चित्रपट बघणे : एक कला

चित्रपट पाहणे आणि त्यांची परीक्षणे लिहिणे हा आमचा एक आवडता छंद. काही लोक त्याला 'फुकटचा धंदा' असेदेखील म्हणतात. अर्थात ते, 'जे मित्र असले की शत्रूची गरज नाही' ह्या कॅटेगरीत मोडणारे असल्याने मी त्यांच्याकडे दुर्लक्षच करत आलो आहे. हां, तर परवा असाच एक मित्र कम शत्रू आम्हाला रस्त्यात भेटला. (दारूखान्यात, शिणिमाला, तमाशाला आणि रस्त्यात मित्र भेटणे हा दुर्मीळ योग आमच्या आयुष्यात कायमच येत आला आहे.) अत्यंत उपहासाने त्याने मला 'मग, अटेंड करणार आहे का नाही सेमिनार? ' असे विचारले. दुपार असल्याने आणि मित्र बायकोबरोबर असल्याने प्यायलेला नसावा ह्याची खात्री होती. पण हे असे काही असंबद्ध बरळेल असे वाटले नव्हते. अर्थात अधिक चौकशी करता त्याच्याकडून जी माहिती समजली, ती ऐकून आम्ही अक्षरश: भर रस्त्यात डोक्याला हात लावून बैठक मारली. कुठल्याश्या संस्थेत म्हणे 'चित्रपट कसा पाहावा' ह्यावरती कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. अरे, कलियुग आहे म्हणून काय काहीही धंदे कराल का काय?

चित्रपट पाहायला शिकवणार? उद्या वंश वाढवायला शिकवाल, परवा दारू प्यायला शिकवाल.. काय अर्थ आहे का ह्या सगळ्याला? अभिनय, दिग्दर्शन शिकवतात इथपर्यंत ठीक होते, पण आता ते कसे पारखायचे हेसुद्धा शिकवणार? हे शिकायचे नसते तर अनुभवायचे असते, हेच ज्यांच्या मद्दड डोक्यात शिरत नाही, ते लोकांना काय शिकवणार आहेत? उद्या चित्रपटात फक्त सोनाक्षी सिन्हा आणि तिचे कमनीय अवयव येवढेच बघायला एखादा मनुष्य जात असेल, तर त्याला तुम्ही अजून नक्की काय शिकवणार आहात? की 'बाबा रे, असे एकदम 'टार्गेट ऍटॅक' करायचे नाहीत. आधी पावलापासून सुरुवात करायची, नेलपेंटची शेड, सॅंडल साधा आहे का हाय हील आहे ते बघायचे, मग वर वर सरकायचे. अंगात चोळी आहे, का काचोळी आहे.. साडी शिफॉनची आहे, का साधी वायल आहे ते ठरवायचे.. ' हे असले दळभद्री काही शिकवणार आहात का? तो इसम आत जाणार, सोनाक्षी आणि तिचे मटकणे डोळे भरून बघणार आणि साला पैसा वसूल झाला म्हणून बाहेर पडणार. त्याला घेणे देणे काय आहे तुमच्या कलेशी आणि शैलीशी? 'एक भुर्जी बना और हाफ फ्राय बिना पल्टी मार के उसके उप्पर' ही ज्याची अदा आहे, त्याला तुम्ही अजून शिकवूच काय शकणार आहात?

मुळात मला सांगा की, एक हिरॉईन आणि दोनचार फाइट सीन्स सोडले तर आजकाल चित्रपटात बघण्यासारखे असते तरी काय? नेहा धुपिया, दिया मिर्झा, कंगना राणावत, कल्की कोचलीन ह्यांच्यात काय बघायचे ते आम्हाला विचारू नका. मुळात हिरॉईन म्हणून ह्यांच्यावरती पैसे लावायला लोक तयारच कसे होतात? हा मला प्रश्न पडलेला आहे. ह्यांच्यावर पैसा लावण्यापेक्षा मी कल्याण बाजार किंवा अगदी एखाद्या क्रिकेट मॅचचे हायलाइट्सदेखील पसंत केले असते. ह्या बायांमध्ये सौंदर्य आणि अभिनय कसा बघायचा हे तुम्ही शिकवू शकणार आहात का? सलमानचा अभिनय कसा पारखावा, हे तुम्ही शिकवू शकणार आहात का? अक्षय कुमार काहीही कसाही आणि बादरायणदेखील संबंध नसताना, अचानक 'बच्चे की जान लोगे क्या? ' असे म्हणतो तेव्हा त्या वाक्याच्या अर्थ आणि चालू दृश्याशी संबंध शिकवणार आहात का?

