विश्वरूप : "मखमल के कालीन में टाट के पैबंद "!

शराबीमधला प्राणचा खणखणीत ड्वॉयलॉग - 'मखमल के कालीन में टाट के पैबंद' आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच पाहिलेला 'विश्वरूप'!

या चित्रपटाकडून माझ्या खूपच अपेक्षा होत्या. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एक संवेदनशील कलाकार कमल हासन यानं त्या चित्रपटाचं केलेलं लेखन आणि दिग्दर्शन. या चित्रपटावर त्यानं खूपच मेहनत घेतलीय, वेळ दिलाय, खर्च केलाय वगैरे ऐकत होतो. शिवाय शेखर कपूर, नासर, जरीना वहाब आणि राहुल बोस असे काही कसलेले अभिनेते या चित्रपटात असल्यानं उत्तम अभिनयाची रेलचेल पाहायला मिळेल अशीही अपेक्षा होती. आजकाल अनेक चित्रपटांचे प्रोमोज आणि त्याचा दर्जा यांच्यात जमीन-अस्मानाचे अंतर असते. निदान विश्वरूपबाबत तरी असे घडणार नाही अशी आशा होती. आणि याच अपेक्षेने अनेक वर्षांनी एक हिंदी सिनेमा पाहायला मी थिएटरमध्ये गेलो.

चित्रपट सुरू झाल्यावर हा चित्रपट हिंदी भाषेतच पाहत आहे ना अशी शंका आली. कारण चित्रपटातील मुख्य अभिनेत्री 'पूजा कुमार'चे विचित्र उच्चार. (कमल हासनचे हिंदी उच्चारही आपण चालवून घेतो म्हणा आता. )पाच मिनिटांनी मला संवाद थोडे थोडे समजू लागले. (पण या बयेला का म्हणून ही भूमिका दिली असावी हा प्रश्न मला शेवटपर्यंत सुटला नाही. ) आणि त्या पाच मिनिटातच जरीना वहाबची दोन वाक्यांची सायकॉलॉजिस्टची (? ) भूमिका संपून गेली.

आणि मग सुरू झाले ते कमल हासनचे प्रत्येक फ्रेममधील विश्वरूप दर्शन.

चित्रपटाची कथा सांगणे येथे सुरू व्हायला हवे. तसे ते आता होत आहे. ज्यांना ही कथा वाचायची नाही त्यांनी पुढचाच एक पॅरेग्राफ सोडून वाचावे. किंवा वाचाच ना! इतके काय आहे त्यात?

तर -
१. जगात इस्लाम नावाचा एक धर्म आहे. तसा तो धर्म चांगला आहे पण अल्-कायदा नामक एका इस्लामी दहशतवादी संघटनेने त्याला बदनाम केलेले आहे. इस्लाम हा शांततेचा संदेश देणारा धर्म असला तरी जिहादचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी दहशतवादी कृत्ये करतात.
२. जगात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नामक एक फारच म्हणजे सर्वात महत्त्वाचा देश आहे. या देशातील लोक स्वतःला सर्वात शहाणे समजतात. त्यांना जगातील सर्व तेलसाठ्यांवर आपले वर्चस्व हवे आहे. परंतु जगातले सर्व तेल इस्लामधर्मी देशांमध्ये निघते.
३. स्वाभाविकपणे अमेरिका व इस्लाम यांच्यात संघर्ष असतो. स्वाभाविकपणे अल्-कायदा + तालीबान नेहमी अमेरिकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात. स्वाभाविकपणे अमेरिका अल्-कायदा+ तालीबानवर बाँबवर्षाव करून त्यांची गावेच्या गावे (म्हणजे दोन-चार घरांची खेडी) उद्ध्वस्त करते.
४. स्वाभाविकपणे अल्-कायदा अमेरिकेत एक डर्टी बाँब (किंवा स्मगल केलेले रशियन न्यूक) फोडण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून अमेरिकेतील काही दोन-तीन मिल्यन शहाणे स्वाभाविकपणे कायमचे शहाणे होतील.

