आई, अशी कशी ही दिवाळी !

आई, अशी कशी ही दिवाळी
येते पटकन, सरते झटकन,
अभ्यासाला पुन्हा जुंपते
दहा दिवस का जाती चटकन !

फराळाच्या डब्यात मोठ्ठ्या
गोड गोड का तसेच उरते ?
चकली चिवडा चट्टामट्टा
पोटामध्ये भरकन जिरते !

भुईचक्र अन् टिकल्या आता
कंटाळा मज येइ उडवता -
धमाल दिसते मोठया हाती
बॉम्ब नि रॉकेट आवाज करता !

सुट्टी असते किती ग हट्टी
ठरल्या दिवशी येते जाते -
मित्रमंडळी गोळा होता
धमाल अमुची मनीं रहाते !

दिवाळी संपुन सुट्टी संपता
जुनाट दिसती नवीन कपडे...
आई, सांग ना दिवाळीस ग
बारा महिने थांब, तू इकडे !

.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

मस्त!

शेवटच्या कडव्यात जरा अडखळलो (एखाद-दोन मात्रा जास्त वाटल्या - मोजल्या नाहीयेत फक्त अंदाज)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश,
पूर्णपणे सहमत आहे. बालगीत असल्याने जास्त खोलात गेलो नाही इतकच .
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्षमस्व पण बालगीतातच ठेका अचुक हवा...त्याबाबत जास्त काळजी घ्यायला हवी असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ठेक्यात आणि ठसक्यात म्हणायला, मला तरी मात्रा चुकल्यामुळे काही अडचण आली नाही. परखड मतामुळे आनंद वाटला आणि वाढला, ऋषिकेश !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0