नवे वाक्प्रचार

अलीकडच्या दिवसांमध्ये ’fiscal cliff' ही संज्ञा 'gone viral' झाली आहे असे म्हणता येईल. ह्या आणि ह्या वार्तांनुसार फेडरल रिझर्वचे अध्यक्ष बेन बर्नान्की ह्यांनी २९ फेब्रु २०१२ ह्या दिवशी कॉंग्रेसपुढे बोलतांना ही संज्ञा प्रथम वापरली असे दिसते.

त्याच वार्तेनुसार न्यूयॉर्क टाइम्सचे लेखक वॉल्टर स्टर्न ह्यांनी १९५७ साली हा शब्द प्रथम वापरला होता. मात्र तो वापर एखाद्या व्यक्तीने आज घरावरील कर कमी आहे म्ह्णून घरामध्ये गुंतवणूक केली आणि पुढील वर्षांत कर वाढला तर तर त्या व्यक्तीपुढे निर्माण होऊ शकणार्‍या आर्थिक अडचणीचे वर्णन करण्यासाठी वापरला होता आणि तो त्या व्यक्तीच्या वैयक्तिक संदर्भातच होता. तत्पूर्वीहि fiscal precipice ही संज्ञा १९०० सालापूर्वी थोडया वेगळ्या संदर्भात वापरली गेल्याचे उल्लेख मिळतात पण असे वाटते की अमेरिकेपुढील सध्याच्या आर्थिक प्रश्नाचे fiscal cliff असे वर्णन करण्याचे श्रेय बर्नान्की ह्यांनाच द्यावे लागेल कारण त्यांच्या ह्या वापरामुळेच तो शब्द सर्वांच्या ओठावर आज आला आहे.

अशीच दुसरी viral संज्ञा म्हणजे 'gone viral'. विशेषेकरून यूट्यूबवरील अगदी अल्प काळात लाखो हिट्स मिळणार्‍या विडिओजच्या संदर्भात हा शब्द गेल्या काही महिन्यात वारंवार ऐकू येतो. गेल्या काही महिन्यांच्या काळात ह्या Gangnam style गाण्याच्या विडिओला १ अब्जाहून जास्ती हिट्स मिळाल्याचे दिसते.

ह्या संस्थळानुसार हा viral शब्दाचा असा वापर २००० सालापासून आहे पण यूटयूबच्या संदर्बात तो अलीकडेच ऐकू येऊ लागला आहे.

टीनएजर्सच्या वापरात फार ऐकू येणारा असाच एक शब्द म्हणजे ’like'. विरामचिह्नासारखा ह्या शब्दाचा वापर ह्या वयाच्या मुलामुलींच्या बोलण्यात आढळतो. उदाहरण: ’I was like, 'hello, do you remember me? It was like, we had never met and I was like, taken aback! सध्याचा teen icon जस्टिन बीबर ह्याचे हे बोलणे आणि त्यातील like चा सुळसुळाट ऐका.

वरील उदाहरणातील ’hello' चा ’काहीतरी चुकतंय’ अशा अर्थी उपयोग हाहि नवाच वाटतो.

अशा प्रकारचे नवे उपयोग भाषेत सारखेच येत असतात आणि त्यांच्या अनेक याद्या जालावर पहायला मिळतात. नमुन्यादाखल ही १६ शब्दांची यादी पहा. संगणक आणि जाल ह्याच्या प्रसारामुळे शेकडो नवे शब्द तयार झाले आहेत किंवा जुन्या शब्दांना नवे अर्थ मिळाले आहेत.

मराठीतहि असे काही नवनवे वाक्प्रचार येत असतात आणि जुने बाहेर फेकले जातात. जुन्या दिवसातील ’सडकून’ (भरपूर), ’मातक्यान’ (अजिबात नाही), ’अंग धुणे’ (बायकांनी स्नानासाठी वापरायचा वाक्प्रचार), ’बाहेरची बसणे’ (मासिक पाळी), ’तीसतीन’ (’३३’ अशा अर्थाचा स्त्रियांचा शब्द), ’धान्यफराळ’ ( एक प्रकारचा semi-उपवास), ’आपोष्णी’ (जेवण सुरू करण्यापूर्वीचे आचमन), ’चित्राहुती-चित्रावती’ (जेवणाच्या प्रारंभी ’चित्राय स्वाहा’ इ. मंत्र म्हणून काढून पानाशेजारी ठेवलेले छोटे घास - लग्नाचे सांगून आलेले स्थळ समृद्ध आहे असे सांगण्यासाठी ’नुसत्या चित्रावती खाऊन बायकांचे पोट भरेल’ असे त्या स्थळाचे वर्णन करीत असत), ’ब्राह्मणाचा हात भिजणे’ (ब्राह्मणाला जेऊ घालणे) असे शेकडो शब्द आणि वाक्प्रचार वापरातून जवळजवळ गेलेले म्हणून उल्लेखिता येतील.

त्याचबरोबर काही नवे शब्द आणि वाक्प्रचारहि आलेले दिसतात. ’मी गावी गेलेलो’ (मी गावी गेलो होतो), त्याचा पोपट झाला (त्याचा मामा झाला), ’आम्ही मित्राच्या खोलीतच पडीक असतो’ (आम्ही मित्राच्या खोलीतच मुक्काम ठेऊन असतो) असे काही teenager वाक्प्रचार सहज सुचतात.

असे काही मराठी-इंग्रजीतील नवे वाक्प्रचार तुम्हास ठाऊक आहेत काय?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

वाक्प्रचाराम्बरोबरच, शब्दाञ्चेही अर्थ बदलत चालले आहेत.
१. 'भयंकर' हे विशेषण 'खूप/अतिशय' या अर्थी इतके वापरले जाऊ लागले आहे की त्या 'भयंकर'ची भीती वाटेनाशी झाली आहे. जेवण भयंकर चविष्ट झाले आहे, ते गाणे मला भयंकर आवडले, इ. इ.
२. 'भारी' हा शब्द पूर्वी 'पुष्कळ' या अर्थी वापरला जाई (भारी मार पडला), तो आता 'उच्च' या अर्थी वापरला जातो.
जेवण भारी होते, ते गाणे भारी होते.
३. परोक्ष - अपरोक्ष याञ्चे तर संस्कृतच्या उलट अर्थच मराठीत रूढ आहेत.
४. शाळा घेणे = बौद्धिक घेणे
५. त्याचा वकार युनूस झाला = त्याला ओकारी आली.
इ. इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक धागा. असे काही वाक्प्रचार मला माहिती आहेत. पण त्याऐवजी हा समोसापीडिया बघा. हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांतील स्लँगचा अमरकोश आहे. कोणीही शब्द "काँट्रिब्यूट" करू शकतो.

यातले बरेच शब्द मीही नै ऐकलेत (आजच्या तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून सांगतोय), पण तुम्हाला पाहिजे असलेले बरेच शब्द इथे मिळतील असे वाट्टेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

fiscal cliff चा साधासोप्या शब्दांत सांगितलेला अर्थ आवडला.

मराठीतले काही वाक्प्रचार जीवनपद्धती बदलल्यामुळे वापरातून गेले असावेत असं वाटतं, उदा: आपोष्णी, चित्राहुती-चित्रावती इ. निदान हे शब्द ऐकलेले होते. 'मातक्यान' हा आजच समजला. मराठी आंतरजालामुळे 'अंमळ' हा तसा जुना शब्द निदान जालावर असणारे लोकं आणि त्यांच्या संपर्कात असणारे मराठी लोक हा शब्द वापरताना दिसतात.

'बाहेरची बसण्या'ची जागा आता 'काका आल्येत', 'मावशी आल्ये', यांनी काही प्रमाणात घेतलेली असावी. फार मुली/स्त्रियांकडून हे शब्द ऐकलेले नाहीत. शारीरिक त्रास होत असेल किंवा एखादीला डाग पडल्याची भीती असेल तरच मासिक पाळीबद्दल बोलणं होतं अन्यथा काही फरक पडत नाही. यामुळेही 'बाहेरची बसणे' किंवा 'कावळा शिवणे' या शब्दप्रयोगांची फार आवश्यकता नसते.

इंग्लिश स्लँगमधे एखादी 'भारी' गोष्ट 'The dawg' किंवा नुस्तीच 'dawg' असते; a dog म्हटलं तर हलकीशी शिवीच. जालावर शोध घेण्याला googling, कंप्यूटर-कंप्यूटर फोन करण्याला skyping आणि सोशल मिडीया वापरण्याला facebooking ही क्रियापदं कानावर येतात. चारचौघात फजिती होण्याला oops moment असा शब्दप्रयोग वापरला गेलेला दिसतो. (रिक पेरीचा हा व्हीडीओ)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सगळे धागे चेकवून झाले की टैम्पास करायला असा विषय बरा.
दोस्ताला फोनवायचे आहे, कल्टी मारतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

या संदर्भातला एक रोचक दुवा : http://knowyourmeme.com/memes/sites/urban-dictionary

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

टीनएजर्सच्या वापरात फार ऐकू येणारा असाच एक शब्द म्हणजे ’like'. विरामचिह्नासारखा ह्या शब्दाचा वापर ह्या वयाच्या मुलामुलींच्या बोलण्यात आढळतो.

मराठीतील 'च्यायला'ची यावरून आठवण झाली होती खरी, परंतु ते उदाहरण तितकेसे चपखल नाही. (मराठी बोलीवाक्यांत हा शब्द विरामचिन्हांसारखा अतिशय सहजगत्या वापरला जात असला, तरी तितक्याही वारंवारितेने वापरला जात नाही, हे नमूद करणे येथे इष्ट आहे.)

कदाचित हिंदीच्या दिल्लीकडील बोलीभाषेतील (विशेषेकरून दिल्लीकडील पंजाबी समाजातील पुरुषवर्गात प्रचलित असलेल्या हिंदीच्या बोलीभाषेतील) 'भां*द' या शब्दाचे उदाहरण या संदर्भात थोडे अधिक चपखल ठरावे. वाक्याच्या अखेरीस असलेल्या दंडाचा (पूर्णविरामाच्या ठिकाणी देवनागरीच्या हिंदी वापरात असलेल्या विरामचिन्हाचा), तसेच अधूनमधून विकल्पाने इतरही विरामचिन्हांचा, उच्चार त्या बोलीत तसा होतो, असे निरीक्षण आहे.

(त्या समाजातील एखाद्या मुलाने घरी आपल्या बापाच्या उपस्थितीत हा शब्द उच्चारला असता, बाप 'मुलगा मोठा झाला', असे म्हणून 'बिझनेस अ‍ॅज़ यूज्वल' सुरू ठेवतो, असे आमच्या हॉस्टेलकालीन दिवसांत त्या समाजातील एका सहाध्यायाकडूनच ऐकलेले आहे. प्रत्यक्षात असा वापरही सर्रास ऐकलेला आहे. असो.)

(यावरून आठवले: महाराष्ट्रात सौम्य शिवीस्वरूप पादपूरणार्थ म्हणून वापरात असलेल्या 'भेंडी' या वाक्प्रचाराचा उगमही पंजाबीतूनच आहे, आणि त्याचा अर्थ - पंजाबीत कसाही वापरला जात असला, तरी - तितकासा 'सौम्य' नाही, हेही नमूद करावेसे वाटते.)

’मी गावी गेलेलो’ (मी गावी गेलो होतो)

हा आपण म्हणता तशा पद्धतीचा 'वाक्प्रचार' नसून, 'मी गावी गेलो होतो'चे मुंबईकडच्या बोलीतील प्रचलित रूप असावे, असा अंदाज आहे. (माझ्या मुंबईकडील अनेक नातेवाइकांच्या तोंडून ऐकलेला आहे; त्याउलट, मुंबईबाहेर तो फारसा चलनात नसावा, असे वाटते. निदान, माझ्या माहितीतल्या कोणा बिगरमुंबईकराकडून ऐकलेला तरी नाही.)

त्याचा पोपट झाला (त्याचा मामा झाला), ’आम्ही मित्राच्या खोलीतच पडीक असतो’ (आम्ही मित्राच्या खोलीतच मुक्काम ठेऊन असतो) असे काही teenager वाक्प्रचार सहज सुचतात.

यांचे वर्गीकरण teenager वाक्प्रचार असे खचितच करता येणार नाही. हे वाक्प्रचार माझ्या समवयस्कांकडून ऐकलेले आहेत, किंबहुना माझ्याही तोंडी आहेत. माझे वय आज उत्तरचाळिशीच्या गटात मोडते.

कदाचित आम्ही teenager असताना हे वाक्प्रचार 'teenager वाक्प्रचार' म्हणून वर्गीकृत करण्यासारखे असतीलही. आज निश्चितच नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोनदा उमटल्याने प्रस्तुत प्रतिसादाची द्वितीयावृत्ती रहित करण्यात आलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

hello बाबत.

टीनएजर्सच्या वापरात फार ऐकू येणारा असाच एक शब्द म्हणजे ’like'. विरामचिह्नासारखा ह्या शब्दाचा वापर ह्या वयाच्या मुलामुलींच्या बोलण्यात आढळतो. उदाहरण: ’I was like, 'hello, do you remember me? It was like, we had never met and I was like, taken aback! सध्याचा teen icon जस्टिन बीबर ह्याचे हे बोलणे आणि त्यातील like चा सुळसुळाट ऐका.

वरील उदाहरणातील ’hello' चा ’काहीतरी चुकतंय’ अशा अर्थी उपयोग हाहि नवाच वाटतो.

'काहीतरी चुकतंय' या अर्थाने या शब्दाचा प्रयोग बराच जुना असावा. उदा. Seinfeld मालिकेतील The Cartoon (January 29, 1998) या भागातील एक पात्र Sally Weaver च्या तोंडी असलेला खालील संवाद.

Sally: Ok so I go to meet Jerry Seinfeld at this horrible coffee shop right? And he's like "Hey stop doing your show." and I'm like, Hello! It's a free country. So then he goes." Okay Shmootsie" and he starts pulling at my sweater right?. He's getting , you know, Hands Across America.

(मूळ संवाद जसाच्या तसा येथे वाचता येईलः http://www.seinfeldscripts.com/TheCartoon.htm)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ताच वरील वर्णनाचे दोन अन्य शब्द सुचले. जबरी (अतिशय योग्य) आणि सही (एकदम बरोबर)!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मातक्यान' हा शब्द फार दिवसांनी , खरे तर माझ्या आठवणीनुसार दुसऱ्यांदाच, ऐकला. खरेच विस्मृतीत गेलेला शब्द.

तीसतीन’ (’३३’ अशा अर्थाचा स्त्रियांचा शब्द), हा पहिल्यांदाच ऐकला तरी तसे इतर शब्द बरेच ऐकले आहेत. माझ्या आजीच्या वयाच्या गावाकडील बऱ्याच बायकांना ४३, ४७ ६७ वगैरे (रँडम उदाहरणे) शब्द म्हणताना कधीच ऐकले नाही. बहुतेक जणी चाळीस आणि सात वगैरेच म्हणायच्या. मात्र त्याच वयाचे पुरुष हे शब्द योग्यप्रकारे बोलत असत. ही अपवादात्मक उदाहरणे आहेत की साधारण ती (शिक्षणाचा अभाव किंवा इतर कारणामुळे( प्रथा होती हे मला माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'चाबूक दिसणे' आणि 'तोडलंस मित्रा तोडलंस' वगैरे नवीन वाक्प्रचार आजकाल जालावर वावरतांना आढळले. यांचा प्रत्यक्ष जीवनात लोक संभाषणात कितपत वापर करतात याची कल्पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या माहितीत, अवधूत गुप्तेमुळे हे वाक्प्रचार फारच प्रसिद्ध झाले. हे दोन्ही वाक्प्रचार प्रत्यक्षात वापरणारी काही पंचविशीची लोकं माझ्या ओळखीची आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छे... ते आधीच प्रसिद्ध होते. तरुणांमध्ये. मला माहिती होते ना... Wink
अवधूतनं ते वाहिन्यांवर आणले इतकंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फिरतीवर असण्याचा फायदा म्हणजे बारा गावची भाषा कळते पण मी फिरतीवर नाही, असो, काही वर्षापूर्वी सोलापूरात समजलेले त्याकाळी नविन असलेले वाक्प्रचार - खूप बोलणार्‍या माणसाला "अरे काय खोकलाय (खोकला आहे)" किंवा " अरे काय कॅसेटए (कॅसेट आहे)", अमेरिकेत "तू मला खूप प्रिय" आहेस हे सांगण्यासाठी "you are so money to me" असं ऐकलय, पुण्यातल्या कट्ट्यावर कट्ट्यावरून निघताना "हीच ती वेळ (क्वचित 'हाच तो क्षण')" (नंतर ती अवधूतने पुण्याबाहेर पोचवली), किंवा "शीशू वर्गात जाउन येतो", पुण्यात पहिल्यांदा "सामान" ह्या शब्दाचा लोकार्थ कळल्यावर आपल्याजवळ ते नसल्याचं फारसं वाइट वाटेनासं झालं, पुढे मुंबईत तेच "सामान" ठेवणं काही वर्गात रुबाबाचं प्रकरण होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मातक्यान या शब्दाचा अर्थ इथे पहिल्यांदाच कळ्ळा. कादंब्रीतच वाचलेलो आधी Wink

हाही एक टिप्पिकल (हा शुद्ध मराठी उच्चार) सीमाभागातील भाषेचा नमुना. सांगिट्लो, घ्येट्लो, बघिट्लो, वाचलो, इ.इ. रूपे प्रचलित आहेत. पैकी "बघिट्लो" वैग्रे ग्रामीण बोलीत आणि शक्यतो ब्राह्मणेतर जातींत कॉमन आहे. हीच रूपे ब्राह्मण बोलीत येतात ती ट चा त होऊन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्वारी! मातक्यान -मात्क्यान ह्याचा मी वर दिलेला अर्थ चुकीचा आहे असे दिसते. मोल्सवर्थ साहेबांच्या १८५७ च्या कोशात ह्याचा अर्थ 'पुनः' असा दिलेला आहे आणि काशीताई कानिटकरांच्या आत्मचरित्रात त्यांनी जुन्या बायकांचा शब्द म्हणून हाच अर्थ दिला आहे असाहि उल्लेख मला एका जागी मिळाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह अच्छा. धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एन.डि.आपटेंची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

म्हंजे हो कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एखादी वस्तू आवडली असल्यास विविध संदर्भात ऐकू आलेली त्याची वर्णने :

गावाकडे - "भारी आहे". "लय भारी आहे"
कॉलेजच्या दिवसात काही मुलग्यांच्या वर्तुळामधे - "सेक्सी आहे"
मुंबईकडे - "सही आहे"
काही वर्तुळांमधे : "अल्टिमेट आहे" ( असे सतत म्हणणार्‍या मित्राचे नाव "अल्टिमेट जोशी" असे करण्यात आले होते. )
पुण्याकडे - "अशक्य आहे"
मी विसरतो आहे हा शब्द मी कुठे ऐकला : "खंग्री आहे"
मुलींकडून ऐकलेली विशेषणे : "गोड आहे" "क्युट आहे" "छान आहे"
काही स्त्रियांनी जवळजवळ कशालाही वापरलेले स्तुतीपर विशेषण : "सुंऽदर"
अलिकडे ऐकलेली काही : "चाबूक (उच्चारी च्याबूक) आहे"
काही अमेरिकन मास मिडियामधे ऐकून कंटाळा आलेले विशेषण - "अमेझिंग"

यापैकी काही विशेषणे अनेकांना न ऐकलेली किंवा नवी किंवा आता वापरात नसलेली वाटू शकतात Smile

काही नव्या एंट्रीज् :
वय वर्षे आठ या वयोगटातल्या अमेरिकन मुलाकडून ऐकलेले जवळजवळ कुठल्याही आवडलेल्या गोष्टीबद्दलचे विशेषण : "ऑस्सम !"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कूल, चिल, हॉट वगैरे शब्द सुद्धा आजकाल तापमानापेक्षा तसं तापमान निर्माण करणार्‍यांबद्धल वापरतात.
मराठीतले भारी, सॉल्लेट, सही, तुफ्फान, कल्टी, अल्टी, फंडा इ. शब्द आहेतच.
अलीकडेच वारंवार ऐकलेला 'नाद खुळा' हा वाक्प्रचार कसा वापरतात हे अजून समजलेले नाही.
त्याच प्रमाणे 'लोड नै लेनेका', 'तू भौत गलत फॅमेलीमें है', 'फुल्टू झ्झकास' वगैरे राष्ट्रभाषेतीन वाक्प्रचार आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

कूल, चिल, हॉट वगैरे शब्द सुद्धा आजकाल तापमानापेक्षा तसं तापमान निर्माण करणार्‍यांबद्धल वापरतात.

हॉट असणार्‍या लोकांचा अ‍ॅटीट्यूड कूल असू शकतो. तिथे उगाच तापमापक घेऊन बसायचं काम नाही.

अलीकडेच वारंवार ऐकलेला 'नाद खुळा' हा वाक्प्रचार कसा वापरतात हे अजून समजलेले नाही.

मलाही नाही.
"नाद करायचा नाय" हे समजतं. याचा अर्थ बहुदा माझ्याशी पंगा घेऊ नका (आता याचं सात्त्विक रूपांतर काय करणार?) असा काहीसा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझ्याशी पंगा घेऊ नका (आता याचं सात्त्विक रूपांतर काय करणार?)

'पंगाबाबत' कदाचित ''न'वी बाजू' काही प्रकाश टाकू शकतील असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उगमाबद्दल नक्की कल्पना नाही, पण महाराष्ट्रात सर्रास प्रचलित होण्याच्याच काय, पण महाराष्ट्राच्या बाजूस (किंवा कदाचित बॉलिवूडपटांतूनसुद्धा) ऐकूही येऊ लागण्याच्या खूप पूर्वी (१९८०चे दशक) दिल्लीच्या बाजूस सर्रास वापरला गेलेला ऐकलेला आहे.

अर्थः गडबड, लफडे, भानगड, भांडण, दंगा, मारामारी असा काहीतरी.

जसे, 'पंगा होना'. उदा. तुम्ही रस्त्याने चालला आहात, आणि रस्त्यात अचानक काहीतरी गडबड झालेली दिसली. (जसे, कोणाचीतरी मारामारी, किंवा अचानक निदर्शने, दगडफेक, जाळपोळ, वगैरे वगैरे. किंवा अचानक कोठेतरी आग लागली आणि घोळका जमला, किंवा पळापळ झाली, किंवा तत्सम काहीतरी.) नेमके काय झाले, ते कळायला मार्ग नाही, पण प्रकरणाचे पर्यवसान त्यास्थळी पोलीस (किंवा अग्निशामक दल, किंवा तत्सम काहीतरी) येण्यात आले. तर 'मैं वहाँ से जा रहा था, तो रस्ते में कुछ पंगा हो गया और पुलीस आ गयी|' (थोडक्यात, मोठी गडबड.)

किंवा, 'पंगा लेना'. कोणालातरी भिडणे (म्हणून शीर्षक ;)), कोणाशीतरी मारामारी करणे किंवा भांडण उकरून काढणे, वगैरे वगैरे. 'जानते हो किस से पंगा ले रहे हो?'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाद खुळा- कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील फेमस वाक्प्रचार. सातार्‍यात "नाद भरी" असे रूपांतर प्रचलित आहे असे एकाकडून कळाले होते पण नंतर कन्फर्म नै केले.

नाद खुळा म्हंजे लै भारी, उसकी तो बात अलगच वैग्रे. व्युत्पत्ती "याचा नाद करणारा तो खुळा" म्हंजे विक्षिप्तबै म्हणतात तसे "पंगा घेणारा मूर्ख" असा तो. किंवा "नाद"= वट, रौनक, अधिकार, प्रभाव, इ.इ. आणि खुळा=भारी, मस्त, इ.इ. असेही सांगण्यास हरकत नसावी.

वाक्यात उपयोगः

नवीन पिच्चर नाद खुळा आहे एकदम. किंवा सलमानचा/पिच्चरचा नादच खुळा. वगैरे.

एका अर्थशून्य कवितेतही हा वाक्प्रचार आहे:

नाद खुळा गणपतिपुळा
चक्की चोळा लादेन खुळा.

दुसरी ओळ बर्‍याच पाठभेदांपैकी एक असावी, पण पहिली ओळ तरी कॉमन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॉम्बेबॉइज मधे ऐकलेली माणिकमोत्ये
"क्या रापच्याक है बॉस"
"रापच्याक नै रापचांडूस है छोटे रापचांडूस"
"ज्यादा नडींग नै करनेका"
"खोपचे मे लेके दूंक्या खर्चापानी"
"चल चल हवा आन दे"
मी चेन्नै बंगरूळात असताना असल्या बंबैया भाषेबद्धल तिथल्या माझ्या सहकार्‍यांमधे कमालीची उत्सुकता होती. मात्र त्यांच्या तोंडून अशी भाषा ऐकताना अगदी केविलवाणी वाटायची... अगदी चर्च्गेटावर मिळणारी फ्र्यांकी किंवा बैदापाव रस्सम मधे बुडवून खाल्यासारखं वाटायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

भाषांमध्ये नवीन शब्दांचे येणे आणि काही जुने शब्द कालबाह्य होणे ही सतत सुरु असलेले नैसर्गिक प्रक्रिया आहे. अलीकडे बाकी मारुन-मुटकून मराठीत घुसवलेले शब्द (आणि तशाच वाक्यरचना) बघितल्या की ही सुकरसंकर आहे की भाषेवर केलेला बलात्कार (पक्षी: बळजोरी. 'बलात्कार सर्वथा न करावा' शिवाजीमहाराजांच्या पत्रातले वाक्य) आहे हे कळेनासे होते. हे वय झाल्याचेच लक्षण असावे.'मनवणे', 'पकवणे', 'धन्स', 'धन्यु', 'वीकांत' हे शब्द मराठीत रुढ होऊन मराठीची उन्नती होणार असेल तर आम्ही टापशा बांधलेल्या बर्‍या. 'मनवणे' हे क्रियापद आशा बगेंसारख्या लेखिकेच्या लिखाणात वाचले होते पण अजूनही ते वाचताना प्रत्येक वेळा गार पाणी पिताना दाढेतून कळ यावी तसे वाटते. बाकी 'ब्रेट ली हा गिटार वादनात आणि गाणी म्हणण्यात दिलचस्पी राखतो' हे म.टा. मधील मराठी वाक्य ऐकून धन्य झालो होतोच. हेही वय झाल्याचेच लक्षण असावे. अस्तु. आमचे अगत्य असो द्यावे. लेखनसीमा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

पकवण्याला चावणे असाही एक समानार्थी शब्द बोलीभाषेत आहे. हा शब्द आई-वडलांच्या पिढीकडून फारसा ऐकलेला नाही. डोकं खाण्यापेक्षा नुस्तंच चावणं किंचित कमी हिंस्त्र वाटतं नै! Wink

'ब्रेट ली हा गिटार वादनात आणि गाणी म्हणण्यात दिलचस्पी राखतो'

हा हा हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बदफैली, नमकहराम, खबरदार, आलम, वगैरे शब्द बखरीच्या नावाखाली वाचल्याचे स्मरते, ते कैसे जाहले ऐसे सोचून अचंबा जाहला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक धागा आणि प्रतिसाद!

बरेचसे शब्द वर आले आहेत. अजून काही आठवणारे शब्द म्हणजे गुगलणे, विदा वगैरे शब्द मराठी आंतरजालावरून आता छापिल वृत्तपत्रातही अपवादाने का होईना दिसू लागले आहेत. 'अंमळ', 'इत्यलम्' वगैरे शब्दांचे पुनरूज्जीवनही झालेले दिसते.

बाकी मंगेश पाडवाकरांनीही "नदीला पूर आलेला" म्हटलं आहेच तेव्हा हा नव्या पिढीतला वाक्प्रयोग वाटत नाही. किंवा मग पाडगांवकर असल्याने तरूणाईचाच असेलही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकी या सरमिसळीमुळे, मुख्यतः बॉलीवुडमुळे हिंदीचे अल्प प्रमाणात मराठीकरण होतेय हे एक निरीक्षण यानिमित्ताने नोंदवून ठेवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी आलेलो, तो गेलेला वगैरे वाक्प्रचार मी लहानपणापासून बोलत, ऐकत आलेलो (की आलो?) आहे. मी आणि माझे जवळचे नातेवाईक यांचा मुंबईशी फारसा संबंध आलेला नाही. तसेच कोल्हापुरात मित्रांच्याही तोंडी 'तू आलेलंस, ते गेलेलं' अशा प्रकारची वाक्ये सर्रास ऐकली आहेत.

बाकी धागा एकदम मस्त आणि रोचक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१.

मी गेलो होतो/गेल्तो आणि गेलेलो ही दोन्ही रूपे कमीअधिक फरकाने आमच्या बोलण्यातही येतात. आमचाबी मुंबैशी संबंध नाही. जण्रल "पच्चिम" म्हाराष्ट्राची क्याराक्टरिष्टिक असावी भौतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोंकणात प्रथमपुरुषी रचना अशीच आहे, (गेलेलो वगैरे) पण याच रचनेला तृतीयपुरुषी उल्लेखात फक्त एक "न्" लावायचा. किंवा "नीत्"

क्येलेलंन्. क्येलंतीन , वगैरे..

हे सर्व फक्त भूतकाळवाचक वाक्यांमधेच. नदीला पूर आलेला हे वरील उदाहरण चालू वर्तमानकाळात (गाणं म्हणतानाची स्थिती, असा बेभान हा वारा, नदीला पूर आलेला, कशी येऊ..) अर्थात तात्कालिक असल्याने तिथला "आलेला" शब्दप्रयोग वेगळा.. (आला आहे अशा अर्थाने)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रैट्ट यू आर. केलेंनीत वैग्रे *कोकणस्थी ढंगाची रूपे.

*कोंकणस्थ हे खरे रूप, पण सध्या देशावर अनुनासिके नुरल्याने आमच्या तोंडी असेच रूप येते (वरीलप्रमाणे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद..

बादवे.. वरील माझ्या प्रतिसादात "क्येलंतीन" हा टायपो आहे. "क्येलंनीत" असं हवं. हे मुद्दाम सांगण्याची गरज अशासाठी की क्येलंतीन याही रचनेचं अस्तित्ब महाराष्ट्राच्या एखाद्या भागात असेल आणि तो भाग कोंकण नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो ते लक्षात आलं होतं. बाकी भविष्यकाळी रूपांमध्ये जाशील,जाल, इ. ऐवजी जाशीन, जातान, इ.इ. पण काही ठिकाणी ऐकलेली आहेत उत्तर महाराष्ट्रीयांकडून. माझा नातेपुत्याचा मित्र "करचाल, जाचाल" वैग्रे म्हणतो. बीडचा एक मित्रदेखील तसेच बोलतो. तात्पर्य इतकेच की -ईनंत रूपे प्रचलित आहेत काही ठिकाणी का होईना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोंकणात प्रथमपुरुषी रचना अशीच आहे, (गेलेलो वगैरे) पण याच रचनेला तृतीयपुरुषी उल्लेखात फक्त एक "न्" लावायचा. किंवा "नीत्"

तमाम कोंकणापेक्षासुद्धा ही जिल्हे रत्नांगिरी + सिंधुदुर्ग यांची खासियत असावी काय? (विशेषतः 'नीत्'?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी आलेलो, तो गेलेला वगैरे वाक्प्रचार मी लहानपणापासून बोलत, ऐकत आलेलो (की आलो?) आहे. मी आणि माझे जवळचे नातेवाईक यांचा मुंबईशी फारसा संबंध आलेला नाही.

आय ष्ट्यांड करेक्टेड.

(माझा स्वतःचा कोल्हापुराशी व्यक्तिशः संबंध कधी आला नाही, परंतु आश्चर्य म्हणजे, माझ्या कोल्हापुरात वाढलेल्या (पण बारा गावचे पाणी प्यालेल्या) दिवंगत तीर्थरूपांच्या तोंडून कधी 'आलेलो, गेलेलो' अशी रूपे ऐकण्यात आल्याचे आठवत नाही. मात्र, खाली ब्याटम्यानप्पांनी निर्देशिलेली 'आल्तो, गेल्तो' ही रूपे त्यांच्या तोंडून क्वचित ऐकल्याचे, किंवा किमानपक्षी अशी रूपे तेथे प्रचलित असल्याबद्दल त्यांच्याकडून ऐकल्याचे, आठवते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाक्प्रचार तयार करणारी मुम्बै आणि पुणे ही दोन मुख्य शहरे ... मुम्बैहून पुण्यात आणि पुण्याहून मुंबैत नवनविन वाक्प्रचारांची नियमित आयात निर्यात चालते. त्यामुळे साधारणतः वर्षारंभी मुंबैत ऐकू येणारे वाक्प्रचार उन्हाळी सुट्टीत पुण्यात पोहोचतात आणि पुण्यातील वाक्प्रचार मुंबैत ... असाच काहीसा प्रकार दिवाळीच्या सुट्टीतही घडतो ...
हल्ली हल्ली काही खास पुणेरी वाक्प्रचार पार्ल्यात ऐकू येतात (पार्लेकर सदैव पुण्यात असल्यासारखे वागतात त्यामुळेही असेल कदाचित) ...

असेच काही वाक्प्रचार - (मुंबैत उत्पन्नावलेले कि पुण्यात ते ज्याचे त्याने ठरवा बुवा)

शाळा घेणे - बौद्धिक घेणे
शोशा करणे - ऐटी मारणे (शोशा = शो शायनिंग)
अशक्य - कै च्या कै / कठीण (हा शब्दप्रयोग खास पुण्यनगरीतील असून माणसागणिक अर्थात थोडा थोडा फरक पडतो)
बळचं - उगाचच / काहीही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

वाक्प्रचार तयार करणारी मुम्बै आणि पुणे ही दोन मुख्य शहरे ...

जोर्दार आक्षेप. या दोन शहरांत तयार झालेल्या वाक्प्रचारांचे अभिसरण अन्य ठिकाणी जास्त होते असे म्हटले तर ठीक, पण बाकी प्रत्येक ठिकाणच्या वाक्प्रचारांचा कोश बनवता येईल इतके त्या त्या स्थळी आढळणारे वाक्प्रचार नक्कीच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साधारणतः वर्षारंभी मुंबैत ऐकू येणारे वाक्प्रचार उन्हाळी सुट्टीत पुण्यात पोहोचतात आणि पुण्यातील वाक्प्रचार मुंबैत ... असाच काहीसा प्रकार दिवाळीच्या सुट्टीतही घडतो ...

मोबाईल, इंटरनेट, फेसबुक, स्काईपच्या जमान्यात मुंबई आणि पुणे ही दोन तंत्रज्ञानात आघाडीवर आहेत असं दिसणारी शहरं एवढी मागास असावीत? खेद झाला.

बाकी प्रत्येक ठिकाणच्या वाक्प्रचारांचा कोश बनवता येईल इतके त्या त्या स्थळी आढळणारे वाक्प्रचार नक्कीच आहेत.

विशेषतः मुंबई-पुण्याच्या जनतेला अन्य महाराष्ट्रातली मराठी समजावी या दृष्टीने या कोषाला महत्त्व असेल. 'नाद खुळा' हा शब्द मुंबै-पुणेकरांना कसा झेपणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विशेषतः मुंबई-पुण्याच्या जनतेला अन्य महाराष्ट्रातली मराठी समजावी या दृष्टीने या कोषाला महत्त्व असेल. 'नाद खुळा' हा शब्द मुंबै-पुणेकरांना कसा झेपणार?

मुंबई-पुण्याच्या जनतेला उर्वरित महाराष्ट्रातील मराठी समजून घेण्यात विशेष रस असतो, ज्याच्या तुलनेत, उदाहरणादाखल, गडचिरोलीच्या रहिवाशांना गडहिंग्लजची मराठी समजून घेण्याबाबत औदासीन्य असते, किंवा, पुन्हा उदाहरणादाखल, चिखलीच्या रहिवाशांना दापोलीची मराठी समजून घेण्याविषयी प्रचंड अनास्था असते, या गृहीतकामागील नेमका आधार समजू शकला नाही.

हे आपले वैयक्तिक निरीक्षण आहे, की असे काही सर्वेक्षण झाले आहे?

मात्र, हे जर खरे असेल, तर (१) हा पुणे-मुंबईकरांवर प्रचंड अन्याय आहे (म्हणजे पुण्या-मुंबईनेच तेवढा उर्वरित महाराष्ट्राला समजून घ्यायचा मक्ता घेतलेला आहे काय?), आणि (२) पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रास पुण्यामुंबईबद्दल सोडा, परंतु एकमेकांबद्दलसुद्धा इतकी जर अनास्था असेल, तर मग महाराष्ट्राने एक(संध) राज्य म्हणून केवळ पुणे-मुंबईकरांच्या हौशीखातर राहावे, हे काही पटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुंबई-पुण्याची भाषा लेखी भाषा, प्रमाण भाषा म्हणून तशीही शिकवली जाते, चित्रपट-नाटकांमधे दिसते, उद्योगधंद्यासाठी अन्य महाराष्ट्रातून लोकं या शहरांत येतात तिथे ही भाषा शिकतात. आत्तापर्यंत जे लोक भेटले आहेत त्यांच्यापैकी मुंबई-पुण्याच्या लोकांना मराठीची एकच बोली समजते/येते ती म्हणजे प्रमाण भाषा. अन्य भागातल्या मराठी लोकांना मराठीची प्रमाण वगळता आणखी एक बोली येते.

दुसरं असं, की एकदा राज्य बनवलं ते भाषेच्या आधारावर (बोलीभाषेच्या नव्हे!). पण आता एकसंध राज्य फक्त त्याच कारणासाठी टिकून आहे का? (अन्य आर्थिक, सामाजिक, राजकीय कारणं नाहीतच का?)

तरीही मुंबई-पुण्याच्या भाषेचा शब्दकोष बनवण्याला माझा विरोध असा नाहीच, असे बहुतांश भाषेचं संकलन करणारे शब्दकोष साधारणतः मराठी शब्दकोष या नावाखाली उपलब्ध आहेतच. अन्य महाराष्ट्रातल्या लोकांची भाषा माझ्यासारख्या लोकांना समजण्यासाठी शब्दकोष असावा असा माझा स्वार्थी विचार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोश, मग तो कुणासाठीही आणि कसल्याही थीमसाठी झाला तरी लोकांना फायदाच होतो, तस्मात अणुमोदण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लै भारी लेख आहे.

@ बॅटमॅन
नादभरी शब्दप्रयोग बरोबर आहे.

म्हणजे एखादा दिप्या नवीन बुलेट घेउन आला तर "दिप्या, नादभरीच की"

असाच अजून एक
आश्चर्योद्गार दाखवणारा म्हणून एक शब्दप्रयोग प्रचलीत आहे;
आयची जय. हा शिवी म्हणून देखील वापरता येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सातारकर. नेटिव्ह सातारकराकडून कन्फर्मेशन आले हे उत्तमच Smile

आयची जय हा मात्र जरा पुणेरी वाटतोय. फ* च्या जागी फिश म्हणतात त्यापैकीच हा प्रकार वाटतोय. किमानपक्षी सांगली, कोल्लापूर (हाच खरा उच्चार आहे Wink ), सोलापूर, विदर्भ अन मराठवाडा इथली पोरं तरी हा शब्दप्रयोग वापरताना मी पाहिली नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅन, जोर्दार आक्षेप मान्य ... पण ...