-ही कथा मी तरी आजपावेतो डझनावारी हॉलिवूडपटात (आणि काही बॉलिवुडपटात परवडत नसल्याने न्यूयॉर्कच्या जागी मुंबई करून) पाहिली आहे. तुम्ही पाहिली नसेल तर विश्वरूपची कथा फोडल्याबद्दल क्षमस्व!

आता चित्रपटाच्या मूळ समाचाराकडे वळू. या चित्रपटाचा काही भाग एका भारतीय आणि काही भाग एका इराणी अशा दोन दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केला असावा अशी शंका येते. -किंवा इतरत्र म्हटल्याप्रमाणे कमल हासनला चित्रपट निर्मितीच्या काळात सीझोफ्रेनिया झाला असावा असे वाटते. तासाभरापूर्वी एके-५६च्या बॅरलमधून बाहेर येणार्‍या माशीचा क्लोज-अप दाखवणारा दिग्दर्शक त्याच चित्रपटाच्या क्लायमॅक्सला 'फॅरेडे केज' म्हणून मायक्रोवेव्ह ओव्हनवर कसा घसरू शकतो हे काही केल्या कळत नाही. धिस ईज टू मच! असे मी थिएटरात ओरडलो. हा माझ्यातल्या प्रेक्षकाचा अपमान होता.

चित्रपट लिहिताना कमल हासनने (मी पाहिलेल्या) जेम्स बाँड ते अ‍ॅर्नॉल्ड स्वार्झनेगर ते मेल गिब्सन अशा कोणत्याही अतिरेकीपटाच्या डीव्हीडी पाहिल्या असणार हे तर स्वाभाविकच आहे. पण तेवढ्यात कमल हासनला लक्षात येते की तो एक भारतीय लेखक-दिग्दर्शक आहे आणि मग भारताच्या अधिकृत धोरणानुसार दहशतवादाला धर्म नसतो. तेव्हा इस्लामी अतिरेक्यांविरुद्ध लढणारा हीरोच स्वतः भारतीय मुसलमान झाला की काम खतम! म्हणजे इस्लामी जिहादाला विरोध पण इस्लाम हा शांतीचा धर्म. अल्-कायदा वाईट पण भारतीय मुस्लिम देशभक्त. इतके ढोबळ गणित, इतके सोपे समीकरण.

चित्रपट सुरू होतो अमेरिकेत आणि मध्येच सर्क्युलर स्लो मोशनने फ्लॅशबॅक घेत अफगाणिस्तानात जातो. अमेरिकेत असताना विश्वनाथनामक चित्रपट नायकाची ओळख होते ती पं. बिरजू महाराजांनी दिग्दर्शित केलेल्या राधा-कृष्ण कथेवरील कथ्थकातून. (कमल हासन आता खूपच बटबटीत म्हातारा दिसतोय. वय झालं त्याचं. ) अप्रतिम नृत्य. त्याची पत्नी झालेली ती पूजाकुमार की कपूर बाई मात्र फारच बालिश रंगवलीय. (आणि ही म्हणे न्युक्लियर आँकोलॉजीतली पी. एच्डी असते. ) हा विश्वनाथ म्हणजेच भारतीय डबल एजंट, एक राष्ट्रीय (हे सांगितलेच पाहिजे! ) मुसलमान - विशाम अहमद काश्मिरी. याचा बाप एक इस्लामी दहशतवादी असतो. विशामच्या बापाने आईला 'सोडल्यामुळे' विशाममधला राष्ट्रवादी मुस्लिम जागा झालेला असतो वगैरे...

