नाती रक्ताची!

रक्ताच्या नातींची ओझे वाहण्याची सक्ती का म्हणून सहन करावे?

आपल्यापैकी बहुतेकांनी दिवाळी नक्कीच साजरी केली असेल. या काळात कुटुंबियांबरोबर, नातलगांच्या गराड्यात, मित्र - मैत्रिणीबरोबर गेलेला वेळ, मारलेल्या गप्पा, खाल्लेले पदार्थ यांची अजूनही आठवण असेल. कदाचित तसे नसेलही!.... कारण आजकाल बहुतेक वेळा अशा प्रकारचे गेट-टुगेदर, कौटुंबिक मेळावे, आनंद देण्याऐवजी काही ना काही कटकटी, कटु अनुभव मागे सोडत असतात. अनेकांना हे उत्सव, मेळावे, म्हणजे ताणाचे, वैतागाचे प्रसंग वाटतात. परंतु टीव्ही सिरियल्सप्रमाणे सास-बहू - जावई, आई -बाबा, भाऊ-बहिण, मावश्या, मेहुणे.... हा खेळ - आवडो न आवडो - चालूच ठेवण्याची सक्ती असते. या गोष्टीत तुमचा प्रत्यक्ष सहभाग असल्यास हे आपण का थांबवू शकत नाही, हाही विचार तुमच्या डोक्यात येऊन गेला असेल. हा घाट पुन्हा पुन्हा घालण्यात काय हशील आहे? या कटुप्रसंगातून आपली सुटका होऊ शकत नाही का? पुढच्या वर्षी या नातलगांपासून लांब कुठे तरी जाऊन सुट्टी साजरी करावी का? हे सर्व विसरून जाणे शक्य होईल का? असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात घोळत असतील. तुम्ही स्त्री असल्यास ही कुचंबणा काही वेळा सहन करण्याच्या पलिकडे असते असे तुम्हाला वाटत असेल. तरीसुद्धा मन मारून, चेहर्‍यावर खोटे खोटे हसू आणून नातलगांची सरबराई करायला तुम्ही हजर राहत असाल.

विभक्त, चौकोनी कुटुंब पद्धती रूढ झालेली असूनसुद्धा नातलगांचे शुक्लकाष्ट अजून का सुटले नाही याचे आश्चर्य वाटते. सर्व बंधनं तोडून आपापल्या मनाप्रमाणे आपण का वागत नाही? रक्ताच्या नातींची ओझे वाहण्याची सक्ती का म्हणून सहन करावे? जन्माला घातलेल्या आई - वडिलांपासून आपण दूर राहू शकतो. परंतु इतर समवयस्क नातलगांशी एवढे चिटकून राहण्याची खरोखरच गरज आहे का? चार नातेवाइक जमले की एकमेकाची उणे-दुणे काढण्याव्यतिरिक्त दुसरा विषयच सुचत नसतो. आपापल्या श्रीमंतीची वारेमाप स्तुती, आपल्या पिलावळांची नको तेवढे कौतुक, नाहीतर इतिहासकाळातील जुने - जुनाट प्रसंगांची उजळणी... तेच तेच ऐकून कान विटलेले असतात. परस्पर विरोधी वैचारिक भूमिकेमुळे हा मौखिक सामना अटीतटीचा होत शेवटी कटू प्रसंगात त्याचा समारोप होतो. आपण काय बोलत आहोत हे दुसर्‍याला कळत नाही व तो/ती काय बोलत आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे या गेट-टुगेदरचा विचका होतो. परंतु आपणच होकार दिलेला असल्यामुळे वा आपलाच या गोष्टीसाठी पुढाकार असल्यामुळे असहायपणे या प्रसंगाला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो.

या संबंधात एक प्रश्न विचारावासा वाटतो. आपण आपल्या कौटुंबिक सौख्यासाठी किती किंमत मोजू शकतो? हा प्रश्न कदाचित बालिश वा मूर्खपणाचा आहे, असेच वाटेल. कारण आपल्या कौटुंबिक सौख्यासाठी वाटेल ती किंमत द्यायला तयार आहोत, असेच आपल्याला वाटत असते. परंतु आपण आपल्या कुटुंबियांवर जिवापाड प्रेम करावे वा कुटुंबियांच्या सहवासातील आनंद उपभोगत राहावे असा कुठलाही लिखित वा अलिखित वा वैश्विक नियम नाही. गंमत म्हणजे याविषयी आपल्याला काय वाटते हे महत्वाचे असून काय वाटायला हवे हे महत्वाचे नाही.

तुमच्या या विषयाबद्दलच्या भावना सुस्पष्ट आहेत. परंतु इतर काही अनिवार्य गोष्टीमुळे तुम्ही त्यातून सहजासहजी बाहेर पडू शकत नाही, हेही तितकेच खरे. उदाहरणार्थ ती एक जबाबदारी असू शकते, वा आपल्याला आवडत नसले तरी दुसर्‍यांच्या समाधानासाठी वा त्यांना दुखवू नये यासाठी थोडीशी कळ सोसली तरी काही बिघडत नाही, असाही विचार त्यामागे असू शकतो. अगदीच मजा येत नसले तरी वा अस्वस्थ वाटत असले तरी कौटुंबिक सौख्याचा दूरगामी परिणामांचा विचार करून आपण अशा प्रसंगी कसे वागायचे हे ठरवत असतो.

यातून काही मार्ग काढता येईल का हा प्रश्न आता आपल्यासमोर आहे. काही तडजोड काढण्यासारखे असल्यास त्याचा विचार करणे गरजेचे ठरेल. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी काही रणनीती ठरवता येईल का, याचाही विचार करावा लागेल. आपले काय चुकले याचाही आढावा घेता येईल. आपण नेहमीप्रमाणे चाकोरीत अडकलो आहोत का? चाकोरीबद्धता, गतानुगतिकता, रूढी, परंपरा यातून सुटका नाही असे आपल्याला वाटत आहे का? त्याच वेळी मनस्ताप सहन करून घेण्याची तयारीसुद्धा आपल्यात आहे का? एक मात्र खरे की गोष्टी हाताबाहेर जाण्याआधीच काही उपाय शोधणे गरजेचे आहे. अन्यथा आयुष्यभर एकमेकाची तोंड न पाहण्याची पाळी आपल्यावर येईल. म्हणूनच थोडीशी मनाला मुरड घातल्यास नंतर होणारा मनस्ताप, त्रास कमी होण्याची शक्यता आहे व तेवढी मानसिक तयारी आपल्याला ठेवावीच लागेल. तोडण्यासाठी वेळ लागत नाही; परंतु तुटलेली नाती जोडणे अशक्यातली गोष्ट ठरू शकते.

नातेसंबंध जपण्यासाठीच्या इतरांच्या अवास्तव अपेक्षाबद्दल तुमच्या मनात नक्कीच अढी असेल. परंतु त्याचवेळी इतरांनी तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला स्वीकारावे ही तुमची अपेक्षा रास्त आहे का, याचाही विचार करणे गरजेचे आहे. अशा नको असलेल्या मेळाव्यात कमीत कमी वेळ देणे, उशीरा येणे. लवकर निघून जाणे, वा हे आवडत नाही, ते आवडत नाही असे म्हणत जमलेल्या मैफलीचा रसभंग करणे, इतरांशी तुटकपणाने वागणे, यातून काही साध्य होईल का याचाही विचार करणे जरूरीचे आहे.

अनेक वेळा हे कटू प्रसंग तुमच्या स्वाभिमानाला धक्का पोचवतात. तुम्ही जपत असलेल्या मूल्यांची खिल्ली उडवतात. काही नाती इतके त्रासदायक ठरतात की त्यांचा सहवास एका मिनिटासाठीसुद्धा सहन करणे अशक्यप्राय ठरते. ब्लड रिलेटिव्ह्ज नव्हे तर ब्लडी रिलेटिव्ह्ज वाटू लागतात. तुमच्या प्रत्येक गोष्टीवर त्यानी केलेला टीकेचा भडिमार सहनशक्तीच्या पलिकडचा ठरतो. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कुठल्यातरी प्रवासी कंपनीला गाठून दूर कुठेतरी - फक्त तुम्ही नवरा-बायको व मुलं - लांब सहलीला जाणे सर्वांच्या दृष्टीने सोइस्कर ठरेल.

परंतु यातून प्रश्न सुटत नाही. अशा प्रकारच्या तडकाफडकी निर्णयातून मूळ समस्येला उत्तर मिळेल का याचाही विचार करणे गरजेचे आहे. आपले कर्तव्य, आपली जबाबदारी, यापूर्वीच्या कटुप्रसंगांचे दाखले, इतर नातलगांची आपल्या पडत्या काळातील वागणूक, इत्यादी सर्व गोष्टींच्या रसायनातून अशा गेट टुगेदरचा विचका होत असतो हे आपण विसरू शकत नाही. काही तरी निमित्त काठून मुळात रक्ताची नाती उधळून टाकण्याचा हा आपला अट्टाहास तर नसेल ना? ही शक्यतासुद्धा विचारात घ्यावी लागेल. आपण कुठल्यातरी काल्पनिक नैतिक दबावाखाली आपले निर्णय घेत नाही ना याची तपासणी करावी लागेल.

एका मानसतज्ञाच्या मते असल्या प्रकारचे ताण तणाव आपण equal footing वर नसल्यामुळे होत असतात. काही कारणामुळे आपण स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे (वा अत्युच्च) समजत असतो. व इतरही तसेच समजत असल्यामुळे कोंडी फुटत नाही. आपलं म्हणजे बाळ, इतरांच कार्ट.... ही मनोवृत्ती आपण जोपासत असल्यामुळे ताण वाढत जातो. कदाचित आपल्यापैकी कुणी तरी स्वत:च्या अपत्यापेक्षा इतराच्या अपत्याला झुकते माप देण्याचा प्रयत्न केल्यास तो सर्वांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरू शकतो. A moral monster.... कदाचित हे काही काळापुरते असले तरी आपल्यावर रक्ताच्या नात्यांचा नैतिक दबाव असतो हे मान्य करायला हवे. म्हणूनच आपण आपले श्रम, वेळ, पैसा इतर अपरिचितांपेक्षा आपापल्या जवळच्या नात्यावरतीच खर्ची घालत असतो. आपले नातलग (व काही प्रमाणात आपले काही निवडक मित्र) इतर अपरिचितांपेक्षा जवळचे वाटतात. आपल्या दु:खद प्रसंगी त्यांचाच आधार वाटतो. माणसांच्या उत्क्रांती काळापासूनच कळप करून राहणे हा गुणविशेष आपल्या सर्वांच्यात आहे. या हार्डवायरिंगपासून सुटका नाही. जर आपण सर्व आपल्या रक्ताच्या नात्यांना जवळ न करता इतर अपरिचितांना झुकते माप देऊ लागल्यास आणखी गोत्यात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फार मनस्ताप करून न घेता (व कुणालाही न दुखवता) या परिस्थितीतून मार्ग काढणे हेच शहाणपणाचे ठरू शकेल.

खरे पाहता नैतिकता सर्वांना एकसारखे वागवलेच पाहिजे अशी अपेक्षा करत नाही. काही अपवादात्मक परिस्थिती वगळता, आपली नैतिक जबाबदारी प्रथम आपल्या जवळचे नातलग, त्यानंतर मित्र व त्यानंतर इतर या उतरंडीच्या क्रमात विभागली जात असते. आवडो न आवडो काही गोष्टी पाळण्याचे आपल्यावर बंधन आहे. वृद्ध माता पित्यांना भेटण्यात तुम्हाला समाधान मिळत नसले तरी वा त्यांना त्याची गरज वाटत नसली तरी तुम्हाला ते ओझे वाहावे लागेल. कारण हा तिढा आपली आवड, आपले समाधान व आपले कर्तव्य यांच्यातला आहे. याला पर्याय नाही!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

"..कारण आजकाल बहुतेक वेळा अशा प्रकारचे गेट-टुगेदर, कौटुंबिक मेळावे, आनंद देण्याऐवजी काही ना काही कटकटी, कटु अनुभव मागे सोडत असतात. अनेकांना हे उत्सव, मेळावे, म्हणजे ताणाचे, वैतागाचे प्रसंग वाटतात. परंतु टीव्ही सिरियल्सप्रमाणे सास-बहू - जावई, आई -बाबा, भाऊ-बहिण, मावश्या, मेहुणे.... हा खेळ - आवडो न आवडो - चालूच ठेवण्याची सक्ती असते."

या अशा काही मुद्द्यांशी सहमत. मला मुख्य एक गोष्ट अनेक वेळा खटकते ती म्हणजे तुम्ही तुमच्या नातलगांवर प्रेम करता ते व्यक्त करण्यासाठी अगदी निवडक,मोजकेच मार्गं आहेत....उदा: जेवायला बोलावणे..आणि तुम्ही स्वतः जेवण करून घालणे; वाढदिवसाच्या दिवशीच फोन केला पाहिजे, वगैरे तत्सम.
प्रेम असतं, पण या एकाच ठराविक मार्गानी ते व्यक्त करण्यास एखाद्याला आवडत नसेल/जमत नसेल तर गैरसमज करून घेतले जातात.

"खरे पाहता नैतिकता सर्वांना एकसारखे वागवलेच पाहिजे अशी अपेक्षा करत नाही. काही अपवादात्मक परिस्थिती वगळता, आपली नैतिक जबाबदारी प्रथम आपल्या जवळचे नातलग, त्यानंतर मित्र व त्यानंतर इतर या उतरंडीच्या क्रमात विभागली जात असते. आवडो न आवडो काही गोष्टी पाळण्याचे आपल्यावर बंधन आहे. वृद्ध माता पित्यांना भेटण्यात तुम्हाला समाधान मिळत नसले तरी वा त्यांना त्याची गरज वाटत नसली तरी तुम्हाला ते ओझे वाहावे लागेल. कारण हा तिढा आपली आवड, आपले समाधान व आपले कर्तव्य यांच्यातला आहे. याला पर्याय नाही!"
नात्यांचं एकूण ओझं करून ठेवलं जातं अस वाटतं कधीकधी.
यावरून वाचनात आलेलं हे आठवलं. काही निवडक भाग इथे देते:
"Indians are risk averse . And that is because of the threat of violence in case they don't follow expectations of others.

Our conformity and mediocrity is not an inborn personality trait, it is a survival strategy that has proved viable in an atmosphere of intimidation and oppression. India suffers from a severely oppressive state machinery which makes sure its citizens always stay docile and grateful for any little freedom that they are allowed.

Let's go over some aspects of our lives and how they are subject to control:

Relationships: Not only the society, but the state will come after you with sticks and guns if you fall in love with the "wrong" person. The police is too happy to arrest you based on your in-laws' statements. And you better make sure you get married to the "right" person the first time. If your wife doesn't like you, well, the police is too happy to arrest you on her complaint. If you want a divorce, well, good luck with that! The courts will take decades to decide on your case.

What if you decide to just be on your own and to hell with the family and community? If you decide not to support your old parents, in many Indian states you can be sent to jail.

If you are in a live-in relationship or are single beyond a "reasonable" age, you may be hard pressed to find a rented accommodation because landlords are a law unto themselves and a tenant cannot ask for non-discrimination."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंकमधला लेख बहुत रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या ब्लॉग वरचे आणिक बरेच लेख आणखीन दर्जेदार आणि मार्मिक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नात्याची किंमत नात्यातून कोणती गरज (म्हणजे भावनिक, शारीरिक, बौद्धिक किंवा आर्थिक) भागवली जाते यावर ठरते. जर कोणतीच गरज भागविली गेली नाही तर नात्याचे ओझे बनते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा लेख वाचून असे मनांत आले की आमचे नातेवाईक फारच समंजस आहेत. दिवाळीनिमित्त जमले तरी आजवर कोणाचा त्रास वाटला नाही. जे समविचारी नाहीत ते भेटतच नाहीत, फक्त लग्नकार्यप्रसंगीच भेटतात. जे समविचारी आहेत ते वर्षभर आवर्जून प्रेमाने भेटतात. ताणतणाव वगैरे होतच नाहीत. त्यामुळे वरील अनुभव नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे. Smile
आम्हाला कंटाळा येणार्‍या नातेवाईकांना आम्ही बोलवतच नाही.. ज्यांना आमचा कंटाळा येतो ते (किमान आपणहून) येत नाहीत.. ज्यांना बोलावतो त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा दुतर्फी असल्याने लेखात व्यक्त केलेली चिडचिड अनुभवायचा योग तसा दुर्मिळ आहे. (दुर्मिळ अशासाठी की, ज्या नावडत्या / ज्यांना आम्ही आवडते आहोत अश्या व्यक्ती न बोलवता आल्यावर मात्र असे प्रसंग उद्भवतात खरे.. मात्र ते एकदाच.. पुढल्यावेळी दोन्ही पक्षांनी योग्य तो धडा घेतलेला असतो)

बाकी इतरांची लग्न-ते-लग्न भेटीगाठी होऊन कमी परिचयामुळे संबंध टिकलेले नातेवाईक, फक्त स्वतःच्या लग्नातच भेटलेली दुर्मिळ जमात वगैरेंना या अभ्यासातून स्वयंस्पष्ट कारणाने वगळता येतेच

बाकी, आम्ही कोणत्याही सण, पुजा, बड्डे वगैरे 'निमित्ते' तयार करत नाही. उलटपक्षी अशी निमित्ते 'निर्माण' करून घोळ घालायला काहीसा विरोधच आहे. एक तर सण/पुजा वगैरे साजरे करा नाहितर फक्त लोकांना घरी बोलवा (जेवायला म्हणूनच नव्हे तर एकूणच चांगला वेळ एकत्रित घालवयला / गप्पा टप्पांसाठी घरी बोलवा - ज्यात जेवण हा आपोआप येणारा भाग) दोन्ही - नातेवाईक + समारंभ- एकत्र करून घोळ वाढतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असे नको तेव्हा उगवणारे वगैरे नातेवाइक माझेही कुणी नाहीत.
बाकी, नाती जपताना, ती लादणे टाळावे अन सहनशीलता वाढवावी असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रेमाचा आग्रह या नावाखाली काही नातलग सक्ती करतात. त्यांच्याशी मी तुसडेपणाने वागतो. मला आग्रह आवडत नाही. मी इतरांना आग्रह करत नाही. पण आवाहन करतो.
काही नातेवाईक इमोशनल ब्लॅकमेल करण्यात पटाईत असतात. त्यांना हव तस इतरांकडून करुन घेण्यात त्यांचा आनंद असतो पण इतरांसाठी ते त्रासाच असू शकत याच त्यांना भानही नसत.
असो जगा व जगू द्या ही पॉलिसी उभयपक्षी उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

