍या पाटीच्या प्रतिसादांसाठी डीफॉल्ट थ्रेशोल्ड १ असा आहे.
 • डिस्प्ले: यात थ्रेडेड डिस्प्ले केला की जुन्या प्रतिक्रिया वर दिसतात; आणि प्रतिक्रियांना दिलेली उत्तरं त्यांच्याखाली तिरकी दिसतात.
  डिस्प्ले: फ्लॅट केला की नव्या प्रतिक्रिया वर दिसतात आणि सर्व प्रतिक्रिया एकाखाली एक दिसतात. प्रतिक्रियेला दिलेलं उत्तर तिरकं फॉरमॅट होऊन दिसत नाही.
 • प्रत्येक पानावर किती प्रतिक्रिया दिसाव्यात हेही आपण ठरवू शकतो. आपलं इंटरनेट कनेक्शन आणि संगणक किती जलद आहेत यावर हे ठरवावं. आपलं इंटरनेट आणि/किंवा संगणक स्लो असलं तर एका पानावर कमी (साधारण ५० किंवा ७०) प्रतिक्रिया ठेवणं इष्ट असेल. पण या दोन गोष्टी बर्‍यापैकी असल्या तर एका पानावर बर्‍याच जास्त, ९०, १५० किंवा जास्त प्रतिक्रिया ठेवल्या तरी फरक जाणवणार नाही.

हे सर्व सेटींग्ज ठरवून 'बदल साठवा' यावर एकदा क्लिक करा. हे सेटींग एकदाच करून पुरतं. (विशिष्ट प्रकारच्या तांत्रिक कामांनंतर हे सेटींग पुन्हा करावं लागण्याची शक्यता आहे. पण त्याची वारंवारिता खूप कमी असेल.) नंतर आवश्यकता वाटली तर हे बदलताही येतं. सदस्यता नसली तरीही हे सेटींग करून आपल्या ब्राऊजरमधे साठवता येतं.

धाग्यांना मिळणारे तारे आणि श्रेणी, कर्म, कर्म-मूल्य यांचा संबंध नाही.

४. श्रेणी कोण देऊ शकतं?

 • फक्त संस्थळाचे सदस्यच श्रेणीदाते सहसंपादक होऊ शकतात.
 • सध्या मर्यादित लोकांना ही सुविधा उपलब्ध आहे. उत्तम वाचक आणि प्रतिसादक असणाऱ्या सदस्यांचा यात समावेश असावा मुख्य विचार आहे.
 • आपण स्वत:च्या प्रतिसादावर श्रेणी देऊ शकत नाही.
 • श्रेणी देण्यासाठी आपल्या सदस्यखात्यात काही 'कर्म' असावं लागतं.

संस्थळावर काही काळ लेखन करूनही श्रेणी देण्याची सुविधा नसल्यास व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.

५. सदस्य-माहितीमध्ये कर्म आणि सध्याचं कर्म-मूल्य दिसतं ते काय आहे?
प्रत्येक धाग्यामुळे आणि प्रतिसादामुळे आपलं कर्म वाढतं. आपल्या प्रतिसादांना मिळालेल्या चांगल्या श्रेणींमुळे कर्म-मूल्य वाढतं. कर्म-मूल्य सरासरी पद्धतीने काढलं जातं त्यामुळे जास्त चांगल्या श्रेणी मिळाल्या की आपलं कर्म-मूल्य वाढत जातं. अधिक कर्म-मूल्य असल्यास आपल्या प्रतिसादाचं सुरूवातीचं मूल्य (उदा: स्कोर एकाच्या जागी दोन असणं) अधिक असतं.
सकारात्मक श्रेणी मिळाली की आधीच्या प्रतिसादाच्या मूल्यात एकाने वाढ होते, नकारात्मक मिळाल्यास एकाने घट होते.

५अ. प्रतिसादांच्या स्कोरसमोर दिसणारी श्रेणी कोणती असते?
बहुमत ज्या श्रेणीला असेल ती श्रेणी दिसत राहते. एखाद्या प्रतिसादाला एक खोडसाळ आणि दोन विनोदी अशा श्रेणी मिळाल्या तर तो प्रतिसाद 'विनोदी' दिसत रहातो.

६. श्रेणी देण्यासाठी कर्म कसं मिळवावं?
आपल्या लिखाणातून (लेख आणि प्रतिसाद) आपल्याला कर्म मिळत रहातं. हे कर्म (कर्म-मूल्य नव्हे) खर्च करून आपल्या प्रतिसादांचं मूल्य कमी होत नाही.

७. श्रेणी का द्यावी?

