भरंवसा

निळ्या वादळाचे अलौकिक संगीत
नि:स्तब्ध भवताल, नि:शब्द धून
हालचाल नाही तरी स्पंदणाऱ्या-
सृष्टीस व्यापून संपृक्त मौन

सखी ऐकते प्राण एकत्र करुनी
निळ्या स्फूर्तीमधला गंभीर खर्ज
संन्यस्त आकाश दूरात स्मरते
जुन्या चांदण्यांचे प्रभावंत पुंज

मुका आर्त आक्रंद पचवून कुणीसा
खुळा अंतराळी बघे स्तब्ध मेघ
निवृत्त पटलात हळवी उमटली
विजेची खुळ्या एक सुस्पष्ट रेघ

निळ्याशा उजेडी खुळासा भरंवसा
किती तीक्ष्ण पाती आता म्यान व्हावी
मालिन्य, दैन्ये नि शल्ये मनांची
तेजात हळुवार वितळून जावी

----- x 0 x ----

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

'मागचा कागद' नंतर अपेक्षा निर्माण झाल्या होत्या त्याला उतरणारी कविता. कविता आवडलीच. विशेषत:

मुका आर्त आक्रंद पचवून कुणीसा
खुळा अंतराळी बघे स्तब्ध मेघ
निवृत्त पटलात हळवी उमटली
विजेची खुळ्या एक सुस्पष्ट रेघ

हे सर्वाधिक आवडले..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

निळ्या वादळाचे अलौकिक संगीत
नि:स्तब्ध भवताल, नि:शब्द धून
हालचाल नाही तरी स्पंदणाऱ्या-
सृष्टीस व्यापून संपृक्त मौन

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0