अतर्क्य की तर्कसंगत?

नैनं छिंदन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः

हिंदू धर्मशास्त्रानुसार आत्मा अमर असतो. तो कधीही नष्ट पावत नाही. मृत्यूनंतर आत्मा निघून गेलेले शरीर हे अचेतन असते. अर्थात, ते जाळून नष्ट केले तरी निघून गेलेला आत्मा पुन्हः दुसर्‍या शरीरात प्रवेश करून पुनर्जन्म होणारच असतो. अशी हिंदूंची धारणा असते. किती हिंदू हे मानतात किंवा कसे, हा प्रश्न तूर्तास बाजूला ठेवू! पण ही हिंदू धर्माची धारणा आहे, हे मात्र खरे.

म्हणूनच, अस्थी गोळा केल्या की प्रत्यक्ष दहनभूमीचे माहात्म्य संपते. दफनभूमीचे माहात्म्य असते ते ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मियांत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या दहनभूमीवरील चौथरा पाडायला विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसली असल्याचे वृत्त वाचले. आणी स्वतःला अभिमानाने "हिंदुहृदयसम्राट" असे म्हणवून घेणार्‍या बाळासाहेंबांच्या अनुयायांना हिंदूंच्या धार्मिक धारणेपेक्षा ख्रिस्ती वा इस्लामी धार्मिक धारणा अधिक का भावू लागल्या, असा प्रश्न पडला.

हे अतर्क्य नव्हे काय?

की यानिमित्ताने, बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेसंबंधित वाद संपुष्टात येईल आणि "इतर मोक्याच्या" जागेचा विचार आपोआपच मागे पडेल, असा तर्कसंगत विचार यामागे आहे?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

यामागे परदेशी शक्तींचा हात आहे का हे पाश्चात्यांचं अंधानुकरण आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुळात शिवसेना (आणि भाजपा व तत्सम तथाकथित हिंदुत्ववादी पक्ष) ज्या हिंदुत्वाचा पुरस्कार करते त्याचे मॉडेल ख्रिस्ती-इस्लामी धर्माच्या काही अतिरेकी अनुयायांपासून प्रेरणा घेऊनच तयार झाले आहे. या मॉडेलचे पूर्ण स्वरुप 'ते असे करतात म्हणून...' या एका वाक्यात संपते. आपल्या संतांनी शिकवलेल्या सर्वसमावेशक, समजूतदार हिंदुत्वाऐवजी अमुकतमुक काही झाले जाळपोळ करण्याची वृत्ती खचितच हिंदुत्ववादी नाही.

आजच्या पेपरात वाचलेल्या बातम्यांनुसार आता स्मारकाच्या वादाऐवजी शिवाजी पार्कचे नामांतर शिवतीर्थ असे करावे असे शिवसेनेचे मत आहे. थोडक्यात आता शिवाजीऐवजी बाळासाहेबांचे नाणे चलनी वाटू लागले आहे.

अवांतरः सामनामध्ये त्या चौथऱ्याला समाधीस्थान असे म्हटले आहे. बाळासाहेबांचा रीतसर दहनविधी झाल्याने त्या स्थानाला 'समाधी' म्हणणे योग्य आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"...मॉडेल ख्रिस्ती-इस्लामी धर्माच्या काही अतिरेकी अनुयायांपासून प्रेरणा घेऊनच तयार झाले आहे"
अ‍ॅन्ड नॉट दी ऑदर वे राऊंड ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते धर्म उत्पन्न झाले त्या काळी इण्टरनेटावरून फाष्टात संकल्पना हिकडून तिकडं जात नसाव्यात बहुतेक.

पण तरीही, 'मूलतत्ववाद्यांचा' (हा हिंदी शब्द. मराठीत यांनाच प्रतिगामी, हिंदुत्ववादी इ. म्हणत असावेत) अविर्भाव सगळीकडे च सारखा. मी सांगतो तो 'धर्म'. बाकी सगळे 'हीदन' 'काफिर'. यांना नष्ट कर. किंवा बाटवून अनुयायी कर. 'तरच', 'तुला', 'स्वर्गात', जागा मिळेल असे बहुतेक सर्वच धर्मांनी या ना त्या वेळी सांगितले.

बेसिकली हिंदुत्ववाद्यांचे (किंवा कोणत्याही मूलतत्ववाद्यांचे. त्यात सगळेच धर्म येतात. हिंदुत्ववाद्यांचे विचार मला माझ्या अनुभवांशी पडताळून पहाता येतात म्हणून त्यांचा विशेष उल्लेख) युक्तिवाद वाचले की हे केवळ 'त्या' धर्माचा हेवा वाटतो, म्हणून त्यांच्यासारखे बनण्याच्या हेतूने केले आहेत असेच वाटतात.