 • कम्युनिटी सर्व्हिस - आपल्या संस्थळावर चांगल्या लिखाणास प्रोत्साहन आणि वाईट लिखाणास शिक्षा करण्याचा अधिकार आपल्याला मिळतो म्हणून आपण श्रेणी द्यावी.
 • आपण "योग्य" श्रेणी देण्यामुळे आपलं कर्म-मूल्य वाढतं. समूहाचं बहुमत हे "योग्य" मत.

८. माझं कर्म, कर्म-मूल्य बाद होतं का?
होय. सध्या ३० दिवसांनी हे पुण्य संचित संपतं असं सेटींग आहे. याचा अर्थ इतरांच्या लिखाणावर चांगल्या-वाईट प्रतिक्रिया दोन क्लिकमधे देण्यासाठी निदान दर ३० दिवसांनी चांगलं, सकस लिखाण करणं आवश्यक आहे. यातून नवीन लोकांनाही संधी मिळत रहाते आणि एकाच किंवा ठराविक व्यक्तींवरच संकेतस्थळाची जबाबदारी पडत नाही.

९. खोडसाळ, भडकाऊ प्रतिक्रिया देणार्‍यांना शिक्षा काय?
सातत्यानं असे प्रतिसाद देणार्‍यांना 'दुर्लक्ष' ही शिक्षा होते. ज्या सदस्यांच्या प्रतिसादांना इतरांकडून सतत 'खोडसाळ', 'भडकाऊ', 'अवांतर', किंवा 'निरर्थक' अशा श्रेणी मिळतात त्यांच्या प्रतिसादांचं कर्ममूल्य घसरतं. त्यामुळे त्यांचे प्रतिसाद डीफॉल्ट सेटींगमधेही मिटलेलेच रहातात. अशा सदस्यांवर इतर कोणत्याही प्रकारचे निर्बंध आपोआप घातले जात नाहीत, पण चांगलं लिखाण केल्याशिवाय अशा सदस्यांकडे सतत दुर्लक्षच होतं.

१०. माझ्या चांगल्या प्रतिसादांवर कोणीतरी सतत वाईट श्रेणी देत आहे; मी काय करू?

 • त्रयस्थ नजरेनं एकदा विचार करून पहा; आपलं लिखाण आपल्याला अत्युत्तम आणि/किंवा हसू येईलसे विनोदी वाटत असेल तरी ते कोणालातरी खोडसाळ वाटू शकतं. कदाचित योग्य असली तरीही व्यक्तिगत आणि बोचरी टीका केल्यास त्याचा परिणाम वाईट श्रेणी मिळणं असा असू शकतो.
 • तरीही आपल्या योग्य लिखाणाला वाईट श्रेणी मिळाली असं वाटत असेल तर व्यवस्थापकांशी संपर्क साधू शकता. सुरुवातीला अशा चुकीच्या श्रेणी देण्याचे प्रकार दिसून आले आहेत. असे प्रकार घडू नयेत याबाबतीत व्यवस्थापक जागरूक असले तरी त्यांच्या नजरेतून अशी चूक निसटण्याची शक्यता आहेच.

११. प्रतिसादाला श्रेणी मिळाल्यानंतर मला प्रतिसाद संपादित करायचा आहे; हे अनैतिक आहे का?
प्रतिसाद देताना विचार करून द्या. प्रतिसादातल्या किंचित चुका, उदा: शुद्धलेखन, विरामचिन्हं बदलणं नक्कीच अनैतिक नाही. पण प्रतिसादाचा अर्थच बदलेल असे बदल तिथेच करण्याऐवजी खाली उपप्रतिसाद देऊ शकता.

१२. मी चुकून चांगल्या प्रतिसादाला वाईट श्रेणी दिली आहे; काय करू?
सध्यातरी दिलेली श्रेणी बदलण्याची सुविधा नाही. त्यामुळे कृपया श्रेणी देताना विचार करून द्या. पण तरीही चूक झाली तर प्रतिसादकाशी संपर्क साधून गैरसमज कमी करण्याचा प्रयत्न करा.

१३. एकच प्रतिसाद मला दोन प्रकारचा (उदा: विनोदी आणि मार्मिक) वाटतो आहे; कोणती श्रेणी द्यावी?
दोन्ही श्रेणी एकाच प्रकारच्या, म्हणजे चांगल्या किंवा वाईट असल्या तर फार फरक पडत नाही. 'खोडसाळ' आणि 'अवांतर' असणार्‍या प्रतिसादाला जी जास्त योग्य श्रेणी वाटते आहे ती देऊ शकता. तसंच विनोदी आणि मार्मिक यांमध्ये जी श्रेणी जास्त योग्य वाटते आहे ती देऊ शकता.