गुढघ्यापर्यंत, खरे तर थोड्या वरच.. साड्या उंचावत (आठवले ना लगेच दृश्य?.. चावट कुठले) शाळेतल्या बायकांना समूहाने जाऊन एकाच विद्यार्थ्याची खाजगी शिकवणी घेण्याची गरज का वाटते? सोनम कपूर, रणबीर कपूर, नील नितीन मुकेश हे मानवी देह अभिनय समृद्धीमुळे चित्रपटात आहेत, का त्यांच्या मधल्या नावामुळे आहेत? अमीर खानला कॉलेज स्टुडंट म्हणून आणि मुग्धा गोडसेला सुपर मॉडेल म्हणून कसे सहन करायचे? प्रितम, अनु मलिक, हिमेश रेशमिया ह्या गंधर्वांनी जपानी डेली सोपपासून ते संतती नियमनाच्या जाहिरातीपर्यंतचे संगीत चोरून आपल्या चित्रपटात वापरले, तर ते कसे सहन करायचे? महेश भट्ट, विक्रम भट्ट हे दिग्दर्शक (? ) कथा, संगीत, तंतोतंत दृश्ये इत्यादी चोरून दमल्यावर आता फॉर अ चेंज म्हणून चित्रपटाची पोस्टर्सदेखील चोरू लागले आहेत. ह्याकडे कुठल्या नजरेने बघावे? हीरो हिरॉईनला खुले आम चुंबन, आलिंगन आणि विविध आसने करताना दाखवल्यावरती, बलात्काराच्या दृश्यात मात्र हात आखडता का घेतात? हीरोपेक्षा जास्त कमावणारा, मोठ्या पदावर कार्यरत असणारा बाप पाठीशी असलेला, आई किंवा बहीण ह्यांची जबाबदारी नसलेला, ४/५ प्रकारच्या चारचाक्या, १५/२० नोकर, बंगला इत्यादींचा मालक असलेला मनुष्य हा केवळ हिरॉइन त्याच्यावरती प्रेम करत नाही म्हणून खलनायक का मानायचा?

अभिनय आणि कलाकार सोडा, आपण चित्रपटातल्या महान दृश्यांवरती बोलू या. 'मर्द' चित्रपटात निरुपा रॉयने देवीच्या वाहनाला... आय माय सॉरी.. वाघाला नमस्कार केल्यानंतर तो तिला उलटून नमस्कार करतो, ह्यातून काय बोध घ्यायचा? तीन इसम तीन खाटांवरती लोळत लोळत एकाच बाईला रक्त देतात, ह्यातून काय विज्ञान शिकायचे? चार्ली चॅप्लिन हा रणबीर कपूरचा आदर्श आहे, म्हणून चॅप्लिनच्या चित्रपटातील दृश्ये तो सररास आपल्या चित्रपटात कॉपी करतो का? चंद्रमुखीसारख्या गर्भश्रीमंत नायकिणी कुठे असतात? मेक-अप मन आणि ड्रेस डिझायनर हे कायम 'गे'च असतात का आणि ते कायम नको तेव्हाच कसे पकडले जातात? क्रिश हा चित्रपट पे-चेकची सरळ सरळ भ्रष्ट नक्कल असतानादेखील इंडियाज फर्स्ट ओरीजिनल सुपर हीरो अशी त्याची जाहिरात का बघावी लागते? करिश्मा कपूरचा पापी गुडिया (तो बघण्याचे पाप करणारा मी बहुदा एकटाच) हा चाईल्ड्स प्लेवरून सरळ सरळ ढापलेला असताना, 'पर्दे पर पहेली बार एक अनोखी कहानी' ह्यावर विश्वास कसा ठेवायचा? 'दो फूल' ह्या मेहमूदच्या अप्रतिम चित्रपटाची झेरॉक्स म्हणजे गोविंदाचा 'आँखे' असा उच्चारदेखील का करायचा नाही? राष्ट्रीय पुरस्कार विजेता अग्निपथ आणि स्कारफेसमध्ये साम्य आहे, असे उघड उघड का बोलायचे नाही? अजय उर्फ महादू देवगण आणि काजोल पडद्यावरती जसाच्या तसा 'अ मुमेंट.. ' साकारतात, तेव्हा तो अद्भुत प्रेमकहाणी पहिल्यांदाच पाहत असल्यासारखा कसा पाहायचा?

बरं, हे नासके प्रश्न जाऊ द्या बाजूला. मला एक सांगा, आजकाल 'बघण्याच्या' लायकीचे कितीसे चित्रपट पडद्यावरती येतात? नो सर!! सनी लिऑनलादेखील पडद्यावरती साकारता न येऊ शकणारे दळभद्री दिग्दर्शक असल्यावरती अजून काय होणार? बघण्याच्या लायकीच्या चित्रपटाचीच बोंब असताना, शिकण्याच्या लायकीच्या चित्रपटांबद्दल न बोलणेच चांगले. शिकायच्या लायकीच्या चित्रपटांचा विषय निघाला की पथेर पांचाली, शेजारी, कुंकू आणि मदर इंडियाच्या पुढे आपली यादी जात नाही. सत्यजित रे यांची पिढी बहुधा श्याम बेनेगलांबरोबरच संपली असावी. कारण मीरा नायर किंवा अख्तर मिर्ज़ा, जानु बरुआ ह्यांच्या चित्रपटांना पडदा बघण्याचेदेखील नशीब मिळते, हेच आजकाल खूप म्हणायचे. अर्थात गाजावाजा करत आणि समाजाला सुधारण्यासाठी, आरसा दाखवण्यासाठी म्हणून निघालेले चित्रपट स्वत: दिग्दर्शक तरी पुन्हा बघतात का, हा खरा प्रश्न आहे. फायर, माय वाईफ्स मर्डर, कोलकाता मेल, मिस्टर ऍंड मिसेस अय्यर ह्या हटके चित्रपटांमधून तरी नक्की वाट्याला काय आले? बॉम्बे बॉइज ह्या चित्रपटाने सगळ्यात आधी ही मळलेली वाट सोडून एक वेगळाच रस्ता पकडला 'हिंग्लीशचा'. आज हा पादचारी मार्ग चक्क चक्क चार पदरी रस्ता होऊन 'बीइंग सायरस'पर्यंत पोहोचला आहे. सगळ्याच प्रस्थापितांना धक्का देणार्‍या 'द अंग्रेज' किंवा 'हैदराबाद नवाब'ने काही काळ जबरदस्त धुमाकूळ घातला होता, पण शेवटी तीदेखील एक पटकन ओसरणारी लाटच निघाली.

आठवड्यातल्या पहिल्या शुक्रवारी थेटरात आणि पुढच्या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी चॅनेलवरती झळकणार्‍या आजच्या चित्रपटांच्या जमान्यात नक्की बघायला तरी काय शिकवणार आहेत? एकदा वाटले होते की, जावे आणि बघून तर यावे. पण मग भीती वाटली, की हे लोक अंधार करून पुन्हा पुन्हा मदर इंडिया, दो बिघा जमीन, भूमिका आणि अंकुरचे दळण दळत बसतील आणि स्वत:च्या समाधानासाठी, ही भूतकाळातील राजेशाही लक्तरे अंगावर घालत आम्हालासुद्धा टेर्‍या बडवायला लावतील. मग आम्हीदेखील उजेडात आल्यावरती दादासाहेब फाळके ते 'एक था टायगर' अशी परंपरेची झूल उडवत लिखाण करायला लागू. जाता जाता ह्या संदर्भात एक किस्सा आठवला. खालिद मोह्हमद ह्या नामवंत समीक्षकाने हृतीक आणि करिश्मा अशा नामांकित मंडळींना घेऊन 'फिझा' सारखा चित्रपट बनवला. ह्या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनदेखील त्याचेच होते. ह्या चित्रपटाविषयी बोलण्यासाठी त्याने सुभाष घईला आमंत्रण दिले होते. आपल्या भाषणात घई साहेबांनी जाता जाता एक फार छान वाक्य सांगितले. ते म्हणाले, “आजवर आमच्या चित्रपटातील ज्या ज्या गोष्टींची खालिदने खिल्ली उडवली, त्या सगळ्या गोष्टी ह्या चित्रपटातदेखील आहेतच की.”