या पेक्षा हे लोक सरळ मुसलमान/ख्रिश्चन इ. का होत नाहीत? :डोळे फिरवणारा बाहुला:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मला वाटलंच होतं की माझा प्रतिसाद "बाल की खाल" टायपाचा वाटणार, पण खरच तसा प्रश्न पडलाय मला.
आता,
'मूलतत्ववाद्यांचा' अविर्भाव सगळीकडे च सारखा.
यातून मला मूलतत्ववाद ही मानवी स्वभावाशी निगडीत असलेली (पण हळू हळू नष्ट होत जाणारी) गोष्ट असावी असं वाटतं.
त्यांमुळे "याचं मॉडेल त्याने घेतलं / त्याचं मॉडेल याने घेतलं" हे दावे निरर्थक वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवसेनेच्या आजकालच्या अग्रलेखांतही, अफजलखान, औरंगजेब यांच्या कबरींविषयी काहीतरी लिहून बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न चाललेला दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile काय सुनीलराव.. चंमतग करताय.. उत्तर ठाव न्हायीत व्हय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझे शिवसेनेला पूर्ण समर्थन नसले तरी एक मराठी पक्ष म्हणून विरोध नाही पण बाळासाहेबांबद्द्ल नितांत आदर आहे.
गेल्या काही वर्षात शिवसेनेला उतरती कळा लागली होती. बाळासाहेब गेल्याने जो जिव्हाळा शिवसेनेबद्द्ल निर्माण झाला होता त्याचा समर्पक उपयोग पक्ष बांधणीसाठी जर केला गेला असता तर त्यांच्या उत्तराधीकार्याना निर्विवादपणे एक हुशार नेता म्हणून पुढे येता आले असते पण बाळासाहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्या समाधीचे होणारे राजकारण पाहून विशेष करून सामना मध्ये अ(उ)ग्रलेख लिहिणारे सध्या असे सुटलेत कि हि संधी शिवसेना मातीमोल करणार बहुतेक....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुहास

झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो

धागा वाचून एका जुन्या धाग्याची आठवण झाली. 'गांधी अहिंसेचे प्रणेते; मग नथुरामला फाशी देणे हे कृत्य अहिंसाविरोधी नाही का?' असा काहीसा धागा होता. (लिंक देत नाही कारण हल्ली जुने धागे वाचता येत नाहीत).

त्यांना स्टेट फ्यूनरल मिळाली तेव्हा स्मारकही करायला काही हरकत असू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नै म्हंजे बाकी काही असूदे, दहनभूमीच्या ठिकाणी (विशेषतः प्रसिद्ध लोकांच्या) स्मारक/वृंदावन इ. उभारणे ही चाल हिंदुधर्मात होतीच की! तिथे कुठे आला क्रिश्चनमुस्लिमांचा संबंध?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

टीव्ही नि मिडियावरले भुक्कड वाद पाहून आश्चर्य वाटते.
तिथे तावातावाने मागणी करत बसलेली मंडळी गाढव आहेत. त्यांना विरोध करणारे सात गाढव आहेत. व्यर्थ वादावादी निस्ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आत्मा अमर असेल तरच खरा धोका आहे. साहेबांचं जाऊ द्या, ते थोर होते. पण आत्मा अमर असेल तर अतिरेक्यांचे आत्मेही पुनर्जन्म घेऊन परत परत छळतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदू धर्म.
इ. वाचून धागा काही गंभीर चर्चा करेल असे वाटले, पण हाय रे कर्मा! फडतूस चर्चा.

वर अतिशहाणा यांना +१ दिलेला आहेच.

मुळात शिवसेना (आणि भाजपा व तत्सम तथाकथित हिंदुत्ववादी पक्ष) ज्या हिंदुत्वाचा पुरस्कार करते त्याचे मॉडेल ख्रिस्ती-इस्लामी धर्माच्या काही अतिरेकी अनुयायांपासून प्रेरणा घेऊनच तयार झाले आहे. या मॉडेलचे पूर्ण स्वरुप 'ते असे करतात म्हणून...' या एका वाक्यात संपते. आपल्या संतांनी शिकवलेल्या सर्वसमावेशक, समजूतदार हिंदुत्वाऐवजी अमुकतमुक काही झाले जाळपोळ करण्याची वृत्ती खचितच हिंदुत्ववादी नाही.

हे परफेक्ट निवेदन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-