ब्रेड अँड बटर - भाग ४ 'संपूर्ण गव्हाचा पाव'

113

भाग तीनमध्ये झालेल्या चर्चेतून संपूर्ण गव्हाचा पाव बनवण्याची प्रेरणा मिळाली होती आणि त्याची माहिती मी त्या भागात दिलेली होतीच पण फोटो लावायचे राहिले होते म्हणून नवीन धाग्याचा प्रपंच.

पावासाठी लागणारे साहित्य:

संपूर्ण गव्हाचे पीठ ५०० ग्रॅम*
फास्ट अ‍ॅक्शन यीस्ट १.५ टेबलस्पून
कोमट पाणी ८० मिलीलीटर (१/३ कप)
कोमट दूध १७० मिलीलीटर (साधारण २/३ कप)
२ अंडी
मध ४० मिली
मीठ १.५ टीस्पून
लोणी ७५ ग्रॅम
* परदेशांत मिळणारे पूर्ण गव्हाचे पीठ (होल व्हीट फ्लॉर) हे भारतातल्या गव्हाच्या पीठापेक्षा वेगळे असते. भारतात आपण जो गहू कणकेसाठी वापरतो, त्यात प्रोटीनचे आणि त्यामुळे ग्लूटनचे प्रमाण बरेच कमी असते असा माझा अनुभव आहे. त्यामुळे भारतात बनवणाऱ्यानी कणकेच्या चिकटपणाचा अंदाज बांधून त्याप्रमाणे त्यात थोडा मैदा मिसळला तर पाव हलका व्हायला मदत होईल.

भाजण्याआधी पावावर वरून लावण्यासाठी साहित्य (हवे असल्यास) :

एक अंडे
एक टेबलस्पून पाणी
थोडे तीळ, काळी खसखस वगैरे.

097 100
101 102
104 105
106 107
108 109

१) एका मोठ्या भांड्यात अथवा परातीत मैदा आणि मीठ एकत्र करून घ्यावे.
२) कोमट पाण्यात यीस्ट मिसळून ते पूर्ण विरघळून घ्यावे.
३) लोणी व मध एकत्र करून थोडेसे फेटून घ्यावे, त्यात अंडी घालून अजून थोडेसे फेटावे. त्यातच यीस्ट मिसळलेले पाणी आणि दूध घालून सारखे एकसारखे करावे.
४) मिश्रणात थोडे-थोडे पीठ मिसळत कणकेचा सैलसर गोळा बनवावा, आवश्यक वाटल्यास थोडे अधिक पाणी अथवा दूध घालावे
५) थोडे मळल्यावर स्वच्छ ओट्यावर गोळा घालून तो चांगला मळून घ्यावा.
६) पीठ साधारणतः सहा-सात मिनिटे मळल्यावर फोटोतल्या गोळ्यासारखे दिसायला लागले की आतून तेलाचा हात फिरवलेल्या एका भांड्यात तो गोळा ठेऊन द्यावा व भांडे ओलसर फडक्याने किंवा क्लींग फिल्मने झाकावे व उबदार ठिकाणी ठेऊन द्यावे. कणिक साधारण दुप्पट फुगल्यावर बाहेर काढावी.
७) फुगलेल्या कणकेचे साधारण १६ सारखे भाग करावेत (मी दीडपट प्रमाण वापरले होते त्यामुळे फोटोत २४ भाग दिसत आहेत) आणि ते एका १७ इंच बाय ११.५ इंच आकाराच्या बेकिंग शीटवर थोडे अंतर राखून ठेवावेत आणि अजून एक तासभर त्यांना फुगू द्यावे. गोळ्यांमधले अंतर कमी झाले तर भाजताना हे गोळे एकमेकांत मिसळतील. (अर्थात ते एकत्र मिसळले तर त्यांचा बाजूचा भागही लुसलुशीत रहातो आणि ते अधिक पावासारखे दिसतात त्यामुळे मी बरेचदा ते फार दूरदूर ठेवत नाही.)
७) ओव्हन १८० अंश सेल्सियस किंवा ३५० अंश फेरेन्हाईट वर तापवून घ्यावा. (ओव्हनच्या अंदाजाप्रमाणे हे तापमान २०० अंश ठेऊन पाव थोडा कमी वेळ भाजला तरी चालेल.)
८) एका अंड्यात एक टेबलस्पून पाणी मिसळून ते एकत्र फेटल्यासारखे करावे. फुगलेल्या पावाच्या गोळ्यांवर एका ब्रशने हे अंड्याचे मिश्रण फसावे व हवे असल्यास त्यावर तीळ, खसखस वगैरे पसरावी. 'एगवॉश' मुळे पावाचा वरचा पृष्ठभाग चकचकीत होतो आणि त्यावर तीळ वगैरे निट चिकटतात.
९) ओव्हनमध्ये मधल्या कप्प्यावर थाळी ठेऊन त्यावर पाव वीस ते पंचवीस मिनिटे भाजावा.

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

झकास दिसतोय.

काळ्या खसखशीला इंग्लिशमधे काय म्हणतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारताबाहेर वाण्याच्या दुकानात साधारणपणे खसखस काळीच मिळते पण भारतात कधी पाहिल्याचं आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह मस्त!
खूप छान आलेत फोटु आणि नवीन धाग्यासाठी धन्यवाद _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा...मस्त. हा पाव किती दिवस टिकू शकतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__/\__
तुर्तास नवा धागा येइपर्यंत केकच्या मागे लागलो होतो. आता केक झाले की इथे पुन्हा वळतोच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा बघून उत्साहाने काल ब्रेड बनवण्याचा प्रयत्न केला. फरक खालीलप्रमाणे

१. ३:१ अशा प्रमाणात गव्हाचे पीठ आणि मैदा घेतले.
२. अशा पाव लादीएवजी मी माझ्याकडे असलेला ब्रेड लोफ चा टीन वापरला.
३. अजून थोडी थंडी आहे आणि शिवाय गव्हाचे पीठ म्हणून उत्साहात १.५ ऐवजी २ टेबल्स्पून यीस्ट घेतले.
४. अंड्याऐवजी ४ चमचे मिल्क पावडर वापरली. (मागील लेखात कोणीतरी सांगितले होते.)
५. लोफ ची उंची अशा पावभाजी वाल्या पाव पेक्षा जास्त, त्यामुळे साधारण ३५ मिनिट भाजला.

गोळा मस्त फुगला. भाजल्यावर रंग चांगला आला, आत फारसा चिकट पण नव्हता. पण.......

फसला!!!! Sad

चव अतिशय वाईट, यीस्ट ची आंबूस आली, वास पण तसाच!

शिवाय कापत असताना त्याचा अतिशय जास्त चुरा पडत होता, स्लाईस मध्ये मोडून पडत होती. मला वाटते,उरलेला निम्म्याहून अधिक शेवटी वाया जाणार आहे.

ठिक आहे, जास्त यीस्ट काय बिघडवू शकते त्याचा अनुभव आला. पुढच्या वेळी काळजी घेईन मग भले फुगायला जास्त वेळ लागला तरी चालेल.

पण चुरा होण्याचे आणि स्लाईस मोडून पडण्याचे काय कारण असावे? यीस्ट की अजून काही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

अंड्या ऐवजी मिल्क पावडर वापरल्याने चुरा होत असेल. मी मैद्याच्या पहिल्या प्रयोगात वर ब्रशने अंड्याचा मुलामा देण्याऐवजी दुध+साखर यांचा मुलामा दिला होता तरी ब्रेड अत्यंत कोरडा दिसतही ह्तोआ आणि कव्हरचा चुरा पडत होता. त्यामुळे असे वाट्टेय
अंडे नको असेल तर त्याला पर्याय योग्य प्रमाणात टाकायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पाव बनविण्याच्या किंवा एकूणच 'बेकिंग'प्रकारात फार नेमकेपणा लागतो. शिवाय स्थळ, काळ, सामुग्री, यासंदर्भात अनेक व्हेरियेबल्स(मराठी?) असतात उदाहरणार्थः
१)पीठ- वेगवेगळ्या ठिकाणी मिळणारी पिठे, त्यांचे प्रकार, त्यांच्यातले ग्लूटनचे प्रमाण इत्यादी.
२)यीस्ट - प्रकार, त्याचे वय (ताजे असणे किंवा जुने इत्यादी)
३)स्थळ- समुद्रसपाटीपासून स्थळाची उंची, तापमान, आर्द्रता इत्यादी.
४)ओव्ह्न- त्याचे प्रकार, आकार, तापमान नियमित राह्ण्याची पद्धत इ.
५)पदार्थ बेक करण्यासाठी वापरलेली थाळी- त्याचा आकार, त्याचा धातू इत्यादी. उदाहरणार्थ, फोकाचियाच्या धाग्यात मी ज्या आकाराची थाळी दिलेल्या प्रमाणासाठी दिली होती त्यामानाने रोचना यांनी मोठी थाळी कमी प्रमाणासाठी वापरली आणि पर्यायाने त्यांच्या फोकचियाची जाडी माझ्यापेक्षा कमी झाली, ऋषिकेशनी माझ्याहून कमी आकाराची थाळी वापरली आणि त्यांचा फोकाचिया जास्त फुगला हे माझ्या लगेच लक्षात आले. तिन्ही चवी साधारण सारख्याच झाल्या तरी त्यांच्या टेक्स्चरमधे फरक पडला असणार.

हे इतके व्हेरियेब्ल्स आणि शिवाय 'बनविणार्याचा अनुभव' असे अनेक व्हेरियेबल्स असताना मूळ कृतीत फार बदल करणे थोडे धाडसाचे आहे. खासकरून 'पूर्ण गव्हाच्या पावात' अंडे न घालता त्याजागी दूध पावडर घालण्याने बराच फरक पडणार. मी असे सुचवेन,
१) पुढच्या वेळेस कणिक आणि मैदा १:१ प्रमाणात घ्या.
२) अंडे खात असाल तर अंडेच वापरा.
३) लोफ टिनच्या ऐवजी सपाट थाळी असल्यास त्यावर गोळे पसरून पहा.
४) यीस्ट्चे प्रमाण दिल्याइतकेच ठेवा (यीस्ट 'फास्ट एक्शन इंस्टंटच' आहे याची खात्री करून घ्या.)
५) तुम्ही अंडे खात नसाल तर असे सुचवेन की अंडे न घातलेला, पूर्ण मैद्याचा फोकाचिया बनवायचा प्रयत्न याआधी करा. तो बनवायला जास्त सोपा आणि हमखास यशस्वी होऊ शकेल.
मी हा प्रतिसाद लिहिताना असे गृहित धरते आहे की तुम्ही याआधी पाव बनविला नाही त्यामुळे थोडे अधिक सविस्तर लिहिले आहे, माझे गृहितक चुकीचे असल्यास माझ्या 'शिक्षकी' टोनबद्द्ल माफी असावी. तुमचा पुढचा प्रयत्न यशस्वी होईल यासाठी शुभेच्छा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>भारतात आपण जो गहू कणकेसाठी वापरतो, त्यात प्रोटीनचे आणि त्यामुळे ग्लूटनचे प्रमाण बरेच कमी असते असा माझा अनुभव आहे. त्यामुळे भारतात बनवणाऱ्यानी कणकेच्या चिकटपणाचा अंदाज बांधून त्याप्रमाणे त्यात थोडा मैदा मिसळला तर पाव हलका व्हायला मदत होईल.<<

सहमत.

>>चव अतिशय वाईट, यीस्ट ची आंबूस आली, वास पण तसाच!<<

>>पण चुरा होण्याचे आणि स्लाईस मोडून पडण्याचे काय कारण असावे? यीस्ट की अजून काही?<<

हो हे जास्त यीस्टचं लक्षण आहे. भारतीय कणकेचा जडपणा आणि यीस्ट अधिक वापरण्याचा मोह टाळणं ह्यातून मी काढलेला एक उपाय असा - ब्रेडचा गोळा थापून चपटा करायचा - गुळपापडीची वडी वगैरे थापताना करू तसा (अर्धा इंच जाडीचा). तो थोडा फुगतो, पण दुप्पट वगैरे होईलच असं नाही. भाजून झाला की खायच्या वेळी पायचा स्लाईस कापावा तसा कापायचा -

आणि मग तो स्लाईस आडवा अर्धा कापायचा. मग हे ब्रेडच्या दोन स्लाईससारखे आतली बाजू भाजून वापरायचे. म्हणजे गोळा खूप फुलून ब्रेड खूप हलका झाला नाही, तरीही असा आतून भाजून खरपूस करून खाता येतो आणि चांगलाही लागतो.

आणखी एक उपाय - भिजवताना पाण्याऐवजी पूर्ण दूध वापरायचं.
आणखी एक उपाय - गोळा हव्या त्या आकारात थापून रात्रभर भिजवायचा. सकाळी भाजायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आणखी एक उपाय - गोळा हव्या त्या आकारात थापून रात्रभर भिजवायचा. सकाळी भाजायचा.

हे मलाही करायला आवडेल. सकाळी सकाळी ताज्या पावाचा वास हे स्वर्गसुख आहे.
त्यासाठी (भारतीय) कणीक न वापरण्याचा पर्याय आहे का? जवळच्या दुकानात अमेरिकन गव्हाचं पीठ मिळतं, कणकेसाठी लांबच्या (देसी) दुकानात जावं लागतं.

यीस्ट कमी करून फरक पडेल का? मी तशी उष्ण भागात रहाते (सध्या हीटींग-एसीशिवाय झकास सुरू आहे. रात्री किंचित थंड होतं.) संध्याकाळच्या वेळेस पाऊण तासाच्या आतच कणीक आकाराने दुप्पट होते. मैदा वापरणे हा पर्याय आम्हाला फार उपयुक्त नाही, दोघांनाही मैद्यामुळे आलेली कन्सिस्टंसी आवडली नाही. एक लॉट १/५ मैदा वापरून बनवून पाहिलं
याच रेसिपीने चार वेळा, यशस्वीपणे पाव बनवण्याचा अनुभव आहे. (एक प्रयत्न फसला कारण यीस्ट ज्या पाण्यात टाकलं ते थोडं जास्तच गरम होतं. हे अर्धा किलो कणीक कचर्‍यात टाकण्याच्या प्रतीची झाल्यावर लक्षात आलं. नशीब पुढे पाव भाजण्याचे कष्ट घेतले नाहीत. सध्या यीस्ट कपात फुलल्यानंतरच ते कणकेत टाकते, फुकट गेलंच तर फक्त यीस्ट जातं. यीस्ट जातं जिवानिशी, अदिती म्हणते वातड.)

पाव भाजण्याच्या आधी कणीक फार वेळ फुगू दिली तर काय फरक पडतो?
सध्यातरी पावाच्या आकाराबद्दल काही तक्रार नाहीये. स्लाईस, बन, कसाही चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>त्यासाठी (भारतीय) कणीक न वापरण्याचा पर्याय आहे का? जवळच्या दुकानात अमेरिकन गव्हाचं पीठ मिळतं, कणकेसाठी लांबच्या (देसी) दुकानात जावं लागतं.<<

भारतीय कणीक ब्रेड बनवायला चांगली नाही (विशिष्ट जातीच्या गव्हाचं पीठ चांगलं असेल तर ते मला अजून सापडलेलं नाही). अमेरिकन गव्हाचं पीठ त्यापेक्षा नक्कीच चांगलं असतं. परदेशातून येणाऱ्या मित्रांना 'माझ्यासाठी अमेरिकन गव्हाचं पीठ किलोभर आणा' म्हणून सांगायचा मोह मला अनेकदा होतो. 'स्ट्रॉन्ग' म्हणून मिळणाऱ्या पिठात ग्लूटेन अधिक असतं.

>>यीस्ट कमी करून फरक पडेल का?<<

मला स्वत:ला कमी यीस्ट घालून अधिक वेळ आंबवून केलेले ब्रेड आवडतात. (यीस्ट कमी घातलं तर पीठ पुरेसं फुगण्यासाठी जास्त वेळ आंबवावं लागतं.) घरचा सावरडो तर अप्रतिम होतो. अपवाद गोड ब्रेडचा - ते शक्य तितका कमी वेळ आंबवून चांगले लागतात. त्यासाठी मग स्निग्धांश असलेले घटक पदार्थ (दूध, लोणी वगैरे) वाढवून ते हलके करावे लागतात.

>>मैद्यामुळे आलेली कन्सिस्टंसी आवडली नाही. <<

बेगलसारखा चिवटपणा गरजेचा असतो किंवा हलका, तलम ब्रेड हवा असतो तेव्हा मैद्याला पर्याय नाही.

>>पाव भाजण्याच्या आधी कणीक फार वेळ फुगू दिली तर काय फरक पडतो?<<

हयाला ओव्हरप्रूफिंग म्हणतात. ह्यानं ब्रेड अधिक आंबूस होऊ शकतो. त्यामुळे गोळा फुगल्यानंतर पुन्हा सपाट होऊ शकतो. पण पुन्हा किंचित मळून, पुन्हा थोडा वेळ आंबवत ठेवून थोडा फुगला (अगदी दुप्पट नव्हे) आणि मग भाजला तर उत्तम होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भारतीय कणीक ब्रेड बनवायला चांगली नाही (विशिष्ट जातीच्या गव्हाचं पीठ चांगलं असेल तर ते मला अजून सापडलेलं नाही).

माझी एक कलीग साळीसकटचे गहु दळून त्याचे ब्रेड बनवते. त्यात तीच्या म्हणण्यानुसार मैदा वापरत नाही. (आता तिच्या माहेरची शेती असल्याने तिला हे जमतं, आमच्यासारख्यांना साळीसकट गहू मिळवायला गुढीपाडव्यापर्यंत थांबायला हवे. - तेव्हा तोरणांसाठी या ओंब्या मिळतील त्या घेऊन त्याचे पीठ करायचा विचार आहे Wink )

बाकी तिने बनवलेला ब्रेड किती चांगला होतो आणि तिने दिलेली माहिती याच्या सत्यासत्यतेबद्दल खात्री देऊ शकत नाही - तितका परिचय नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या विकांताला वेळ झाल्यास हा प्रयोग करून बघणार आहे. घरचीच कणीक व मैदा १:१ घेणार आहे बाकी कृतीशी प्रामाणिक रहायचा विचार आहे.
प्रश्न असा की हा ब्रेड किती फ्लफी होतो. बर्गर ब्रेड एवढा होतो का? (मला बर्गरसाठीच हवा आहे. बर्गरच्या टीक्कीचा नवा प्रयोग करायचाय, त्यासोबत हा ही! Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुम्ही विकांताला काय-काय करणार? ब्रेड करणार, बागकाम करणार, MS-Money वर काम करणार? की इथे वाचलेले सगळे काही करून बघता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
मनि इन्स्टॉल करून झाले आहे. सेटपही केला आहे त्याला फारतर २-३ तास लागले.

बागकामाची माहिती मिळवायला सुरूवात करणारे. नर्सरीला भेट देणे वगैरे त्याला अर्धा-एक तास खूप झाला.
आता डो बनवत आहे कमी यीस्टचा जो उद्या सकाळपर्यंत फुलेल. (सवयीमुळे वेळ २०-२५ मिनिटे). सकाळी ब्रेड व कटलेट (१ तास) हाकानाका!

विकांताला असे ५-६ तास मी सहज काढु शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मैदा:कणिक यांचे ३:२ असे प्रमाण घेतले होते (मात्र पद्दत बर्‍यापैकी मैद्याचीच - प्रमाण आयत्यावेळी गरजेप्रमाणे बदलत . छान झाला होता ब्रेड. फक्त मैद्यासारखा हलका झाला नव्हता.
जाळी वगैरे पडली होती छान, बर्‍यापैकी मऊ होता, पण १०-११ ब्रेड्सपैकी एखाद दोन आतून एखाद्या घासाला ओलेही लागले. १८५ वर १८ मिनिटे बेक केला होता. बहुतेक अजून २ मिनिटे चालली असती वाढवून

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> ब्रेड्सपैकी एखाद दोन आतून एखाद्या घासाला ओलेही लागले. <<

ब्रेड भाजल्या भाजल्या लगेच खाल्ला तर असं होऊ शकतं. त्यातली आर्द्रता पूर्णतः बाहेर पडायला थोडा वेळ लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हं तसंच असेल मग. त्या घमघमाटात कोणालाच फार धीर धरवत नाही Smile

अवांटरः कणिक घातली की घमघमाट अधिक येतो का? आज दोन मजले खाली रहाणार्‍या आजोबांनी बेकिंग होत असल्याच्या वासाबद्दल चौकशी केली.
बहुदा एरवी तो घमघमाट इतका पसरत नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> कणिक घातली की घमघमाट अधिक येतो का? <<

कणकेला एक खमंगपणा असतो, पण हा घमघमाट लोणी, दूध, तीळ, खसखस वगैरे गोष्टींमुळे आला असणार. बनपाव नेहमी साध्या ब्रेडपेक्षा घमघमाट पसरवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आज दोन मजले खाली रहाणार्‍या आजोबांनी बेकिंग होत असल्याच्या वासाबद्दल चौकशी केली.

सर्वांना तुम्ही टॉर्चर असणार Smile इतका छान वास येत असेल आय कॅन इमॅजिन. क्वचित ब्रेड-बेकेइंगचा सुगंध बेकरीमध्ये अनुभवलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप प्रयत्न करूनही मला काही हे जमलं नाही.
कधी अगदीच फ्लॅट तर कधी कडक गोळे.
यीस्ट नीट मिळत नाही अज्जिबात.

पण मी प्रयत्न सोडणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मी प्रयत्न सोडणार नाही.

इसमें हम आपके साथ हैं! माझे प्रयोग देखील १००% यशस्वी झालेत असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पण मी प्रयोग करणे सोडत नाही Smile ब्रेड करण्याचे खूळ माझ्याही डोक्यात आहे.

तुम्ही भारतात कुठे आहात का? सहसा बेकरीवाल्यांकडे "प्रेश यीस्ट" मिळते. मोठा ब्लॉक असतो, आणि तो फ्रीझर मधे ठेवावा लागतो, हवा तेवढाच खरडून वापरायचा. कुठे तरी चिंतातुर जंतू ने ५०० ग्रॅम मैद्याला २.५ छोटे चमचे फ्रेश यीस्ट लागतं असं सांगितलं होतं, ते प्रमाण मला ही योग्य वाटतं.
१००% मैद्याचा पाव यशस्वी होई पर्यंत कणके कडे बघायचेच नाही असे ठरवले आहे. कारण रुची म्हणते तसे भारतातील कणकेत "होल व्हीट फ्लावर" पेक्षा कमी ग्लूटन असतं. त्यामुळे प्रमाणात अधिक गोंधळ होतो.
फ्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी पण पिझ्झाच्या उरलेल्या बेसचे पाव करायला ठेवले. आधी ओले राहिलेत असे वाटल्याने आणखी बराच वेळ ठेवले पण मग त्याचे कडक चाह्त बुडवून खाण्याचे बटर झाले. आत जाळीपण पडली नव्हती. कदाचित डो बनवून बराच वेळ झाल्यानेही झाले असेल.
पण पुन्हा प्रयत्न करून पाहण्याची जिद्द आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

दोन्हीच्या प्रमाणात + कंटेन्ट्समध्ये बर्‍यापैकी फरक आहे. तेव्हा यासाठी वेगळे डो बनवावे.
पावाच्या 'डो'चे नान बरे बनतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हो. पण नवीन पिझ्झा बनवण्याऐवजी हा ही प्रयोग करून पाहिला. आता येत्या वीकेंडला घरी नाहीय, नाहीतर लगेच ट्रायही केला असता. पिझ्झाची चटक लागेलसे वाटतेय. Smile त्यासाठी एकदा कणकेचा बेस जमायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

पुढचा भाग नान चा काढू का? घरी वारंवार नान बनविले जातात आणि आता हात चांगला बसला आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेकी और पुछ पुछ! Smile
येऊ देच!

झालंच तर कुलचा, मिस्सी रोटी वगैरे प्रकारही तुम्ही अथवा इतरही कोणी घरी करत असल्यास त्यांचीही पाकृ येऊ दे!

मीही पंजाबी भाज्यांच्या तीन ग्रेव्ह्यांची (लाल, पांढरी व पिवळी/तपकीरी (चुभुदेघे)) रेसिपी गौरीला विचारून इथे टाकेन. मग कोणतीही पंजाबी भाजीही घरी बनवता येईल - फक्त प्रत्येकाला प्रमाण वेगवेगळे करायचे (ग्रेव्या आठवडाभर टिकतात) - अगदी हाटिल टेस्टची. बायकोचे कवतिकः गौरी त्यात आता सवयीने च्याम्प झाली आहे! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नेकी और पुछ पुछ!
येऊ देच! >> असेच म्हंते. पाकृ फोटू येऊद्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाट पाहातेय, नान आणि पंजाबी भाज्यांची..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

>> आत जाळीपण पडली नव्हती. कदाचित डो बनवून बराच वेळ झाल्यानेही झाले असेल. <<

ब्रेडसाठी भिजवलेली कणीक काही दिवस फ्रीजमध्ये टिकते. आर्द्रता उडून जाऊ नये ह्यासाठी क्लिंगफिल्म किंवा घट्ट झाकणाचा डबा आवश्यक. जेव्हा पुन्हा वापरायची असेल तेव्हा रूम टेंपरेचरला आणून कणीक पुन्हा मळावी आणि झाकून ठेवावं. पुन्हा फुगलं की ह्याचा अर्थ कणीक अजून वापरण्यालायक आहे. अन्यथा पाण्यात यीस्ट भिजवून कणकेत मळून घ्यायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भारतातील बेकर्स, कणकेपासून चांगला पाव बनविण्यासाठी ग्लूटन पावडर वापरतात असे ऐकले होते. कोणी वापरून पाहिली आहे का? नजिकच्या बेकरीवाल्याकडे चओकशी केली तर कुठे मिळते ते समजू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंडी खात नाही. क्रुपया अंडयाना काही पर्याय माहीत असल्यास सुचवावा. अळशीची पावडर वापरुन बघीतली आहे , पण समाधानकारक रीझल्ट नव्हता. बाकी तुमचा पाव मस्त च दीसतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याच पाककृतीने पाव बनवला, फक्त बन बनवायच्या ऐवजी थोडा सँडविच ब्रेड बनवून पाहिला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.