(मिसळपावच्या दिवाळी अंकात पूर्वप्रकशित. हा लेख इथे डकवण्याची परवानगी देणार्‍या ऐसीअक्षरेच्या अधिकारी वर्गाचे आभार.)

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

या क्षेत्रातील आमचे ज्ञान अगाध आहे. जेव्हा विद्या बालन ची चर्चा होती. त्यावेळी आम्ही या लोकांना विद्या बाळ म्हणता येत नाही म्हणून हे विद्या बालन म्हणताहेत असे वाटायचे. नंतर जरा दखल घ्यावी असे ठरवले तेव्हा लक्षात आले कि ही विद्या बालन चित्रपट सृष्टीशी संबंधीत कुणीतरी व्यक्ती आहे. मग अधिक डोक वापरल्यावर लक्षात आल कि ही डर्टी पिक्चर नावाच्या चित्रपटाची नायिका आहे. नंतर एकदा चित्रपट सीडीवर पाहिला. बरा वाटला.
ते फिल्म अ‍ॅप्रिसिएशन वाल्यांनी चित्रपट आम्हाला दाखवून काय वाटले हे जाणुन घेतले तर त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात काही बदल करता येतील असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

विद्या बालन आणि विद्या बाळ - मेलो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ ROFL प्रचंड मेलो!

आता काही दिवसांनी विद्या बाळंत असेही ऐकू येईल पकाकाकांना!!!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

'एक्झॅक्टली लाईक काननबाला ऑर दुर्गा खोटे' हे साम्य आठवलं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच!

घाटपांडे यांच्यासारख्या सज्जन आदरणीय व्यक्तीच्या प्रतिसादावर तीन जेष्ठ ऐसीकर ऐसे अवांतरात लो़ळताना पाहून शरमेने मान खाली गेली आहे.

पण मुळ धागालेखकाच्या हा लेख इथे डकवण्याची परवानगी मागण्याच्या सौजन्यामुळे हसून मेल्या गेले आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिकण्यासारखं काहीच नसलेले एखाद दोन तरी हिंदी किंवा मराठी सिनेमे असावेत असा अंदाज आहे. चिंतातूर जंतूंच्या उत्तराची वाट बघतो आहे... कदाचित ते इराणी किंवा इस्रायली सिनेमे सुचवतील अशी भीती आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वामनमूर्ती परामधून अचानक मोठ्ठा कोणी मनुष्य प्रकट होऊन सात्त्विक संतापाने हातातली पानं फडफडवत, लालबुंद चेहेर्‍याने समस्त हिंदी चित्रपटसृष्टीला दोष देतो आहे असं काहीसं चित्र डोळ्यासमोर आलं. हिंदी चित्रपटांना शिव्या देताना आमच्या लाडक्या जॉन अब्राहमचे नाव न काढल्याबद्दल निषेध. या हिंदी चित्रपटांनी आमच्या शिक्षणाची वाट लावलीच (काही गंमत म्हणून नाहीच, परीक्षा संपल्यावर 'मस्त' आणि 'कुछ कुछ होता है' काय बघायचे?) आता हा त्याबद्दल लेख लिहीताना जॉन अब्राहमचं नाव गाळतो म्हणजे काय चाललंय काय?

बाकी दारू प्यायला शिकवण्याबद्दल फार बोलू नकोस, सोकाजी भडकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>शिकण्यासारखं काहीच नसलेले एखाद दोन तरी हिंदी किंवा मराठी सिनेमे असावेत असा अंदाज आहे. चिंतातूर जंतूंच्या उत्तराची वाट बघतो आहे...<<

लहानपणी माझ्यावर अत्याचार झालेले असल्यामुळे याउप्पर यावर भाष्य करायला मी नालायक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दिया मिर्झा... अभिनय नाही मान्य.. पण ती गोड दिसते.

