मराठी संकेतस्थळांसाठी यंदाही स्पर्धेचे आयोजन २०१३

राज्य मराठी विकास संस्था व सीडॅक मुंबई या संस्थांच्या सहकार्याने यंदाही मराठी सकेतस्थळाची स्पर्धा २०१३ आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई- राज्य मराठी विकास संस्था व सीडॅक मुंबई या संस्थांच्या सहकार्याने यंदाही मराठी सकेतस्थळाची स्पर्धा २०१३ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सरकारी संकेतस्थळ व इतर संकेतस्थळ अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे.
सरकारी संकेतस्थळाच्या गटासाठी पहिला पुरस्कार १५ हजार रुपये, दुसरा १० हजार आणि तिसरा पुरस्कार ५ हजार रुपयांचा असेल. तर इतर संकेतस्थळासाठी पहिला पुरस्कार ३५ हजार रुपये, दुसरा २० हजार आणि तिसरा १५ हजार रुपयांचा असेल. या पुरस्कासाठी १८ डिसेंबर ते १८ जानेवारीपर्यंत राज्य मराठी विकास संस्थेच्या http://www.rmvs.maharashtra.gov.in/rmsv या संकेतस्थळावर आणि सीडॅकच्या http:/www.cdacmumbai.in या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेशपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
संकेतस्थळासाठी वापरण्यात आलेली प्रमाणके, टंक, संकेतस्थळाची तांत्रिक गुणवत्ता वापर करणा-यांना पुरवण्यात आलेल्या सोयी, उपयुक्तता, सहभागाची सोय, माहितीची मांडणी, भाषेचा दर्जा, माहितीचा संग्रह आदी निकषांवरून तज्ज्ञ परीक्षकांकडून संकेतस्थळाचे परीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी गिरीश पतके यांनी दिली.

माहिती स्त्रोत : प्रहार दैनिक

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पैकी gov.in ही लिंक मोडकी आहे. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आदिती, लिंकचा दोष नाहीये. नावातच गव्हर्नमेंट आहे मग दुसरं काय होणार? Wink

ऐसी अक्षरे ने त्यात सहभागी व्हावे यासाठी ही माहिती शेअर केली होती. जरुर सहभागी व्हा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0