रक्ताच्या नात्याच्या अनुभवांशी सहमत. शक्यतो वादच जास्त होतात. माझ्या आठवणीतले बहुदा सगळेच सणसमारंभ आणि कार्यक्रम याचेत्याचे मानपान सांभाळणे आणि रुसवेफुगवे यामुळे विलक्षण तणावपूर्ण झाले होते. आता केवळ तोंडदेखले संबंध ठेवल्याने तो त्रास नाही त्यापेक्षा आपण स्वतः निवडलेले काही मोजके मित्र आणि रक्ताचे नसले तरी दूरचे काही प्रेमळ नातेवाईक यांच्याशी संबंध ठेवलेले चांगले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वृद्ध माता पित्यांना भेटण्यात तुम्हाला समाधान मिळत नसले तरी वा त्यांना त्याची गरज वाटत नसली तरी तुम्हाला ते ओझे वाहावे लागेल. कारण हा तिढा आपली आवड, आपले समाधान व आपले कर्तव्य यांच्यातला आहे. याला पर्याय नाही!

वृद्ध मातापित्यांना भेटण्यात समाधान वाटत असले तरी भेटता येईलच असेही नाही.
त्यामुळे आता हे वृद्धांनीच ओळखायची वेळ आलेली आहे की जग नेहमीच तरूणांसाठीच होतं आणि असेल. आपली मुलं संसाराला लागल्यावर त्यांचे जोडीदार आणि लहान मुलं यात मग्न होणार. वृद्धांनी आपली आर्थिक, सामाजिक, भावनिक सोय आपणच पाहिलेली बरी. कायद्याने मुलांनी मेन्टेनन्स देणे बंधनकारक असल्याने तो घ्यावा आणि मजेत राहावे.
आज तरूण असलेले पुढे वृद्ध होतील तेव्हा त्यांच्यावर हीच वेळ येणार, त्यामुळे उगाच भलत्या रुढी, परंपरा आणि संकेतांच्या मागे न लागता त्या परिस्थितीसाठी सज्ज झालेले बरे.
जिथे मातापित्यांना भेटायला वेळ होत नाही तिथे बाकीच्या नातेवाईकांची काय कथा? अगदीच कोणी जवळ राहात असेल आणि समवयस्क, समविचारी, मित्रवत् असतील तर थोडंसं येणंजाणं होतं. दिवाळीला किंवा उन्हाळीसुटीत परगावी राहणार्‍या नातेवाईकांकडे जाऊन आठवडाभर राहणे वगैरे गोष्टी जवळजवळ इतिहासजमा झाल्या आहेत.
ज्यांना समाधान वाटत नसूनही निव्वळ कर्तव्य म्हणून नातेसंबंध जपायची निकड वा जबरदस्ती भासते ते "लोक काय म्हणतील" या रोगाचे बळी असतात असे वाटते.
रच्याकने: चेपुवर एक पोस्ट वाचली होती "आपला मुलगा श्रावणबाळ व्हावा असं प्रत्येक स्त्रीला वाटतं पण नवर्‍याने तसं वागलेलं चालत नाही."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखातले विचार पटले.

विभक्त, चौकोनी कुटुंब पद्धती रूढ झालेली असूनसुद्धा नातलगांचे शुक्लकाष्ट अजून का सुटले नाही याचे आश्चर्य वाटते.

मला वाटतं नात्याचं ओझं हे पन्नास शंभर वर्षांपूर्वी होतं त्यापेक्षा खूपच कमी झालेलं आहे. आणि ही प्रक्रिया पुढे चालत राहील अशीही आशा आहे. एके काळी शेजाऱ्यांशी नातं असणं हे अनिवार्य होतं. आता ते नाही. कोणाशी संबंध ठेवावेत याबाबत अधिक लवचिकता आणि प्रचंड मोठी निवड निर्माण झालेली आहे. फोन, इमेल, चॅट, फेसबुक यासारख्या माध्यमांतून अशी लॉंग डिस्टन्स, स्वनिर्मित 'नाती' जपून ठेवणं शक्य झालेलं आहे. पंचवीस वर्षांपूर्वी हे तितकं सोपं नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखातील विचार आवडले/पटले. विचारांना चालना देणारा लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0