कंगना राणावत बद्दल कही बोलू नका हो.... मला आवडते ती! आणि बरा अभिनय करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मी माझ्या cinema आयुष्याचे सरळ सरळ २ भाग च केले आहेत.

१. t.v. वर फुकट दिसणारे हिंदी cinema त्यातल्या सुंदर्‍यांसाठी बघतो. सुंदर्‍यांचे shots संपले की लगेच चॅनेल बदलतो. कॅतरिना, करिना, अमिशा, दिव्या, अनुष्का फार च सुंदर आहेत, कुठे बघायला मिळणार?

२. चांगले cinemaa बघण्यासाठी english movies साठी पर्याय नाही. ते तर न चुकता बघतो त्यासाठी पैसे खर्च करायला लागले तरी चालते.

मराटी मधे ह्या दोन्ही गोष्टी नाहीत ( चांगले सिनेमा आणि सुंदर्‍या ), त्यांमुळे त्यांच्या वाट्याला जात च नाही.
मराठी मधले सिनेमे म्हणजे shooting केलेली नाटके असतात, त्यांना सिनेमा हे medium म्हणुन कळले तरी आहे का हा प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराटी मधे ह्या दोन्ही गोष्टी नाहीत ( चांगले सिनेमा आणि सुंदर्‍या ), त्यांमुळे त्यांच्या वाट्याला जात च नाही.

बहुतांश मराठी चित्रपट मलाही भारी वाटत नाहीत. (पण डोकं बाजूला काढल्यानंतर काही मराठी चित्रपटांमुळे शुद्ध करमणूक झालेली आहे हे मान्य.) पण उमेश आणि गिरीश कुलकर्णी यांचे चित्रपट, हरिश्चंद्राची फॅक्टरी या (आणि अशा) चित्रटपटांबद्दलही तुमचं हेच मत आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

@ आदिती - हरिश्चंद्राची फॅक्टरी बद्दल पण असेच मत आहे. मी खुप अपेक्षेने तो सिनेमा बघितला. पण त्यात मला फाळकेंनी घेतलेल्या कष्टाचे, त्यांच्यावर आलेल्या मानसिक ताणाचे चित्रण नीट वाटले नाही. फार उथळ वाटला, व्यक्तीरेखेची खोली आली नाही. म्हणजे सिनेमा वाईट नव्हता पण ग्रेट म्हणावा असाही नव्हता.

तुम्ही माझा दुसरा मुद्दा बघितला नाहीत. मी म्हणालो होतो की मराठी सिनेमा हे shooting केलेली नाटके वाटतात. सिनेमा हे खुप मोठे माध्यम आहे. त्या माध्यमाचा पूर्ण वापर केला तर तो चांगला सिनेमा बनतो. उमेश आणि गिरीश कुलकर्णी यांचे चित्रपट चांगले असतात पण ते ह्या माध्यमाचा २०% पण उपयोग करुन घेत नाहीत.

तुम्ही Martin Scorsese चे सिनेमा बघा ( goodfellas, Casino, Taxi Driver, Aviator ), Sergio Leone, Capola किंवा David Lean चे. बघा म्हणजे नीट बघा. परत परत बघा म्हणजे मी काय म्हणतो आहे ते लक्षात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडी आणखी तसदी देते, नाटक आणि सिनेमांमधला फरक याबद्दल स्वतंत्र लिखाणच करू शकाल काय? परत परत बघून मला नवीन काही समजेल असं वाटत नाही. फारतर चुकलेलं एखादं वाक्य किंवा शब्द ऐकू येतात, तेवढंच. (प्रोग्रॅमिंग किंवा तत्सम गोष्टींबद्दल म्हटलं जातं, इनपुट्स तेच देऊन, प्रोग्रॅम न बदलता आउटपुट बदलत नाही. आम्हीही त्या प्रोग्रॅमएवढेच 'हुशार' आहोत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.