१४. मला संगीतातलं काहीही समजत नाही. मी तत्संबंधी धाग्यांच्या प्रतिसादांवरही श्रेणी द्यावी का?
अशी आवश्यकता नाही. ज्या प्रतिसादांबद्दल खात्री आहे अशाच प्रतिसादांना सुयोग्य श्रेणी द्या. संगीताबद्दल समज नसूनही प्रतिसाद माहितीपूर्ण वाटल्यास तशी श्रेणी जरूर द्या.

१५. अचानक श्रेणी देण्याची सुविधा दिसत नाही; काय करू?
तुमचं 'कर्म' कमी झालेलं आहे. धागे आणि प्रतिसाद देऊन तुम्ही कर्म वाढवू शकता.

१६. मला अचानक श्रेणी देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मी काय करू?
योग्य पानावर आला आहात. हा धागा संपूर्ण वाचून काढा. आणखी शंका असल्यास व्यवस्थापकांशी संपर्क साधा.

---

कोणाला श्रेणीदाते बनवलं जातं याबद्दल संस्थळाचं धोरण -

 • मर्यादित लोकांना ही सुविधा उपलब्ध आहे.
 • त्या मर्यादित लोकांत कुणाचा समावेश असावा हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे.
 • एखाद्या सदस्याला श्रेणी देण्याची सुविधा हवी असली तर त्यांनी स्वत:हून आणि खाजगीत व्यवस्थापनाला तशी विनंती करावी.
 • व्यवस्थापनाच्या निर्णयाचं कोणतंही समर्थन दिलं जाणार नाही.​ ​
 • श्रेणीदा​नाची सुविधा ही कुणाच्याही हक्काची बाब नसून ​जबाबदारी​ची​ आहे. त्यामुळे सदस्यांनी ती सुविधा​ वापरताना काळजीपूर्वक ​आणि विचारपूर्वक ​वापरावी. जर कुणी ​तिचा ​गैरवापर करताना आढळलं तर ती ​कधीही आणि पूर्वसूचना न देता ​काढून घेतली जाऊ शकते. त्यामुळे ही जबाबदारी पेलण्याची क्षमता संस्थळावरच्या आपल्या वर्तनातून सातत्यानं दर्शवीत राहणं ही अपेक्षा व्यवस्थापन श्रेणीदात्याकडून ठेवतं.
 • विशिष्ट सदस्याला श्रेणीसुविधा का नाही किंवा ती सुविधा त्यांच्याकडून का काढून घेतली ह्याविषयी कोणतंही स्पष्टीकरण व्यवस्थापन देणार नाही.
 • एकापेक्षा अधिक सदस्यनामं वापरणाऱ्यांना श्रेणीसुविधा मिळणार नाही.

प्रतिक्रिया

मुद्दा क्रमांक १० मध्ये कोणीतरी हा शब्द कसा काय येऊ शकतो? कारण मला सातत्याने चार-पाच आयडी वेगवेगळ्या मार्गाने नाकारू शकतात. त्यात ते सातत्यानं तशी नकारात्मक श्रेणी देत जातील. ते कोण हे मला थोडंच कळणार. त्यामुळं कोणीतरी याला अर्थ नाही.
म्हणून,
हे गुप्त मतदान आहे का? की मी दिलेली श्रेणी प्रतिसादकर्त्याला, लेखकाला कळते?
मला काही फरक पडत नाही कळलं तरी, पण या प्रश्नाचे उत्तर इतर अनेकांना धीर देऊ शकते.
श्रेणीमध्ये विनोदी अशी एक श्रेणी आहे. तो शब्द मला गेले दोन दिवस खटकू लागला आहे. त्या विनोदीपेक्षा मिश्कील असा शब्द वापरता येईल का? कारण आजकाल विनोदी या शब्दाला विरुद्ध अर्थच्छटाही प्राप्त झाली आहे, खरं तर तीच अधिक ग्राह्य धरली जाते, मनात पार्श्वभूमीवर तरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी चाळलेल्या मॉड्यूलच्या माहितीपत्रकाप्रमाणे. 'वन टू वन' कोणी जर टारगेट करत असेल तर दिलेल्या श्रेणीचा उपयोग होणार नाही. थोडक्यात मी जर मोडकांच्या प्रतिसादांना सतत खोडसाळ श्रेणी देत गेलो तर माझ्या श्रेणीचा परिणाम त्यांच्या प्रतिसादावर एका ठराविक काळानंतर होणे बंद होईल.

हे गुप्त मतदान आहे का? की मी दिलेली श्रेणी प्रतिसादकर्त्याला, लेखकाला कळते?

