मुलं, संस्कृती, आडदांडपणा, बलात्कार इत्यादी: काही असंकलित नोंदी

अनेक शाळांमधून हिरीहिरीने राबवला जाणारा उपक्रम म्हणजे ताज्या वर्तमानपत्रांचे वाचन. अशाच एका शाळेत मुलांना पेपर वाचायला सांगण्यामागची कारणे सांगितली जातात ती अशी: दररोज घडणा-या घटनांची माहिती मुलांना कळते, २. मुलाला आत्मविश्वास येतो, ३. मुलांची भाषा चांगली होते, ४. मुलांना सामाजिक भान येते इत्यादी. आता, नऊ-दहा वर्षाच्या वयाच्या मुलाला माहिती वा सामाजिक भान देण्यासाठी पेपर वाचायला लावणारा ‘स्पर्धा परिक्षा- अभ्यास’ टाईप प्रकार कशासाठी किंवा वर्तमानपत्रे वाचून भाषा खरच चांगली होते काय अशा प्रश्नांना शिक्षणशास्त्रीय चौकटीत प्रतिसाद देण्याचा हेतू इथे नाही. दररोजच्या भडक बातम्या वाचताना मुलांच्या प्रश्नांने निरुत्तर होण्यापेक्षा बातम्या वाचायचे प्रोत्साहन न देण्याकडे काही पालकांचा कल असतो. पण एक शिक्षिका काही केल्या ऐकेना. ती मुलाच्या आईला समजावून सांगण्याच्या स्वरात म्हणाली, “अगं, मागच्या वर्षीच्या मुलांना भारतात पीएम कोण आहे सीएम कोण आहे हे पण माहिती नव्हते. म्हणून आम्ही यावेळेला दररोजच्या सकाळचे काम पेपरवाचनाने सुरू करायचे ठरवलेय.” “पण”, मुलाची आई म्हणाली, “सगळं कसं मुलाला माहिती होणार एकदम? आठ-दहा वर्षाच्या मुलाला सी एम पीएम माहिती असायलाच पाह्यजे असं काय आहे.”. यावर ती शिक्षिका नाराज झाली. “नाही, आपण राहातो तिथले जनरल नॉलेज माहिती पाहिजे. नाहीतर मुले फ़क्त नुसत्या गोष्टी वाचत बसतात.” त्यांच्यातला मुद्दा वाढत गेला. दोघींच्या संवादात पुढे तणाव आणणारा असा एक मुद्दा उपस्थित झाला की जो आज लिंग भेद, पुरुषी बल, आणि स्त्रीशोषण यांच्याशी निगडीत आहे. आईने त्र्याग्याने त्या शिक्षिकेला विचारले: “माझ्या मुलाने बलात्कार म्हणजे काय विचारले तर काय सांगायचे?” सहजतेने, ती शिक्षिका उत्तरली: “सांगायचे, बलात्कार म्हणजे, मुलाने मुलीवर केलेली जबरदस्ती.” यानंतर, बाजूला उभारलेल्या मुलांपर्यंत ‘जबरदस्ती’ या शब्दातून काय पोहोचले असेल? मुलांना प्रौंढांसारखेच भवतालाचे आकलन होत असते त्यामूळे त्यांना प्रौंढ समजूनच त्यांना बरोबरीचे समजावे यावरही आपली सहमती असते. भवताली होणारे बदल मुलांपासून आपण किती काळ लपवुन ठेवणार. त्यांना माहिती होऊ द्या या जगाची. नव्या प्रगल्भ शिक्षणपध्दतीतील सुजाण पालक आणि सुजाण नागरिक म्हणून या मुद्द्यावर आपली सहमती. पण, तरीही...

+++++

एके दिवशी, शाळेच्या बाहेर मुले-मुली खेळत होती. अंगावर धावुन जाणे, ओरडणे वैगेरे खेळ सुरू होते. एक मुलगी दुस-या मुलाला हातात बारकी काठी घेऊन म्हणाली, “पुढे येऊन बलात्कार करशील तर बग. माझ्या हातात कायाय.” कदाचित, त्याशाळेतल्या शिक्षकवृंदाला आभिमान वाटेल की स्वयंसंरक्षणाचे बाळकडू आपल्या शाळेच्या ग्राऊंडात मिळतात.

++++

गल्लोगल्ली, वर्तमानपत्रांच्या पानापानांवर झळकतात छायाचित्रे आणि बातम्या: स्त्रीने आत्मसंरक्षण करणे महत्वाचे आहे. त्यासाठी मिळेल त्या साधनांनी पुरुषाचा प्रतिकार करावा असाही प्रसार केला जातो.
कुठल्यातरी गावचा पोलिस आधिकारी वैगेरे सांगतो स्वसंरक्षणासाठी प्रतिकार करणे हा स्त्रिचा हक्कच आहे.
“मी माझ्या मुलगीला सांगून ठेवलय बाबाशिवाय कुणाही पुरुषाला जवळ येऊ द्यायचे नाही. मग तो मामा असू दे न्हाईतर काका, न्हाईतर आणि कोण.”, आजूबाजूला घडणा-या घटनांनी दचकुन गेलेली एक आई आपल्या मुलाला सांगते.
बारमधे संध्याकाळी बिअर पिताना समोरच्या टीव्हीवर बलात्काराच्या ब्रेकिंग न्यूज बघून मुलगा असलेल्या बापाला मुलबाळ नसलेला तरूण चिडीला येऊन सांगतो “साल्यांना चौकात फ़ासावर चढवाय पाह्यजे. बरय रे तुला मुलगी नाही.”
गावागावांतल्या ब-याच कॉलेजिसमधून उद्दिपित करणारे कपडे मुलींनी घालू नयेत असे फ़तवे काढले जातात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक असोत नाही तर गावातला कॉंग्रेसचा कार्यकर्ता असो: मातृत्वाचा पर्यायाने स्त्रीत्वाचा आदर करणा-या भारतीय संस्कृतीचा –हास होतोय म्हणून असे माणूसकीला काळीमा लावणारे प्रसंग घडत आहेत असे त्वेशाने सांगितले जाते.

