चुकवू नयेत असे चित्रपट - ३ कॅसाब्लॅंका ( १९४२ )

हे आधी दुसर्‍या संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे

---

नमस्कार लोक हो,

आज जो सिनेमा तुम्हाला सांगावासा वाटतो आहे त्याला पण World War-2 ची पार्श्वभुमी आहे. पण ही युद्ध कथा नाही. हा सिनेमा प्रेमाचे वेगवेगळे पदर फार सुन्दर पणे आपल्याला दाखवतो.

हा चित्रपट १९४२ साली तयार केलेला आहे, त्यामुळे तो त्यावेळच्या तंत्रज्ञानाने तयार केलेला आहे हे बघताना लक्षात ठेवावे.

हा सिनेमा मानवी संबन्धांवर असल्या मुळे, ह्यात भव्य सेट किंवा other technical production values नाहित. युद्धा ची पार्श्वभुमी असुन सुद्धा ह्यात युद्ध नाही.

पण कथा , पटकथा, dialogues, मानवी स्वभावांचे चित्रण असे काही आहे कि हा चित्रपट All time great movies च्या यादी मधे नेहमी पहिल्या ५ मधे असतो.

प्रेम, निष्ठा, कर्तव्य आणि नियती ह्या बद्दल चे काव्य च आहे हा चित्रपट म्हणजे.

कॅसाब्लँका ( दिक्दर्शक- Maichael Curtiz )-

पार्श्वभुमी - जर्मनी ने फ्रांस घेतल्यावर, all the Colonies of France आपोआप जर्मनी च्या अधिपत्याखाली आल्या. Morocco was a French Colony then, so it became German colony.

कॅसाब्लँका हे आफ्रिकेच्या उत्तर टोकावरचे प्रसिद्ध बंदराचे शहर आहे. That time, it was not possible to leave Germany Occupied Europe. But as USA had not entered into the war then, people could go to US via Spain or Portugal. Germany used to issue transit pass and Casablanca was the main centre for leaving.

थोड्क्यात कथा.

रिक ( Humphrey Bogart ) नावाचा american सडाफटिंग माणुस आधी कुठल्या तरी african देशा मधे freedom fighters च्या लढाई मधे involved असतो. नन्तर तो Paris ला येतो, तिथे त्याला Ilsa ( Ingrid Burgman ) भेटते. ती एकटी असते आणि दोघे प्रेमात पडतात. त्याच वेळेला Hitler's Army Paris मधे शिरणार असते. त्या मुळे ते दोघे Paris सोडायचे ठरवतात. रिक पॅरिस रेल्वे स्टेशन ला जातो, पण Ilsa तिथे येत च नाही.

सिनेमा सुरु होतो तेंव्हा रिक कॅसाब्लँका मधे एक क्लब cum बार चालवत असतो. मोरोक्को मधला एक फ्रेन्च स्वातंत्र्यसैनिक रिक कडे थोडे transit pass देतो. तेव्हड्यात त्याला फ्रेन्च पोलिस पकड्तात.

थोड्या वेळानि रिक च्या बार मधे नायिका तिच्या नवर्‍या बरोबर येते. पुढे त्यांच्यात काय होते ते बघणे च गरजे चे आहे.

कशासाठि बघावा

- आतिशय सुंदर कथा, Script , Dialogues साठी.
- नेमक्या व्यक्तिचित्रां साठी.
- ह्या कोरड्या जगात थोडे भावनिक होण्यासाठी.

टाळण्या सारखे काहीच नाही. एकदा बघितला तरी कधीहि विसरु शकणार नाही असा हा चित्रपट.

खुप काही लिहिण्या सारखे आहे, पण लिहित नाही. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी ह्या weekend ला बघाच. आणि DVD विकत च आणुन ठेवा, कारण एकदा बघितला की तुम्ही पुन्हा पुन्हा बघणार च!!!

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

मला हा चित्रपट फार आवडला.

