कॉकटेल लाउंज : गोवन समर

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “गोवन समर

पार्श्वभूमी:

मागच्या आठवड्यात 3-4 दिवसांचा गोव्याचा दौरा करून आलो. ह्यावेळी येताना काजू फेणीच्या दोन बाटल्या आणल्या. पहिल्यांदाच काजू फेणी ट्राय केली म्हणजे चव घेतली. ह्या आधि काजू फेणीबद्दलचे माझे मत बरेचसे पूर्वग्रहदूषीत होते (त्याचे कारण दुसर्‍या लेखात). आता ते सर्व ह्या काजू फेणीच्या उत्कृष्ट चवीमुळे बदलून गेले आहे. काजूच्या गराची एक मस्त चव जिभेवर रेंगाळत ठेवणारी अफलातून (सेक्सी) चव आहे काजू फेणीला. मागे एकदा गविंशी काजू फेणीच्या कॉकटेलबद्दल ओझरती चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी काजू फेणी चाखली नसल्याने त्या चर्चेला म्हणावा तसा रंग भरला नव्हता.

आता फेणी चाखली असल्यामुळे, तिच्या चवीप्रमाणे काय कॉकटेल करता येइल ह्याचा अंदाज आला. ही रेसिपी माझे इंप्रोवायझेशन आहे. कंप्लीट, नावासकट, माझी रेसिपी.

प्रकार काजू फेणी बेस्ड कॉकटेल
साहित्य
काजू फेणी (Cazcar Brand) 2 औस (60 मिली)
कॉइंत्रो 0.5 औस (15 मिली)
लिंबाचा रस 10 मिली
लिम्का
बर्फ
मीठ
लिंबाचा काप (सजावटीसाठी)
ग्लास कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

सर्वप्रथम लिंबाचा काप ग्लासाच्या कडेवर फिरवून खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे ग्लासच्या रिमवर मीठ लावून घ्या.

आता काजू फेणी, कॉइंत्रो आणि लिंबाचा रस कॉकटेल शेकर मध्ये बर्फ घालून व्यवस्थित शेक करून घ्या. त्यानंतर ग्लामध्ये क्रश्ड आइस घालून त्यात ते मिश्रण ओतून घ्या.

आता ग्लासमध्ये लिम्का टाकून ग्लास टॉप अप करा.

लिंबाचा काप ग्लासला सजावटीसाठी लावून कॉकटेल सजवून घ्या.

अफलातून चवीचे गोवन समर कॉकटेल तयार आहे Smile

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चिअर्स!

आता काही साधे प्रश्नः
१. कॉकटेल, ठाराविक बिअर पिताना ग्लासाच्या कडेला लिंबू लावतात त्याचं प्रयोजन सजावट सोडून इतर काही असतं का?
२. फेणी गोव्याबाहेर मिळते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चियर्स!

१. बीयर पिताना ग्लासच्या कडेला लिंबू लावतात हे माहिती नाही, तसे असेल तर फक्त ते सजावटीसाठी असेल. बियर मध्ये काहीही मिक्स केल्यास हॉप्स ने आलेली मूळ चव जाऊ शकते. ह्याउप्पर करोना बियरच्या बाटलीत लिंबाची फोड टाकून सर्व केली जाते एवढेच माहिती आहे. त्याचे कारण करोनाची चव खुपच माइल्ड आहे आणि त्या चवीला तजेला येण्यासाठी तसं करत असावेत. किंवा करोना मेक्सिकन बियर असल्याने तशी मेक्सिकन प्रथा असावी. पण बियरमध्ये काहीही मिक्स न करणे हेच उत्तम!

२. अजुन तरी फेणी गोव्याबाहेर मिळत नाही Sad

- (साकिया) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0