++++

“कायद्याच्या बडगा, फ़ाशी आणि काय काय,” माझी मैत्रिण मला सणकलेल्या डोक्याने सांगत असते, “अरे कसे बघतात रे हे बापय. त्यांची मालमत्ताच आहो आपण. मला तरी ते बघितले तरी कधी-कधी घाणेरडी फ़ीलींग येते. काय करणाराय त्यांचं.”

++++

बलात्काराच्या घटनेला दिल्या जाणा-या प्रत्येक प्रत्युतरात एकवेम सत्य गृहित धरलेले असते ते म्हणजे या घटनेच्या केंद्रस्थानी ‘बाई’. ती घटना घडते तेंव्हा बाई अबला असते. तिथे ती एकटी असते. हिंसेच्या घटनेला प्रतिकार करण्यास ती कमी पडते. बरोबर कुणी असेल तर तो/ते तिला बळ देण्यात ते कमी पडतो/पडतात. माणूस असणारा पुरुष त्यादिवशी पशुसारखा वागतो इत्यादी. तो असा का वागतो? याची कारणे, समाज बदललाय, आधूनिकीकरण झाल्येय, कुटूंबसंस्था मोडकळल्या आहेत, संस्कृतीचा –हास होतोय वैगेरे.
यासगळ्यांमधे अजुन एक मान्य केलेले असते की बाई ती जी पुरुष नाही. म्हणजे, ती व्यक्ती बाई नसती तर असे काही झालेच नसते. यावर सर्वांचे एकमत. आरुन फ़िरुन, बाई म्हणजे ‘दुसरी’ कुणीतरी ही इथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात सर्वकाळ तशीच कायम राहिलेली भावना आधिक तीव्र केली जाते. त्यात शिक्षणे, माध्यमे, पोलिसे, राजकारणे अशांच्या संस्थांत्मक भरघोस पाठिंब्याने बाई पुरुषापेक्षा कुणीतरी दुसरीच आहे हे आधिकाधिक गडद केले जाते. बलात्कारासारखे प्रसंग जे माध्यमे (जसे काही पहिल्यांदाच असे घडले आहे आणि आता नाही आपण ही न्यूज फ़्लॅश केली तर नंतर ही संधी येणार नाही अशा आवेशाने) उचलून धरतात. मग, खैरलांजी असो वा त्या आधीचा वा नंतरचा इतर हिंस्त्र प्रकार असो. संस्थात्मक संक्रमाणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असे प्रसंग उचलून धरले जातात (आणि विसरलेही जातात). सगळ्या प्रसंगातली टॅगलाईन अशी की पशुवत हिंसा कमी करायची असेल तर स्त्रीकडे आपण संस्कृतीतल्या उदात्त भावनेने बघितले पाहिजे. अशा प्रसंगातील नराधमांना कडक शिक्षा व्हायला हवी. त्यातुन इतर स्त्रियांना बळ येईल. ‘डेलि मिरर’ या वर्तमानपत्रातील बातमीत बलात्कारीत महिलेचे नांव तिच्या वडलांकडून जाहीर केले जाते. हे करताना वाचणारा गलबलून जाईल अशा भाषेतील या बातमीत परिच्छेद पाडून असेही सांगितले जाते की: “Releasing a photo of her is for another day.” उद्या-परवा किंवा तेरवा पेपर वाचावा अशी उत्सुकता चाळवत ठेवली जाते. जिथे इंग्रजी पहिली भाषा आहे त्या समाजात वाचले जाणारे असे इंग्रजी पेपर वाचले तर भारतातल्या मुलांची इंग्रजी चांगली होईल या ‘शैक्षणिक’ हेतूने इथल्या शाळांमधल्या वाचन कट्ट्यावर अशा वृत्तपत्रांचे वाचन नक्कीच चांगला ‘उपक्रम’ समजला जाईल.

+++++

बरं येवढं होऊन यातून पुरुष आणि त्याचं पुरुषीपण बाजूलाच. त्याला त्याच आडदांडपण जपून ठेवण्यासाठी जणू व्यवस्था. त्याला त्याच्या लैंगिक प्रेरणा जोपासू द्या. पण, थोडे संयमाने घे बाबा! म्हणजे, वेश्यागमन करु द्या त्याला आणि त्यासाठी वेश्याव्यवसायाला मान्यता द्या. जेणेकरुन तो निष्पाप बाईची धरपकड करणार नाही. घरात बायकोने ‘गृहशोभिका’ सारख्या मासिकांतून येणारे सल्ले अभ्यासून त्याला सांभाळुन घ्यायचे मार्ग कुठले आहेत याचा अभ्यास करावा म्हणजे तो भरकटणार नाही. त्यात, जेवण कसे चविष्ट करावे, ती कितीही थकली वा तिची काही शारिरिक स्थिती असली तरी तिने तो सेक्सपासून वंचित राहाणार नाही याची खबरदारी घ्यावी. जेणेकरुन, घरातल्या वा शेजारच्या स्त्रियांची त्याच्या नजरेपासून सुटका होईल. शिवाय, प.पू. मोहन भागवत महाराजांचा ‘सल्ला’ मानून लग्न हा कराराचे प्रामाणिकपणे पालन करावे. म्हणजे, घर, मातृत्व अशी संस्कृतीची मुल्ये आधिक बळकट होतील वैगेरे.

