विसावताना एकदा....

विसावताना एकदा....

नको हलवूस खांदा, झोप माझी चाळवेल
स्वप्न-वास्तवाचा सांधा, कोठेतरी हरवेल

समजावू नको काही, स्तोत्रसुद्धा म्हणू नको
सांगायाचे राहिलेले झोपताना सांगू नको

कधी व्याकूळ दु:खाने, कधी निराशेची गाणी
सुखासक्त आशा रुजे कधी दिव्यशा अंगणी

कधी सारे विस्कटून जाती क्षोभाचे प्रपात
शांतावते तेव्हा तुझ्या निरांजनातली ज्योत

वेग-हादरे जगाचे, उंच झोके कर्तृत्वाचे
घेते उसंत जराशी, उसे माझे विसाव्याचे

तुझ्या हृदयीचे ठोके कानी अस्फुट नादती
जन्मांतरीचे सौहार्द, खुणा अंधुक स्मरती

आता थोपटू ही नको, आर्त सारे निवळू दे
पाण्याने पापणीआड डोळे जरा ओलावू दे

खांदा हलवू नकोस, प्राण-फुले गोळा केली
तुझ्यातली पितृ-कळा माझ्या वात्सल्या भेटली
`````````````````````````````````````````

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

अहा!
शेवटची द्विपदी तर कमाल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

कविता मनापासून आवडली.
.अशी कविता दुर्मिळ आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता थोपटू ही नको, आर्त सारे निवळू दे
पाण्याने पापणीआड डोळे जरा ओलावू दे

वा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0