कोणालाच कळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडक्यात मी जर मोडकांच्या प्रतिसादांना सतत खोडसाळ श्रेणी देत गेलो तर माझ्या श्रेणीचा परिणाम त्यांच्या प्रतिसादावर एका ठराविक काळानंतर होणे बंद होईल.

किती काळाने? म्हणजे एखाद्याचा बाजार उठवायचा असेल तर किती वेळ हातात असतो? Wink मला कुणाचा बाजार उठवायचा नाही, पण कुणी माझा उठवण्याचा प्रयत्न करतोय असं वाटलं तर त्याला किती काळ सोसायचं आहे हे कळेल. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काळ म्हणजे घड्याळातला वेळ नव्हे. अल्गोरिदम नक्की काय ट्रेंड वापरून हे ठरवते हे पहावं लागेल. सहसा वेगवेगळे पॅटर्न सॉफ्टवेअर पडताळतं आणि त्यानूसार ठरवतं. त्यामुळे काळ हा वेळ असे न मानता, वेळ आणि कृती याचं गणिती कॉम्बिनेशन असणार असा माझा अंदाज आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अल्गोरिदम नक्की काय ट्रेंड वापरून हे ठरवते हे पहावं लागेल.

पहा की मग. बाजार उठवण्याची संधी किती काळ असते हे पहायचं आहे मला लगेच.
अल्गोरिदम असेल तर अंतिम फलिताविषयीचे काही तरी निश्चित सूत्रही असणार. क्लीष्ट असेल. पण असेलच.
ते डॉक्यूमेंटेशनची लिंक दे की. मीही थोडं वाचतो. वाडा चिरेबंदी मेंदूत काही जातं का पाहू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रावण, प्रत्यक्ष अनुभवा अंती तुमचा मुद्दा बरोबर वाटतोय,
कोणीतरी जाणुनबुजुन माझ्या पोस्ट्स ना निरर्थक वगैरे मायनस गुणांकन करते आहे, अगदी स्तोत्रांच्या धाग्यावर स्तोत्रे लिहिली तरी ते निरर्थक?
साईटचे संचालक या प्रकारास कसा आळा घालणार? वा घालू इच्छितात की नाही हा प्रश्न आहे. आणि याकरता निदान साईटचालकान्ना तरी कोण कुणाला कसली श्रेणी देतय हे समजु शकते की नाही? तांत्रिकदृष्ट्या तसे त्यांना समजणे शक्य व्हावे.
अजुन काही काळ वाट बघणे हा एक सद्यस्थितीतील पर्याय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या ३० दिवसांनी हे पुण्य संचित संपतं असं सेटींग आहे.

मला कर्माचा वापर कसा केला जातो ते अद्यापही स्पष्ट झालेले नाही. माझे कर्म सध्या ७ आहे. मी लोकांना श्रेणी दिली तरी ते कमी झालेलं दिसत नाही. ते ३० दिवसांनी शून्यावर येणार असे सेटिंग आहे का? आणि असेच सेटिंग ज्यांचे कर्ममूल्य २ आहे त्यांच्यासाठीही १ वर परत येणे असे आहे का?

+ श्रेणी ही दोन पर्यंत का जाते आणि - श्रेणी -१ पर्यंत का सिमित होते हे ही कळले नाही.

तरीही, वरील स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. सर्व मुद्दे स्पष्ट झाले नाहीत तरी हा लेख उपयुक्त वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंय.

५. सदस्य-माहितीमधे कर्म आणि सध्याचे कर्म-मूल्य दिसते हे काय आहे?
प्रत्येक धागा आणि प्रतिसादासामुळे आपल्यालं कर्म वाढतं. आपल्या प्रतिसादांना मिळालेल्या चांगल्या श्रेणींमुळे कर्म-मूल्य वाढतं. कर्म-मूल्य सरासरी पद्धतीने काढलं जातं त्यामुळे जास्त चांगल्या श्रेणी मिळाल्या की आपलं कर्म-मूल्य वाढत जातं. अधिक कर्म-मूल्य असल्यास आपल्या प्रतिसादाचं सुरूवातीचं मूल्य (उदा: स्कोर एकाच्या जागी दोन असणे) अधिक असतं.

मलाही हे स्पष्ट कळलेलं नाही. प्रियालीचं कर्म आहे ७ आणि कर्ममूल्य आहे २. म्हणजे, तिच्या प्रत्येक कर्माचं मूल्य दोन असं मिळून तिचं आजचं संचित १४ मानायचं की, कर्म सात असलं तरी कर्ममूल्य केवळ दोन म्हणजे तिच्या साडेतीन कर्मांचं मिळून एक मूल्य झालं आहे, असं काही आहे. त्यात हा खाली दिलेला खुलासा अधिक गडबडीचा. माझं कर्म आहे दोन. मूल्य आहे एक. म्हणजे काय, हे मला कळलं नाही. एक पुण्य गाठीशी जोडण्यासाठी मला दोन कर्मं करावी लागली. प्रियालीला दोन पुण्यं जोडण्यासाठी सात कर्मं करावी लागली...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्दा क्र. ८ आणि १५ बद्दल अजून थोडे स्पष्टीकरण हवे.
सकस लिखाण करणे म्हणजे धागे व प्रतिसाद दोन्ही सकस लिहिणे असे म्हणावयाचे आहे का?
काही सदस्य धागा स्वरूपात लेखन अजिबात करत नाहीत किंवा फार कमी करतात उदा. नितीन थत्ते. पण त्यांचे प्रतिसाद मात्र वाचनीय आणि मुद्देसूद असतात. तर अशा चांगल्या प्रतिसादकांनीपण कर्म, कर्म मूल्य मिळण्यासाठी धागारूपी लेखन करणे आवश्यक आहे का नुसत्या सकस प्रतिसादांनी काम भागू शकेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

निगेटिव्ह रेटींगने सामान्य वाचकाला बाय डिफॉल्ट फडतूस प्रतिसाद मिटवून ठेवता येतील. वावा! वावा!
पण काय हो? ते रेटींग देण्यासाठी मॉड्रेटर लोक्स ना ते सगळे फडतूस प्रतिसाद मुद्दाम शोधून वाचत बसायला लागणार त्याचं काय? :दिवे:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

खी: खी: मी तर मुद्दम फडतूस प्रतिसाद आधी वाचते :ऑ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हंजे माझा प्रतिसाद वाचून तर झालाच, त्यावर प्रतिक्रिया पण! माझा प्रतिसाद फडतुस असल्याचा किती हा जालीम पुराव Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लोकांच्या धाग्यांना चांगले / वाइट प्रतीसाद येणं श्रेणी वगैरे समजू शकतं पण त्यांच्या प्रतीसादांनाही श्रेणी देणं ही संकल्पना फार चूकीची वाटत आहे. विदा पूरेसा नाहीये मान्य पण आत्ता ज्या लोकांना श्रेणी द्यायची सूवीधा आहे त्यांची नावे जाहीर करावीत व एखाद्या धाग्यावर यांनी प्रतीक्रीया लिहली असेल तर त्याच्या श्रेणी व त्याच धाग्यावर त्याला आलेल्या विरोधी मताच्या प्रतीक्रीया यांची श्रेणी बघावी. निश्कर्श धक्कदायक असतील. प्रतीसादांची श्रेणी हे सहसंपादक ठरवूच शकत नाहीत. आणी राहीली गोश्ट सामान्य लोकांची तर कळणार्‍याला कळतच के प्रतीसाद काय म्हणून लिहला आहे सहसंपादकांनी त्यावर एखादा ठप्पा मारणे चूकीच्या पध्दती प्रचलीत करतील असा धोका आहे. सदस्य हे कूकूलं बाळ न्हवेत आणी सहसंपादक त्यांचे पालनकर्ते न्हवेत की त्यांनी इथल्या सदस्यंना समजवावं की चांगल काय, वाइट काय,अवांतर काय अथवा खोडसाळ म्हणजे काय वगैरे वगैरे वगैरे... फ्री स्पीच सोबत ते जसं च्या तसं कोणताही ठप्पा न मारता माननीय सदस्यापर्यंत जसं च्या तसं पोहोचवणही संस्थळाचीच प्रमूख जबाबदारी आहे. असो माझ्या पध्दीतीने मी सदरील व्यवस्था तपासत आहे वेडं वाकडं खेळून अनूभव घेत आहे, याक्षणी निश्कर्ष इतकाच आहे की श्रेणीच्या भितीने हळूहळू सदस्य/सह्संपादक त्यांचे मत स्वातंत्र्य गमावून बसतील व सकारात्म वा नकारात्म असे एकसूरी प्रतीसाद/श्रेणी द्यायला सूरूवात करतील. उदाहरणार्थ माझा हा प्रतीसाद केवळ कै च्या कै, अवांतर, निरर्थक अथवा खोडसाळ गणला जाण्याची शक्यता प्रचंड आहे कारण मी या संकल्पनेची व्यवहार्यता तपासायची पण मागणी इथं करत आहे पण ती तपासली गेली आहे असं तर कोणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही ना ? मग श्रेणी पध्दतीची विश्वासहर्ता काय ?

म्हणूनच एक सूचना अमलात आणता आली तर बघा श्रेणी पध्दती बाय डीफॅल्ट डीसेबलच असावी. ज्याना वाटतं की इथले लेख, प्रतीसाद यांचा कल समजून घ्यायला सहसंपादक नावाच्या गाइडची गरज आहे त्यांनी ते एनेबल करून कंटेट फिल्टर करून घ्याव. होय म्हातारीने टोपली झाकली आहे म्हणून सूर्यच उगवत नाही असा समज ज्यांना करून घ्यायचा आहे क्वळ त्यांनाच तो करून घेण्याची मूभा असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही शंकासमाधानाबद्दल निळ्याचे आभार.

मला कर्माचा वापर कसा केला जातो ते अद्यापही स्पष्ट झालेले नाही. माझे कर्म सध्या ७ आहे. मी लोकांना श्रेणी दिली तरी ते कमी झालेलं दिसत नाही. ते ३० दिवसांनी शून्यावर येणार असे सेटिंग आहे का? आणि असेच सेटिंग ज्यांचे कर्ममूल्य २ आहे त्यांच्यासाठीही १ वर परत येणे असे आहे का?

आजच्या लिखाणामुळे कर्म ७ असेल आणि मधल्या तीस दिवसांत काहीच लिखाण केलं नाही तर शून्य होईल. तुझ्यासारख्या लिहीत्या लोकांना या गोष्टीचा फारसा फरक पडणार नाही. पण अजिबात लिखाण न करणार्‍या लोकांना चांगलं लिखाण करण्यासाठी उत्तेजन देण्याच्या हेतूने ही मर्यादा ठेवली आहे.
कर्म कमी होताना फारसं दिसत नसेल कारण लिखाणाच्या प्रमाणात तू श्रेणीवाटप करत नसणार. मुक्तहस्ते श्रेणीवाटप व्हावं अशीही अपेक्षा आहेच.

+ श्रेणी ही दोन पर्यंत का जाते आणि - श्रेणी -१ पर्यंत का सिमित होते हे ही कळले नाही.

कर्ममूल्य -२ आहे म्हणून प्रतिसादबंदी होऊ नये म्हणूनही. हे मूळ मॉड्यूलमधलं सेटींग आहे आणि त्याच्याशी खेळण्याइतपत पीएचपीची माहिती अजून माझ्याकडे नाही. Smile

घंटासूर यांच्या शंकांबाबतः
धागाच लिहीला पाहिजे असं नाही, प्रतिसाद लिहीले तरीही कर्म मिळत रहातंच. धागा आणि प्रतिसाद लेखकांना प्रतिसादांवर मत व्यक्त करता यावं याची काळजी नक्की घेतली जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्वत:च्या प्रतिसादाला श्रेणी देत येत नाही, तद्वतच स्वतःच्या धाग्याला अन त्या धाग्यतील प्रतिसादांना श्रेणी द्यायची सुविधा नको असे वाटते. टेक्निकली शक्य असेल तर बरे असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मुद्दा मान्य आहे, फक्त टेक्निकली अनेक गोष्टी शोधाव्या लागत आहेत त्यातली ही पण एक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माहितीपुर्ण धागा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा धागा 'अद्ययावत' असा कालपासून दिसतो आहे, पण नेमके किती बदल केले आहेत हे लगेच कळत नाही. सगळ्या श्रेणी इंग्रजीत दिसताहेत, आणि आत्ता एका प्रतिसादाला श्रेणी दिल्यावर "you have 9 moderation points left" असे दिसले. पण बाकीच्या बदलांची खात्री करून घ्यायला पूर्ण धागा पुन्हा वाचावा लागतो. संपादन केलेला भाग काही वेळ वेगळ्या रंगात किंवा ठळक दिसू शकेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आत्ता फक्त श्रेणींची नावं इंग्लिशमधूनही दिली. त्याचं भाषांतर करण्याचा (तांत्रिक) प्रयत्न दोनदा फसला आहे.

संपादन केलेला भाग ठळक करण्याचा मुद्दा अगदी आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता श्रेणी दिल्यावर अख्खा धागा रिफ्रेश होतो आहे, त्यामुळे उरलेले 'नवीन' प्रतिसाद गायब होताहेत
श्रेणी दिल्यावर पान रिफ्रेश न होता पुर्वी सारखे तिथ्ल्यातोथे श्रेणी दिली जाईल असं करता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे माझ्या लक्षात आलं नाही. तू कोणता ब्राउजर वापरतो आहेस? माझ्या फाफॉ (३.क्ष) आणि एका जुनाट लिनक्स ब्राउजरवर असं होत नाहीये.

'नवीन' प्रतिसाद गायब होणं थोडं तापदायकच वाटत आहे. लवकरात लवकर यासाठी काही उपाय शोधते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी आता आय ई ८ + विंडोज विस्टा वापरत आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फायरफॉक्स+ विंडोज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुगलून काही मिळतं आहे का ते पहाते.
फाफॉच्या दोन व्हर्जन्सवर हे व्यवस्थित सुरू आहे असं दिसत आहे. इतर काही ब्राउजर्सचा प्रॉब्लेम?

निळ्या: सदस्यता कालावधी एका आठवड्याच्या वर गेला की नीट दिसतो आहे. भाषांतराच्या फायलीत मला कुठेही "१ आठवडा१ दिवस" असं दिसत नाहीये, त्यामुळ दुरूस्त काय करायचं हेच समजत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सदस्य कालावधी दुरुस्त झालेला दिसतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या शिवाय, आता स्वतःच्या प्रतिसादालाही श्रेणी देता येऊ लागली आहे.
शिवाय एकदा श्रेणी दिली तरीही पुन्हा श्रेणी देता येता आहे

**स्वारी नुसताच छिद्रान्वेशीपणा चालला आहे.. पण ड्रुपलच्या नावाने बोंब असल्याने तांत्रिक मदत तुर्तास करणे कठिण वाटते**

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>>> कर्म कमी होताना फारसं दिसत नसेल कारण लिखाणाच्या प्रमाणात तू श्रेणीवाटप करत नसणार. मुक्तहस्ते श्रेणीवाटप व्हावं अशीही अपेक्षा आहेच. कालच्यापुरते मला श्रेणीवाटप करता येऊ लागले, तेव्हा मुक्तहस्ते श्रेणीवाटप केले. तर कर्म ६ आहे तसे राहून, कर्ममूल्य मात्र सम्पुन गेले. आता मी काय करु? कसं करू?
कित्येकांचे कर्म एखाददोन असताना कर्ममुल्या मात्र सातत्याने अस्ते ते कसे काय?
असो. उत्सुकता म्हणून विचारले असे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या प्रतिसादांना किंवा तुम्ही लिहिलेल्या लेखनावरील प्रतिसादांना सातत्याने चांगल्या श्रेण्या मिळाल्या की तुमचे कर्ममुल्य (पुण्य)वाढते.
कर्म मात्र तुम्ही काढलेल्या धाग्यांच्या व प्रतिसादांच्या संख्यांशी संबंधीत आहे. जितकी संख्या जास्त तितके कर्म अधिक.
मात्र कर्माचे मुल्य (पुण्य) मिळणार्‍या बर्‍यावाईट श्रेणीने वाढते..

-- चांगल्या श्रेण्या मिळाल्याने मुल्य वाढते
-- वाईट श्रेण्या मिळाल्याने मुल्य कमी होते
-- दुसर्‍याला श्रेण्या दिल्याने मुल्य कमी होते
-- मात्र मुल्य कमी होऊ नये म्हणून ३० दिवसांत काहिच केले नाहि तर मुल्य ० होते.

मुल्य (पुण्य) कमित कमी १ असले तरच श्रेण्या देता येतात
म्हणजे श्रेणी देता येण्यासाठी चांगल्या प्रतिक्रीया द्याव्यात, चांगल्या प्रतिक्रीया मिळतील असे लेखन करावे, इतरांच्या लेखांना प्रोत्साहन द्यावे (जेणेकरून त्यांचे मुल्य वाढेल व ते तुमच्या चांगल्या लेखाला प्रोत्साहन देऊ शकतात)

बरोबर का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माहिती व्यवस्थित समजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला श्रेणी देता येते आहे काय?
हा धागा ज्याला दिसला तो श्रेणी देऊ शकतो का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रेणींच्या यादीत 'पकाऊ' अशी आणखी एक श्रेणी अंतर्भूत करता येईल काय? नजीकच्या भविष्यकाळात मोठ्या प्रमाणावर आवश्यकता (नि उपयुक्तता) निर्माण होण्याची शक्यता जाणवते.

(तूर्तास ही नेमकी अर्थच्छटा दर्शविणारी कोणतीही श्रेणी उपलब्ध नाही.)

श्रेणीमूल्य -१ असे ठेवता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"It's a mug's game, my dear. It's a mug's game." - 'न'वी बाजू.

अनुमोदन. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रेणींच्या यादीत 'पकाऊ' अशी आणखी एक श्रेणी अंतर्भूत करता येईल काय?

आयड्या आवडल्ये.
- पकलेला काळा मठ्ठ बैल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

आयुर्वेदातील मुख्य सन्कल्पना कफ पित्त वात नसून,प्राण (बायो इलेक्ट्रिकल चार्ज) ही आहे.सीस्टमस अप्रोच या तन्त्राने पाहिले तर इलेक्ट्रिकल सीस्टम किन्वा मेकनिकल व्हायब्रेशन सीस्टम आणि आयुर्वेदाधारित ह्युमन बाडी सीस्टम या एकमेकाना आनुषन्गिक आहेत.इलेक्ट्रिकल सीस्टम मधील चार्ज हा आयुर्वेद सीस्टममधील प्राण या सन्कल्पनेशी जोडता येतो.
त्याचप्रमाणे कप्यासिटन्स=कफ,कन्डक्टन्स=पित्त आणि इन्डक्टन्स=वात.
आयुर्वेदाच्या विचाराप्रमाणे प्राण हा सूर्याकडून येतो.त्यामुळे आयुर्वेदाची रचना ही दिवस रात्र आणि सूर्याच्या वर्षभराच्या स्थिती
यावर आधारलेली आहे.याच पद्धतीने सत्त्व,रज आणि तम ह्याचा अनुषन्ग चार्ज्,करन्ट्,पोटेन्शिअल डिफरन्स याच्याशी लावता येतो.परम्परागत वैद्याना इन्टरडिसिप्लिनरी माहित नसल्यामुळेसुद्धा आयुर्वेद योग्य आधुनिक सन्ज्ञावलीत प्रकट करता आला नाही.
नवीन पाश्चात्य विचारान्शी आपल्या विचारान्ची योग्य तुलना करू न शकल्यामुळे गोन्धळ होतो आहे.दम लागला टन्कताना.चुका समजून घ्याल अशी आशा करतो. :-S

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा धागा २०११ चा आहे. अजुनही हेच नियम आहेत की काही बदलले आहेत?
हे पुण्य काय असतं बुवा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उल्का

श्रेणीसंकल्पना ही निवळ्ळ कंपुगिरी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

...ही सुविधा तितकीही टाकाऊ नाही.

या सुविधेच्या वापरामागील अनेक शक्यता आणि त्यांमागील विनोदमूल्य/मनोरंजनमूल्य लक्षात घेतले आहेत काय?

अर्थात, ही सुविधा (आणि त्याचमुळे तिच्या वापरातून उद्भवणारे मनोरंजन) सर्वांस उपलब्ध नाही, हे खरेच म्हणा, आणि ही दुर्दैवाची बाब आहे. खरे तर प्रत्येक सदस्यास ही सुविधा उपलब्ध असावयास हवी - Everybody should have a right to their own bit of fun.

इत्यलम्|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"It's a mug's game, my dear. It's a mug's game." - 'न'वी बाजू.

श्रेणीसंख्या, श्रेणी, Score, श्रेणीनंतरचा स्कोर

या चारांचे कॅल्क्युलेशन कसे होते??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते एक सिक्रेट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रेणीसंख्या = ठराविक प्रतिसादाला किती श्रेणी दिल्या गेल्या.
श्रेणी = कोणकोणत्या ते ह्या धाग्यावर वर लिहिलेलं आहेच. सकारात्मक श्रेण्यांचा प्रत्येकी स्कोर +१ आणि नकारात्मक श्रेण्यांचा -१. 'मिळालेल्या श्रेणीं'मध्ये हे गणित प्वॉसॉन वितरण काढून होत असेल. म्हणजे दोन रोचक, एक मार्मिक ह्याला बहुदा रोचक ठरवलं जात असावं. कधी मला निराळी शंका येते, सगळ्यात वरच्या प्रतीची श्रेणी दाखवली जाते. हे लिहिण्यासाठी थोडं किचकट वाटतंय. विशेषतः दोन मार्मिक, दोन खोडसाळ, एक अवांतर, अशा मिश्र श्रेण्या असतील तर.
Score = दिलेल्या श्रेणींनुसार झालेला स्कोर. उदाहरणार्थ दोन मार्मिक आणि एक खोडसाळ अशा श्रेणी असतील तर स्कोर = १ + १ - १. दोन मार्मिक = +२ आणि एक खोडसाळ = -१. ह्या सगळ्यांची बेरीज
श्रेणीनंतरचा स्कोर = मूळ पुण्य + स्कोर. सगळ्यांचंच मूळ पुण्य सुरुवातीला एक असतं. त्याचं पुढचं नक्की गणित मलाही समजलेलं नाही. पण सातत्याने सकारात्मक श्रेणी मिळवल्या की पुण्य लवकरच वाढून २ होतं. अगदी क्वचित, पण सकारात्मक श्रेणी मिळालेल्या लोकांचा स्कोर ३ दिसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.