+++++

रिक्षात बसलाय. मागून टु-व्हिलरवाला अर्थातच घाईघाईने आणि अर्थातच मान वाकडीकरुन मोबाईल कानाला लावून जातो. एकदा हॉर्न देतो दोनदा हॉर्न देतो. रिक्षात जोरात गाणे सुरू आहे. अर्थातच, ते गाणे कुठल्यातरी बाईच्या जवानीला वा आई-पणाला उद्देशून आहे. शेवटी, टू-व्हिलरवाला रिक्षाला ओवरटेक करुन जातो. जाता जाता, रिक्षावाल्याकडे वाकून, “हे रांडच्या. तुझ्या आईच्या झवन्या बघुन चालीव की जरा. तुझ्या आईचा दाना तुझ्या. बघ की जरा.” रिक्षावाल्याला अर्थातच शिव्या ऐकू गेलेल्या नसतात. त्याला राग येतो तो टु-व्हिलरवाला आपल्या ओरड्ला याचा. अर्थात, तोही लिमिटेड. कारण, तो त्या प्रांतातला नसतो आणि टू-व्हिलरवाले त्या गावातल्या पॉवरफ़ुल लोकांपैकी आहेत हे त्यांच्या हेअरस्टाईल वरुन, कपड्यांवरुन आणि हातातल्या कड्यांवरुन त्याला दिसते.

+++++

चांगले-वाईट या तुकडे-करणामधे संस्कृती चांगल्याचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते. ‘चांगले’ काही म्हणायचे असेल तर ‘संस्कृती’ हा शब्द वापरला जातो. यामधे, उदाहरणार्थ, ‘वाचन-संस्कृती’ जोपासावी असे म्हणताना जन्माला आल्यापासून लहान-थोर सगळ्यांनी वाचलेच पाहिजे तरच ते जगतील असे थोपवले जाते. मग, वयाच्या कुठल्या टप्प्यावर वाचावे किंवा वाचण्याशिवाय जगणं समृध्द करणा-या कुठल्या कुठल्या कृती असू शकतात किंवा काय वाचावे अशा शक्यतांचा सारासार विचार न करता वाचन करायलाच हवे आणि ती संस्कृती-समृध्द बाब आहे. मग, ‘बलात्कार’ असे एखाद्या मुलाने वाचले तर त्याचे काय दूरगामी परिणाम मुल आणि त्याच्या भवतालच्या जगावर पडत असतील याचा विचार न करता वृत्तपत्र -वाचन ही एक सकाळी शाळेत आल्यावर ‘वाचन-कट्या’ वर करायची अक्टिव्हिटी म्हणून राबवली जाते. वृत्तपत्रांशिवाय इतर काही सकाळी-सकाळी का वाचायचे नाही? हिंदूत्ववादी चिंतनवाद्यांच्या दृष्टीने इतर ‘गोष्टी’ वाचणे म्हणजे देशभक्तिच्या आड येईल. सामाजिकतावाद्यांच्या दृष्टीने फ़िक्शन वा अदभुत सामाजिक भान देत नाही. सामाजिक भान देण्याच्या भानगडीत मुलांचा हे जग पाहाण्याचा आणि अनुभवण्याचा मोकळा अन अदभूत आनंद त्यांच्याकडून गोष्टी न वाचायला देण्यातून हिरावून घेतला जातो. अशा कुचंबणा करणा-या विचार-बैठकांच्या पार्श्वभूमीवर भवताल आणि भवतालातल्या घटना आपापल्या जबाबदारीवर निरखण्याच्या शक्यता लहानपणापासून दुरापास्त होत जातात. मग राहातात त्या रामायण महाभारतातल्या नैतिकतेच्या गोष्टी. ‘आपल्या’ संस्कृतीतल्या गोष्टी म्हणून त्या थोपवल्या जातात. ख-याच त्या समाजातल्या नसा-नसात वाहाणा-या गोष्टी आहेत काय आज? सीता आणि राम, किंवा कृष्ण-लीला नैतिकचे पाठ इथल्या बलात्कार संस्कृतीत एकमेकाला सन्मानाने जगू देण्यास प्रवृत्त करतात काय? समजुती विकसित होतानाच्या टप्प्यावर रामायण-महाभारत आणि द्रौपदी वस्त्रहरण विचार आणि कृती आपल्याला समृध्द करतात काय? रामायण महाभारताला पर्याय काय असू शकतात? किंवा रामायण महाभारतातले जग वेगवेगळ्या वयातल्या मुलांसाठी, व्यक्तींसाठी जबाबदारीने आणि सन्मानाने कशा त-हेने उपलब्ध करुन दिले जाईल? बाईला संरक्षण करायला शिकवणार, स्त्री सबलीकरणाचे धडे लहानपणापासुन. पुरुषाने शिकायचे काय? कसे शिकायचे? लोकशाही आधिक समृध्द आणि बळकट होण्यात त्याचा सक्रिय़ सहभाग काय आणि कसा असावा? दिवसागणिक बलात्काराचे प्रसंग समोर येतात यात पुरुषाने कुठले भान आणायचे? इतर सामाजिक मुद्द्यांबरोबर याप्रश्नांनाही निकडीने भिडण्याची गरज आहे. स्त्री-पुरुषांमधले भेदांमधले नाते संबंध बदलले तरी भेद नाहीसे झालेले नाहीत. त्याची रुपे बदलली पण सत्ताकारणातील तीव्रता कमी झालेली नाही. बदलत्या समाजाबरोबर स्त्री-रुपे बदलली असे आपण सहज म्हणतो पण पुरूष-रुपे बदलली आहेत काय? असतील तर त्यांच्यात काय बदल झाला आणि झालेल्या बदलाने स्त्री-पुरुषांच्या नाते-संबधात काय फ़रक पडला याविषयीच्या भानाबरोबर हिंसाप्रकाराकडे पाहू लागलो तर कदाचित पुरुष असण्याच्या वेगवेगळ्या त-हा पुन्हा तपासता येतील. तपासण्याच्या या चिकित्सक प्रक्रियेत स्त्री-पुरुष संबधातल्या नव्या शक्यता तपासता येतील. माझ्यासारखा मी आहे, माझ्यासारखी तो आणि ती आहे आणि आपल्यासारखा तिचा आणि त्यांचाही सन्मान आहे ही भावना वाढेल, कदाचित.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (6 votes)

आशुतोष काय पेटलाय! Smile मार्मिक लेखन
जवळजवळ वर्षभराने लिहिताय.. पण एकच मारा तो क्या मारा!

चांगले-वाईट या तुकडे-करणामधे संस्कृती चांगल्याचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते. ‘चांगले’ काही म्हणायचे असेल तर ‘संस्कृती’ हा शब्द वापरला जातो.

Smile खरंय! याच्यापुढील शेवटला परिच्छेद कळस आहे

आता येत राहु दे अधिक नियमित Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश, तुम्ही नेहमीच मला पाठबळ देत आला आहात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार सुंदर व मार्मिक विश्लेषण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>“माझ्या मुलाने बलात्कार म्हणजे काय विचारले तर काय सांगायचे?” <<

आताच्या जमान्यात पालकांना ह्या प्रश्नाला सामोरं जायला लागणारच. शाळेत बातम्या वाचून घेण्याला विरोध करायला हा मुद्दा पुरेसा नाही.

>>मातृत्वाचा पर्यायाने स्त्रीत्वाचा आदर करणा-या भारतीय संस्कृतीचा –हास<<

>> ‘चांगले’ काही म्हणायचे असेल तर ‘संस्कृती’ हा शब्द वापरला जातो.<<

'आपली संस्कृती महान' ही संकल्पनाच मुळात एक थोतांड आहे आणि आधुनिक विचारसरणीनुसार कालबाह्य आहे, हे मान्य करायला आपण जोवर तयार नाही तोवर असले मूर्ख दावे सार्वजनिकरीत्या केले जाणारच.

>>बलात्काराच्या घटनेला दिल्या जाणा-या प्रत्येक प्रत्युतरात एकवेम सत्य गृहित धरलेले असते ते म्हणजे या घटनेच्या केंद्रस्थानी ‘बाई’. <<

खरी गंमत ही आहे, की बलात्कार करणारे पुरुष असतात हे सत्य दिसतं. जस्टिस वर्मांच्या सूचनांत असं म्हटलं आहे की बलात्काराच्या बाबतीत लिंगभेद करू नये, कारण मुलग्यांवर आणि पुरुषांवरसुद्धा बलात्कार होतात.

>>डेलि मिरर’ या वर्तमानपत्रातील बातमीत बलात्कारीत महिलेचे नांव तिच्या वडलांकडून जाहीर केले जाते. हे करताना वाचणारा गलबलून जाईल अशा भाषेतील या बातमीत परिच्छेद पाडून असेही सांगितले जाते की: “Releasing a photo of her is for another day.” उद्या-परवा किंवा तेरवा पेपर वाचावा अशी उत्सुकता चाळवत ठेवली जाते. जिथे इंग्रजी पहिली भाषा आहे त्या समाजात वाचले जाणारे असे इंग्रजी पेपर वाचले तर भारतातल्या मुलांची इंग्रजी चांगली होईल या ‘शैक्षणिक’ हेतूने इथल्या शाळांमधल्या वाचन कट्ट्यावर अशा वृत्तपत्रांचे वाचन नक्कीच चांगला ‘उपक्रम’ समजला जाईल.<<

ह्यातला उपरोध अनावश्यक वाटतो. मराठीत 'पोलीस टाइम्स'देखील निघतो आणि सभ्य वृत्तपत्रंसुद्धा. 'डेली मिरर' काय जातकुळीचा पेपर आहे ते मला चांगलं ठाऊक आहे. एक नजर टाकली तर कळतं की शाळेत वाचण्यासारखा तो नाही.

>>त्याला त्याच्या लैंगिक प्रेरणा जोपासू द्या. पण, थोडे संयमाने घे बाबा! म्हणजे, वेश्यागमन करु द्या त्याला आणि त्यासाठी वेश्याव्यवसायाला मान्यता द्या.<<

ह्यातला उपरोधदेखील अनावश्यक वाटतो. लैंगिक प्रवृत्ती नैसर्गिक असतात आणि त्यांचं वैध मार्गानं दमन होणं समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक असतं हे तर र.धों. कर्वेसुद्धा मानत.

>>वृत्तपत्र -वाचन ही एक सकाळी शाळेत आल्यावर ‘वाचन-कट्या’ वर करायची अक्टिव्हिटी म्हणून राबवली जाते. वृत्तपत्रांशिवाय इतर काही सकाळी-सकाळी का वाचायचे नाही? हिंदूत्ववादी चिंतनवाद्यांच्या दृष्टीने इतर ‘गोष्टी’ वाचणे म्हणजे देशभक्तिच्या आड येईल. सामाजिकतावाद्यांच्या दृष्टीने फ़िक्शन वा अदभुत सामाजिक भान देत नाही. सामाजिक भान देण्याच्या भानगडीत मुलांचा हे जग पाहाण्याचा आणि अनुभवण्याचा मोकळा अन अदभूत आनंद त्यांच्याकडून गोष्टी न वाचायला देण्यातून हिरावून घेतला जातो.<<

ह्या दाव्यातही आजकाल फारसं तथ्य नाही. अगदी ज्ञानप्रबोधिनीसारख्या संघिष्ट शाळासुद्धा आता एकंदर अवांतर वाचनावर भर देतात. वृत्तपत्रवाचन हा त्यातला केवळ एक भाग झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इथेच कोट कसे करायचे हे मला माहीती नाही. म्हणून अवतरणे वापरलीत.

"आताच्या जमान्यात पालकांना ह्या प्रश्नाला सामोरं जायला लागणारच."

मला मान्य आहे या प्रश्नाला सामोरं जायला लागणार. पण अशा प्रश्नांबद्दल पालक वा शिक्षक म्हणून आपली सुस्पष्टता असणे गरजेचे आहे असे मला वाटते.

"खरी गंमत ही आहे, की बलात्कार करणारे पुरुष असतात हे सत्य दिसतं. जस्टिस वर्मांच्या सूचनांत असं म्हटलं आहे की बलात्काराच्या बाबतीत लिंगभेद करू नये, कारण मुलग्यांवर आणि पुरुषांवरसुद्धा बलात्कार होतात."

सर, याबाबतीत मात्र मला आपला टोन कळला नाही. लिंगभेद करु नये हे मान्य करतानाच स्त्रीवर होणा-या बलात्काराचे प्रकरण भीषण आहे. शिवाय इथल्या पितृसत्ताक व्यवस्थेने ते आधिकच भीषण केले आहे. मला एकेकदा असे वाटते की पुरुषांवरच्या बलात्काराचे लॉजिक जेंव्हा पुढे केले जाते ते याच पितृसत्ताक व्यवस्थेचा परिपाक आहे काय?

"ह्यातला उपरोध अनावश्यक वाटतो. मराठीत 'पोलीस टाइम्स'देखील निघतो आणि सभ्य वृत्तपत्रंसुद्धा. 'डेली मिरर' काय जातकुळीचा पेपर आहे ते मला चांगलं ठाऊक आहे. एक नजर टाकली तर कळतं की शाळेत वाचण्यासारखा तो नाही."

मला आनंद आहे आपण यातला उपरोध समजून घेतलात. तो अनावश्यक वाटला हे ठीकय तरीही. माध्यमे जे काही ‘पेटवण्याचे’ कार्य करतात त्याकडे माझे लक्ष वेधायचे होते.

"ह्यातला उपरोधदेखील अनावश्यक वाटतो. लैंगिक प्रवृत्ती नैसर्गिक असतात आणि त्यांचं वैध मार्गानं दमन होणं समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक असतं हे तर र.धों. कर्वेसुद्धा मानत."

तुमच्यापर्यंत माझा उपरोध पोहोचतो हे बरे वाटते. इथं र.धो कर्वे कुठल्या संदर्भात बोलत आहेत याची मला माहिती नाही. वेश्यागमन असावे की नसावे हाही माझा इथे मुद्दा नाही. पण, बापय एवढे आपल्या सेक्शुयालिटीचे कौतुक का करुन घेतो. शिवाय इतरांना करायला लावतो. इतरही करतात. सगळ्या व्यवस्था त्याच्या मागे लावल्या जातात. पुरुषत्व आणि सेक्शुयालिटीचे इतके अजोड नाते, नेहमीच! त्याच्या असण्यात/घडवण्यात सेक्शुयालिटीशिवाय इतर काहीच स्टेकला नाही.

पुरुषाच्या लैंगिक नैसर्गिक पृवृत्ती पु-या झाल्या नाहीत तर एका बाईनं (किंवा जस्टीस वर्माच्या म्हणण्या प्रमाणे बाईव्यतिरिक्त इतर कूणी) एवढी मोठ्ठी किंमत मोजायची! (बहुदा ते होऊ नये म्हणून) सगळी माध्यमे ‘लैंगिक भावना पु-या न होण्याच्या’ काळात काय करावे याचे मार्गदर्शन करणारी माध्यमे! म्हणजे, त्या काळात त्याचे ’असणे’ तेवढ्या पुरतेच?

सर, इथे मला लेखाच्या शेवटी पुरुष-असण्याचा, पुरुषात्वचा व्यापक मुद्दा मांडायचा आहे असे म्हटले आहे त्याकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय पुरुषाचं ‘अवलंबित्व’.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याशाळेतल्या शिक्षकवृंदाला आभिमान वाटेल की स्वयंसंरक्षणाचे बाळकडू आपल्या शाळेच्या ग्राऊंडात मिळतात.

समज, जाण ही एकदम येणारी गोष्ट नाही, पण ती येण्यासाठी लागणारी यंत्रणा/शिस्त कायम राबवणे, त्यात कालपरत्वे बदल करणे गरजेचे आहे, त्यामुळे वर्तमानपत्र वाचणं गैर आहे का ह्याच "हो"/"नाही" असं उत्तर देता येणार नाही, लहानांना समजावून कस सांगायचं ह्याचं ज्ञान मोठ्यांना यायला पण तर काही काळ जाणारच, ती जाण आल्यावर पाल्याच्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं ही चिंता रहाणार नाही.

संस्थात्मक संक्रमाणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असे प्रसंग उचलून धरले जातात (आणि विसरलेही जातात). सगळ्या प्रसंगातली टॅगलाईन अशी की पशुवत हिंसा कमी करायची असेल तर स्त्रीकडे आपण संस्कृतीतल्या उदात्त भावनेने बघितले पाहिजे. अशा प्रसंगातील नराधमांना कडक शिक्षा व्हायला हवी.

अशा प्रसंगातील माणसं ही रुढ अर्थाने सुसंस्कृत नसतातच, त्यामुळे सुसंस्कृत जगाला संस्कृतीचा प्रचार करणं गरजेचं आहे, अन्यथा पशुवत जगावं हे ठीक.

