बलात्काराविरूद्धचा रामबाण उपाय

लेख लिहावा की न लिहावा हे नक्की होत नव्हतं, पण माझ्या सर्व जालीय मित्रांच्या हे नजरेला पडलं असेलच असं नाही म्हणून मुद्दाम लिहितोय.

मिडीयावर, जालावर, वृत्तपत्रांमधून आणि एकूणच सर्व समाजचव्हाट्यावर बलात्कार, पीडीतांना न्याय, बलात्कार्‍यांची मानसीकता यावर उहापोह चालू आहे. ह्या सर्व मंथनातून काही चांगले कायदे, अंमलबजावणीत सुसूत्रता व कठोरता, समाजाच्या एकूण मनोवॄतीत सुधारणा वगैरेर फायदे झाले तर ते निश्चीतच चांगले ठरेल.

भेदरलेली जनता सध्यातरी रोज न्यूज चॅनलवर कोकलणार्‍या पॅनेलीस्टना पाहाणे याखेरीज काहीही करू शकत नाही. पण ह्याच भेदरलेल्या समाजमनाचा फायदा इतरही काही लोक अत्यंत साळसूदपणे व घृणास्पदरित्या घेताना दिसले. ह्या यादीमधे तथाकथीत अध्यात्मीक गुरूही असतील याची कल्पना नव्हती.

गणपाच्या फेसबूक वॉलवर अनिरुद्ध बापूने सांगीतलेल्या बलात्कारापासून वाचण्याच्या जालीम उपायांची यादी पाहिली आणि थक्क झालो. आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी आणि सुरक्षेसाठी ती यादी इथे देत आहे..

दिनांक ३ जानेवारी रोजी आपल्या परमपूज्य सद्गुरूंनी श्रीहारीगुरुग्राम येथे सर्व स्त्रियांना भयमुक्त केले. एवढेच नाही तर, एका गोष्टीची खात्री बाळगायला सांगितली कि यापुढे कोणीच माझ्या मुलींकडे वाकडया नजरेने पाहू शकणार नाही - परमपुज्य बापूंनी खालील पंचसुत्री सांगितली,
०१. कोणावरही बलात्कार झालेला असेल व त्या व्यक्तीने १०८ वेळा अनिरुद्ध चलिसा ११ दिवस म्हंटली तर बलात्कार करणारी व्यक्ती नपुंसक होईल व तसे झाल्याचे सर्वांना लगेच कळेल .
०२. जी व्यक्ती रोज पाच वेळा श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम मंत्र म्हणेल त्या व्यक्तीवर कोणी कुठ्ल्याचप्रकारे जबरदस्ती करू शकणार नाही.
०३. ज्या व्यक्तीला स्वतःवर बलात्कार होईल अशी सतत भीती वाटते त्या व्यक्तीने श्री मातृवात्सल्य उपनिषदातल्या, श्रीशिवगंगागौरीच्या महात्म्याचे दोन अध्याय वाचाल्यासं त्या व्यक्तीचे भय व भयाचे कारण कायमचे नाहीसे होईल.
०४. ज्या व्यक्तीस लिहिता वाचता येत नसेल अशा व्यक्तीने पूर्ण विश्वासाने व प्रेमाने फक्त अनिरुद्ध अनिरुद्ध म्हंटले तर सर्व वाचन स्वतः सद्गुरु करतील व त्याचा संपूर्ण फायदा त्या व्यक्तीस मिळेल.
०५. अहिल्या संघाच्या बल गटास व श्रीचंडिका आर्मीच्या गटास स्वतः परमपुज्य बापू असे टेक्निक शिकवणार कि ज्याने बलात्कार करणारा लागलीच कायमचा नपुंसक होईल.
परमपुज्य सद्गुरूंनी सर्वांना सांगितले कि आत्माविश्वासाने भयमुक्त जीवन जगा व त्या परमात्म्यावर मनापासून प्रेम करत संपूर्ण सुखमय जीवनाचा आनंद लुटा.
आपण खरोखरच फार सुदैवी आहोत की आपल्याला बापुंसारखा बाप, नंदाईसारखी आई आणि सुचीतदादासारखा मामा सातत्याने आपले सर्व वाईट गोष्टींपासून रक्षण करावयास ढालीसारखे आपल्या सर्वबाजुनी उभे आहेत.

मला स्वत:ला कोणी तथाकथीत गुरू असे सांगून स्वतःचेच हसे करून घेइल असे अजीबात वाटले नव्हते, म्हणूनच अर्थात ह्या प्रकारावर विश्वास बसला नव्हता, पण नंतर गणपाच्याच वॉलवर प्रत्यक्ष त्याच बुवाच्या प्रवचनाची वीडीओ लिंक पाहिली..
http://www.youtube.com/watch?v=kO04G6gLUEc&feature=youtu.be

आता ह्या सगळ्या प्रकारावर हसावं की रडावं हे मला खरोखरीच कळत नाहिये. वास्तवीक हा सगळा प्रकार मी केवळ हास्यास्पद म्हणून सोडून दिलाही असता पण मला जास्ती त्रासदायक वाटला त्या बापूच्या प्रत्येक वाक्यानंतर होणारा टाळ्यांचा कडकडाट.

प्राथमीक उद्वेग ओसरल्यावर काही प्रश्न मनात आले त्यावर इथल्या सदस्यांनी काही विचारप्रदर्शन केल्यास चर्चा पुढे नेता येइल.

१. माझे नाव घ्या म्हणजे अमूकमूक होइल असे छातीठोकपणे सांगण्याचे धाडस ह्या लोकांमधे कुठून येत असावे.
२. ते जे सांगतात त्यामागची प्रेरणा काय असेल, म्हणजे त्यावर खरोखरीच त्यांचा स्वतःचा विश्वास असेल की समोर बसलेल्या माणासांना केवळ फसवण्याचा उद्देश असेल.
३.असल्या कल्टमधे ओढले गेलेले लोक नक्की कशामुळे असल्या मूर्खपणाच्या कथांवर विश्वास ठेवत असतील.
४. कल्ट्मधे ओढल्या जाणार्‍या लोकांची विचारशक्ती इतकी मृतवत कशामुळे होत असेल.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

इथल्या सदस्यांनी काही विचारप्रदर्शन केल्यास चर्चा पुढे नेता येइल

नाही ब्वॉ! या बाबतीत मी तरी सपशेल शरणागती पत्करलेली आहे. ज्या प्रकारे लोकं शरणागती पत्करून बाबा-बुवांना थोर मानतात तसंच मला या लोकांची श्रद्धा माझ्या आकलनापलिकडची वाटते. पण हे नंदाई आणि सुचितदादा कोण? मुखिया बापू माहित होते.

मी फीत पूर्ण पाहिली नाही. पण टाळ्या वाजवणारे लोकं फितीमधे दिसले नाहीत. लोकप्रियता कशी मिळवावी, भोळ्या लोकांना कसं उल्लू बनवावं, हे बापूंना पक्कं समजलेलं दिसतंय.

मात्र ही यादी भारी आहे. मध्यप्रदेशचे भाजपचे मंत्री आणि सरसंघचालकांची विनोदबुद्धी इथेही बरीच कमी पडली असं म्हणावं लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Homo Sapien ( aka thinking man) या प्राण्याला नष्ट होण्याचा धोका असलेल्या प्रजातिंच्या यादीत समाविष्ट केले जावे अशी मी जोरदार मागणी करतो.
- Homo Miserabilis.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>Homo Sapien ( aka thinking man) हा कसातरी* टिकून आहे. पूर्वी त्यांची बरीच प्रजा होती पण बदलत्या परिस्थितीत (श्रद्धेच्या उगमानंतर) टिकून राहणे खूपच अवघड झाले. Smile

*इथे आधी कसाबसा हा शब्द वापरला होता. पण एका विदेशी पाहुण्यामुळे तो वापरणं अवघड झालं आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

च्यामारी आता "अनिरुद्ध अनिरुद्ध" असे माझ्या मित्राला हाक मारायची पण चोरी! (त्याला त्याच्या या पाळण्यातल्या नावाने हाक कोण मारतो हा प्रश्न अलाहिदा) लोकांना वाटायचे स्वतःवर बलात्कार होऊ नये म्हणून हा मंत्र म्हणतोय! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यांच्या धाडसाविषयी शंका घ्यायला तुम्हाला काहीच कसे वाटत नाही ?
२१-१२ नंतर तुम्ही जीवंत आणि कार्यरत आहात ही बापूंचीच कृपा आहे नाहीतर हे जग त्यादिवशी बुडणारच होते. बापू, नरेंद्रमहाराज , अम्मा, अप्पा यांच्या त्यांच्या त्यांच्या भक्ताना वाचविताना बाकीचे जग आपोआप त्या पूण्याने वाचले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला अनिरुद्धबाण उपाय म्हणायचाय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असाच कोणत्या देवीच्या नामाचा जप केल्याने एखादी आवडलेली देवी आमच्यावर भुलेल असा मंत्र बिंत्र असेल तर द्या राव, जरा प्रयत्न करून पाहिन म्हणतो. फक्त प्रायोगिक उत्सुकता म्हणून हो, दुसरं काही नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ओ तो मंत्र मलापण पायजे!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणजे तिकडे बायकांना सुरक्षाकवच मंत्र द्यायचा आणि इकडे इच्छुक लोकांना 'वशीकरण' मंत्र द्यायचा.

बापूजी, भारतातल्या सर्वच पुरुषांवर तो मंत्र टाका हो! नाहीतरी लोकसंख्या फार वाढलीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो अशी घाई करू नका, बॅटमॅनचं अजून लगीन बी झालेलं नाही!! Wink

पण आम्ही कुठं म्हणलं आम्ही त्याचा प्रयोग भारतात करू म्हणून? आम्ही आपलं पांडवांना आदरस्थान ठेवून रंभा नाय तर उर्वशीला बोलावू की राव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

धन्यवाद निळूभौ. अविवाहित लुख्ख्यांची दु:खे या गृहस्थाश्रमींना कशी कळणार म्हणा. निषेध असो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अविवाहित लुख्ख्यांची दु:खे

ये बात कुछ हजम नही हुई Wink

-(माजी अविवाहित लुख्खा) ऋ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

का ओ उघडे जखम पे नमक छिडकताय Biggrin

(लुख्खेपणा जाईपर्यंत लुख्खाहूडच्याच बाजूने बोलण्याचा निश्चय करून पाळणारा) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे हे हे तुम्हारे बच्चे, बच्चे और हमारे बच्चे जनसंख्या???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0