मुम्बै आणि पुणे या दोन्ही शहरातील लोक वाक्प्रचार स्वतःचे तयार करत नाहीत . या दोन्ही शहरात विविध ठिकाणाहून आलेले लोक असल्याने बोलण्याच्या पद्धतींची सरमिसळ होऊन येथे वैविध्यपूर्ण वाक्प्रचार प्रामुख्याने तयार होतात अस म्हटल ... इतर शहरातदेखील वाक्प्रचार आहेतच फक्त सर्व ठिकाणचे वाक्प्रचार इथे वापरले जातात एवढाच काय तो आमच्या म्हणण्याचा अर्थ ...
अदिती , तांत्रिक प्रगतीचा मुद्दा बरोबर आहे पण इंटरनेट, फेसबुक, स्काईप वर किती लोक मराठीतून संभाषण करतात हा एक गंमतशीर विषय ठरेल ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

सहमत आणि असहमत दोन्हीही.

इतर शहरातदेखील वाक्प्रचार आहेतच फक्त सर्व ठिकाणचे वाक्प्रचार इथे वापरले जातात एवढाच काय तो आमच्या म्हणण्याचा अर्थ ...

सहमत.

या दोन्ही शहरात विविध ठिकाणाहून आलेले लोक असल्याने बोलण्याच्या पद्धतींची सरमिसळ होऊन येथे वैविध्यपूर्ण वाक्प्रचार प्रामुख्याने तयार होतात अस म्हटल ...

असे तरी विशेष दिसत नाही. पुणे अथवा मुंबैचे खास वाक्प्रचार तयार करण्यात मुख्यतः तत्रस्थांचाच भरणा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुंबई-पुण्याच्या लोकांना मराठीची एकच बोली समजते/येते ती म्हणजे प्रमाण भाषा

अमान्य ... मुंबई - पुण्याची लोकं मराठीच्या अनेक बोली समजू शकतात .. ते फक्त प्रमाण भाषाच वापरतात असं म्हणता येईल कदाचित ..
किंबहुना मुंबई - पुण्याची मराठीची स्वतंत्र बोली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

वरती मुसुंनी चाबूक शब्दाबाबत उदाहरण दिलेलेच आहे.
https://www.youtube.com/watch?v=PsIS_CREvAo
या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते पण हेच म्हणतात - चाबूक गायलीयेस म्हणे कानफडात मारल्यासारखं गायलीयेस Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

Biggrin

गुप्ते साहेबांच्या विशेषणाला आम्ही BDSM विशेषणे म्हणायचो Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पिळणे, किडे करणे, शान्पट्टी, श्येना, कानपट्टी. खत्तर्नाक, भिडू, नडणे. विहरणे.
मराठी हाय्फाय शब्दाचे विडंबन किंवा टिंगल करून अर्थाचे क्षुल्लकीकरण करणे. विहरणे, त्याग आणि उच्च हे यातले.
क्षमस्व, विनम्र.
खल्लास. फुल्टु, पौवा.
भोजपुरी भाषेतली रूपे वापरणे. उदा. तुवा कवा गेल्वा? (तू कधी गेलास.) एरवीसुद्धा 'वा' कशालाही लावणे. कायच्या जागी का वापरणे. काय्च्याकाय हे तर कॉमनच.
इंग्रजी शब्द सुंदर बनवून मराठीत आणणे. डेकोरेशनचे डेकोशन.
हिंदी/उर्दूचा वापर. 'जरा खुल्कर बोलो यार'. हे 'यार' कुठेही.
लोल, ह.घ्या.(वेगळ्या अर्थाने)
जालीय भाषा आणखीनच वेगळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोफत का चंदन घिस मेरे नंदन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेटाळणी/आश्चर्य व्यक्त करण्यासाठी कुठल्याही मराठी शब्दाच्या मधे 'काय' घुसवणे. उदा. -
एखाद्याचे आडनाव 'हट्टंगडी' असेल तर, 'आवरा, हट्टं काय गडी!!', वगैरे....

शिवाय दळ्या किंवा विशेष खास नसलेल्या मुलांना आजकाल मुली 'चोमू' म्हणतात हा एक अजून नवीन शोध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"केशव जोक" म्हणजे अगदी सात्विक अन प्युअर व्हेज जोक. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

शिवाय,
बागडणे, [उगीच (पुढे पुढे)नाचणार्‍याला बागड-बम,] हिरवळ, हिरवाई, हिरवी, हिरवी गार. म्हणजे हिरवी पाहून आपण गार किंवा आपल्या हिरोगिरीमुळे हिरवी गार.
फोकटमे, चिल्लम्चिल्ली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या लाडक्या लुई सीके ने केलेली नेहमीच्या वापरातल्या शब्दांची चिरफाड -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखातील व सर्व प्रतिक्रियांतील, बहुतांशी शब्दांचे विपरीत उपयोग ऐकले होते. हा धागा चांगलाच आहे, असाच नवीन वाकप्रचारांसारखा, नवीन म्हणींचाही धागा निघाला होता का ?
पूर्वी अमृत मासिकांत अशा म्हणी यायच्या. त्यांतली एक आवडली होती.

'खायला नाही कोंडा अन बसायला पाहिजे होंडा!'
नवीन रचलेल्या म्हणींचा एखादा वेगळा धागा काढावा वा जुन्या धाग्याचा दुवा द्यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोंड्याची म्हण फारच झकास. यमक आणि आशय दोन्ही जुळून आलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हडपसर-मगरपट्टा भागाकडून कोरेगाव पार्काकडे येताना मुंढवा गावठाण लागतं. आसपासची झाडी, शेतजमिनी जाऊन मोठमोठ्या स्किमा उभ्या राहिल्या आहेत. मुंढवा गावठाणातल्या एका चौकातल्या फळ्यावर या अर्थकारणावर प्रकाश टाकणारी एक नव-म्हण खडूने लिहिली होती:

"जमीन विकली बापाची
गाडी घेतली अपाची"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

शाइनिंग मारणे =सायबाच्या पुढे घोटाळणे ,पुढे पुढे करणे.
ऐपत नसताना मोठ्या गप्पा मारणाऱ्यांसाठी Xड मे नही X और हXने चला जुहू |

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0