ठसा

५ वर्ष्या पूर्वीचा तो जीवन बदलून टाकणारा प्रसंग आज अजुन सुधा ताजा होता त्याच्या मनात. अगदी आत्ताच घडून सारखा .तो प्रसंग होताच तसा.कधीच न विसरता येण्या सारखा. बघता बघता श्री भूतकाळात रमून गेला. श्रीला लहानपणा पासूनच व्यायामाची खूप आवड. अर्थात आई मुळे लागलेली . आईची खूप शिस्त होती एकदम कडक! पहाटे लवकर उठून दूध पिउन व्यायाम केल्यावरच ब्रेकफास्ट.पहाटे उठून जॉगिंगला जाणे हा श्री च्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला होता. तरुणपणी सुधा हेच अंगवळणी पडलं होत त्याच्या .व्यायामा सोबतच श्रीला गाण्याची ,नाटकात काम आवड होती. अगदी शाळेपासूनच तो सगळ्या स्पर्धांमध्ये असायचा.पुढे इंगीनिरिंगला admission घेतल्यावर सुद्धा त्याने अभ्यासातून वेळ काढून आपल्या आवडी जोपासल्या. त्यामुळेच कॉलेज मधे तो एकदम फेमस होता. इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्ष्या पासून तो कॉलेज मधल्या या सगळ्या गोष्टीन मध्ये भाग घ्यायचा. मग ते वक्तृत्व स्पर्धा असो किंवा कवी संमेलन असो...एकंदरीत कोणत्याही मुलीने भुलून जाव असं व्यक्तिमत्व.

या सगळ्या गोष्टींमुळे कॉलेजच्या पहिल्या वर्ष्यापासूनच मुलींच्यात खूपच femous होता श्री !! पण इतक्या सगळ्या मुली याला भाव देत असून सुद्धा त्याला कोणीच क्लिक झालं नव्हती .खरं तर त्याला इंटरेस्ट नव्हता कोणाच्यात. पण त्याचा हा पवित्रा हळू हळू बदलू लागला तो direct दुसऱ्या वर्ष्याला आलेल्या प्राची मुळे. प्राची दिसायला काही अप्सरा वगेरे नव्हती. पण श्रीला का कोण जाणे ती खूपच आवडली होती. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी स्वतःची introduction देताना तिने तिच्यातल्या गान-सरस्वतीचं दर्शन घडवलं.खरच खूप गोड गळा लाभला होता प्राचीला.तिचे काळे भोर डोळे आणि लांब सडक केस यात श्री पुरता अडकून पडला होता. आणि तिच्या आवाजाच्या प्रेमात पडला होता तो पहिल्याच दिवशी.हळू हळू प्राची आणि श्री ची मैत्री वाढू लागली. आणखीनच घट्ट झाली"गाणं" हा दोघांच्यातला जिव्हाळ्याचा विषय बनला होता. "गाणं" दोघांना अणखी जवळ आणत होतं. दोघांनाही जाणीव होत होती आपण एकमेकांच्या प्रेमात पडल्याची!! श्रीला स्वतः च्यातला हा बदल जाणवत होता.पण सध्या career महत्वाचं आहे म्हणून तो वेळ घेत होता. प्राची ला देखील जाणवत होत कि श्रीला आपल्या बद्दल मैत्री पेक्षा काहीतरी जास्ती वाटत आहे पण ती देखील गप्प होती.श्री काही बोलण्याची वाट पाहत होती.

एकंदरीत कॉलेज चे गुलाबी दिवस खूप छान चालले होते . फाइनल year ला आल्यावर मात्र श्री ने काहीतरी डिसिजन घ्यायचं ठरवलं आणि प्राचीला लग्नासाठी propose केलं. प्राची ला देखील श्री आवडत होता.थोडा वेळ घेऊन तिने श्रीला होकार दिला. आता पुढे खरी परीक्षा होती. घरच्यांचा विरोध गृहत होता. कारण हे दोघा inter cast मॅरेज करत होते. पण त्यांनी मोठ्या जिद्दीने घरातल्यांना समाजवले. पण तरी सुद्धा श्री च्या आईच्या मनात प्राची बद्दल जरा तिढा होताच.प्राची पेक्षा एकाहून एक सरस,सुंदर मुली श्री ला सांगून आल्या होत्या .पण एकुलत्या एक मुलाच्या हट्टा पुढे त्याचं काही चालत नव्हतं.

श्री आणि प्राची दोघांनीही एका IT company मध्ये जॉब लागला. जॉब सोबत तिचं गाणं पण सुरूच होतं.धकाधकीच्या IT life मध्ये गाणं हा तिचा श्वास होता.जॉब मध्ये थोडं सेटल झाल्यावरच लग्न करू असं त्यांनी घरच्यांना आधीच सांगितलं होत. जॉब मध्ये एक,दीड वर्ष्य झाल्यावर आता मात्र दोघांच्याही घरचे मागे लागले लग्नासाठी. आणि अखेर दोन जीवांच्या मिलनाचा दिवस उजाडला. एका शुभ मुहूर्तावर प्राची आणि श्री एका नाजूक धान्यात बांधले गेले. इथून पुढे खरा जीवन प्रवास सुरु झाला होता.कॉलेज चे ते रंगीत दिवस फुलपाखरा सारखे उडून गेले होते.'अरे संसार संसार' या गाण्याची उक्ती प्राचीला येऊ लागली होती. पण श्री साठी ती सर काही सहन करत होती. नवऱ्याचा आधार असला कि संसाराच्या विस्तवावरून चालणं बाई साठी जर सुखकर होत.

दिवस पुढे सरकत होते. श्री आणि प्राची च्या लग्नाला २ वर्षं झाली होती. जॉब करून घर सांभाळायच आणि त्यात घरी आल्यावर सासू बाईंची काही न काही कूण कुण या सगळ्या मूळ प्राची अगदी थकून जायची. यात आता घरातल्याना नव्या पाहुण्याची आस लागली होती. प्राचीला देखील आता आपण आई व्हाव अस वाटत होत. तस पाहायला गेला तर सगळ सेटल होत. हरकत नव्हती नवीन पाहुणा यायला.

पण नियतीच्या मनात काही वेगळच होत. प्राचीला दिवस जात नव्हते . श्री आणि प्राची ने एका नामवंत डॉक्टरना दाखवल. सगळ्या तपासण्या टेस्ट,वगेरे झाल्या.सगळे उपाय थकले. जप जाप ,उपवास तापास सगळ काही करून झालं. "आता planning पुरे " असे लोकांचे टोमणे देखील ऐकून झाले. ते दोघे वरकरणी हसत होते.पण आतून खूप धास्तावले होते.बाळाची आस तर लागली होती.पण हा "पण" मध्ये येत होता. आणि एक कटू सत्य समोर आलं.प्राची कधीच आई होऊ शकणार नव्हती हे!! सगळ्यां साठीच खूप धक्का दायक होत. श्री च्या आईला तर अजुन एक नवीन विषय मिळाला होता प्राची ला त्रास द्यायला. प्राची खूप सहन करत आली होती. पण आता तिच्यासाठी सगळा असह्य होत चालल होत. नियती पुढे तिने हात टेकले होते. रोज काहीतरी नवीन असायचच .एखाद्या स्त्री साठी ती आई होऊ शकत नाही हि गोष्ट मरण समान असते आणि त्या मरण यातना प्राची रोज भोगत होती.

परिस्थिती पुढे हतबल होऊन परिस्थिती स्वीकारण्या शिवाय पर्याय नव्हता कोणा कडेच. दिवस जात होते.त्रास तर सगळ्यानाच होत होता,पण त्रास सहन करण्या शिवाय पर्याय नव्हता. एकंदरीतच नियतीने केलेल्या खेळाचा परिणाम सगळ्यांवरच झाला होता.श्री ने तर स्वतःला कामात अक्षरशः बुडवून घेतल होता.रोज सकाळी जॉगिंग,मग ऑफिस आणि संध्याकाळी उशिरा पर्यंत ऑफिस मधे थांबून काम असा त्याचा दिनक्रम सुरुच होता. तो प्राची ला कधीच काही बोलला नव्हता आणि बोलत देखील नव्हता. पण प्राचीच मन तिला खात होता.ती श्री ला एखद बाळ दत्तक घेऊन या म्हणून मागे लागली होती तर श्री ची आई श्री ला दुसरा लग्न कर म्हणत होती.जे कधीच शक्य नव्हत.श्री त्याचं प्राची वरच प्रेम कधीच कोणाला वाटू शकणार नव्हता. प्राचीचं गाणं पूर्ण बंद पडलं या सगळ्या प्रकारात . ती स्वतःला दोष देत होती आणि आतल्या आत कुढत होती.

आपल्या आवडत्या माणसाला,त्याच्यात काहीही दोष असला तरी,समाज्याच्या,कुटुंबाच्या साक्षीने आपलंसं करणं किंवा समाज्याला झुगारून आपलंसं करणं हा एक अवघड दुःखाचा प्रवास असतो.आपल्या डोळ्या देखत आपलं सुख दूर घेऊन जाणारं. श्री च्या बाबतीत देखील हेच घडू लागल होतं.

एक दिवस श्री नेहमी प्रमाणेच जॉगिंगला जायला निघाला. पहाटेची वेळ होती. खूप थंडी होती तरी पण जॉगिंग ची सवय आधी पासून असल्याने थंडी श्री ला थांबवू शकत नव्हती. त्या दिवशी पण खूप थंडी होती. प्राची त्याला सांगत होती की आज नको जावूस.पण श्री ने ऐकल नाही. तो गेलाच.आज का कोण जाणे काही तरी वेगळच वाटत होत त्याला. जॉगिंग झाल्यावर एका बाकावर बसला ,जरा दमला होता म्हणून.आणि अचानक त्याची नजर एका निळ्या रंगाच्या कापडावर पडली. काही तरी गुंडाळून ठेवलेल होतं त्यात. त्याने सुरवातीला जरा दुर्लक्ष केल. पण काही वेळाने त्याला तिथे हालचाल जाणवली. त्याने नीट पहिल आणि त्याला कळल की त्या निळ्या कापडत एक छोट बाळ होत.अगदी काही तासांच असेल. इवलस ते पिल्लू कोणाला तरी नकोस झालं होत बहुतेक.आणि कोणीतरी त्या काही तासांच्या बाळाला सोडून निघून गेल होत.श्री ने त्या बाळाला उचलल.आणि क्षणात ते बाळ रडायचं थांबल.जणू तो लहानगा जीव श्री येण्याचीच वाट पाहत होता. ती एक मुलगी होती. श्री ने तिला हृदयाशी कवटाळल. जणू देवाने त्याच्या आयुष्याला अंधार दूर करायलाच तिला पाठवल होत.

त्या बाळाला उचलून घरी न्यायच अस श्री ने मनाशी पक्क ठरवून टाकल. आणि क्षणाचाही विचार न करता तो घरच्या दिशेने चालू लागला.नेहमीचा घर त्याला लांब वाटू लागल.कधी एकदा घरी जातोय आणि प्राचीला बाळ दाखवतोय अस झालं होत त्याला. घरा जवळ पोचला आणि बाहेरूनच प्राची, प्राची म्हणून हाका मारू लागला. प्राची खूप वर्ष्यांनी श्रीला असा हसताना पाहत होती. तिला काही समाजेना हा इतका का ओरडतोय ते. त्याच्या हातात काहीतरी निळ कापड दिसत होत आणि तो धावातच घराजवळ येत होता. ती पटकन दारा जवळ गेली आणि श्री ने त्या बाळाला तिच्या हातात दिला.तिला काहीच कळेनास झला.ती फक्त त्या इवल्याश्या जिवा कडे पाहताच राहिली.श्री ने या बाळा कुठून आणल, कस आणल काही काही तिच्या मनात आल नाही त्या वेळेस.ती फक्त त्या बाळा कडे पाहताच होती. शब्द मुके होऊन गेले. आणि तिच्या डोळ्यातून आपोआप पाणी येऊ लागल. श्री ने तिला धरून हॉल मधे सोफ्यावर बसवल आणि रडू दिल.

नंतर थोडा सावरल्यावर श्री ने प्राचीला आणि आईला सगळी हकिकत सांगितली. ती पहाट,थंडी आणि ते निळ्या कापडत गुंडाळ्लेला काहीतरी श्री च्या जीवनात कायम घर करून राहिल. घरात वेगळच वातावरण निर्माण झल होत बाळ आल्या पासून. सगळे अगदी बाळाच्या मागे लागले होते.नव्या पाहुण्याने श्री च्या घरात अगदी उत्साहाच निर्माण केला होता.श्री ने तिच नाव काव्या ठेवल.

बघता बघता काव्याच्या इवल्याश्या पावलांनी सगळ घर काबीज केल होतं. श्री ,प्राची ,श्रीची आई अगदी काव्या मध्ये गुंतून गेले होते. काव्या मुळे .

५ वर्ष्या पूर्वीच्या या सगळ्या घटना आठवताना श्री चे डोळे भरून आले होते. काव्या ५ वर्ष्यांची झाली होती. आणि श्री त्याच बेंच वर बसून दुडू दुडू पाळणाऱ्या काव्या कडे पाहत होता. इतक्यात मागून खांद्यावर कोणी तरी हात ठेवला. प्राची होती ती. श्री च्या बाजुला बसून ती सुधा काव्या कडे हरपून पाहत राहिली. न सांगताच दोघांना एकमेकांच्या मनातल्या भावना समजल्या. ते दोघं भानावर आले तेव्हा त्यांना समजलं कि काव्या त्यांना बोलावत आहे तिच्या सोबत खेळायला.

श्री तिथून निघाला खरा पण ती पहाट ,तो हिवाळा आणि ते निळ्या रंगात गुंडाळलेला इवलस बाळ यांचा “ठसा” त्याच्या हृदयावर करमाचा कोरला गेला होता….

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

पाची िदसायला काही अपसरा
वगेरे नवहती. पण शीला का कोण जाणे ती खूपच आवडली होती.

नवया पाहुणयाने शी चया घरात अगदी उतसाहाच िनमारण केला
होता.शी ने ितच नाव कावया ठेवल.

नंतर थोडा सावरलयावर शी ने पाचीला आिण आईला सगळी हिककत सांिगतली. ती
पहाट,थंडी आिण ते िनळया कापडत गुंडाळलेला काहीतरी शी चया जीवनात कायम घर करन
रािहल. घरात वेगळच वातावरण िनमारण झल होत बाळ आलया पासून. सगळे अगदी
बाळाचया मागे लागले होते.नवया पाहुणयाने शी चया घरात अगदी उतसाहाच िनमारण केला
होता.शी ने ितच नाव कावया ठेवल.

५ वषयार पूवीचया या सगळया घटना आठवताना शी चे डोळे भरन आले होते. कावया ५
वषयारची झाली होती. आिण शी तयाच बेच वर बसून दुडू दुडू पाळणाऱया कावया कडे पाहत
होता.

मोकलाया दाही दिश्या या अजरामर मिपाकाव्यरत्नाची आठवण झाली.

पाची अन शी, काय काँबिनेशन आहे, वा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श्री आणि प्राची,हो. भावनाओंको समझो.

लेखिकेने ही कथा आवश्यक टंकनदुरुस्ती करून पुनःप्रकाशित करावी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॅटमॅन - तुम्ही ज्या काव्यरत्नाचा उल्लेख केला आहे "मोकलाया दाही दिश्य"", त्याची मिपा वरची लिंक देउ शकाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! वरिजिनल सोर्स वाचायची उत्सुकता दाखवल्याबद्दल आभार!

हे घ्या.

http://www.misalpav.com/node/6332

कविता आणि प्रतिसाद दोन्ही आवर्जून वाचा. हसूनहसून नाही कळायचं बंद झालं तर सांगा ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आजचा दिवस चांगला गेला - धन्स धनश्री. खुप हसले. बर्‍याच दिवसांनी इतके हसले

बॅट्मॅन - धन्यवाद. लगेच वाचते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बापरे , पोटात दुखायला लागले. ग्रेट आहे कवि आणि असे टंकुन वर मोबाइल नंबर पण देतोय.
हे तर एकदम Stress Buster च आहे. कॉपी करुन ठेवली आहे.

जरा जास्त बघितले तर दिसले की हे सतिश महाशय दोन वर्ष असेच टंकत आहेत. काहीच सुधारणा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवर स्वागत.
टंकनदोषांमुळे (किंवा कॉपी-पेस्त मुळे?) वर दिलेला मजकूर वाचणे अत्यंत कठिण जाते आहे.
या दुव्यावर टंकलेखनाची मदत केलेली आहे तिचा लाभ घेऊन वरील लेखन स्वसंपादित करावे ही विनंती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१०००००००००००००००.

स्वसंपादन मस्ट!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण करमणुक चांगली होत आहे.

आश्चर्य आहे की "धनश्री" मधला "श्री" जमला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरवर चाळल्यास कथेची ऊत्सुकता वाटतेय. व्यवस्थित टाईप केल्यास वाचता येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

हम्म ठीक आहे कथा. सेँटी सेँटी मला जास्त आवडत नाही Smile
लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"शी".... मला वाटले जपानी नाहीतर चिनी हिरो आहे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मलाही असेच वाटले आधी.
शिवाय श्री 'femous' असल्याने मूलबाळ होत नसावे असेही वाटून गेले. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आर्र तेच्या.....काय बेक्कार हाणलाय हो ननि!!! मान गये Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

टंक लेखनाच्या चुका सुधारित आवृत्ती.............

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरूवातीची काही वाक्य दुरूस्त करून दिलेली आहेत.

५ वर्षांपूर्वीचा तो जीवन बदलून टाकणारा प्रसंग आज अजूनसुद्धा ताजा होता त्याच्या मनात. अगदी आताच घडून सारखा. तो प्रसंग होताच तसा. कधीच न विसरता येण्यासारखा. बघता बघता शी भूतकाळात रमून गेला. शीला लहानपणापासूनच व्यायामाची खूप आवड. अर्थात आईमुळे लागलेली. आईची खूप शिस्त होती एकदम कडक! पहाटे लवकर उठून दूध पिऊन व्यायाम केल्यावरच ब्रेकफास्ट.

तीन सर्वसाधारण सूचना आहेतः
१. जोडाक्षरं एकत्र लिहीणे. उदा: व्यायाम, वयायाम नव्हे. फोनेटीक कीबोर्डावरचं स्पेलिंग vyAyAm
२. विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडूनच लिहीणे. उदाहरणार्थ लहानपणापासूनच, व्यायामासोबतच इ. विभक्ती प्रत्यय शब्दापासून तोडून लिहीणे हा हिंदीमधला नियम आहे. शब्दाचं सामान्यरूप केल्यानंतर विभक्ती प्रत्यय तोडून लिहीला की शब्द फारच विद्रूप दिसतो.
३. विरामचिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारचिन्ह इ. आधीच्या शब्दाला जोडून येतात. त्यानंतर एक मोकळी जागा सोडली जाते आणि पुढचं वाक्य येतं. उदा:
पूर्णविरामाचा असा उपयोग अयोग्य आहे .
पूर्णविरामाचा असा वापर योग्य आहे. पूर्णविरामानंतर पुढच्या शब्दाआधी एक मोकळी जागा सोडलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फार सेँटीमेँटल कथा आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

अपत्यप्राप्ती हा लग्नाचा 'उद्देश' असतो असं अगदीच चुकीचं (आणि मुर्खपणाचं) बाळकडू मिळाल्यामुळे होणारे दुष्परिणाम काही प्रमाणात टिपले असले तरी छोट्या प्रसंगांतून कथा अधिक खुलवता आली असती असे वाटते. कथेचा जीव यापेक्षा बराच मोठा होता.

पुढील कथेसाठी, लेखनासाठी शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लग्नाचाच उद्देश का अनेक लोकांसाठी तो आयुष्याचाही असतो.

श्री बाळाला घेऊन घरी येतो तेव्हा प्राचीने आत्महत्या केलेली असते असं काही झालं असतं तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

@ धनश्री - तुम्ही सगळी मजाच घालवुन टाकली तुमचे टंकन सुधारुन.

लेख्/कथा अगदीच बाळबोध आहे. माहेर किंवा मानिनी सारख्या मासिकात खपुन जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0