Must Watch Movies – 1 Patton

हे लेखन आधी दुसर्‍या संकेत्स्थळावर टाकले आहे

------
जर आपल्याला सर्वात उत्तम बघायलाच मिळाले नाही तर जे थोडेसे Above Average आहे तेच फार चांगले वाटायला लागते. त्यामुळे सुमार चित्रपटांचा पण उदो उदो होताना दिसतो. म्हणुन असे वाटले कि, काही उत्तम चित्रपटान्ची ओळख करुन देणारा एक नविन धागा सुरु करावा. ह्या धाग्यातला हा पहिला प्रयत्न.

Internet वर सगळी माहिति उपलब्ध असल्यामुळे मी फक्त तोन्डओळख करुन द्यायच्या विचारात आहे.

Patton ( 1970 )

हा चित्रपट Patton ह्या अमेरिकन General वर आहे. हा चित्रपट काही Patton ची Biography नाही. हे पण एक विषेश आहे. ह्याच्यात Melodrama नाही, युद्धावर असुन सुद्धा उगाचच शीरा ताणुन ओरडा आरडी नाही. महत्वाचे म्हणजे, वस्तुस्थितीची तोडफोड नाही.

चित्रपटात १९४३ ते १९४५ एव्हडा कालखंड दाखवला आहे. George C Scott ह्या अभिनेत्यानी Patton ची भुमिका केली आहे. अभिनय म्हणजे काय त्याचा हा वस्तुपाठ आहे. ह्या भुमिके साठी त्याला ऑस्कर मिळाले.

Karl Malden नी General Omar Bradley ची भुमिका केली आहे. आठवत असेल तर हा अभिनेता A Street Car named Desire मधे होता. त्या चित्रपटा विषयी नंतर केंव्हातरी.

Patton ला ७ ऑस्कर मिळाली. George Scott नी ऑस्कर नाकरले.

ह्या चित्रपटा चे खासियत.

. अप्रतिम अभिनय.
. चांगली पटकथा. Francis Ford Coppola ची आहे. हा GodFather मुळे सर्वांना माहिती असलेला.
. सत्या च्या बराच जवळ, पण तरीही अजिबात कंटाळवाणा होत नाही.
. चांगले संगीत.
. Hollywood Movies मधे नेहमी च असतात ती Production Value.

हा चित्रपट Patton हा माणुस कसा होता ते उत्तम रित्या दाखवतो.

चित्रपटा ची सुरुवात सुद्धा बघण्या सारखी आहे. Patton नी त्याच्या Brigade ला उद्देशुन केलेले भाषण आहे. हे भाषण आपल्याला जरी खुप आक्रमक वाटले तरी Patton नी केलेले खरे भाषण जास्त आक्रमक होते म्हणे.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

हे मी लिहीलेले रसग्रहण -

सहसा मी युद्धाचे सिनेमे बघायच्या भानगडीत पडत नाही. याचं कारण जेव्हा जेव्हा नवरा युद्धाचे सिनेमे लावून बसतो,तेव्हा तेव्हा तोफांच्या, बंदूकींच्या, रणगाड्यांच्या आवाजानी माझं डोकं उठतं. परत कोकलून कोकलून नवर्‍याला "आवाज कमी कर" हे सांगावं लागतं ते वेगळच. ना भक्तीगीतं, भावगीतं लावता येतात ना झोप काढता येते, ना घरी कोणी कुणाशी बोलू शकतं.
मुलीने फादर्स डे ला माझ्या नवर्‍याला एक वॉर मूव्ही - "पॅटन" भेट दिली. आता तिनी दिली म्हणजे पहायलाच पाहीजे मला. पण इतकच नाही तर नवर्‍यानीही मला पटवून दिलं की हा सिनेमा अन्य युद्धाच्या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. आता कसा? तर युद्ध होतं पार्श्वभूमीवर पण मुख्य या सिनेमात कॅरेक्टरायझेशन अर्थात व्यक्तीचित्रण अतिशय बांधेसूद आणि प्रभावी आहे. आता एवढं ऐकल्यावर मी देखील हा सिनेमा पहायला बसले आणि खरोखर इतकी रंगून गेले या सिनेमात की ज्याचं नाव ते.


पॅटन हा अमेरीकन जनरल. आणि सिनेमा आहे संपूर्ण दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर. सिनेमाची सुरुवातच इतकी प्रभावी आहे. सुरुवात होते तीच जनरल पॅटनच्या तडफदार आणि अतिशय उत्तम लष्करी नेतृत्व दाखविणार्‍या भाषणाने.
या भाषणातील एक वाक्य -

"Now I want you to remember that no bastard ever won a war by dying for his country. He won it by making the other poor dumb bastard die for his country"

या भाषणात पॅटनचा भारदस्त आवाज, त्याची उत्तम संवादफेक आणि त्याचं टॉवरींग व्यक्तीमत्व अमेरीकेच्या विशाल झेंड्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या सामोरं येतं. पण मित्रहो ही तर आहे बस्स छोटीशी झलक. नंतर संपूर्ण सिनेमाभर "जनरल पॅटन" आपल्यावर अशी काही जादू घालतो की ज्याचं नाव ते. पॅटनच्या प्रत्येक सुखाशी, दु:खाशी, चूकेशी, त्याच्या गुणांशी आपण अगदी समरस होऊन जातो.
पॅटन जेव्हा नवीन हुद्दयावर छावणीत येतो ते गाव छोटसं असतं पण येताना तो सायरन वाजवत येतो. त्याचं संपूर्ण व्यक्तीचित्रण्च असं काही फ्लेम्बॉयंट केलेलं आहे की शेवटी अशा फ्लेम्बॉयंट आणि तडफदार जनरलला एकदा जेव्हा माफी मागावी लागते तेव्हा आपल्याला खरच खूप वाईट वाटतं. ते पुढे येईलच. आल्या आल्या या कुचकामी आणि बदनाम अशा छावणीला रंगरूप आणण्यासाठी, सर्वांना शिस्त लावण्याचं पहीलं काम तो हाती घेतो. लेगींग्ज नसलेल्या स्वयंपाक्याला $२० फाईन होतो. एका सैनिकाच्या गादीशेजारच्या भींतीवर उत्तान स्त्रीचं चित्रं लावलेलं असतं ते फाडलं जातं. एकंदर जुना ढिसाळपणा, ढिलाई चालणार नाही हा संदेश व्यवस्थित पोचवला जातो.
पॅटन स्वतः सळसळणार्‍या गरम रक्ताचा आहे. तोंडात सतत शिव्या, गरम डोक्याचा, परखड, स्पष्टवक्ता असा हा सिनेमात रंगवलेला आहे. हाडीमाशी सैनिक आहे. त्याने मातृभूमीला वाहून घेतलं आहे. तो स्वतः रणभूमीला अजीबात घाबरत तर नाहीच पण जे घाबरतात अशांनी सैन्यात भरती होऊ नये अशा मताचा तो आहे. अशांना तो "यलो कॉवर्ड", "यलो बास्टर्ड" म्हणतो. एकदा जखमी सैनिकांना भेट देते वेळी एक धट्टाकट्टा सैनिक भेदरून तिथे रडत असतो त्या वेळी पॅटन त्याला "टेक अवे धिस यलो बास्टर्ड" म्हणून त्याच्या थोबाडीत लगावतो. ही चूक (?) त्याला पुढे खूप भारी पडते, छावणीत एक एक करून सर्वांची माफी मागावी लागते, त्याची बदली होते, त्याच्या खालचा अधिकारी त्याच्या वर येऊन बसतो वगैरे वगैरे.
पण या प्रसंगातही पॅटन जे करतो ते नेतृत्वाच्या दृष्टीकोनातून चूक आहे असं मला वाटलं नाही.
हां आता त्याचा एक दोष सिनेमात ढळढळीत दाखवलेला आहे तो म्हणजे - माँटी हा ब्रिटीश सैन्याचा प्रमुख असतो. त्याच्याबरोबर पॅटन सतत स्पर्धा करत असतो. जर्मनीचा एखादा तळ माँटी सर करतोय का पॅटन असा प्रकार आणि जेव्हा वरीष्ठांकडून व्यवस्थित सूचना असते की पॅटनने हा तळ सर करावयास जाऊ नये तेव्हादेखील ती सूचना धुडकावून, स्वतःच्या लोकांचे जीव धोक्यात घालून घाईघाईने पॅटन तळ सर करून बसत असे. म्हणजे कधीकधी वाटतं पॅटननी अंतर्गत स्पर्धेमधे जास्त शक्ती वाया घालवली.
आता व्यक्तीगत पॅटन कसा होता तेदेखील या सिनेमात छान पेरलं आहे. पॅटन स्वघोषीत कवी दाखवला आहे.तसेच ख्रिश्चन असूनही त्याचा पुनर्जन्मावर गाढा विश्वास दाखविला आहे. कधी कधी फार पूर्वीच्या युद्धभूमीवरच्या कबरस्तानावर तो वेळ घालवतो. जेथे त्याचं शांत, अनोखं रूप आपल्याला पहावयास मिळतं. एक वेगळाच पॅटन साकार होतो, जो म्हणतो " अनंत वर्षांपूर्वी मी इथे आलो असेन, लढलो असेन." पॅटन उशाशी बायबल ठेवतो आणि कोणी त्याला विचारलं की तू हे वाचतोस का तर उत्तरतो "गॉडॅम एव्हरी नाईट!" . कुठे पुस्तक वाचून आपल्या शत्रूचा अभ्यास करणारा पॅटन आणि कुठे रात्री झोपण्यापूर्वी बायबल वाचणारा पॅटन.
संपूर्ण सिनेमा पाहील्यानंतर मला एक अतोनात देखणं लढाऊ, लष्करी व्यक्तीमत्व पहायला मिळाल्याचं समाधान मिळालं. पॅटनचे अफाट नेतृत्व गुण, स्पष्टवक्तेपणा तसच त्याच्या दोषांचही कौतुक वाटल्याशिवाय राहीलं नाही इतकी मोहीनी या सिनेमानी घातली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पॅटन अप्रतिम सिनेमा आहे. ती व्यक्तीरेखाच विलक्षण आहे. सिनेमातील अ‍ॅक्टर खूप देखणा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0