मग हा विशाम कोण? कुठला? तर अफगाणिस्तानात अल्-कायदाला ट्रेनिंग देतानाच नेटोला (म्हणजे अमेरिकेलाच) मदत करणारा अंडरकव्हर भारतीय एजंट. पुन्हा वगैरे... अफगाणिस्तानात घडणार्‍या घटना दाखवताना कमल हासनने खूपच बारकावे दाखवले आहेत. काही अत्यंत नाजूक संवादही त्यात आहेत. ते पाहताना मला खरोखर खूप आनंद झाला कारण दहशतवादावर काढलेल्या चित्रपटात इतके बारीक संवाद शक्यतो नसतात. ते पाहून आपण एखादा इराणी पिक्चर पाहतोय असे वाटले. इथे संवाद बारकाईने ऐकण्यासारखे आहेत. उदा. -१. 'मला डॉक्टर व्हायचंय' म्हणणारा सात वर्षांचा मुलगा 'मी लहान नाही' म्हणून झोपाळ्यावर झुलायला नकार देतो. तर त्याचाच सोळा वर्षांचा मोठा भाऊ जो जिहादी आहे तो मात्र आपणहून झोपाळ्यावर झुलतो. २. - कमल हासनने साकारलेला भारतीय मुसलमान 'विशाम अहमद कश्मिरी' म्हणतो की मला बाप आहे पण माझ्या बापाने माझ्या आईला सोडलीय. राहुल बोसने साकारलेला जिहादी-अफगाण 'ओमर'ला मात्र त्याचा 'बाप' कोण आहे तेच माहीत नाही. ( भारतातल्या मुसलमानांनी वाद करायचा हाच एक खरा पॉइंट मला दिसला. पण तो काही कुणाच्या लक्षात आलेला दिसत नाही. वाद झाले ते फारच ढोबळ गोष्टींवर झाले: अल्लाऱ्हु-अकबरचा नारा वगैरे.; )) एकुणातच अफगाणिस्तान सीक्वेन्समध्ये खूपच दम आहे. इथे 'विशाम अहमद कश्मिरी' अल्-कायदाला ट्रेनिंग देणारा डबल-एजंट आहे. राहुल बोसचा ओमर हा जिहादी-तालीबानी उत्तम झालेला आहे. इथेच एक अरबी बनून (अल-जवाहिरी? )नासर हा गुणी अभिनेता दिसतो. राहुल बोसच्या बायकोचे कामही उत्तम जमून आले आहे. इतकेच काय जयदीप अहलावत नामक (मलातरी)नव्या नटाचे कामही उत्तम वठले आहे. 'दोन बोटांची बंदूक' हा प्रकारही चांगलाच भेदक वाटतो. अफगाणिस्तान सीक्वेन्समध्ये कदाचित कमल हासनच थोडा कमी पडला आहे. (तो काश्मिरी कमी सिद्दी जास्त वाटतो... )

असे सर्व सुशेगात चालले आहे, माझ्यातला प्रेक्षक सुखावतो आहे. आणि इथेही अचानक...

पुन्हा कमल हासनला लक्षात येते की तो एक भारतीय दिग्दर्शक आहे. आणि हा चित्रपट काही एखादी आर्ट-फिल्म अथवा डॉक्युमेंट्री नाही. गडबडीने लगेच एका (तोराबोरासदृश) गुहेत असलेल्या ओसामा बिन लादनचे दर्शन या काश्मिरीला आणि प्रेक्षकांना घडते. मग नेटो आपल्या हेलिकॉप्टर गनशिप्सनी अल्-कायदाच्या त्या गावावर हल्ला करते. त्यांना मारायचे असते ओसामाला पण मरतात गावातले निरपराध नागरिक (हे टिपीकल भारतीय फोडणी वगैरे). त्यात 'मला डॉक्टर व्हायचंय' म्हणणारा मुलगा आणि त्याची आईही असते. आणि हे सगळे दाखवताना कमाल हासनला आठवते की खर्‍या नेटोकडे 'चिनुक्स' आहेत. पण बजेट नाही. आता चिनुक्सशिवाय कसे चालेल? तेव्हा मग पोरकट ग्राफिक्सने चिनुक्स अवतरतात. त्याला हेही आठवते की खर्‍या तालिबान्यांकडे अँटी एअरक्राफ्ट शोल्डर मिसाईल्स (स्टिंगर) आहेत. पण बजेट नाही. आता स्टिंगरशिवाय कसे चालेल? मग आणा रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड - तेही प्लास्टिकचे मॉडेल.