पण, थोडे संयमाने घे बाबा! म्हणजे, वेश्यागमन करु द्या त्याला आणि त्यासाठी वेश्याव्यवसायाला मान्यता द्या.

चिंतातूर जंतू म्हणतात त्याप्रमाणे नैसर्गिक प्रवृत्तीचे दमन करणे दुरगामी हानीकारक आहे, पण म्हणून वेश्याव्यवसायाला मान्यता देणं हेही गैरच आहे, तिथे(निदान आपल्याकडे) कोणी स्वखूशीने जाण्यास तयार होईल अशी परिस्थिती नाही.

चांगले-वाईट या तुकडे-करणामधे संस्कृती चांगल्याचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते. ‘चांगले’ काही म्हणायचे असेल तर ‘संस्कृती’ हा शब्द वापरला जातो. यामधे, उदाहरणार्थ, ‘वाचन-संस्कृती’ जोपासावी असे म्हणताना जन्माला आल्यापासून लहान-थोर सगळ्यांनी वाचलेच पाहिजे तरच ते जगतील असे थोपवले जाते. मग, वयाच्या कुठल्या टप्प्यावर वाचावे किंवा वाचण्याशिवाय जगणं समृध्द करणा-या कुठल्या कुठल्या कृती असू शकतात किंवा काय वाचावे अशा शक्यतांचा सारासार विचार न करता वाचन करायलाच हवे आणि ती संस्कृती-समृध्द बाब आहे

हे निम्मं बरोबर आहेच, वाचन-संस्कृती बरोबर आहेच, पण काय वाचवं, केंव्हा काय वाचावं, कसं वाचावं हे सगळं सांगणारी देखिल एक संस्कृती आहे, पण त्या संस्कृतीबद्दल बरेचसे अनभिज्ञ आहेत त्यामुळे निम्मेच एकल्यावर त्रागा हा होणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वृत्तपत्र वाचना बद्दलचा मुद्दा इथे आला आहे. मला वाटते तो आपण शिक्षणाकडे कोणत्या विचाराने पाहातो यावर ते अवलंबून असावे. मला वाटते दुस-याने वाचून दाखवणे आणि मुलाने स्वतः वाचणे या दोन्ही कृती मुलाच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर व्हाव्यात. त्यात, कधी काय वाचून दाखवावे याचे आकलन ‘मुलांचे शिक्षण’ अशा सरसकट टायटल खाली न होता मुलांची वाढ, त्यांचा भावनीक अवकाश इत्यादी वर अवलंबून असावे. ब-याच वेळा याचा विचार न करता मुलाला तातडीने आड्ल्ट करणारी वाचन संस्कृती/अवांतर वाचन संस्कृती आकाराला येते असे मला वाटते. वाचन कट्टा असूच नये असे मी म्हणत नाही. तर वयाच्या कुठल्या टप्प्यावर वाचावे आणि काय वाचावे याचा विचार आणि कृती व्हावी असे मी मानतो.

शिवाय, वाचन कृतीची गडबडच कशाला असेही मला वाटते. भवतालाचा अनुभव घेण्याच्या, आकलन करुन घेण्याच्या-देण्याच्या अनेक शक्यत आजुबाजूला उपलब्ध असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकंदर प्रतिसादाशी सहमत.

शिवाय, वाचन कृतीची गडबडच कशाला असेही मला वाटते. भवतालाचा अनुभव घेण्याच्या, आकलन करुन घेण्याच्या-देण्याच्या अनेक शक्यत आजुबाजूला उपलब्ध असतात.

सहमत, फक्त त्या अनेक शक्यतां-प्रमाणेच वाचन ही एक शक्यता आहे, अनुभवाच्या इतर शक्यतांची जाण पालकांना येईपर्यंत वाचन ही नसे थोडके अस मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>तिथे(निदान आपल्याकडे) कोणी स्वखूशीने जाण्यास तयार होईल अशी परिस्थिती नाही.<<

कळलं नाही. जरा विस्तारानं सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्वखुशीने वेश्याव्यवसाय करण्यास कोणी तयार असेल असं वाटत नाही, नसल्यास, वेश्याव्यवसायास मान्यता देऊन स्त्रियांचा प्रश्न सुटणार नाही, किंबहुना अप्रत्यक्षरीत्या त्या व्यवसायात इच्छेविरुद्ध ओढले जाण्याची शक्यताच अधिक, पुरुष वेश्यांबाबतची माहिती पुरेशी नसली तरी ते सुद्धा कितपत स्वखुशीने असेल ह्याबद्दल शंका आहे. वेश्याव्यवसायास मान्यता देऊन पुरुषांचा प्रश्न सुटेल व त्यातूनच स्त्रियांचा(स्त्रियांवरील अन्यायाचा) प्रश्न सुटेल हे समस्येचे दुरगामी समाधान आहे असं वाटत नाही.

पुरुषांच्या/स्त्रियांच्या नैसर्गिक भावनेच्या पूर्तीसाठी हा मार्ग निदान सद्य परिस्थितीत पुरेसा योग्य वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असले लेख पाडणारा आणि त्याला सहमती दर्शविणारे पूरक प्रतिसाद देणारा एक आंतरजालिय वर्गच तयार झालाय.
बलात्कार, हिंदुत्ववादी, संघ, स्त्री मुक्ती, संस्कृती, रामायण-महाभारत, स्त्री-पुरुष समानता, इत्यादी इत्यादी

'चालू द्या' एवढे दोन शब्द बोलून रजा घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आरुन फ़िरुन, बाई म्हणजे ‘दुसरी’ कुणीतरी ही इथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात सर्वकाळ तशीच कायम राहिलेली भावना आधिक तीव्र केली जाते.

हे वाक्य फारच आवडलं.

हिंदूत्ववादी चिंतनवाद्यांच्या दृष्टीने इतर ‘गोष्टी’ वाचणे म्हणजे देशभक्तिच्या आड येईल.

रामायण नाहीतर सिंड्रेलाच्या गोष्टी लहान मुलांना सांगत असतील तर ते अर्थातच देशभक्ती किंवा योग्य वाढीच्या आड येणारच.

वेश्याव्यवसायासंदर्भातः
जोपर्यंत या व्यवसायात जबरदस्तीने स्त्री-पुरुषांना ओढलं जातंय तोपर्यंत त्याचं समर्थन करणं शक्य नाही. सध्यातरी कोणत्याही देशात या संदर्भात चांगली परिस्थिती असेल असं वाटत नाही. पण थिअरेटीकली, एखाद्या समाजात शरीरविक्रयाच्या व्यवसायात लोकं आपण होऊनच येत असतील तर त्या व्यवसायाबद्दल आक्षेप घेण्याचं कारण नसावं. 'मी' यांना बहुदा असं काहीसं सुचवायचं आहे असं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बादवे शालेय विद्यार्थ्यांसाठी खास कुठले वर्तमानपत्र आहे काय? खरे तर अश्या वर्तमानपत्राला चांगली मागणी असेल असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मुलीच्या शाळेत टाईम्सची स्टुडंट एडीशन सगळ्या मुलाना वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मुलाच्या शाळेत "द हिंदु"ची स्टुडंट एडिशन मुलांना देतात. ती त्याच्यापेक्षा मलाच आवडते.
लेख आवडला. मी नव्यानेच ऐसी पहायला लागले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

हा तुमचा प्रश्न मला महत्वाचा वाटतो. मुलाच्या वाढीला/वयाला साजेशी वाचता येतील/वाचून दाखवता येतील अशा वर्तमानपत्रांची रेंज मी राहातो तिथे-भारतात आहे असे वाटत नाही. असतील तर ती मला माहीती नाहीत. कुणाला माहीती असल्यास सांगा, प्लिज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"खरी गंमत ही आहे, की बलात्कार करणारे पुरुष असतात हे सत्य दिसतं. जस्टिस वर्मांच्या सूचनांत असं म्हटलं आहे की बलात्काराच्या बाबतीत लिंगभेद करू नये, कारण मुलग्यांवर आणि पुरुषांवरसुद्धा बलात्कार होतात."

>>याबाबतीत मात्र मला आपला टोन कळला नाही.<<

मुद्दा एवढाच आहे की पीडित स्त्रिया आणि पुरुषसुद्धा असू शकतात, पण बलात्कारी मात्र पुरुषच असतात असं दिसतं.

>>बापय एवढे आपल्या सेक्शुयालिटीचे कौतुक का करुन घेतो. शिवाय इतरांना करायला लावतो. इतरही करतात. सगळ्या व्यवस्था त्याच्या मागे लावल्या जातात.<<

म्हणूनच ती एक साधी भूक आहे हे मान्य करा आणि ती शमवण्यासाठी वैध उपाय द्या. ते मिळत नाहीत म्हणून नात्यागोत्यातल्या आणि इतर मुलींना त्या भुकेची शिकार व्हावं लागतं.

>>मुलाच्या वाढीला/वयाला साजेशी वाचता येतील/वाचून दाखवता येतील अशा वर्तमानपत्रांची रेंज मी राहातो तिथे-भारतात आहे असे वाटत नाही. <<

सकाळ किंवा लोकसत्ता मुलांना वाचायला देण्यात मला काही अडचण दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ते मिळत नाहीत म्हणून नात्यागोत्यातल्या आणि इतर मुलींना त्या भुकेची शिकार व्हावं लागतं.

हे समाजमान्य असलं तरी या विधानाला तितकासा आधार नाही.
किंबहूना असे 'भुकेले' बहुतांश वेळा वैश्यागमन करतात. बलात्कार किंवा इतर विकृतीचा या भुकेशी तितका संबंध नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>किंबहूना असे 'भुकेले' बहुतांश वेळा वैश्यागमन करतात. बलात्कार किंवा इतर विकृतीचा या भुकेशी तितका संबंध नाही<<

वेश्याव्यवसाय हा लपूनछपून करायचा असल्यामुळे लहान गावांमध्ये वेश्यागमन हा पर्याय असेलच असं नाही. शिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताज्या बलात्काराच्या घटनेनंतर आणि त्याआधीही अनेक ठिकाणी बलात्काराविषयी जो सांख्यिकी विदा आला होता त्यानुसार भारतातले बहुतांश बलात्कार हे नात्यातल्या किंवा परिचयातल्या व्यक्तींकडून होतात असं म्हटलं होतं. अब्रू, कौमार्य वगैरेंविषयीचं सामाजिक दडपण, वडीलधाऱ्या पुरुषांबद्दलची भीती वगैरे कारणांमुळे ते दडपले जातात; किंवा साक्षी बदलल्या जातात वगैरे कारणांमुळे शिक्षा होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. उदाहरणार्थ, 'हिंदू'मधला Why rape victims aren't getting justice हा मार्च २०१२मधला लेख पाहा. त्यानुसार दिल्लीतले ९६.६% बलात्कार परिचयातल्या व्यक्तीकडून होतात. सहज उपलब्धता आणि शिक्षा होणार नाही ह्याची खात्री ह्या घटकांच्या प्रभावानं हे होत असणार, पण त्यामागे लैंगिक भुकेचं दमन नसेलच असं वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'ऐसी'च्या आर्काईव्हमध्ये हा धागा सापडला. पुन्हा एकदा वाचला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वर्तमानपत्रे वाचणे हा चांगला उपक्रम आहे.
आपल्या लहानपणी सभ्य वर्तमानपत्रांत किमान पहिल्या पानावर तरी सभ्य बातम्या, सभ्य भाषेत छापून येत असत.
आठवड्याला एक विशेष मुलांसाठी म्हणून पुरवणी निघत असे आणि रवीवारच्या पुरवणीतही एखादे पान/ एखादा कोपरा मुलांसाठी खास असे.
तो वाचून खरेच मजा यायची.
हल्ली सवंगपणाच्या नादात खरेच वर्तमानपत्रातील बातम्या/ भाषा यांत काहीच सभ्यपणा राहिलेला नाही.

अश्या परिस्थितीत मुलाच्या शाळेत नेहमी वर्तमानपत्र वाचायचा अर्धा तास कसा असतो हा प्रश्न पडत होता.
तो शाळेनेच सोडविला.
सध्या शाळेत '' http://m.thehindu.com/in-school/हा पेपर येतो. सुरुवातीला लिमिटेड एडिशन्स असताना प्रत्येक वर्गात एक पेपर देऊन मुख्य बातम्या वाचून दाखवित/ मुलांना वाचायला लावत असत.
आता मागचे सहा महिने प्रत्येक मुलाला एक कॉपी शाळा सुटताना फ्री देतात.
आता मुलगा (इयत्ता - पहिली) घरी आल्याआल्या त्यातल्या महत्त्वाच्या बातम्या वाचून दाखवतो.
आणि मग आवडतील ती कोडी वगैरे सोडवतो. त्याचे जनरल नॉलेज माझ्यापेक्षा चांगले झालेय.

अगदी असेच टाईम्सवाले http://timeforkids.com पण छापतात.
तो माझ्या मोठ्या मुलीच्या शाळेत आठवड्याला एकदा देतात.
त्या दिवशी विशेष पुरवणी , कोडी, खेळ जास्त असतात.

आमच्या गावात (कर्नाटकातला सगळ्यात मागास जिल्हा) उपलब्ध होतोय म्हणजे भारतात सगळीकडे असेलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटचा परिच्छेद फारच आवडला. पुरूष असण्याबद्दलचे कायदे आणि बाईचे "दुसरी" करण खरोखर चिंताजनक आहे.

"श्यामची आई" मध्ये श्याम अतिशय भावनाप्रधान, आईचे हृदय जाणणारा असा आहे. मात्र शेजारच्या बायका त्याच्या आईला, "श्यामला तुम्ही अगदी बायको करून टाकलीये" असली विधाने करतात. श्यामला दळण का दळतोस म्हणून विचारतात. त्याची आई (नाईलाजाने अथवा स्वाभिमानाने) ह्या फालतू "पुरूषीपणाच्या" संकल्पनांना भीक घालित नसते, हे उदाहरण आठवले.

https://www.fatherly.com/ ह्या ब्लॉगवर "वडिलकी" बद्दल चांगल्या चर्चा आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे मुलांसाठी नियतकालिकांचा विषय निघालाच आहे तर अमेरिकेत निघणारे 'म्यूज' हे नियतकालिक मुलांना अगदी आवर्जून वाचायला देण्यासारखे आहे असे सांगावेसे वाटते. माझ्या नऊ वर्षीय मुलीसाठी मी अलिकडेच त्याचे सदस्यत्व घेतले. मुलांना आवडेल अशा भाषेत नवीन शास्त्रीय संशोधन, वेगवेगळ्या जमातींच्या भाषा, संस्कृती, कला, विनोद अशा वेगवेगळ्या विषयांवर अतिशय सुरस माहिती त्यात असते, मुलीच्या हातात पडल्यावर त्याचे किमान दोनदा रवंथ झाल्याशिवाय ती पुस्तक खाली ठेवत नाही. पोस्टाने स्वतःच्या नावाने मासिक येणे हे देखिल मुलांना अतिशय नवलाईचे वाटते आणि आवडते. पोस्टाने हे मासिक सध्या फक्त उत्तर अमेरिकेतल्या लोकांनाच मिळते असे दिसतेय पण ऑनलाईन सदस्यत्व सर्वांसाठी उपलब्ध असावे. इथे एक झलक उपलब्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात ज्ञानप्रबोधिनीतर्फे 'छात्र प्रबोधन' हे एक मासिक निघत असे. बराचसा राष्ट्रवादी अजेंडा असे (मराठीतूनच स्वाक्षरी करा, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते वगैरेछाप काश्मीरसंबंधी कविता). पण किशोर-चांदोबा सारखं मनोरंजनकेंद्री नव्हतं. पत्रमैत्री सारखे अभिनव उपक्रम, वैज्ञानिक माहिती, भाषाविषयक लेख अशी चांगली रेलचेल असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://m.huffpost.com/us/entry/my-rapist-might-not-know-hes-a-rapist_b_9091426.html?
हा लेख वाचला. पुरुषांनी स्पष्टपणे विचारण्याची व देहबोलीवर विसंबून न राहण्याची गरज आहे.
ते नैनो-नैनो में वगैरे बकवास असतं आणि कितीही क्लिनीकल वाटलं तरी (खरंतर प्रत्येक गोष्टीत) "तुला हे हवंय का?" असे विचारणे आणि "होऽऽ" असे स्पष्ट उत्तर आल्याखेरीज पुढे काहीही न करणे हे अंगी बाणवले पाहिजे. शक्यतो दिलेली संमती नोंदवून ठेवता आली तर उत्तमच. असे न केल्यास प्रत्येक संभोग हा पोटेन्शियल बलात्कार असू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादे अॅप वगैरे काढण्याची चांगली संधी आहे. ऑनलाईन कन्सेन्ट डेटा. जेव्हा हवा तेव्हा पोलिसांशी शेअर करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0