न कर्त्याला सतरा कारणे ..!!

गरमगरम झालेले पाय आणि त्यावर सोडलेली थंडगार पाण्याची धार . स्वर्गसुखच ते.

पण त्यासाठी आधी पाय आणि अंग गरम करावे लागते .गैरसमज नको.

सकाळी थोडे लौकर उठावे लागते ..पांघरूण कष्टानी दूर सारावे लागते.

आपले बाहेरचे कान एकदम मजबूत असतात .

बोललेलं आणि न बोललेलं सुद्धा आपल्याला बरीक ऐकायला येत.

पण आपलाच आतला आवाज मात्र ऐकू येत नाही.

आपलं शरीर आपल्याशी सतत संवाद करत असतं .

ते एखाद्या समंजस मुलासारखं असतं , त्याच्या मागण्या सुद्धा माफक असतात . पुरेशी झोप . नीटस खाणं. बास्स ...मग ते सतत हसत असतं.

अर्थात या मागण्या पूर्ण न झाला तर थोडी तडजोड करतंही बिचारं ...नंतर मात्र एक नाठाळ पोर उभं राहतं समोर. कटकट कुरबुरी करणारं.

नेहमीची चाकोरी मोडली तर लगेच निषेध नोंदवणारं. आणि गाडी रुळावर आणली कि प्रसन्न हसणारं . मुळात ते शहाणं असतं .

आपल्या आईने खूप खूप वर्षांपूर्वी आपल्याला चालायला शिकवलेलं असतं . फक्त सरत्या वर्षांसोबत आपण तेच विसरलेलो असतो. किती सोपं , बिनपैशाचं असतं हे. पण कोणीतरी सतत आपल्याला पराणी लावली लागते.

आरशासमोर उभं राहिल्यावर " काहीतरी करायला हवं "म्हणायला आपल्याला वेळ असतो.पाठ वळता बाकी निरर्थक व्यवधानं ओढवून घेतलेली .

आणि "वेळ नाही"चं भंपक पालुपद.

एखादी गोष्ट करण्याची चार कारणे असली तर न करण्याची चाळीस कारणे सहज शोधतो आपण.

स्पष्टीकरणे देतो आपण उगाचच लोकांना . कशाला? ( त्यातले मोस्ट फनी उदाहरण म्हणजे " व्यायाम सोडल्यावर 'बॉडी' सुटते , म्हणून व्यायाम न करणे हा पर्याय )

फक्त एकाच व्यक्तीला आपण आन्सरेबल असावे ....स्वतःला फक्त स्वतःला. तिथे मग फसवेगिरी चालत नाही .

लावून घ्यायचे हे व्यसन , भले मग कोणी आपल्याला खुळं म्हणो , व्यसनी म्हणतो.

तोचतो नेहमीचा रस्ता किती निराळा प्रसन्न असतो पहाटे.मानो या न मानो रस्त्याला आणि हवेला सुद्धा मस्त सुगंध असतो . नकारात्मक विचारवाला कोणी लगेचच म्हणेल सुगंध कसला , भलते भलते वासच सहन करावे लागतात पहाटे. पण आपण त्या नकारार्थींकडे सपशेल दुर्लक्ष करायचं कारण आपण पॉझीटीव्ह विचार करणारे असतो.

मुहूर्त कशाला शोधायचा ? जाग्या त्यांथी सवार ( जाग येईल त्या क्षणापासून सकाळ ) अशी म्हणच आहे गुजरातीमध्ये .

आपण बिनधास्त सुरुवात करायची . अहं अजिबात कोणी नको जोडीला. एकट्याने निघायचं सर्रळ . दुधवाले , पेपरवाले , अगदी गल्लीतले कुत्रे सुद्धा ओळखीची स्माईल देऊ लागतात चारसहा दिवसात.

बाकी कोणाला कोणाशी देणे घेणे नसण्याचा मस्त प्रहर असतो हा ..फक्त आपला .

स्वतःशी संवादण्याचा.

गाणारे नसलेले सुद्धा गाऊ लागतात ( मनातल्या मनात ).

कवी नसलेल्याला सुद्धा चार ओळ्या सुचू शकतात .

आणि या अशा नोट्स सुद्धा तेव्हाच उगवून येतात कि .

आणि तेच ते बोलणारं शरीर भरभरून पावत्या देऊ लागतं .फार अपेक्षा नसतातच ना त्याच्या .चांगले सकस काही केले तर फळे रसाळ गोमटी लगेच दिसू लागतात.

आणि जेव्हा कोणी भेटणारा म्हणतो " क्या बात ...व्वा ..वाटत नाही हं तुमच्याकडे बघून " ती केवढी मस्त मस्त जाणीव असते .

नाहीतर मग उलट अर्थाने ऐकून घ्यायचे " अरे बापरे ...वाटत नाही हो तुमच्याकडे बघून "

काय ऐकायचं हे सर्वस्वी आपल्या हाती ...अर्रे व्वा ..........कि अरे बापरे ....!!

थोडक्यात काय ..........चालाल तर वाचाल .........चालते व्हा Wink

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

न कर्त्याचा वार शनिवार

मस्तय

चला यावरुन नवीन वर्षाच्या दोनेक दिवसात बासनात गुंडाळलेल्या रिझोल्यूशनची आठवण झालीय
आता ऊद्या परत ट्राय करिन म्हणते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

न कर्त्याचा वार शनिवार

की नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न कर्त्याचा वार शनिवार
की नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने?

वेल दोन्हीचा अर्थ एकच असावा. चूकभूल देने घेणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

हो ना, लेख नेमका शनिवारीच आला, नाहीतर गेलो असतो चालायला. Wink

जोक्स अपार्ट, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत असल्याने भरपूर आणि भरभर चालणे होते, त्यामुळे अशा प्रेरणेची गरज नसली तरी लेख आवडला.

गेल्यावेळी संध्याकाळच्या चार-पाच वाजता शिवाजीनगर ते औंध चालत गेलो तर घरी आणि शेजारी-पाजारी कोण आश्चर्य आणि काळजी व्यक्त झाली होती! जणू चालणे ही स्वाभाविक कृती न राहता एक मुद्दाम करायचा व्यायामप्रकार झालाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंजवडीत असताना मी हिंजवडी ते चिंचवड हा प्रवास अनेकदा चालत करत असे. त्यावरुन अनेकांना मी विक्षिप्त वाटत होतो. अजूनही कुठे दूरचे नातेवाईक वगैरे भेटले तर 'अच्छा तुम्हीच ना ते हिंजवडीपासून घरापर्यंत चालत यायचे' वगैरे आठवणी काढतात. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठचा तरी पक्षी ओरडत असे पेरते व्हा पेरते व्हा... असं ऐकून आहे. शेतीपासून पार दूर गेलेल्या आपणा शहरवासियांसाठी चालते व्हा हा संदेश छान आहे. 'चालता हो' यातला अपमानास्पद भाग नाही, हे गृहित धरून अर्थातच.

मुक्तक आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/|\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक मैत्रीण आणि मी आपसांत स्पर्धा लावली आहे. आठवड्यातून कोण अधिक नियमितपणे आणि/किंवा अधिक व्यायाम करतंय याची! गेले सहा-आठ महिने, क्वचित काही अपवाद वगळता हे बरं सुरू आहे. गेल्या काही महिन्यांमधे बर्‍यापैकी प्रमाणात चीज, वेफर्स, गोड आणि तळकट पदार्थ, दारू वगैरे होऊनही वजन उलुसं का होईना, कमी झालेलं आहे.
अधूनमधून होणारी "तुझं वजन कसं काय कमी होतं, माझं पण कमी झालं पाहिजे" असली ड्वायलाकबाजी उपयोगी पडते का नाही माहित नाही. त्यातून दोघींची करमणूक निश्चित होते. नवीन वर्ष सुरू होता-होता जिमला जाण्याचा संकल्प करणार्‍यांची टर उडवणार्‍या लेखांचाही या काळात सुकाळ असतो.

वाट्टेल ते खाऊनही आहे त्या आकारात 'काडीचाही' फरक पडत नाही अशा लोकांबद्दल हेवा वाटतो खरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खाणे आणि आकारात फारसा व्यायाम न करताच, फारसा संबंध नसणार्‍या (नशीबवान?) लोकांपैकी मी आहे.
त्यामुळे व्यायाम न करण्याचे हे अठरावे कारण धरायला हरकत नसावी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काल संध्याकाळी सर्व कारणं बाजूला ढकलून तुमच्या या लेखाने मला चक्क चालायला लावलं आहे इतकंच म्हणतो... धन्यवाद..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0