मला हा चित्रपट फार आवडला. मुळात मला अशे रोमँटीक चित्रपट जिथे बिकट परिस्थितीत नाती जुळतात वैगेरे, खूप आवडतात. विशेषतः युद्धावारचे वैगेरे. कारण ती परिस्थिती काय होती हे आत्ता कुणीच अनुभवू शकत नाही, पण हे चित्रपट थोडं त्या आयुष्याचं दर्शन घडवतात. याउलट उगीचच सेटप केलेले खोटे-खोटे रोमीओ-ज्युलियेट टाईप चित्रपट नक्लुपी वाटतात. खरंतर मूळ रोमीओ-ज्युलियेट गोष्ट खरोखर चांगली आहे, पण त्या ढाच्यावरचे लाखो चित्रपटांचा कंटाळ येतो.

खुप काही लिहिण्या सारखे आहे, पण लिहित नाही.

धन्यवाद. एवढ्या समीक्षेतच तुम्ही मराठीची आई-बहिण काढलीत. अजून लिहिले असते तर वाचणे झाले नसते. खरंतर हेही नाही वाचलेय, पण असो.

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

ओह प्रसाद१९७१ उर्फ

ओह प्रसाद१९७१ उर्फ अनुराधा१९८० उर्फ अनु राव!!! हम्म....

Amazing Amy

खव मध्ये कोणीतरी विचारले आहेच

खव मध्ये कोणीतरी विचारले आहेच तेच मी ही विचारते, अनुराधा१९८०=अनु राव हे मलाही कळलं. पण प्रसाद्१९७१=अनुराधा१९८० या प्रमेयाची सिद्धता आहे का?

इथेच वरचे प्रतिसाद वाच की.

इथेच वरचे प्रतिसाद वाच की. लेखकाला 'प्रसाद१९७१' संबोधले आहे + माबोवरदेखील या लेखांवर त्यांना प्रसाद१९७१ असेच संबोधले आहे. तिथले सध्याचे नाव टोचा. www.maayboli.com/node/38225

Amazing Amy

तो आयडी माझ्या Lesser Half चा

तो आयडी माझ्या Lesser Half चा आहे. पुर्वी एकाच मशिन वरुन जालावर जाताना एकमेकांच्या आयडींची सरमिसळ झाली होती. आता माबो+मिपा आणि ऐसी अशी विभागणी झाली आहे.

कृपया गैरसमज टाळावा.

लेसर हाफ हं! शब्दयोजना बहुत

लेसर हाफ हं!

शब्दयोजना बहुत रोचक आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

Actually it doesn't matter to

Actually it doesn't matter to me. फक्त कुतुहल होतं. त्या कुतुहलाचीही लाज वाटतेय. असोच.

ह्म्म थँक्स . खरच.

ह्म्म थँक्स . खरच.

https://www.youtube.com/watch

https://www.youtube.com/watch?v=zaAqze81y4Y

या गाण्याकरता हा सिनेमा फार आवडला. वेडी होते हे गाणं ऐकलं की (स्माईल)
इन्ग्रिड बर्गमन चा अभिनय तर इतका जीवघेणा सुंदर आहे. विशेषतः अनेकानेक वर्षांनी दोघांची भेट होते तो क्षण ....

You must remember this
A kiss is just a kiss, a sigh is just a sigh.
The fundamental things apply
As time goes by.

And when two lovers woo
They still say, "I love you."
On that you can rely
No matter what the future brings
As time goes by.

Moonlight and love songs
Never out of date.
Hearts full of passion
Jealousy and hate.
Woman needs man
And man must have his mate
That no one can deny.

येस्स्स हे गाणं वगळता सिनेमा

येस्स्स हे गाणं वगळता सिनेमा विशेष वाटलाच नाही.

एका ओळीत कसाबलंका

भर महायुद्धात जगातले सगळे अड्डे सोडून मी तिची आठवण काढत जिथे ढोसत बसलो होतो त्याच आफ्रिकेतल्या गुत्त्यात ती नेमकी आली.. Drunk

बाकी लेखन उत्तम आहे. इंग्रजी देवनागरीत छापावे म्हणजे टाइम्समधील परीक्षण वाटू शकेल. कसाबलंकेची आठवण पुन्हा करून दिल्याबद्दल शुक्रिया!
(दात काढत)>

नावरे आवरीता!

cum बार म्हणजे काय?

या लेखात उल्लिखित 'cum बार' म्हणजे काय? याविषयी मार्गदर्शन करावे. असे बार अद्याप 'मारोक' मधे आहेत का?

आंग्लाळलेली मराठी

लेखाचे शीर्षक वाचून उत्सुकतेने वाचायला सुरुवात केली, परंतु जिथे तिथे आंग्ल भाषेतील शब्द बघून पुढे वाचवले गेले नाही.
मराठी संस्थळावर संपूर्णपणे मराठी वाचायला मिळण्याची वाचकांची अपेक्षा रास्तच म्हटली पाहिजे.
आपणच मराठीचे असे धिंडवडे काढले, तर इतरांना काय बोलायचे?

वाद

धाग आणी त्यावर होणार्‍या वादांतील काही प्रतिसाद पाहून मौज वाटली.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तंत्रज्ञान जुन्या पद्धतीचं

'कासाब्लांका' लक्षात रहाण्यासारखा नाही वाटला.

तंत्रज्ञान जुन्या पद्धतीचं असलं तरीही Dr Strangelove (युद्धप्रसंगात, आणीबाणीच्या वेळेस लोक कसे वागतात), Wild Strawberries (बाह्य जगात यशस्वी असणार्‍या मनुष्याचं व्यक्तिगत आयुष्य फरफटलेलं असणं), राशोमान (सत्य म्हणजे नक्की काय, या प्रश्नाचा उहापोह) असे चित्रपट आवर्जून बघा, असं रेकमेंडेशन (मराठी शब्द?) द्यावं असं वाटतं. 'कासाब्लांका' काही महिन्यांपूर्वी पाहिला, त्यात असं काहीही मलातरी सापडलं नाही. काय आवडलं (किंवा आवडलं नाही) ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला नाही, आणि लक्षातही राहिलं नाही. म्हणून हा प्रश्न मुद्दाम विचारावासा वाटला. पुन्हा हा चित्रपट का पहावा आणि त्यात नक्की काय पहावं?

---

भाषेबद्दल. कामाच्या कधी मजेच्या निमित्ताने काही द्विभाषिक लोकांना, कधी वेगळी मातृभाषा असणार्‍या लोकांशी संसार करणार्‍या लोकांना भेटणं होतं. त्यांतल्या बहुसंख्य लोकांना विचारलं असता त्यांनी एक नियम सांगितला ज्यामुळे या द्विभाषिक लोकांना दोन्ही भाषा नीट जमल्या. ज्या भाषेत वाक्य सुरू केलं आहे त्याच भाषेत ते संपवायचं. माझ्या आजोळच्या घरात एक कातकरी कुटुंब रहातं. त्या घरातले सगळेच कातकरी आणि त्या गावातल्या कातकरी वस्तीतलेही बहुसंख्य कातकरी दोन बोली भाषा बोलतात, प्रमाणभाषा (किंवा त्या आसपास जाईल अशी बोली) आणि कातकरी. या भागातले न शिकलेले लोकही दोन बोली भाषांची भेसळ करताना आढळले नाहीत. आमच्यासारख्या शहरी लोकांशी बोलताना प्रमाणभाषेच्या आसपास असणारी बोली आणि अन्य कातकरी लोकांसोबत असताना त्यांची बोली असा भेदही स्पष्ट दिसत असे, पण एका बोलीभाषेत वाक्य सुरू केलं की ते त्याच भाषेत संपत असे. आम्ही कातकरी भाषेत भाषांतर मागितलं तर ते ही 'शुद्ध' असे.

महायुद्ध, (अन्य देशांतल्या) वसाहती, स्वातंत्र्यलढा, हिटलरचं सैन्य असे शब्द मराठीमधे प्रचलित आहेत. रोजच्या वापरातले मराठी समजले जाणारे इंग्लिश शब्द शोधायचे असतील तर टेबल, पेन, आणि अनेक तांत्रिक शब्द आठवले. मराठीत पर्शियन, अरबी भाषांमधून आलेले अनेक शब्द आहेत. पण युद्ध, वसाहतवाद इ गोष्टी आपल्याकडेही होत्या. परकीय संस्कृतीमधून आल्यामुळे शब्द तसाच उचलला, अशी कारणमीमांसा या शब्दांसाठी देता येत नाही.

'क्रुत्रीम' वाचायला बरं वाटत नाही हे खरं, (ते सवयीमुळे?) पण मग संस्थळानं तस धोरणं बनवावं ज्यायोगे असं वाचायला लागणार नाही.

शुद्धलेखन (किंवा स्पेलिंग) ही गोष्ट अनेकांना तापदायक वाटते त्यामुळे शुद्धलेखन तपासता येण्याची सोय असावी हे मान्य आहे. पण सॉफ्टवर असलं तरीही त्याचा उपयोग करताना तारतम्य वापरावं लागणारच, पाणी म्हणायचं आहे का पाणि हे ठरवण्यासाठी आधी शुद्धलेखन माहित असावं लागेल, शंका असेल तर शब्दकोषांचा वापर करण्याची इच्छा असावी लागेल. प्रमाणभाषा वगळता अन्य बोलीभाषेतलं लिखाण असेल तर पानीसुद्धा शुद्ध म्हणावं लागेल. कोणी कातकर्‍यांच्या घरात घडणारी गोष्ट लिहीत असेल तर "आंगळू धवुला गेला आहा" अशा प्रकारचं मराठी लिहीताना ती बोलीभाषा शुद्ध माहित असावी लागेलच. 'आंघोळ करणे' आणि 'आंगळू धवु' यातलं उच्चश्रेणीचं मराठी कोणतं यापेक्षा 'आंघोळ धुणे' अशी वाक्यरचना दोन्ही बोलीभाषांमधे चूक आहे हे समजणं महत्त्वाचं.

'ऐसी अक्षरे'वर टंकनासाठी मदत इथे आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काहिसा सहमत

लेखातील मराठी वाचायला बरं वाटतं नाही हे परत एकदा नमूद करतो.

कोणी कातकर्‍यांच्या घरात घडणारी गोष्ट लिहीत असेल तर "आंगळू धवुला गेला आहा" अशा प्रकारचं मराठी लिहीताना ती बोलीभाषा शुद्ध माहित असावी लागेलच. 'आंघोळ करणे' आणि 'आंगळू धवु' यातलं उच्चश्रेणीचं मराठी कोणतं यापेक्षा 'आंघोळ धुणे' अशी वाक्यरचना दोन्ही बोलीभाषांमधे चूक आहे हे समजणं महत्त्वाचं.

मुद्दा कळला, पण (वादासाठी वाद म्हणा) (बोली)भाषा शुद्ध किंवा अशुद्ध हे सापेक्ष आहे असं मानल्यास म्हणजेच कातकर्‍यांची भाषा(काथोडी?) जर दर पन्नास मैलाला बदलत असेल तर त्यात चूक बरोबर हे सापेक्ष ठरते. मग संभाषण करणार्‍या लोकांना एकमेकांची भाषा समजली तर ती(संभाषणासाठी) योग्यच आहे असं मानण्यास काय हरकत आहे? अर्थात शिष्टाचार म्हणून किंवा लिखाणाचा प्रेक्षकवर्ग लक्षात घेऊन सुलभीकरण करणे, व्याकरण-नियम पाळणे जरूर करावे असे माझे मत आहे.

कर्जतकडच्या कातोड्यांची भाषा

कर्जतकडच्या कातोड्यांची भाषा अलिबागकडच्या कातोड्यांपेक्षा वेगळी असेलच. आणि ती वेगळी असण्याबद्दल अजिबात आक्षेप नाही उलट शक्य असेल तर हे वैविध्य जपलं जावं.

एकमेकांना बोली कळते का नाही यापेक्षाही एकमेकांमधे मिसळणं कितपत सहजपणे होतं असा प्रश्न आहे. आंघोळ करण्याला कर्जतकडच्या कातोडी भाषेत 'आंगळु धवुला गेला आहा' म्हणत असतील तर शहराकडे नोकरी मिळताना सोपं होतं म्हणून त्यांनी कातोडी बोलीतच 'आंघोळ धुण्याचं' कारण नाही. शहराकडे जाऊन अशी भाषा बोलले तर तोटाच जास्त होईल. प्रमाण मराठी बोलताना तीच बोली बोलणं आजोळच्या कातकर्‍यांना अजिबात कठीण जात नसे. तीच गोष्ट त्यांच्या कातोडी बोलीचीही!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अवांतर

एकमेकांना बोली कळते का नाही यापेक्षाही एकमेकांमधे मिसळणं कितपत सहजपणे होतं असा प्रश्न आहे.

आपल्याच बोलीवर ठाम न रहाता एकमेकांची बोली कळली तर मिसळणं सहजपणे होतं असं ईतिहासात दिसतं, पण तसं आवडेलचं/किंवा लगेच कळेलच असं नाही.

रेकमेंडेशन (मराठी शब्द?)

रेकमेंडेशन (मराठी शब्द?)
...... शिफारस हा प्रचलित. (मराठी म्हणायचा की नाही ते तज्ज्ञांवर सोपवू.)

...... शिफारस हा प्रचलित.

...... शिफारस हा प्रचलित. (मराठी म्हणायचा की नाही ते तज्ज्ञांवर सोपवू.)

उचललेली व्याख्या: ज्या शब्दाचं सामान्यरूप होतं तो शब्द मराठी म्हणायला हरकत नाही.

शिफारस या शब्दाचं मूळ कोणत्या का भाषेत असेना, या चित्रपटांची शिफारस जरूर करेन. (हे चित्रपट रेकमेण्ड करण्यापेक्षा चित्रपटांची शिफारस अधिक मराठी वाटते.)ते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

किंवा असेही -

.... या चित्रपटांची शिफारस जरूर करेन....
..........'मी हे चित्रपट तुम्हांला अगत्याने/अवश्य सुचवेन' असेही आपण म्हणू शकतो. किंवा 'हे चित्रपट तुम्ही अवश्य/ज़रूर पाहा' असेही म्हणायला मोकळीक आहेच.
बर्‍याच वेळा, इङ्ग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द सुचत नसेल, तर वाक्यरचनाच बदलून पाहा किंवा शब्द समूह वापरून पाहा, कारण मुळात इङ्ग्रजी शिकण्याआधी, आपण असे मराठी बोलतच नव्हतो.
उदा:- 'I am busy rightnow' साठी 'मी सध्या व्यग्र आहे', 'सध्या कार्यबाहुल्य आहे' असे अर्थाने योग्य मराठी वाक्य म्हटले, तरी ते कानाला टोचतेच. ते इङ्ग्रजीचे भाषान्तर आहे, हे कळतेच. 'आजकाल मी जरा कामात गुन्तलो आहे' असे सोपे मराठी बोलायचे, ऐकायचे आपण बहुधा विसरूनच गेलो आहोत.

रोचक

यावरच मागे एकदा एका आंतरजालावरील व्यक्तीच्या काहिशा कृत्रिम रचनेमुळे त्याला आणि स्वतःलाही विचारले होते की "तु/मी विचार - वाक्यरचना- कोणत्या भाषेत करतो?" माझे स्वतःपूरते प्रामाणिक उत्तर 'मराठीत' असे आले नाही (मात्र ते इंग्रजी, हिंदी असेही आले नाही.. कारण याप्रश्नाचे उत्तर देताना मीच गोंधळलेलो होतो).

