बाळासाहेबांनंतर काय ?

असं म्हणतात की नेहरू गेल्यानंतर तत्कालीन देशीविदेशी पत्रकार/निरीक्षक "नेहरूंनंतर कोण?" आणि त्याहीपेक्षा "नेहरूंनंतर काय ?" असे प्रश्न विचारू लागले होते. पुढे काय घडलं ते सर्वज्ञात आहे. यातला "काय ?" हा प्रश्न म्हणजे "भारताचं काय होणार ?" अशा अर्थाने होता.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर "महाराष्ट्राचे काय ?" असा प्रश्न शिवसेनेचे कट्टर समर्थकही विचारत नाहीत. "शिवसेनेचे काय होणार ?" या प्रश्नाची चर्चा हळुहळू सुरू झालेली आहे. बर्‍याचदा या धर्तीवर सुरू केलेलं अंदाजपत्रक चुकतं, काहीतरी भलतंच अनपेक्षित घडतंही. मात्र "बाळासाहेबांनी केलेलं काम आणि त्यांची योग्यता" किंवा "बाळासाहेबांचे अपराध" इत्यादि स्वरूपाच्या लिखाणापेक्षा "काय घडणार/घडू शकेल" याचा वेध घेणारं लिखाण - निदान प्रस्तुत संदर्भाततरी - मला अधिक रोचक वाटतं.

या प्रश्नाचा वेध अनेक प्रकारे घेता येईल. राजकीय समीकरणे काय जुळतील किंवा कुठली तुटतील या आणि अशा र्‍हस्वदृष्टीच्या अंदाजांपासून ते "अस्मितांचं राजकारण कुठलं वळण घेईल ? यापुढे निव्वळ अस्मितांचं राजकारण करून सत्ता काबीज करता येईल का ? की त्याकरता प्रस्थापित सरकाराविरुद्धचा असंतोष पुरेसा असणं आवश्यक आहे ?" या आणि अशा प्रश्नांच्या अंगाने, काहीसा दूरगामी वेधही घेता येईल.

विषय गॉसिपकॉलम भरावा इतका रोचक आहे पण माझ्यामते महाराष्ट्राच्या एकंदर राजकीय वाटचालीच्याबाबत महत्त्वाचा ठरावा.

सर्वात मोठा मुद्दा म्हणजे शिवसेनेच्या राजकीय महत्त्वाचा. बाळासाहेबांच्या निधनानंतर जाळपोळ नि हिंसा न करून शिवसेनेने आपली पुण्याची गंगाजळी राखली आहे हे खरं, पण शिवाजी पार्क वर बाळासाहेबांचं स्मारक बनवावं - पर्यायाने या महत्त्वाच्या मैदानाचा मैदानी भाग देण्यात यावा - ही मागणी करून अस्मितांचं राजकारण पुढे नेण्याची टेस्ट-केस शिवसेना बनवते आहे हे दिसतंय. सत्तेत असताना जितक्या सहजपणे "बाँबे"चं "मुंबई" झालं तितक्या सहजपणे दादर स्टेशनचं नामकरण किंवा शिवाजीपार्कच्या जागेच्या मागणीची पूर्तता या गोष्टी होणार नाहीत हे उघड आहे. पण या मुद्द्यावर किती मायलेज मिळतं यावर शिवसेनेमधे किती राजकीय बळ शिल्लक आहे हे ठरेल.

"उद्धव आणि राज एकत्र येणार काय ?" या, काहीशा भावनाप्रधान/मेलोड्रामाटीक चर्चेमधे माध्यमं रंगलेली असताना, भाजप बरोबर असलेली युती आणि शरद पवार यांनी शिवसेनेला आपल्या कह्यात आणण्याची शक्यता या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ शकतं. यापैकी "जोड्या जुळवा" किंवा "तोडो और जोडो" अशी वेगवेगळी काँबिनेशन्स केली तरी एक गोष्ट निश्चित : राजकीय नकाशा पालटणार.

बाळासाहेब जिवंत असताना जे चुलतभाऊ एकत्र येऊ शकले नाहीत ते, आता "थोरले साहेब" गेल्यावर एकत्र येतील ही शक्यता दुरापास्त वाटते. भाजप आणि शिवसेनेची युती गेली अनेक वर्षे हेलकावे खात आहे. गेल्या निवडणुकीत युतीला आलेलं अपयश यातून ही स्थिती अधिकाधिक खिळखिळी बनताना जाणवत होतंच. मात्र बाळासाहेबांच्या एकखांबी तंबूमुळे शिवसेनेची साथ धरून असलेला भाजप यापुढे राज ठाकरेंचा पर्याय आत्मसात करेल का ? खुद्द राज ठाकरे भाजपबरोबर जातील काय ? या प्रश्नांची उत्तरं अनिश्चित आहेत; पण हे प्रश्न आता यापुढे निरर्थक राहिलेले नाहीत.

बाळासाहेब अत्यवस्थ असताना अनेकदा "मातोश्री"वर गेलेले छगन भुजबळ या सर्व भेटीगाठी निव्वळ राजकीयदृष्ट्या प्रतीकात्मक नाहीत हे दर्शवतात. शरद पवार यांना शिवसेनेच्या संदर्भात "मर्जर अँड अक्विझिशन्"ची स्वप्नं पडत आहेत हे अगदी नक्की. हे घडलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं काय ? त्यांना सत्तेमधे अजून एक भागीदार पसंत पडेल काय ? की सत्तेत भागी द्यावी इतकी लायकीच राहू नये इतक्या वेगाने सेनेचा "मार्केट शेअर" कोसळेल ? सांगता येणं कठीण आहे.

भाजपने साथ सोडण्याची शक्यता, शरद पवार यांनी दाखवलेली लालूच, बाळासाहेबांचा संपलेला करिष्मा , अस्मितांच्या राजकारणाला लोकांनी दिलेल्य प्रतिसादाबद्दलची अनिश्चितता या जोडीला राज ठाकरेंकडे जाण्यासाठी होणार्‍या गळतीची दाट शक्यता हा आणखी एक धोका शिवसेनेच्या जहाजाला आहे खरा. एकंदर जहाजाला नवी दिशा मिळणं सद्यस्थितीमधे आवश्यक आहे. नुसत्या संजय राऊतांच्या भोंग्यांनी आणि शिवतीर्थावरच्या स्मारकांच्या मागण्यांनी हे होईल असं निदान चालू घडीला वाटत नाही.

व्यक्तिशः मला राज ठाकरे यांचा अँगल सर्वाधिक रोचक वाटतो. या सर्व खेळाडूंमधे निदान तेच एक असे आहेत की जे निदान "महाराष्ट्राचा ब्ल्यू प्रिंट" काढण्याची भाषा करतात. नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधे केलेल्या कामाची निदान तोंडदेखली स्तुती करतात, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्याचा विकास साधण्याविषयी बोलतात. मात्र राज ठाकरे यांना स्वत:ची - शिवसेनेच्या दिवसांपासूनच बनलेली - कडवी प्रतिमा त्यागणे, राजकीय सलोखे घडवून आणायची तयारी दाखवणे, "मनसे"ची फक्त "शहरी पक्ष" ही प्रतिमा बदलणे हे सर्व करावे लागेल. मुंबईपरिसरातली दादागिरी, "कोहिनूर मिल"ची कोट्यावधी रुपयांची खरेदी आणि त्या जागी बिल्डींगा बांधून कमावलेले अब्जावधी रुपये हे सर्व लोक विसरतील. राज ठाकरे यांनी अपेक्षाभंग करण्याकरता आधी एकदा त्यांना संधी तरी मिळावी. त्यांची अजून झाकलेलीच असलेली सव्वा लाखाची मूठ सध्या रोचक वाटते खरी.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

शिवाजी पार्कवर माजी शिवसेनाप्रमुखांचे स्मारक बांधण्यासाठी 'धमकी'ही आलेली आहे. लोकसत्तामधली बातमी. न्यायालयाची भूमिका पहाता हे शक्य नाही असं मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलेलं आहे. ही त्याची बातमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भाजपने साथ सोडण्याची शक्यता, शरद पवार यांनी दाखवलेली लालूच, बाळासाहेबांचा संपलेला करिष्मा , अस्मितांच्या राजकारणाला लोकांनी दिलेल्य प्रतिसादाबद्दलची अनिश्चितता या जोडीला राज ठाकरेंकडे जाण्यासाठी होणार्‍या गळतीची दाट शक्यता हा आणखी एक धोका शिवसेनेच्या जहाजाला आहे खरा. एकंदर जहाजाला नवी दिशा मिळणं सद्यस्थितीमधे आवश्यक आहे.

मनसेच जहाजाला मिळालेली नवी दिशा म्हणायला हरकत नाही, नाही का? पक्ष नावाला वेगळा, आणि मानलेले शत्रू वेगळे (अंडुगुंडु नाही, मुसलमान नाही, आता भैया) पण राजकारणाची शैली तीच - हिंसक, अस्मितावादी आणि पोकळ. त्यामुळे राज ठाकरे हे पाइड पाइपर ठरले तरी फारतर विलेक्षिणीच्या वेळेस टीव्ही वर योगेंद्र यादव स्टाइल अंकांच्या चर्चेसाठी हे सर्व रोचक ठरू शकते. महाराष्ट्राच्या राजकीय स्वास्थ्याच्या दृष्टीने फारसा फरक पडेल असे वाटत नाही. आपले एक पेसिमिस्टिक मत!

व्यक्तिशः मला राज ठाकरे यांचा अँगल सर्वाधिक रोचक वाटतो. या सर्व खेळाडूंमधे निदान तेच एक असे आहेत की जे निदान "महाराष्ट्राचा ब्ल्यू प्रिंट" काढण्याची भाषा करतात. नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधे केलेल्या कामाची निदान तोंडदेखली स्तुती करतात, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्याचा विकास साधण्याविषयी बोलतात. मात्र राज ठाकरे यांना स्वत:ची - शिवसेनेच्या दिवसांपासूनच बनलेली - कडवी प्रतिमा त्यागणे, राजकीय सलोखे घडवून आणायची तयारी दाखवणे, "मनसे"ची फक्त "शहरी पक्ष" ही प्रतिमा बदलणे हे सर्व करावे लागेल.

रोचक म्हणजे खरोखर राजकीय पर्याय म्हणून, की "बाळासाहेबांनंतर" च्या चर्चा विषयासाठी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पक्ष नावाला वेगळा, आणि मानलेले शत्रू वेगळे (अंडुगुंडु नाही, मुसलमान नाही, आता भैया) पण राजकारणाची शैली तीच - हिंसक, अस्मितावादी आणि पोकळ.

सहमत. प्रांतीय अस्मितांना चुचकारून 'या बाहेरच्या हरामखोरांमुळे सगळे प्रश्न निर्माण होतात' असं म्हणत स्थानिक जनतेच्या मनातल्या संतापाची शक्ती आपल्या हाती हत्यारांसारखी ठेवणं या राजकारणाला एक किरकोळ पण नियमित मागणी असते. त्यात गंमत अशी की बाहेरचे म्हणजे नक्की कोण हे निवडताना सोयीस्कररीत्या गरीब, असंघटित समाजात कमी मिसळलेले असे लोक शोधायला लागतात. अंडुगुंडु, मुसलमान, भैये हे टारगेट्स पकडायचे, तर मुंबईत मालक म्हणून स्थिरावलेल्या गुजराथी, मारवाडी व्यापाऱ्या - उद्योजकांकडे दुर्लक्ष करायचं, हे करावं लागतं. पण यातून मर्यादितच गोष्टी हाती येतात - जास्तीत जास्त म्हणजे त्या राज्यात सत्तेवर येता येतं. बेस व्यापक केल्याशिवाय मोठ्या गोष्टी हातात पडत नाहीत. मग आधीचा प्रांतीय मुखवटा टाकून दुसरा राष्ट्रीय चेहरा स्वीकारावा लागतो. मराठी मागे टाकून हिंदुत्ववाद वगैरेंतून ब्रॉडर अपील मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो. शिवसेनेने ते केलं. पडलेला प्रांतीय मुखवटा अर्थातच राज ठाकरेंनी उचलला. मनसे जर मोठी झाली तर तीही तो मुखवटा टाकून भानसे वगैरे नाव घेईल. आणि नवीन कोणीतरी तो मुखवटा उचलायला पुढे येईल.

प्रश्न असा पडतो की ऐकेकाळी एकसंध असलेला मराठी मध्यमवर्ग आता तसा राहिलेला नाही. एकतर तो अधिक शिकलेला आहे, अधिक प्रमाणात संपन्न आहे, आणि नोकऱ्यांसाठी बराच प्रवास केलेला आहे. त्यांतल्या काहीजणांना परदेशी जाऊन काम करण्याचा, तिथे सामावता न येण्याचा, व एक प्रकारच्या सांस्कृतिक भेदभावाचा अनुभव असतो. अशा वेळी शहरांतून कारखाने/कामगार निघून जाऊन उत्पादनाचं विकेंद्रीकरण घडताना ही प्रांतिक नीश लहान लहान होत जाणार का?असा प्रश्न पडतो. मग एकंदरीतच प्रांतिक अस्मिता चेतवणारे पक्ष किती अल्पजीवी ठरतील हे काळच सांगू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका बाजूला मध्यमवर्ग शिकला आणि आणि उदार झालाय असे वाटले तरी तो तेवढाच बंदिस्तही आणि संकुचित राहिला आहे. प्रांतिक नीश लहान होतीय काय याची शंका आहे. देशांतर्गत आणि देशाबाहेर मराठी-शिकलेला वर्ग नोकरी वा इतर निमित्ताने फिरत असला तरी तो व्यापक अर्थाने फिरतो काय? या बद्दल शंका आहे. कोठेही गेला तरी `मराठी कार्यक्रम' 'साजरे' करून मराठी पण सिद्ध करण्याची या वर्गाची धडपड त्याला किती संकुचित राजकारणापासून दूर ठेवेल याबद्दल शंका वाटावी. अशा वातावरणात प्रातींक नीश कमी होत आहेत असे वाटते पण गटांची संख्या कमी होईल. प्रभाव क्षेत्र नाही. रूपे बदलतील. ताकद कमी होणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ते एकंदर अंधकारात चाचपडणार्‍यांना दिशा देणारे कुणी महात्मे आहेत असं मी म्हणत असल्याचं वाटत असेल तर माझ्या सांगण्यात चूक होत असावी. माझं म्हणणं इतकंच की ज्या ब्रेकथ्रूची ते वाट पहात होते ती वेळ येऊन ठेपली असावी. बाळ ठाकरे गेल्यानंतर राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे. ती कुणी नि कशी भरून काढायची आणि कोण काढेल हे येते काही आठवड्यात दिसेल. राज ठाकरे या संधीचा वापर करण्याकरता सर्वाधिक चांगल्या स्थितीत आहेत असं माझं म्हणणं.

"हरवलेल्या जहाजा"ची तुलना मी शिवसेनेच्या संदर्भात केलेली आहे याचा पुनरुच्चार करतो. अशा प्रसंगी ज्या प्रकारच्या व्हिजन-स्टेटमेंटची आवश्यकता असते त्याची अजूनही खूण दिसत नाही. "बाळासाहेबांनंतर काय ?" हा प्रश्न शिवसेनेच्या संदर्भात शोचनीय आहे.

बाकी राज ठाकरे यांनी अस्मितांना चुचकारण्याचं राजकारण आजवर केलं हे तर स्वच्छच आहे. मी वर म्हण्टल्याप्रमाणे त्यांना ही आपली प्रतिमा पुसावी लागेल, भाजपशी जमेल तितक्या लवकर हातमिळवणी करावी लागेल. तेव्हांच त्यांना प्रस्थापित राजकीय स्थितीबद्द्लच्या असंतोषाचा फायदा घेता येईल. त्यांना हे जमलं नाही - मुख्य म्हणजे उमजलं नाही - तर काय ? अजून पाच वर्षं वाट पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

राज ठाकरे यांनी भाजपला पेलवेल अशी भुमिका बर्‍याच आधीपासून घ्यायला सुरवात केली आहे
-- मोदींचे 'कौतीक'!
-- सीमाप्रश्नावर (आश्चर्यकारकरित्या)भाजपशी संलग्न भुमिका
-- (सेना-भाजप पेक्षा) राष्ट्रवादीची मते अधिक खाणे (नाशिकसारख्या राष्ट्रवादीच्या किल्ल्यात शह, पुण्यात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे)

राष्ट्रवादी+काही शिवसैनिकांची छुपी साथ, काँग्रेस आणि मनसेला भाजपची छुपी साथ असे तिरंगी सामने नजीकच्या भविष्यात संभवतात असे वाटते. शिवसेना वेगळा पक्ष म्हणून टिकेल.. उघडपणे भापशी लगेच काडीमोड कठीण दिसतो (आर्थिक कारणे), मात्र लपून रा.काँ.ला मदत्र करत राहिलसे दिसते (मनसे प्रत्येकवेळी( काँग्रेसविरोधी भुमिका फारशी घेत नाही.. तसेच काहीसे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाळासाहेबांनंतर त्यांची मनमानी, कायद्याला कमी लेखणं वगैरेंचा वारसा संजय राऊत यांनी उचलल्याचं दिसत आहे. ‘ती’ जागा रामजन्मभूमीएवढी पवित्र
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17386640.cms

बातमीतलाच मजकूरः "न्यायालयाचे निर्देश , जागेची मालकी , सरकारची परवानगी हे मुद्दे असतीलही पण स्मारकाबाबत जो काही निर्णय असेल तो शिवसैनिकच घेतली , असे राऊत यांनी निक्षून सांगितले."

मटावरच एक प्रतिक्रिया दिसली: "आवारा रे ह्या ला..........." (इथे बहुदा राऊत यांच्याकडे निर्देश असावा.) मटाने अशा प्रकारच्या (शिवसैनिकांना) प्रक्षोभक वाटतील अशा प्रतिक्रियांना प्रसिद्धी देणं रोचक वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सध्या १०+ स्टेंट टाकलेले हृदय हा आहे असे मला वाटते..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>>> शिवसेनेचा प्रॉब्लेम (म्हणजे ) सध्या १०+ स्टेंट टाकलेले हृदय हा आहे असे मला वाटते.. <<<
हे जरा उलगडून सांगता येईल का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> शिवसेनेचा प्रॉब्लेम (म्हणजे ) सध्या १०+ स्टेंट टाकलेले हृदय हा आहे असे मला वाटते.. <<<

किंचित डोके खाजवल्यावर आणि http://en.wikipedia.org/wiki/Coronary_stent हे पाहिल्यावर लक्षांत आलं. त्यानंतर "हिंदूहृदय" आणि "अजब ज्याचे सरकार "त्याच्या संदर्भातला विनोद कळला. थोडक्यात, ट्यूब लाईट आता पेटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

तरीपण कष्टपूर्वक जाणून घेतलेत, त्याबद्दल धन्यवाद, मुसुजी.
मी क्रिप्टिक बोललो थोडे, माफ करा.. पण मुसुजींनी घेतले ते कष्ट घेऊनही ट्यूब पेटली नसेल तर.. खुलासा खाली आहेच Wink

मा. उद्धवजींच्या हृदयास रक्त पुरवठा करणार्‍या करोनरी धमन्यांत १० पेक्षा जास्त 'स्टेंट' बसवले गेले आहेत. सामान्यतः ३ पेक्षा जास्त लागत असतील तर बायपासचा पर्याय दिला व स्वीकारला जातो. इतके स्टेंट डेंजरस आहेत. व ती संख्या हेच एक रेकॉर्ड आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

त्यांचं देऊळ बांधायला घेतलं जाणार असल्याची एक बातमी वाचण्यात आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंदिर वही बनायेंगे! शिवाजीपार्क परिसरातल्या तरुणांनी आता फक्त संगणक खेळच खेळावेत, घरांतच अंडरहँड क्रिकेट खेळण्यावर समाधान मानावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे, 'मार्मिक प्रतिसाद', अशा अर्थाने.

(बाळासाहेब जेव्हा 'बाळ ठाकरे' होते - किंवा 'बाळ ठाकर्‍यां'चे जेव्हा 'बाळासाहेब' झाले नव्हते* (कालाय तस्मै नमः!) - त्या काळातल्या त्यांच्या मुखपत्राचे नावही 'मार्मिक'च होते, हा दैवदुर्विलास आहे.)

* (अर्थ तोच, भावनाही तीच. पण या दुसर्‍या आवृत्तीचे शब्द जाहीर उच्चारण्याची आज कोणाच्या बापाची टाप आहे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूलभूत प्रश्न 'बाळासाहेबांनंतर काय', हा नसून, 'बाळासाहेबांनंतर काही हवे कशाला', हा असावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण कशाला चर्चा करुन स्वताला त्रास करुन घेतो आहे. कोणी ही आले आणि शिवसेनेचे पुढे काही झाले तरी आपल्या आयुष्यात काही चांगले होण्याची शक्यता आहे का? सगळे एकाच माळेचे मणि. आपण फक्त पुढचा बन्द कधी होतो त्याची वाट बघायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आपण कशाला चर्चा करुन स्वताला त्रास करुन घेतो आहे."
चर्चा करून त्रास कसला ?
इथे सगळ्या शक्यतांची वाच्यता करायची आणि नंतर जे होईल ते आपणच कसं आधी अचूक हेरलं होतं हे मिरवायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या संदर्भात नुकताच वाचलेला एक रोचक लेख : http://rahibhide.blogspot.in/2012/11/blog-post_26.html

ठाकरे किंवा शिवसेना यांच्यावर मराठी भाषेमधे सरळ टीका करणार्‍यांची गच्छंती ठरलेली असल्यामुळे अशा स्वरूपाच्या व्यंगात्म भाषेतून अचूक बाण मारणे अपरिहार्य ठरते. लेखातल्या उपहासाने फारच छान मनोरंजन झाले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

दोन टोकाची व्यक्तिमत्वे.. विद्वत्तेच्या बाबतीत तर तुलनाच नाही Lol हे वानगीदाखल. बाकी पुण्यनगरीच्या संपादिकेकडून इतक्या हुच्च लिखाणाची अपेक्षा नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मस्तं लेख. इथे लिंकवण्यासाथी मुसुंचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक