इंटरनेटच्या व्यसनापासून मुक्ति..! मुक्तांगणचा नविन विभाग

"आभासी दुनिया: आपल्यापुरती किती खरी आणि किती खोटी?" या येथिल धाग्यातिल विषयास अनुसरुन, आणि,
आज ०७/११/२०११ रोजीच्या दैनिक लोकसत्तातील प्रथम पृष्ठावर आलेल्या या बातमी संदर्भाने हा धागा उघडला आहे.

वर उल्लेखिलेल्या धाग्यात, आभासी दुनियेचे मानवी जीवनावर वाईट परिणाम होताना अन्य व्यक्तिंवर अन्याय होतो का असा प्रश्न मांडला आहे, तर
वर उल्लेखिलेल्या बातमीमधे, इंटरनेट (अर्थात आभासी दुनियेत वावरण्याचे) चे व्यसन लागलेल्यांवर उपचाराकरता पुण्यातील मुक्तांगण या संस्थेने स्वतंत्र कक्ष उघडल्याचे कळविले आहे.

हा धागा उघडण्यामागिल कारणमिमांसा पुढील प्रमाणे
क) या बातमीची प्रसिद्धी होणे, जेणेकरुन, कुणास उपचाराची आवश्यकता भासत असल्यास त्यास माहित होणे.
ख) या अनुषंगाने, वाचकाने, स्वतःचे मुल्यमापन/आत्मपरिक्षण करणे.
ग) तसे करण्यास, या व्यसनाची लक्षणे/परिणाम यावर जाणकारांचे मतप्रदर्शन होणे.

मला जशी माहिती/अनुभव्/अनुभुती मिळत जाइल, तसे तसे मी येथे भर घालिनच, पण तोवर, या विषयातील जाणकारांनी कृपया यावर मतप्रदर्शन करावे.

सर्वसाधारणतः पुढील मुद्यान्ना जरुर स्पर्ष करावा असे अपेक्षित आहे.
१) असे व्यसन खरोखरी असू शकते का? असल्यास काही उदाहरणे.
२) या व्यसनाची बाह्य लक्षणे, त्याची अन्य व्यसनप्रकारांबरोबर तुलना, अंतिम परिणाम.
३) व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवरील सहजशक्य उपाययोजना.

धन्यवाद.

field_vote: 
2.75
Your rating: None Average: 2.8 (4 votes)

प्रतिक्रिया

मला या धाग्याचं शीर्षक बघून हा अनियन स्टाइल गमतीदार धागा आहे की काय असं वाटलं होतं. पण खरोखरच तशी बातमी बघून मी अवाक् झालो.

व्यसन या शब्दाची व्याख्या जरा जास्तच तीव्र झाली आहे का? याच व्याख्येने इंटरनेट नसताना इतरांशी चकाट्या पिटण्याचं व्यसन, नुसतंच बाहेर हुंदडण्याचं व्यसन, पोरींवर लाईन मारण्याचं व्यसन अशी व्यसनं होती असं म्हणता येईल का?

पंचवीस वर्षांपूर्वी एखादा १२-१५ वर्षांचा मुलगा तासन् तास पुस्तकं वाचत बसला असता, अगदी तहानभूक हरपून, तर त्याला व्यसन म्हटलं असतं (कदाचित नसतंही). पण तोच जर तबल्याचा रियाज करत बसला असता, किंवा मिळालेल्या प्रत्येक मोकळ्या क्षणात क्रिकेट एके क्रिकेट करत बसला असता तर त्याचं वारेमाप कौतुक झालं असतं. सचिन तेंडुलकरला क्रिकेटचं व्यसन आहे असं कोणी म्हणतं का? झाकिर हुसेनला तबल्याचं व्यसन आहे का? एकंदरीत व्यसन या शब्दाबाबत सर्वधर्मसमभाव दिसत नाही.

कदाचित सर्वसामान्य जनता नेटवर पुरेसा वेळ घालवत नसेल.

बातमी प्रकारच्या धाग्यासाठी आदर्श स्वरूपाची मांडणी केल्याबद्दल लेखकाचं अभिनंदन. मोजके पण पुरेसे शब्द, बातमीचा दुवा, बातमी काय आहे व का महत्त्वाची आहे याबाबत थोडक्यात वर्णन, व त्याअनुषंगाने काय चर्चा व्हावी याचं सादरीकरण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तोच जर तबल्याचा रियाज करत बसला असता, किंवा मिळालेल्या प्रत्येक मोकळ्या क्षणात क्रिकेट एके क्रिकेट करत बसला असता तर त्याचं वारेमाप कौतुक झालं असतं. सचिन तेंडुलकरला क्रिकेटचं व्यसन आहे असं कोणी म्हणतं का? झाकिर हुसेनला तबल्याचं व्यसन आहे का?

नाही असं कोणी म्हणणार नाही कारण हुसैन आणि तेंडूलकर दोघांचे गुण कला-खेळ या क्षेत्रातील आहेत. ते जोपासण्याला समाजात मान आहे किंबहुना त्यांच्या गुणांमध्ये इतर लोक आपले मन रमवतात. त्यांची तुलना इंटरनेट सर्फिंगशी होऊ शकत नाही. दुसरं म्हणजे हे दोघेही आपल्या गुणांनी पैसा कमावतात. त्यातून आपल्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी उत्पन्न निर्माण करतात.

तासन् तास वाचन केल्याने किंवा इंटरनेट सर्फिंग केल्याने हे साध्य होईलच असे नाही. पुन्हा, वाचन कसले चालते हे ही येथे महत्त्वाचे आहे. पीतपुस्तके, चॅटिंग वगैरेंची तुलना एखाद्याच्या रियाझाशी होते असे वाटत नाही.

१) असे व्यसन खरोखरी असू शकते का? असल्यास काही उदाहरणे.

माझ्यामते असू शकते. फेसबुक आणि तत्सम साइट्सवर सतत वेळ घालवणे, अपडेट्स देणे, खाजगी माहिती देणे यातून अडचणीत आलेले लोक माहित आहेत.

मूळ लेखात विद्यार्थी हे मुक्तांगणचे टारगेट वाटतात. अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि एकलकोंडेपणा, आभासी दुनियेत रमणे वगैरे दुष्परिणाम दिसतात याच्याशी सहमत आहे.

सध्याचा टिनेज वर्ग फेबुवर जो वेळ घालवतो तो लक्षात घेतला तर हे कॉलेजला कधी जातात,अभ्यास कधी करतात आणि मित्र मैत्रिणींसोबत कधी हुंदडतात असा प्रश्न पडतो.

२) या व्यसनाची बाह्य लक्षणे, त्याची अन्य व्यसनप्रकारांबरोबर तुलना, अंतिम परिणाम.

अतिइंटरनेट सर्फिंग करणार्‍या जोडीदारासोबत घटस्फोट घेण्याची उदाहरणे अमेरिकेतच वाचली होती.निद्रानाश हा सर्वात मोठा परिणाम आहे. जालावर वावरणार्‍यांनी कृपया तो नाकारू नये. Smile

३) व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवरील सहजशक्य उपाययोजना.

इतरत्र मन रमवणे, मुलांचा इंटरनेट वेळ नियमित करणे, त्यांच्या इंटरनेट हालचालींवर लक्ष ठेवणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१) असे व्यसन खरोखरी असू शकते का? असल्यास काही उदाहरणे.

होय असे व्यसन असु शकते. केवळ इंटरनेट नाही तर एकुणच 'टेलिकॉम'मधील गॅझेट्सचं व्यसन असतं
कित्येक व्यक्ती उगाच इमेल आल्याचे, समस आल्याचे चेक करत असतात. (आपल्या धाग्यावर प्रतिक्रीया आल्याचेही नक्की चेक करत असतील Wink )

२) या व्यसनाची बाह्य लक्षणे, त्याची अन्य व्यसनप्रकारांबरोबर तुलना, अंतिम परिणाम.

 • इंटरनेटपासून जास्त काळ दूर राहु न शकणे.
 • दर ठराविक वेळाने आपली इमेल्स, समस वगैरे चेक करणे
 • ठराविक वेळात आपल्याला इमेल्स, उप्डेट्स वगैरे न आल्यास अस्वस्थ होणे
 • इतर वैयक्तीक, कौटुंबिक वगैरे जबाबदार्‍या टाळून इंटरनेटवबस्वेळ घालवणे

३) व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवरील सहजशक्य उपाययोजना.

दुर प्रवासाला जाणे शक्यतो अश्या ठिकाणी जिथे इंटरनेट नसेल.
घरातून इंटरनेटचे कनेक्शन काढू नये, त्यापेक्षा स्लो-स्पीड कनेक्शन घेणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१) असे व्यसन खरोखरी असू शकते का? असल्यास काही उदाहरणे.

आपण केला तो छंद व इतरांचे ते व्यसन. छंद व व्यसन यातील सीमा रेषा पुसट आहे. तसेच ती सापेक्ष आहे. विरंगुळा म्हणुन एकत्र आलेले लोक पुढे परस्परांचा द्वेष मत्सर करु लागतात. हे व्यसनापोटी विवेकबुद्धी गमावल्याचे लक्षण आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच हे वाक्य गुळगुळीत असल तरी त्याचा मथितार्थ लक्षात घेतला तर तो व्यवहार्य आहे. ऋषिकेशने वर मुद्देसुद मांडणी केली आहेच. आपण सारेच कमी अधिक प्रमाणात इंटरनेटचे व्यसनी आहोतच. ऐसी अक्षरे हे पण व्यसनातुनच निर्माण झाले आहे. तुझे धागे किती माझे धागे किती? तुझी श्रेणी अमुक माझी तमुक वगैरे स्पर्धात्मक विचार मनात चालू होतात. मागचे हिशोब चुकते करणे, ते करण्यासाठी एखाद्याला गुगलून (बुकलून) काढणे हे प्रकार चालू होतात.इंटरनेटच्या व्यसनातुन मुक्त झालेली वा विरक्त झालेली मंडळी देखील पहायला मिळतील. काहींचा अंतासोबतच व्यसन सुटते. हे व्यसन चांगले कि वाईट या कृष्णधवल द्वैतात स्तिमित करणे मला स्वत:ला अयोग्य वाटते. या कडेही बहुरंग बहुढंगाने पहाता येते.

२) या व्यसनाची बाह्य लक्षणे, त्याची अन्य व्यसनप्रकारांबरोबर तुलना, अंतिम परिणाम.

ऋषिकेशने सांगितल्या प्रमाणे
३) व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवरील सहजशक्य उपाययोजना.
एका व्यसनातुन मुक्त होण्यासाठी दुसरे व्यसन जोडून घेणे. व्यवहार्यता आपापल्या मानसिक शारिरिक बौद्धीक सामाजिक कुवती प्रमाणे. तुलनात्मक दृष्ट्या आपल्याला कमी हानिकारक व्यसन जडवुन घेणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सहमत. +१ दिला आहे.

आपण सारेच कमी अधिक प्रमाणात इंटरनेटचे व्यसनी आहोतच.


हे अगदी मान्य!
या संदर्भात भरपूर विचार आहेत. मुद्दाम धाग्याच्या सुरूवातीला लिहिले नाहियेत. इथली चर्चा साधक बाधक होते आहे हे दिसतं आहे. (युज्य्वली लिंबूजींचे धागे टवाळीचे/विनोदी म्हणून इतर म.सं. वर सोडून दिले जातात. पण हा खरंच गंभीर विषय आहे) थोडी चर्चा/मते अजून आली तर छान वाटेल.
सध्या थोडा पळापळीत आहे. नंतर सविस्तर.

ता.क.
मुक्तांगण ही व्यसनमुक्तीबाबत जेन्युइन काम करणारी संस्था आहे. ड्र्ग्ज, अगदी मनोहर साप्ताहिकात 'ब्राऊन शुगर' बद्दल यायचं तेंव्हापासून मुक्तांगण काम करतंय. अन त्यांना जर इंटरनेट अ‍ॅडिक्शन पटावर घ्यावं वाटतं आहे, तर माझ्या मते त्या बाबीस नक्कीच 'क्रेडिबिलिटी' आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तुझे धागे किती माझे धागे किती? तुझी श्रेणी अमुक माझी तमुक वगैरे स्पर्धात्मक विचार मनात चालू होतात. मागचे हिशोब चुकते करणे, ते करण्यासाठी एखाद्याला गुगलून (बुकलून) काढणे हे प्रकार चालू होतात

Smile
आंतरजालीय वावराला केवळ 'मोकळे होणे' इतपत सिमीत राखले तर उपयोग होऊ शकेल असे वाटते. म्हणून तर 'मोकळा तर झालो!' Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे पहा
>>>१) असे व्यसन खरोखरी असू शकते का? असल्यास काही उदाहरणे.
>>>२) या व्यसनाची बाह्य लक्षणे, त्याची अन्य व्यसनप्रकारांबरोबर तुलना, अंतिम परिणाम.
>>>३) व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवरील सहजशक्य उपाययोजना.
या तिनही मुद्यान्ना काही प्रमाणात स्पर्ष करु शकेल असा लेख दैनिक लोकप्रभामधे http://loksatta.com/lokprabha/20111118/baldin-vishesh.htm येथे आला आहे.
आभासी दुनियेतील गेम्स चा लहान मुलांवर होणार्‍या परिणामाची तेथे चर्चा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कालच म्हटलं होतं की हा धागा शोधून परत पुनरुज्जीवीत करावा लागेल. ते तुम्हीच केलंत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

२०११ मध्ये स्मार्टफोन / फेसबुक होते वा नव्हते आठवत नाही, पण सध्याची परिस्थिती बघता, फोनच्या माध्यमातुन इंटरनेट द्वारा whatsapp/facebook इत्यादी सुविधांच्या आहारी जाणे होते आहे काय हा अभ्यासाचा विषय होतो आहे.
whatsapp /facebook मुळे तर समोर प्रत्यक्ष हजर व्यक्तिशी संवाद करणे सोडून फोनच्या स्क्रीनमधून दूर अंतरावरील प्रत्यक्ष/आभासी व्यक्तिमत्वांशी संवाद साधणे जास्त होते आहे असे वाटते.
whatsapp /facebook सुयोग्य प्रकारे वापरले तर अतिशय उपयोगी माध्यम आहे. पण त्यांचा व्यसनसदृष वापर होऊ लागल्यावर कौटुंबिक/सगेसोयर्‍यांबरोबच्या संवादात धोकादायकरित्या न्यून राहू लागल्याचे जाणवते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

whatsapp /facebook मुळे तर समोर प्रत्यक्ष हजर व्यक्तिशी संवाद करणे सोडून फोनच्या स्क्रीनमधून दूर अंतरावरील प्रत्यक्ष/आभासी व्यक्तिमत्वांशी संवाद साधणे जास्त होते आहे असे वाटते.

मग? प्रॉब्लम क्या है?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>> हा ई-व्यसनमुक्ती चा कोर्स ऑनलाईन आहे का?"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0