मग कमल हासनमधल्या लेखकाला अ‍ॅम्नेशिया होतो असे वाटते. कारण यानंतर एकदम अमेरिकेत विशाम काश्मिरी कथ्थक डान्सर - मास्टर 'विश्वनाथ-विझ' बनून येतो आणि राहुल बोस-जयदीप अहलावत (ओमर-सलीम अल्-कायदा जोडगोळी)एकदम सीजीयमचा डर्टी बाँब बनवण्यासाठी दाखल होतात. यावेळी मात्र ओमरला(राहुल बोसला) विशाम-विश्वनाथ हा आपला शत्रू आहे हे (कसे कुणास ठाऊक पण) माहीत झालेले असते. हा मधला गायब झालेला इतिहास काही रिळांमध्ये सुरक्षित असावा आणि विश्वरूप-२ मध्ये तो अवतीर्ण होणार असावा अशी शंका येते. (आणि ती चित्रपटाच्या शेवटी खरी ठरते : कमिंग सून- विश्वरूप २ टू इंडिया. )

कथानक अमेरिकेत परत आल्यावर मात्र चित्रपटाची एकदम घसरगुंडी सुरू होते. अभिनेता म्हणून शेखर कपूरची धूळधाण उडते. राहुल बोसला अचानक चेहर्‍याचा प्यॅरालिसिस झाला आहे काय अशी शंका येऊ लागते. तो सारखे तोंड वाकडे करूनच वावरतो. 'कॉमिक रिलीफ' म्हणून लिहिलेले संवाद ऐकता ऐकता ती टुकार कुमार नटी (विश्वनाथची बायको) डोक्यात जाते. अरे, काही झाले तरी न्यूक्लिअर आँकॉलॉजीमधली पी. एच्डी इतकी मूर्ख कशी असू शकते, बॉस? वात आणलाय तिने अगदी.

क्लायमॅक्स तर कहर आहे. स्पाय हार्ड किंवा पिंक पँथर किंवा जॉनी इंग्लिशमध्ये शोभेलसा. दरवाजाच्या फटीत सोडलेल्या फ्लेग्जी-गायडेड कॅमेर्‍यासमोर झुरळच काय येते, हीरो ते झुरळ फुंकर मारून कसे उडवतो- ह्यॅ, ह्यॅ, ह्यॅ! आणि मग तो फॅरेडे केज मायक्रोवेव्ह ओव्हन!!! हाय रे कर्मा. त्याक्षणी माझे पैसे फुकट गेल्याची तीव्र जाणीव मला झाली.

या आधीच्या 'लाईफ ऑफ पाय' च्या समीक्षणात म्हटल्याप्रमाणं एकतर चित्रपट मला पूर्णपणे आवडतो किंवा पूर्णपणे आवडत नाही.
पण विश्वरूपने मला निराश केले. काहीशे रुपये गेल्याचे दु:ख नाही. पण या चित्रपटावर कमल हासननं घेतलेली मेहनत, दिलेला वेळ, केलेला खर्च वगैरे सगळं फुकट गेलं. शेखर कपूर, नासर, जरीना वहाब आणि राहुल बोस असे काही उत्तम अभिनेते वाया गेले. आणि मग मला तो मखमलीचा गालिचा दिसेचना, दिसली ती फक्त ओबडधोबड तरटाची वेडीवाकडी ठिगळं.

ता. क. : मला चित्रपटाबद्दल आत्मीयता वाटण्यासारख्या दोन गोष्टी सांगायच्याच राहिल्या -
१. दीपक नामक बंगाली पात्राच्या हातातली सॅम्सोनाईट ब्रीफकेस (एकदोन फ्रेममध्येच दिसते पण-) अगदी माझ्याकडे असलेल्या ब्रीफकेससारखी आहे.
२. राहुल बोसने अफगाणिस्तानात घातलेल्या दोन गॉगल्सपैकी एक (जो पोलरॉईडचा आहे) काळा गॉगल अगदी माझ्याकडे असलेल्या गॉगलसारखा आहे.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

हे ही परिक्षन आवदलं.
इतकं असूनही जमलं चित्रपट पहावाच असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा हा मस्त लिहीलीय समिक्षा.
पण एक था टायगर, बॉडीगार्ड सारखे चित्रपट १००कोटी कमवतात... त्यांच्यापेक्षा विश्वरुपम खरंच वाईट आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुलनाच नको.

दु:ख याचे नाही की तो एक था.., बॉडीगार्ड इतके पैसे कमावणार नाही, कदाचित कमावेलही.
दु:ख याचे की तो कमल हासनचा चित्रपट असूनही सलमानपणाकडे झुकतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसुनानागारु यू सिंप्ली खडक!!!!

मस्त मस्त परीक्षण, चाला बागुंदि , इप्पुडू थेटरलो वेल्लि जल्दीच चुस्तानू!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चूडंडी, चाला बागा लेदू , वोक्के उंदी इदि पिक्चरू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरे , तरवाता फीडब्याक चेपतानु Smile (ना तेलुगु इप्पुडू समाप्तमु Blum 3 )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

___________/\____________

कुणीतरी तो चिरंजीवीचा फ्येमस तेलुगु ड्वायलॉक् इथे द्याल का ? (बहुतेक "बाशा"चा. त्यातला "बाशा" ऐवजी "विसुनाना" असे शब्द टाका म्हंजे झालं ! )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

भारीच लिहीलय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

या परीक्षणाचा आस्वाद पुन्हा जाणतेपणे लुटण्यासाठी तरी सिनेमा पहावा म्हणतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'विश्वरुप' फस्ट्डे फस्ट्शो पाहिला. त्यावर काही लिहावेसेही वाटेना. अपेक्षाभंग आणि भ्रमनिरास या दोन जुन्या मित्रांच्या खांद्यांवर हात ठेवून कसाबसा खुरडत जगतो आहे. तुमच्यासारख्या तरुणांनी असले डिटेलवार परीक्षण लिहून आमची 'आपण यावर लिहायला पाहिजे' ही खंत वाचवल्याबद्दल धन्यवाद. मिठाईचे दुकान टाकण्यापेक्षा हलवायाशी मैत्री अधिक बरी! 'प्रेमाची गोष्ट' की 'विश्वरुप' असा च्वाईस होता. बायको 'प्रेमाची गोष्ट' म्हणत होती.मी 'एक दूजे के लिये' पासून 'सदमा', 'सागर', 'चाची ४२०', 'मुंबई एक्सप्रेस' असले सगळे जुने आठवून तिला 'विश्वरुप' ला ओढून घेऊन गेलो. बायकोसमोर खजिल होण्याची आता सवय करुन घ्यायला पाहिजे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हा हा हा!
खजिल बायकोला बघायची संधी हुकवलीत यात किती दु:ख मानायचे ते ठरवा Wink

बाकी, नाना, परिक्षण आवल्डं हे वे सां.न

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विश्वरुपम, प्रेमाची गोष्ट दोन्हीचा फार चांगला फिडबअॅक नाहीय. त्याऐवजी डेवीड किँवा फारुख दिप्तीचा चित्रपट (नाव विसरले) पाहीला नाही का कोणी?
नांबियार चा शैतान खूपच छान होता. खोया खोया चांद रीमिक्सचा अॅक्शन सिक्वेन्स तर जबरदस्त. त्यामुळे डेवीड बद्दल उत्सुकता.
बादवे कश्यप चा पाँच पाहीलाय का कोणी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारुख दिप्तीचा 'लिसन अमाया' चित्रपट आहे तो. रिव्यू चांगले आलेत,आणि तसाही दिप्तीसाठी नक्की बघावा वाटतो.

शैतान बद्दलही सहमत.

डेवीड, पाँचबद्दल काही माहिती नाही ब्वॉ! पहिल्यांदाच ऐकतोय.

विसुनाना - परिक्षण अगदी फर्मास आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

बरोबर! लिसन अमाया.
नांबियार चा डेविड पण १ फेब लाच रिलीज झाला. चांगला असेल असं वाटतय.
en.m.wikipedia.org/wiki/David_(2013_Hindi_film)
शैतान चा प्रोड्युसर अनुराग कश्यप याचा पाँच हा पहीला अॅज अ डिरेक्टर चित्रपट. सेंसर बोर्ड ने रिलीज होउ दिला नाही.
en.m.wikipedia.org/wiki/Paanch
युट्युब वर आहे हा चित्रपट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसुनानांनाच स्किझोफ्रेनिया झालेला आहे. लेखा*च्या सुरूवातीला पिटातले प्रेक्षक बनून कमल हासन हा कसा गुणी दिग्दर्शक, नट, नर्तक आहे असं लिहीतात. मधेच त्यांना आपलं रेप्यूटेशन वाढवण्याची लहर येते आणि ते उच्चभ्रू विचारवंत/विचारजंत बनतात आणि पिच्चर कसा घिसापिटा, पकाऊ आहे हे सांगतात.
अचानक त्यांची प्रोफाईल पकाकाका (प्रकाश घाटपांडे) यांनी चोरली आहे का काय असं वाटतं, कारण ते मधेच भविष्य वर्तवतात आणि पुढे ते खरं होतं हे ही सांगतात. ही हातोटी पकाकाकांना चांगली जमते.

पण शेवटी पुन्हा एकदा नॉर्मल विसुनानांचा अवतार होतो आणि लेखाच्या शेवटी ते गोरगरीबांप्रती (=कमल हासन) कणव प्रदर्शित करत आवरतं घेतात. अलिकडे त्यांना थोडा इंटरनेटमेनिया झाला असावा. अवांतरात, आपणही चित्रपटातल्यासारखी फॅशन करतो असं सांगत ट्रेंडी असल्याचं दाखवण्याचा क्षीण प्रयत्नही करतात.

*या लिखाणाला ललित म्हणावे, का समीक्षा का चित्रप्ट परिचय असा प्रश्न पडला. मग धागाच म्हणावं असंही वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विनोदीपणातही श्रेणी असाव्यात काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL
'फ्रेम करून भिंतीवर टांगण्यासारखा प्रतिसाद' अशीही एक श्रेणी काढता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हहपुवा झाली.
"अलिकडे त्यांना थोडा इंटरनेटमेनिया झाला असावा." - पहा सन्जोप राव, आपल्या आज्ञेचे पालन केल्याचे परिणाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालच एका मैत्रिणीने यातिल कथकच्या गाण्याच्या चित्रीकरणाची चित्रफीत पाठवली, तेव्हा या नावाचा एक चित्रपट आहे हे ज्ञान मिळाले होते, चित्रफीतीत, पं. बिरजू महाराज, शाश्वतीजी यांना पाहून अपेक्षा उंचावल्या होत्या. कमल हासननेही कथक बरे केले असावे असे वाटले. मागे एका मित्राने कमल हासनने अदा केलेल्या भारतीय शास्त्रीय नृत्यांची झलक असलेली फीत पाठवली होती, त्यातील कथक कमल हासन हा एक चांगला नर्तक आहे हे माहिती असूनही मला बघवले नव्हते. त्यामुळे हा चित्रपट बघावा अशी उत्सुकता निर्माण झाली होती. आज हे परीक्षण वाचून, त्यावर पूर्ण बोळा फिरला आहे.

या धाग्यातली काही वाक्य खास आवडली.

ज्यांना ही कथा वाचायची नाही त्यांनी पुढचाच एक पॅरेग्राफ सोडून वाचावे. किंवा वाचाच ना! इतके काय आहे त्यात?
या चित्रपटाचा काही भाग एका भारतीय आणि काही भाग एका इराणी अशा दोन दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केला असावा अशी शंका येते
आणि हे सगळे दाखवताना कमाल हासनला आठवते की खर्‍या नेटोकडे 'चिनुक्स' आहेत. पण बजेट नाही. आता चिनुक्सशिवाय कसे चालेल? तेव्हा मग पोरकट ग्राफिक्सने चिनुक्स अवतरतात. त्याला हेही आठवते की खर्‍या तालिबान्यांकडे अँटी एअरक्राफ्ट शोल्डर मिसाईल्स (स्टिंगर) आहेत. पण बजेट नाही. आता स्टिंगरशिवाय कसे चालेल? मग आणा रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड - तेही प्लास्टिकचे मॉडेल.
...आणि शेवट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसुनानांचा लेख आवडला. कमल हासन हा खरेतर चांगला अभिनेता मात्र गेल्या काही काळातील विशेषतः चाची ४२० नंतर त्याचे चित्रपट अगदी स्वकेंद्रित झाले आहेत असे वाटते. प्रत्येक चित्रपटात स्वतःने अनेक भूमिका करण्यामागचे कारण समजले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0