बहुदा (पहिली ७ वर्षे पूर्ण मराठी, नंतर सेमी इंग्रजी आणि महाविद्यालयीन व पुढील शिक्षण इंग्रजी माध्यमात होऊनही [की झाल्यामुळे?]) विविध भाषांच्या संस्कारामुळे काहिशा 'संकरित' भाषेत विचार-वाक्यरचना होत असाव्यात

अश्या प्रश्नांची चाचणी घेणारी काही टुल्स / प्रश्नमालिका ऑनलाईन उपलब्ध असतील का? (इथे कोणी बनवू शकेल का?)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तूच बनव ना. बॅट्या, नंदन,

तूच बनव ना. बॅट्या, नंदन, अमुक या जाणकारांची मदत घे. प्लीज, बनवच. निष्कर्ष रोचक असतील.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काहीसा सहमत

'रिक ( Humphrey Bogart ) नावाचा american सडाफटिंग माणुस आधी कुठल्या तरी african देशा मधे freedom fighters च्या लढाई मधे involved असतो' असल्या अक्करमाशा मराठीपासून ह्या संस्थळाला दूर ठेवा असे मागणेहि फार आहे काय?

सहमत, ते वाचावयास त्रास होतो आहे.

अवांतराबद्दल - कोण ती भाषा वापरतो ह्यावर किती भाव कोण देतो हे ठरतं असा अनुभव आहे, पण वाचायला, ऐकायला बरं वाटत नाही हे खरं,

प्रमाण मराठीचा वाद नाहीच आहे.

मी प्रमाण मराठीचा पुरस्कर्ता असलो तरी येथे मुद्दा तो नाहीच.

'रिक ( Humphrey Bogart ) नावाचा american सडाफटिंग माणुस आधी कुठल्या तरी african देशा मधे freedom fighters च्या लढाई मधे involved असतो' असल्या अक्करमाशा मराठीपासून ह्या संस्थळाला दूर ठेवा असे मागणेहि फार आहे काय?

अवान्तर - इंग्रजीची बेगडी झूल पांघरणार्‍या पुष्कळांचे इंग्रजीहि तसेच अक्करमासे असते हा अनुभव आहे. वरील वाक्यात साहेबाच्या इंग्रजीनुसार american आणि african ह्या शब्दात a च्या जागी A हवा होता. असल्या 'Language thunderous, grammar wondrous' भाषेमध्ये कोठल्याहि प्रतिष्ठित संस्थेला लिहा आणि किती 'भाव' मिळतो ते पहा

अक्करमाशा मराठीपासून चपखल

अक्करमाशा मराठीपासून

चपखल वर्णन...

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

जुनाच वाद?

प्रमाण मराठी म्हणजे काय असा वाद इथे घालावा(परत) काय? "शुद्ध मराठी" ची व्याख्या काय? असं विचारावं तरं सापेक्ष उत्तर मिळणारं नाही काय?

'क्रुत्रीम' वाचायला बरं वाटत नाही हे खरं, (ते सवयीमुळे?) पण मग संस्थळानं तस धोरणं बनवावं ज्यायोगे असं वाचायला लागणार नाही.

मराठीचे दुर्दैव.

मराठीचे दुर्दैव आणि चालू घसरण ह्यामुळेच आहे की साक्षर - सुशिक्षित हा शब्द जाणूनबुजून वापरत नाही - मराठी व्यक्तींनाहि आपल्याला शुद्ध मराठी लिहिता येत नाही ह्यामुळे ओशाळवाणे वाटत नाही, उलट मला चांगले मराठी लिहिता येत नाही हे ते तोंड वर करून जाहीर करतात अणि शुद्ध लिहिण्याची गरजच काय असे विचारण्याचेहि धार्ष्ट्य दाखवितात. प्रसाद१९७१ ह्यांना 'क्रुत्रीम' लिहिण्यात काहीच कृत्रिम वाटत नाही.

धैर्य असेल तर कामाच्या जागी किंवा जेथे काही लभ्यांश आहे असे वाटते अशा ठिकाणी इंग्रजीशी असे स्वैर चाळे करा आणि परिणाम चाखा.

कमीत कमी 'ऐसी अक्षरे' असे नाव लावणार्‍या संस्थळावर तरी मराठीबाबत अधिक संवेदनाशीलता दाखवा हे विनंती.

होमवर्क

घरचा अभ्यास
शुद्ध मराठीमध्ये दिसणारे ४ धागे परत लिहून काढावेत ,(एकदा वहीमध्ये आणि नंतर संगणकावर)
Script , Dialogues इत्यादी तांत्रिक शब्दांसाठी मराठी शब्द धुंडाळावेत (इथे शब्दकोश दिलेले आहेत त्याचा संदर्भ घ्यावा).प्रत्येक ओळी मध्ये दिसणारे आंग्ल शब्द काढून टाकावेत,प्रत्येक दुसऱ्या वाक्यात असलेले आंग्ल शब्द वाचायला अवघड होतात आणि माझ्यासारख्यांना भावना नीट पोहोचत नाहीत. अजून थोडं प्रवाहात आणता आल्या झकास जमेल .खुप काही लिहिण्यासारखे आहे पण लिहित नाही. असे तुम्हीच म्हणता आहात लिहून व्हा मोकळे बिंधास जे वाटतंय ते ,फक्त रसभंग होण्याची शक्यता वाटली तर तशी सुचना द्या ..

संकेत्स्थळ हा शब्द संकेतस्थळ असा कुठे पण सापडला असता,किमान असे सारखे लागणारे शब्द वर्ड मध्ये कॉपी करून ठेवल्यास परत लिहिताना तिथून उचलून लिहू शकाल.. प.रा.च्या ब्लॉग वर चित्रपट परिक्षण सापडेल त्यात तुम्हाला लागणारे मराठी शब्द सहज मिळून जातील...

मित्र समजून सांगतोय राग नसावा..

गरज नाही

सर्व शब्द मराठीत लिहिण्याची गरज नाही.जे शब्द रोजच्या वापरातले आहेत ते english काय आणि मराठी काय?

उगाच रोजच्या वापरातल्या सगळ्यांना समजणार्‍या english शब्दांना मराठी शब्द तयार करण्याच्या चुकीच्या पायंड्यामुळे लेखी मराठी ही क्रुत्रीम ( हे कसे लिहायचे अजुन सापडले नाही ) वाटू लागली आहे.

संकेतस्थळ शब्द correct केला आहे.

सर्वप्रथम लेखमालेचे नाव मराठी

सर्वप्रथम लेखमालेचे नाव मराठी बदललेत त्याबद्दल अभिनंदन!

कृ = kRu
टंकलेखनासाठी मदत या धाग्यावरून होईल. जरूर लाभ घ्यावा ही विनंती

English = इंग्रजी
correct = दुरूस्त
other technical production values = इतर तांत्रिक निर्मितीमूल्ये
dialogues = संवाद
All time great movies = कालातीत उत्तम चित्रपट
all the Colonies of France = फ्रान्सच्या सगळ्या वसाहती
freedom fighters: स्वातंत्र्यसंनिकांच्या
involved : सहभागी (त्या वाक्याच्या अनुशंगाने अर्थ)
Script: पटकथा

याव्यतिरिक्त american : अमेरिकन, african : आफ्रिकन अश्या प्रकारे विशेषनामांना देवनागरीत जसेच्या तसे लिहिता यावे. याव्यतिरिक्त काही वाक्ये अख्खीच्या अख्खी इंग्रजीत आहेत त्यांतील काहि शब्द अडल्यास जरूर विचारा.

मराठी संस्थळावर मराठीत लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा ही विनंती. नवे मराठी शब्द तयार करण्यास आपले समर्थन नाही असे समजते. परंतू जे प्रचलित मराठी शब्द आहेत किमान त्यांचा वापर आवर्जून कराल, जे माहित नसतील त्याबद्द्दल इथे चर्चा करुन मग योग्य वाटल्यास लेखनात बदल कराल अशी आशा वाटते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!