कांती शाह नावाच कल्ट

काल लॅपटॉप वर एड वुड हा रिचर्ड बरटन- जॉनी डेप यांचा चित्रपट बहुदा २८ व्या वेळी पाहत होतो. एड्वर्ड डेविस 'एड' वुड जूनियर हा हॉलीवुड मधला निर्माता आणि दिग्दर्शक. ६० आणि ७० च्या दशकात याने एलीयेन्स, भूत-प्रेत आणि इतर तत्सम विषयावर चित्रपट काढले. पण याची खरी ओळख ही नाही. अमेरिका मध्ये Golden Turky Award नावाचा भन्नाट प्रकार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करतात, त्याप्रमाणे गोल्डन टर्की अवॉर्ड्स सर्वात वाईट चित्रपटाना पुरस्कार देतात. त्यांच्या मते वाईट चित्रपट बनवणे पण एक कला आहे. तर या गोल्डन टर्की अवॉर्ड नि एड वुड ला Worst Director of All Time या पुरस्काराने सम्मानित केले. हा पुरस्कार घ्यायला एड वुड मात्र हाजर राहू नाही शकला. कारण २ वर्षापूर्वीच अती मद्यपान ने तो मरण पावला होता.

रिचर्ड बरटन ने एड वुड वर काढलेला चित्रपट पाहताना मला प्रश्न पडला की एड वुड चा कोणी भारतीय वारसदार असेलच की ज्याने सतत वर्षानुवर्ष वाईट चित्रपट काढले असतील. पण प्रश्न जास्त वेळ टिकला नाही कारण लगेच मला एड वुड चा भारतीय वारसदार सापडला. कांती शाह. एड वुड प्रमाणेच कांती शाह हा मुळीच लाइम लाइट मध्ये नाही. पण त्याने त्याच्याच क्लेम प्रमाणे तब्बल ९० चित्रपटांची लेखन-निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. अनेक मराठी ब्लॉग लेखकाना कांती शाह माहीत आहे तो त्याच्या कल्ट क्लासिक 'गुन्डा' या फिल्म मुळे. 'its so bad that it's good' या सिंड्रोम मुळे ह्या चित्रपटाला कल्ट क्लासिक चा दर्जा मिळाला आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तिला विनोदाची झालर येते म्हणतात. अतिशय वाईट संवाद, भडक अभिनय, विनोदी रेप सीन्स, व अतिशय वाईट तांत्रीक बाजू असते तेंव्हा गुन्डा सारखा चित्रपट तैयार होतो. एड वुड चे चित्रपट ज्याप्रमाणे तो मरण पावल्यावर कल्ट बनले तसा कांती शाह चा हा चित्रपट प्रदर्शित झालयावर गाजला. पण कांती शाह च दुर्दैव हे की गुन्डा हा मिथुन चा चित्रपट म्हणून ओळखला गेला. या चित्रपत्ाआचा लेखक-निर्माता-दिग्दर्शक कांती शाह हा बाजूलाच राहिला. खर तर गुन्डा चा दिग्दर्शक हीच कांती शाह ची ओळख करून देण म्हणजे त्याच्यावर अन्याय होईल. डाकु मुंनीबाई, गरम,कांती शाह के अंगूर ,लोहा,या सेमी पोर्न चित्रपटांचा लेखक-दिग्दर्शक म्हणून तो सिंगल-स्क्रीन चित्रपट मार्केट मध्ये प्रसिद्ध आहे.

छोट्या आणि सेमी-अर्बन भागात त्याच्या चित्रपटाना लाखोचा चाहता वर्ग आहे. म्हणून काही त्याचे चित्रपट काही सोशल मेसेज द्यायच्या फंदात पडत नाहीत. जे जे म्हणून या छोट्या शहरातल्या प्रेक्षकाना हवे आहे ते ते कांती शाह आपल्या फिल्म्स मधून देतो. त्याच्या सिनेमांवर अश्लिलतेचे आरोप केले जातात. पण कांती शाह कडे या आरोपानवर उत्तर आहे. कांती शाह च्या मते जेंव्हा महेश भट्ट बिपाशा किंवा मल्लिका सारख्याना घेऊन चित्रपट काढतो ज्यात हॉट सीन्स चा भडिमार असतो तेंव्हा महेश भट च्या चित्रपटाना कोणी अश्लील म्हणत नाही आणि मी माझया टार्गेट ऑडियेन्स ला जे पाहिजे ते देतो तर माझया वर अश्लिलतेचे आरोप होतात. आहे की नाही वॅलिड पॉइण्ट?

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हणतात. कांती शाह ला तुम्ही यशस्वी मानत असाल तर त्याच्या यशामागे पण एक स्त्री आहे. सपना तन्वीर. कांती शाह ची बायको. पण ती कांती शाह च्या नुसते पाठीमागे उभी राहून थांबली नाही तर त्याच्या चित्रपटांमध्ये तिने कॅमेरयासमोर पण भरपूर 'योगदान' दिले आहे. कांती शाह च्या जवळपास प्रत्येक चित्रपटात तिने मुख्य अभिनेत्रिची भूमिका पार पाडली आहे. तिचा स्वतहचा असा एक फॅन बेस आहे.

कांती शाह ने त्याच्या २० वर्षाच्या कारकिर्दीत धर्मेन्द्र, मिथून, गोविंदा, मनीषा कोइराला अशा ए ग्रेड अभिनेत्यांसोबत पण काम केल आहे. बी ग्रेड चित्रपटात काम करणारे हे मोठे अभिनेते हा स्वतंत्र लेखांचा विषय. राजेश खन्नाने आपल्या पडत्या काळात वफा नावाचा एक तद्दन ब ग्रेड चित्रपट केला होता. त्यात त्याने केलेले काही सीन्स पाहून त्याच्या चाहत्यांवर वीज पडेल. तीच गोष्ट उर्वशी ढोलकिया या नुकत्याच बिग बॉस सीज़न च्या विजेतीची.

बी ग्रेड चित्रपट हे माझयसारख्या छोट्या शहरातून आलेल्या लोकांच्या अनुभव विश्वाचा अविभाज्य हिस्सा. हा विषय तसा टॅबू म्हणून गणला गेला असल्याने चार लोकात या विषयावर बोलता येत नाही. पण बोलता येत नाही म्हणून या विषयाच मह्त्व कमी होत नाही. कांती शाह हा माणूस त्यामुळे माझयच नव्हे तर लाखो लोकांच्या अनुभव विश्वाचा हिस्सा आहे. कुठलाही आव ना आणता त्याने एक प्रकारे चित्रपट सृष्टी शी आपले इमान राखले. आपल्या प्रेक्षकांशी ेकनिष्ठ राहून त्याना इमान इतबारे हवे ते दिले.भले या माणसाने शोले किंवा दो बिघा जमीन बनवला नसेल पण शेवटी गुन्डा ने त्याला मोठ्या लोकांच्या प्रभावळीत स्थान मिळवून दीलेच. आज IMBD सारख्या वेब साइट वर गुन्डाच मानांकन रणबीर च्या Rockstar, विद्याच्या द डर्टी पिक्चर, आणि चक्क शोले पेक्षा पण जास्त आहे. अजुन एका दिग्दर्शकाला काय हव.

काळ बदलत आहे. चित्रपट सृष्टीची गणित पण बदलत चालली आहेत. मल्टिपलेक्स नि सर्व समीकरण बदलून टाकली आहेत. त्याचा फटका कांती शाह ला पण बसला आहे. डिजिटल क्रांतीच्या या काळात कांती शाह सारख्या एकांड्या शिलेदाराला निभाव धरण अवघड होत जाणार आहे. कदाचित पुढच्या ५ वर्षात कांती शाह नामशेष पण झाला असेल. पण त्याची लेगसी कायम राहणार आहे. रमेश सिप्पी ने एक शोले बनवला आणि तो चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अमर झाला. कांती शाह पण त्या प्रभावळीत राहील याची व्यवस्था गुन्डाने केली आहे. पण कांती शाह आणि एड वुड सारखी लोक आपण त्याना कितीही हसत असलो तरी चित्रपट बनवल्याशिवाय राहू शकत नाहीत. त्यांच चित्रपट बनवण्यावर अतोनात प्रेम असते. कारण ते त्याशिवाय दुसर काही करू पण शकत नाहीत. कांती शाह च पुढे काय होईल या कल्पनेने जीव तुटतो. ज्या माणसाने आपल्यासाठी एवढ केल त्याची काळजी वाटायला नको?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

आभारी आहे या टिपण्णीबद्दल. विशेषकरुन, ब-याच दिवसांनंतर लोहा या सिनेमाची आठवण आली. आमच्या गावातल्या व्हिडिओ पार्लरच्या टिकिट चेकरला वशिला लाऊन अगदी पडद्याखाली बसून दंगा करत हा सिनेमा बघितलाय. एका ढीश्~व बरोबर व्हिलनला जमीनीत गाडणारा हिरो विरळाच. बी=ग्रेडचं इस्थेटीकच वेगळं. गुंगवून टाकणारं. रामसे बंधूंच्या सिनेमाची आठवण येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कांती शाह के अंगुर' ख्या ख्या ख्या. उडान आठवला... माहीत नव्हतं अशा नावाचा खरंच चित्रपट आहे... रॉकस्टार मधला 'जंगली जवानी' पण यांचाच का?
रोचक लेख.
या शाह भाईँचा एकही चित्रपट पाहीला नाही.
'मिस लवली' बद्दल अधुनमधुन येतं पेपरात. थोडी माहीती देउ शकाल का त्या चित्रपटाबद्दल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिस लवली हा बी ग्रेड चित्रपट नाही तर बी ग्रेड फिल्म इंडस्ट्री आधारित फिल्म आहे. सध्या जाम हवा आहे या चित्रपटाची फिल्म फेस्टिवलेमध्ये

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

हो हा लेखही बी ग्रेड इंडस्ट्री/निर्माता वरच आहे ना, त्यामुळे तुम्ही किँवा इतर कोणी मिस लवली पाहीला असल्यास त्याबद्दल अधीक वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिचर्ड नाय हो टीम , टिमोथी वाल्टर बर्टन

बाकी कांतीभाय, सपनाबेन चे फोटो टाका की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो टाकायला मला पण आवडतील पण जरा 'ह्या' टाइप चे आहेत ; ) Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

खी खि.. रोचक माहिती..
अजून असा चित्रपट थेट्रात पहायचा योग आलेला नाही. एकदा बघायचा विचार आहे (पण तसा तो बरेच वर्षे आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गुंडा पिच्चरवर एक अप्रतिम लेख इथे बघावा.

http://www.naachgaana.com/2007/06/22/gunda%E2%80%94the-legend/

मूळ ब्लॉगवर सापडत नाहीये लेख. पण हा लेख म्हंजे मस्ट रीड आहे. हसूनहसून कळायचं बंद होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही दिलेल्या यादीतील काही चित्रपटाञ्ची नावे ऐकली असली तरी 'कान्ती शाह' हे एवढे दणदणीत प्रकरण असेल हे माहीत नव्हते.
पाहायला हवे.
थोडे अवान्तर -
बी ग्रेड नसले, तरी डोके बाजूला ठेवून चित्रपट पाहण्यातले, आणि त्यातल्या एकूणच संवाद, नृत्य, अभिनय, सङ्कलन, हाणामारीच्या प्रसङ्गान्तील अतिरेकाने विनोदी होणारे काही चित्रपट आठवले.
१. सुरक्षा (१९७९) हा मिथुनचा असाच घनघोर गम्भीर चित्रपट. एस्.एस्.ओ. नावाची दहशतवादी सङ्घटना भारतावर हल्ला करून देश ताब्यात घेणार असते. मिथुन हा 'जी-९ एजण्ट' शर्थीचे प्रयत्न करून एस्.एस्.ओ. च्या प्रमुखाला शिकस्त देतो याची दुर्दम्य कथा. यात जगदीप हा नट घरात सायकलवर बसून, मागचे चाक स्टॅण्डवर चढवून, जागच्या जागी पाय मारत एका हाताने घण्टी वाजवत, 'खम्बा उखाडके' हा वाक्यप्रयोग जागोजागी फेकत, हनुमानाला साकडे घालतो की, 'आता मी तरूण झालो, आतातरी मला एखादी पोरगी पटायला मदत कर'. यावरूनच, चित्रपटाचा दर्जा काय ते सूज्ञांस साङ्गणे न लगे.
यातील मिथुनचे करामती करण्याचे प्रसङ्ग नयनरम्य आहेत, चुकवू नका.
२. फारूख शेख, रवी वासवानी, सतीश शाह, अमजद खान, अनुपम खेर, राकेश पुरी, राजेन्द्र नाथ अशी प्रभावळ असलेला एक जबरदस्त फार्सिकल चित्रपट म्हणजे 'पीछा करो' (१९८६). दिग्दर्शक पङ्कज पराशर.
'जाने भी दो यारों' मध्ये जशी अनेक प्रसङ्गान्त कसलीही तर्कसङ्गती नसलेली दृश्ये त्यातल्या वैचित्र्याने अतोनात हसवून जातात, तसे वैचित्र्य वापरून एक पूर्ण लाम्बीचा चित्रपटच पराशरने उभा केला आहे. वानगीदाखल, अमजदखान आपल्या 'बॉस'ला फोन करताना 'मियाँव मियाँव, कुत्ते को बिल्ली का सलाम' अशी सङ्केताक्षरे उच्चारून गुप्त सम्भाषणाची सुरूवात करतो. ही चित्रपटाची सुरुवात पाहा. किंवा फारूख शेख आपल्या 'ज़मीर' ला भेटतो ते हे दृश्य पाहा, एकूणच कल्पना येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे एकंदरीत फारच रोचक प्रकरण दिसते आहे. माहितीबद्द्ल धन्यवाद. एकंदरीतच या धाग्याने आमच्या माहितीत प्रचंड भर घातली आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कांती शाहचे काही चित्रपट शाळेत असताना पाहिले होते. ठळकपणे आठवणारा म्हणजे लोहा. मला हा गुंडापेक्षाही जास्त आवडला होता. मोहन जोशीला तसल्या भूमिकेत पाहून सुरुवातीला धक्काच बसला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या लोकाणा गुन्डा आणि कांती शाह काय चीझ आहे हे माहीत नाही त्यांच्यासाठी गुन्डा मधला एक सीन. संवाद ऐकुन्च आडवे व्हाल. ROFL

http://youtu.be/uu3NSXaJ7h8

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

वर्गात घासू, चष्मिष्ट दिसणार्‍या पोरांनी अचानक ऑफ तासाला दंगा सुरू केल्यानंतर जसं आश्चर्य वाटेल तसं लेख आणि प्रतिसाद वाचून झालं. कांती शाह या अनमोल हिर्‍याचं नाव मला आजच माहित झालं, सिंड्रेला मेन यांचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वर्गात घासू, चष्मिष्ट दिसणार्‍या पोरांनी अचानक ऑफ तासाला दंगा सुरू केल्यानंतर जसं आश्चर्य वाटेल तसं लेख आणि प्रतिसाद वाचून झालं.

कळतात हो असली बोलणी. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कांतीभाईंचा गुंडा यूट्यूबवर संपूर्ण (एकच क्लिप) आहे. इच्छुकांनी जरूर लाभ घ्यावा:
http://www.youtube.com/movie?v=vYd2XcIxGBk&feature=mv_sr

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही लाभ घेतला काय हो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी इच्छुक आहे का याची माहिती काढून घेण्याचा हा तुझा डाव मला कळत नाही होय?

नाही. सध्यातरी नाही. डोकं बाजूला काढण्याची एवढीच वेळ आली तर सोय असावी म्हणून शोधून ठेवला आहे एवढंच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही हा हा हा हा. पूर्ण पिच्चरच भारीये, पण तितका वेळ नसला, तर सुरुवातीचा फकस्त अर्धा तास बघ. मिथुनदाच्या एंट्रीपर्यंत वट्ट. हसूनहसून झिंगून कळायचं बंद होतंय!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

२० मिनीटात पुरता पिक्चर पाहिला. मारामारी, गाणी असतील तर सगळं ढकललं. डायलॉग्जच ऐकलं. कांती शाहचा एवढा उदोउदो का करावा हे लगेच समजलं. "मेरा नाम है बुल्ला, मै रखता हूं सब खुल्ला।"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तो खरेतर मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता आहे "रखता हूं खुल्ला" ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जबर्‍याच लिहिले आहे.

मधे The Cult of Kanti Shah हा असाच अजून एक धुमशान लेख वाचनात आला होता.

आणि हा गुंडा ह्या चित्रपटालाच वाहिलेला ब्लॉग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २