नो, डेव्हीड!

फावल्या वेळात मुलाच्या शाळेत जाऊन वाचनायलात मदत करणं हा माझा आवडीचा छंद. तिथल्या लायब्ररीयन आणि मदतनिसाबरोबर माझी आता गट्टी जुळलेली आहे. मुलाच्या नावावर ते मला हवी तेवढी पुस्तकं घेऊ देतात. मी पुस्तकं व्यवस्थित चाळून, मुलांना आणि मला एकत्र वाचायला आवडतील या अंदाजाने आणत असते. या आठवड्यात अशाच अंदाजाने मी डेव्हीड शॅननचं 'नो, डेव्हीड!' आणलं, आणि सांगायची गोष्ट म्हणजे, आमच्या घरात या पुस्तकाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला! रोज या पुस्तकाची पारायणं होतात. असं आहे तरी काय या पुस्तकात? तर लेखकाचे लहानपणीचे, तो ५ वर्षांचा असतानाचे अनुभव त्याच्याच शब्दात, खरं म्हणजे त्याने सतत ऐकलेल्या एकाच शब्दात मांडलेले आहेत. तो शब्द म्हणजे "नो!". लेखकाच्या शब्दातच सांगायचं तर, "काही वर्षांपूर्वी माझ्या आईने मला मी लहान असताना बनवलेलं पुस्तक पाठवलं. त्यात (मोठ्यांच्या चष्म्यातून) करू नये अशा अनेक गोष्टी करतानाची चित्रं होती, पुस्तकाचे नाव 'नो डेव्हीड' कारण तेव्हा मला तेवढंच लिहीता येत होतं."
यातलं डेव्हीडचे चित्र देखील मजेदार आहे. चेहर्‍याकडे पाहूनच हा मुलगा व्रात्य, डामरट आणि 'उद्योगी' आहे याची खात्री पटते. वानगीदाखल हे पुस्तकाचे मुखपृष्ठ पहा.

मळलेल्या पायाने घरात चालू नये, पलंगाचा उपयोग उड्या मारण्याकरता नसून झोपण्याकरता करायचा असतो, घराबाहेर जाताना कपडे घालण्याचा प्रघात आहे यासारख्या अनेक गोष्टी डेव्हीडला साफ नामंजूर आहेत. त्याकरता तो सतत आईची बोलणी खात असतो.
या पुस्तकाकरता लेखकाला कॅल्डेकॉट पुरस्कार मिळाला आहे. न्यु यॉर्क टाईम्स च्या बेस्ट सेलर्स यादीत या पुस्तकाचा समावेश आहे. या पुस्तकाच्या प्रसिद्धीनंतर, डेव्हीड सिरीजची अनेक पुस्तके आली. 'डेव्हीड गोज टू स्कूल', 'डेव्हीड गेट्स इन ट्रबल', 'ओह! डेव्हीड' वगैरे. उद्याच वाचनालयातून काही आणायचा मनसुबा आहे.
जाता जाता..आमच्य चिरंजीवांनी या पुस्तकातून प्रेरणा घेऊन, आईच्या न आवडलेल्या गोष्टींचे 'नो मॉमी!' असे पुस्तक लिहिण्याचा संकल्प सोडला आहे!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

तुमच्या चिरंजीवांच्या पुस्तकाबद्दल मला अधिक उत्सुकता आहे. आमच्या एका मित्राचा चार-साडेचार वर्षांचा मुलगा आम्हाला सगळ्यांना 'गप्प बसा', 'कोणी गाऊ नका' वगैरे दम देत होता त्याची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुदैवाने, आमच्या चिरंजीवांचे अर्ध्याहून अधिक संकल्प हे सुरु होण्याआधीच हवेत विरतात. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा भारी वाटतोय डेव्हीड मुखपृष्ठावरुन. वाचायला पाहीजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त आहे मुखपृष्ठ ...बघायला+वाचायला हवा डेव्हिड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कन्सेप्टच खत्रा आहे!!! वाचायला पाहिजेच एकदा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुस्तका बद्दल उत्सुकता आहे. शोधून बघतो इथे मिळतंय का ते
बाकी शिर्षकावरून पु.लं.च्या 'गप्प बसा संस्कृती' या शब्दप्रयोगाची आठवण झाली.

बाकी ऐसीवर लिहित्या झालात त्याबद्दल आभार! आता असेच लेखन इथे येत राहु दे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऐसी अक्षरेवर स्वागत.

बालकथा ही किती प्रभावी लिहिता येते याचा अनुभव मला इथल्या लायब्ररींधली आणि दुकांनांतली पुस्तकं पाहून गेली काही वर्षं येत आहे. एक उदाहरण देतो - माझ्या पाच वर्षाच्या मुलाने शाळेतून एक पुस्तक आणलं. त्यात एका हट्टी कबुतराची गोष्ट आहे. त्या कबुतराला झोपायचं नसतं. म्हणून ते खूप गमतीदार कारणं देतो. 'आत्ता टीव्हीवर पक्ष्यांचा कार्यक्रम आहे. इट इज एज्युकेशनल!' असं नाक वर करून सांगतं. चिडचीड करतं, मस्का लावतं, विचित्र युक्तिवाद करतं.... प्रत्येक पानावर एक एक चित्र काढून शेवटी ते कसं झोपाळतं याची वीस-पंचवीस चित्रांची गोष्ट आहे.

चार-पाच-सहा वर्षे वयोगटासाठी इतकी चांगली पुस्तकं मी लहान असताना तरी भारतात तयार होत नसत. सध्याची परिस्थिती माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'द मॉम साँग' या एका जबरदस्त गाण्याची आठवण झाली.
गायिका आणि गीतकार दोघाञ्ची शाबास !

अवान्तर : मुखपृष्ठ छानच आहे पण तो पाण्ढरा गोळा काय आहे ते कळले नाही.
चेण्डू ? चन्द्र ? फुगा ? ...पटत नाही.

घासकडवी : सई पराञ्जपे यान्नी विनिसाठी लिहीलेले 'हरवलेल्या खेळण्यांचे राज्य' (१९७०) हे छोटेखानी पुस्तक आवर्जून मिळवून वाचावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक, परत एकदा 'द मॉम साँग'ची आठवण करून दिल्याबद्द्ल आभार. तेव्हा खदखदून हसले होते ऐकल्यावर. गायिका, गीतकार आणि वाजवणारीचीही शाबास!
मुखपृष्ठावरचा पांढरा गोळा म्हणजे, पुरस्काराची उठवलेली मोहर आहे. त्याचा चित्राशी काही संबंध नाही. 'हरवलेल्या खेळण्यांचे राज्य' वाचायला हवं.

घासकडवी यांच्याशी सहमत. वाचनाची गोडी लागल्यावर 'फास्टर फेणे', 'किशोर' सारखे मासिक (त्यात भा. रा. भागवतांच्या कथा क्रमशः यायच्या, त्यांची खूप उत्सुकतेने वाट पहायचे.) असे अनेक पर्याय होते. पण मुळात वाचण्याची गोडी लागण्याकरता अशी अर्थवाही चित्रं आणि कमीत कमी शब्द असलेली, मुलांची नाळ जुळावी अशी पुस्तकं माझ्यातरी पाहण्यात आली नाहीत. सई परांजपे/शकुंतला परांजपे यांच्या लहान मुलांकरता लिहीलेल्या काही मजेदार कथा वाचल्या होत्या, त्यातली एक मांजराची कथा(शकुंतलाबाईंनी लिहीलेली) आजही लक्षात आहे. पांढरं शुभ्र मांजराचं पिल्लू चुकून कपड्यांच्या गठ्ठ्यातून धोब्याकडे दिलं जातं आणि इकडे घरातली मंडळी त्याला शोधून शोधून हवालदील होतात अशी ती गोष्ट होती.

दोन वर्षांपूर्वी मुलाने, एक 'मिस विशीवॉशी' नावाचं असच एक गमतीदार पुस्तक आणलं होतं, तेव्हा लहानपणी 'किशोर'मधे वाचलेल्या एका कवीतेची आठवण झाली. 'चेंगटमावशी धुते धुणी' अशी काहिशी ती कवीता होती. अर्थात, विशीवॉशी मात्र चेंगट नसून भारीच कामसू आहे.

डेव्हीडच्या आधी, 'स्प्लॅट द कॅट' सिरीज आमच्याकडे हीट झाली होती. त्यातलं 'स्प्लॅट गोज टु स्कूल' खूप मजेदार आहे. शाळेत जाण्याच्या कल्पनेने पहिल्या दिवशी स्प्लॅट खूप घाबरलेला आहे. तो न जाण्याचे अनेक बहाणे करून शेवटी शाळेत जातो. पहिला थरारक दिवस पार पडल्यावर शाळेबद्द्लचं त्याचं मत बदलतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"वाचण्याची गोडी लागण्याकरता अशी अर्थवाही चित्रं आणि कमीत कमी शब्द असलेली, मुलांची नाळ जुळावी अशी पुस्तकं माझ्यातरी पाहण्यात आली नाहीत..." - ह्यावर एक उत्कृष्ट सजेशन देऊ? - शेल सिल्व्हरस्टाइन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

You have not yet discovered that you have a lot to give, and that the more you give the more riches you will find in yourself.
- Anaïs Nin

लहान पोरांना टिपिकल 'बालिश' मट्रियल सोडून अंमळ वरच्या लेव्हलची पुस्तकं पचत नाहीत का? तसल्या गोष्टींसाठी कार्टून च्यानेल्स आहेतच की.

टिपिकल बालगीते इ. चा मारा ही पोरांना सानेगुर्जी क्लबात ढकलायची तयारी आहे. त्यात जरा वैविध्य अन अंमळ कमी इनोसन्स आणला तरी चालण्यासारखे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

टिपिकल बालगीते इ. चा मारा ही पोरांना सानेगुर्जी क्लबात ढकलायची तयारी आहे.

संदीप-सलील जोडीची बालगीतं मला आवडली. (त्यांची मोठ्या लोकांची गाणी अंमळ साने-गुरुजी छाप वाटतात.) आता या सुपरमॅनच्या गाण्यातही पोरांना तो फक्त मारामारी करत नाही, मारामारी करून दमतो वगैरे सांगणं मला ठीक वाटतं.

आमच्या ठाण्याच्या शेजारची पोरं ही गाणी सोडता मैना, (नवीन) पोपट, कोंबडी इ. गाणी शिकलेली होती, आहेत. या पोरांसाठी असणारी गाणी थोडी लहान-मुलांसाठीची असतील तरी तक्रार करावीशी वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हम्म ते आहे. पण द रूटिन फेअर फॉर देम जे आहे ते लैच 'सानदवणीय' चा प्रीकर्सर वाटतं. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वरील पुस्तके सानेगुर्जी क्लबाची नाहीत. तशा पुस्तकांहून जास्त दर्जेदार आहेत. बालवर्गात वाचायला शिकत असलेल्या पाच वर्षाच्या मुलाच्या द्रूष्टीने खूपच छान पुस्तके आहेत ही.
अजून एक उत्तम पुस्तक माला म्हणजे डॉ. स्यूसची पुस्तके. त्यातले पहिले पुस्तक 'द कॅट इन द हॅट' वर चित्रपटही आहे.
गेला दीडेक महिना माझा सहा वर्षांचा मुलगा त्याच्या 'लोरॅक्स' पुस्तकाने आणि चित्रपटाने नादावला होता. विशेष म्हणजे चित्रपटात रूपांतर करण्यासाठीची भर घालूनही हा चित्रपट अतिशय रंजक आणि उद्बोधक झाला आहे. 'झाडे लावा झाडे जगवा' च्या कोरड्या जाहिरातीपेक्षा कोवळ्या संस्कारक्षम मनांसाठी हे पुस्तक किती सुरेख धडा आहे. त्यातले एक गाणे 'हाउ बॅड कॅन इट बी' तर आम्हा दोघांना खूप आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम!! ऐसे असेल तर भारीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं