नामदेव ढसाळ

नामदेवाच्या विद्रोहाला शिव्या देणार्‍यांच्या भ्याड विरोधाला मी तीळमात्र भीक घालत नाही. कारण ढसाळांच्या विद्रोहात सर्व काही "क्षम्य" असते आणि आहे शिवाय कायम राहील. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे मान व भान राखावे लागते. पण आपल्या मायबोलीचाच हात धरून नेहमी आपल्यावर अत्याचार केलाय त्या अत्याचाराला वाचा फोडण्याचे जहाल क्रांतीकारक कार्य माझ्या नामदेवानं केलंय. नामदेव ढसाळ ह्या दोन प्रवृत्तीमध्ये विभागलेल्या एका वादळाचं नाव आहे. मला कवीमनाचा अंगार चेतवणाराच नामदेव आवडतो आणि तोच माहित आहे. म्हणून खाली जे काही लिहीलेले आहे ते सारे कवी नामदेव ढसाळ म्हणून आहे. त्यांच्या कवितेवर माझं निश्चितच आंधळं प्रेम आहे. ह्या प्रेमापोटीच कदाचित तु आत्ता उद्धवस्त झालेलाच बरा एवढं म्हणण्याची हिम्मत मी स्वतः दाखवू शकतो.

आज नामदेव ढसाळांचा वाढदिवस आहे. वयाने आणि त्यांच्या स्वकर्तृत्वाने ते कितीतरी मोठे आहेत. ‘द पोएट ऑफ अंडरवर्ल्ड’ म्हणून ख्याती पावलेले दादा मला नेहमी माझ्यातलेच एक वाटले. आजही सर्वसामान्यांमध्ये जेव्हा केव्हा नामदेव ढसाळांच्या कवितांचा विषय निघतो तेव्हा त्यांना आपला मोठा भाऊ, एक फ्रेंड- फिलॉसॉफर म्हणूनच आपल्या जवळचा मानतो आणि ओघाने माझा नामदेव हा नामदेव ढसाळांप्रती असलेला प्रेमळ स्वार्थी भाव तोंडातून बोहेर येतो. भारतात विद्रोही साहित्याला फार जूनी परंपरा आहे. पण त्या साहित्याला त्याचे खरे स्वरुप, सन्मान त्या साहित्याचे अधिष्ठान हे केवळ आणि केवळ नामदेव ढसाळांनीच मिळवून दिले. साजूक तूपात घोळल्या गेलेल्या, क्षणोक्षणी नाकातून अनुनासिक उच्चरवात बाहेर पडलेल्या शब्दांच्या पलीकडे जाऊन विद्रोहाच्या खर्‍या रंगाला, ढंगाला त्यातल्या हंटरबाजाला मान्यता मिळवून देण्याचे श्रेय बिनदिक्कीतपणे नामदेव ढसाळांकडेच जाते.

आज नामदेव ढसाळांना लपून छपून शिव्या देणारे, त्यांचा पोकळ कारणे देउन भ्याड विरोध करणारे हे आपआपल्या मताच्या लोकांमध्ये मतप्रदर्शन करून मोकळे होतात. पण गोलपिठा सारख्या मैलाचा दगड ठरलेल्या साहित्यकृतीच्या इंचभर उंचीची नवी निर्मिती करण्यास असमर्थ असतात. बाबासाहेबांनीच म्हटलेय, ज्याला समर्थन करता येत नाही तोच भ्याड विरोध करतो. कारण विरोध करण्यासाठी तात्विक, नैतिक आचरणासोबत नवनिर्माणाची धमक असावी लागते. तोच यथायोग्य विरोध करू शकतो. अन्य कोणी नाही.
नामदेव ढसाळांबद्दल माझे असलेले वैयक्तिक मत हे काही माझे त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आलेले नाही. किंवा मी की त्यांच्या वकिल देखील नाही. नामदेवाला आणि त्याच्या कवितेला, त्या कवितेतल्या अंगाराला, त्या अंगाराच्या धगधगीला समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला बुद्ध आणि बाबासाहेबांबरोबर डोस्टोव्हस्की, मॉक्झिम गॉर्की, अॅरिस्टॉटल, विजय तेंडूलकर, कार्ल मार्क्स, फ्रेडरिक अंजेल, संत तुकाराम, मायकोव्हस्की, शेक्सपिअर, बुकर टी वॉशिंग्टन, मार्टिन ल्युथर किंग सारख्या वैश्विक किर्तीच्या विचारवंताचा, लेखकांचा, साहित्यिकांचा आणि महामानवांचा प्रभाव आणि त्यांचे साहित्य समजून घ्यावे लागेल. नामदेव ढसाळांवर असलेली श्रद्धा ही बाबासाहेबांवर असलेल्या श्रद्धेइतकी थोर तर मुळीच नाही पण ती अंधश्रद्धा बिल्कूल नाही. माझ्या नामदेवासाठी माझे असेलेल वैयक्तिक मत हे अंतिम रुपाने हे वैचारिक मंथनातूनच आलेले आहे. एका खोल चिंतनातून आलेले आहे. आणि हो यावर कोणी आक्षेप घेउ शकत नाही.
गोलपिठामधून किंवा एकूण समग्र साहित्यातून पिडीत, शोषित, दूर्लक्षित अवहेलित समाजाची जी व्यथा नामदेव ढसाळांनी मांडली, ती इतकी अस्सल होती की त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्यास कोणीही तय्यार होणार नाही. त्यांच्या आयुष्यात ज्या विश्वात ते वावरले, तो त्यांचा मुंबईतील फॉकलंड रोडच्या वेश्यावस्तीतील भाग म्हणजे गोलपिठा.
जिथे दारू, मटका आणि रांडबाजी शिवाय कोणी जीवन जगत नाही.
जिथे कोंबडं कापावं इतक्या सहजपणे माणसे कापली जातात.
जिथे दिवस रात्री सुरू होतो.
ढसाळांच्या भाषेतच सांगायचे तर
"मनगटावरच्या चमेलीगजर्‍यात कवळया कलेजीची शिकार उरकून
शेवटच्या बसची वाट पाहणारे बाहेरख्याली लोक"
पदोपदी दिसतात.
जिथे हिजड्यांची शरीरेही भोगली जातात.
जिथे सर्व ऋतू सारखेच असतात.
"येथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच असतो
म्हणून फांदीला नुसता सांगाडाच लटकवून भागत नाही रे
इथे माण्सालाच माणूस खात असतो
आणि वाल्याच्या पाठीवरले वळ लपविले जातात रे"

अशा विश्वात, तरूण वयात आजुबाजूचे भयाण जीवन पाहून, अन्याय अत्याचार सहन करून हा एका खाटिकाचा मुलगा कविता लिहायला लागला. सोसलेले अत्त्याचार आग होऊन त्यातून बाहेर पडू लागले. लेखणी मशाल झाली, ज्यात अख्ख्या विश्वाला जाळून टाकण्याची ताकद होती. त्यामुळे तो ठणकावून म्हणतो

" जिवाचे नाव लवडा ठेवून जगणार्‍यांनी
खुशाल जगावे....
मी तसा जगणार नाही "

या विश्वात वावरूनही ढसाळांच्या जाणीवा बोथट झाल्या नाहीत. त्या दिवसेंदिवस धारदार होत गेल्या. त्या अगतिक झाल्या नाहीत, ज्वलंत झाल्या.

"मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला
शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो
इव्हन मी आईबापांनादेखील शिव्या देतो
बांबलीच्यानो इथे जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात
आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलेत"

या कवितेत शोषणव्यवस्थेला सुरूंग लावण्याची धमक आहे. ती बेधडकपणे सांगते की

"तुमच्या गांडीचे कानवले कुरतडलेत ज्यांनी
त्यांच्या नाशासाठी मी पिकू घातलेय आढी"

हा दिलासा, हे आश्वासन ही कविता देते. त्यामुळे ती जवळची वाटते. स्वत:च्या वेदनेत इतरांना सामावून घेण्याची जबरदस्त ताकद या कवितेत आहे.

"शेटसावकारांची आय झवून टाकावी
नात्यागोत्याचा केसाने गळा कापावा
जेवणातून विष घालावे मूठ मारावी
रांडवाडे वाढवावेत: भाडखाव व्हावे"

पण ती पुढे म्हणते -

" नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही गुलाम करून लुटू नये
नाती न मानण्याचा, आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करु नये
आभाळाला आजोबा अन जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत
गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे
चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे"

इथे ही कविता विश्वात्मक होते. शेटसावकारांची ' आय झवण्याची' भाषा करणारे ढसाळ मला इथे आभाळासारखे वाटतात. इथे ढसाळ एका जाती पुरते मर्यादित रहात नाहीत, एका धर्मापुरते मर्यादित रहात नाहीत, एका राज्यापुरते, एका भाषेपुरते मर्यादित रहात नाहीत, एका देशापुरते मर्यादित रहात नाहीत तर जगात ज्या ज्या माणसाचे शोषण झाले आहे, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, देशाचा असो त्याचे होऊन जातात.

त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. लहानपणापासून ते तारुण्याच्या उंबरठ्यावप पाउल पडेस्तोवर बेदर्दी हंगाम सोसलेल्यांना, हमनदस्ती पाटाळात, चान्या चिन्यूल्या, डिलबोळ, पावशेर डालडा झोकणार्‍यांच्या जगातल्या तरुणाला त्या भावल्या नाही तर नवलच. पिढ्यानपिढ्या क्षयरोगानं मरणारा बाप, राजेश खन्नाच्या पोस्टर कडे पाहत नाकाला झोंबणार्‍या स्वस्त अत्तराच्या दर्पात आयुष्याला रंगीत बनवण्याची स्वप्न पाहणार्‍या तरुणांना त्यांची गुलामगिरी जाणवून देउन एका महाप्रतिभावंतांची नवी क्रांतिकारी ओळख दिली तर त्यात चुकले कुठे ? नामदेवाच्या साहित्यातून ह्या सार्‍या घटना आणि त्याअनुषंगाने भळभळणार्‍या जखमा इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते. तिला तिच्या अस्सल रूपात वहायला मिळते म्हणून ती प्रामाणिक वाटते आणि ती सच्ची असते म्हणून काळजाला भिडते. —

लेखक : वैभव

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

या लेखकाचा परिचय करून घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वैभव यांनाही ऐसी अक्षरेवर बोलवाल का? लेखकाशी प्रत्यक्ष संवाद महत्त्वाचा वाटतो.

प्रेरणा/संदर्भ म्हणून या धाग्याचा उल्लेख अस्थानी ठरू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रेरणा, संदर्भ की आणखी काही? की हे दोन्ही लेखक एकच, की प्रेरणा, संदर्भ म्हणताहात तो लेख प्रस्तुत लेखानंतरचा? अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नामदेव ढसाळ हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय, गोलपिठ वाचून बरिच वर्ष झाली, पण त्यातल्या कविता अजुनही थोड्याफार लक्षात आहेत.
त्यांची आई ही कविता माझ्या आवडत्या कवितांपैकी आहे,

आई गेली याचं दुःख नाही
प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते
दुःख याचं आहे,
की अज्ञानाच्या घोषा आत
तिने आयुष्याच्या वाटाघाटी केल्या
गाव सोडताना ती तिथेच ठेऊन आली
मरीआईचा गाडा
विस्थापित होऊन बाप आगोदरच
धडकला होता शहरात
आई शहरात आली देहाचं झाडवान घेऊन
कष्ट, खस्ता उपसल्या भोगल्या तिने
तरीही तिचा अद्भुताचा शोध चालूच होता
तिच्या देहातली वाद्य अशी झंकारत रहायची
बाप तसा खाटीकखान्यातला कसाईच होता
प्रत्येक रात्री जनावरांचे सोललेले देह वहायचा
रक्तबंबाळ व्हायचा
चिक्कार पाहिलं भोगलं आईनेही
शहरातही तिने तवली मध्ये अन्न शिजवलं
पैठणीचे रंग न्याहाळता न्याहाळता
जुनेराला ठिगळ लावलं
बापाआधी मरून तिने असं अहेवपण जिंकलं
बाप अजूनही खुरडत खुरडत मरणाची वाट पाहतो आहे
आई आगोदर बाप मेला असता,
तरी मला त्याचं काही वाटलं नसतं
दुःख याचं आहे,
तोही तिच्या करारात सामील होता
दोघांनीही दारिद्र्याचे पाय झाकले
लक्ष्मी पूजनाला दारिद्र्य पूजलं
प्रत्येक दिवाळी ही माझ्यासाठी अशी एक एक पणती विझवत गेली
स्वतःच्या छोट्या विश्वाचा उलगडा झाला नाही आईला
आभाळाकडे हात करून ती म्हणायची,
त्याच्याशिवाय साधं झाडाचं पानही हलत नाही...
आईच्या नातवाला पृथ्वीचा आकार तरी कळला आहे...
विजा का चमकतात? पाउस का पडतो?
तो सांगू पहायचा आजीला,
माझ्या येडपटा,
म्हणत ती त्याच्या पाठीत धपाटा टाकायची
बाबा नियंत्याची अशी चेष्टा करू नये म्हणायची,
तिला हे जग, गैबान्याची शाळा वाटायची
ती म्हणायची,
पृथ्वी म्हणजे त्याने अंथरलेली लांब चादर आहे
तिला आदी नाही अंत नाही...
उन - सावली सर्व त्याच्या इच्छेचाच खेळ म्हणायची
आई मेली याचं दुःख नाही
प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तुत लेखातला ९० टक्के भाग अन्य ठिकाणाहून आलेला आहे. त्याचे लेखक नक्की कोण ? त्याचा स्रोत कुठला ? ते नीट सांगायला हवं. दुसर्‍या लिंकमधे "धोंडोपंत" नावाने तो लेख आलेला आहे. वैभव नि धोंडोपंत एकच का ?

दुसरं असं की, जरी "वैभव" या नावाने श्रेय दिलेलं असलं तरी जसाच्या तसा लेख इथे चिटकवू नये.

वाघमारे यांचं स्वतःचं लिखाण विशेष उल्लेखनीय आहे. माझ्या सुचवणीमागच्या भावना ते समजून घेतील अशी अपेक्षा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

त्यांनी ह्यापुढे इथे लिखाण करणार नाही असे ठरवलेले असल्याने, ते कॉपी पेस्टची मदत घेत आहेत.

असो..

सदर लेखकाविषयी अधिक माहिती, ह्या लिखाणामागचे त्यांचे स्वतःचे विचार, प्रेरणा इ. इ. जाणून घ्यायची इच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

मलाही हाच प्रश्न पडला आहे. हे वैभव नेमके कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

गोलपिठा वाचून बरेच दिवस झाले.

इथे ही कविता विश्वात्मक होते.

माझ्यामते इथे ती भयंकर छद्मी आणि सारकॅस्टिक होते. आधीच्या भागात जी मानवतेची आई घालण्याची वर्णनं केलेली आहे, तसलं काहीही न करणारांनी खुशाल असल्या उदात्त वगैरे गोष्टी कराव्यात असं ते म्हणतात. ख्रिस्ताने ज्याप्रमाणे 'ज्यांनी कधी पाप केलं नसेल त्याने पहिला दगड टाकावा' म्हटलं तसं. थोडक्यात, सगळेच बरबटलेले आहेत.
____
आम्ही शाळेत होतो तेव्हा इतिहासाचा अभ्यास करताना जेव्हा पहिल्यांदा जहाल पक्ष आणि मवाळ पक्ष असे शब्द ऐकले तेव्हा आपोआपच ओढा जहालांकडे गेला. कारण मवाळ म्हणजे काहीतरी पुचाट हे त्या शब्दातूनच आपोआप यायचं. आपल्या अन्यायाला वाचा फोडायची तर ती मवाळ मार्गाने होऊच शकत नाही हा त्यावेळचा विश्वास अजूनही पूर्णपणे लयाला गेलेला नाही. विद्रोहाला वाट देणारी भाषा ही झोपलेल्या सणसणीत शिवीसकट तोंडावर गार पाणी ओतल्यासारखीच हवी हे वाटणं समजू शकतोच. आणि ती त्याच संदर्भात, त्याच गरजेतून बघायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखाचा काही भाग (ज्यामध्ये -"साजूक तूपात घोळल्या गेलेल्या, क्षणोक्षणी नाकातून अनुनासिक उच्चरवात बाहेर पडलेल्या शब्दांच्या पलीकडे जाऊन विद्रोहाच्या खर्‍या रंगाला, ढंगाला त्यातल्या हंटरबाजाला मान्यता मिळवून देण्याचे श्रेय बिनदिक्कीतपणे नामदेव ढसाळांकडेच जाते."- हे आक्षेपार्ह जातीसूचक वाक्य आहे) तो भाग केवळ स्वतः वैभव भालेराव यांनी लिहिला असावा. अन्यथा भालेराव यांनी 'सम्यक समीक्षा' या आपल्या ब्लॉगवर; श्री. धोंडोपंत आपटे (जे स्वतः एक गझलकारही आहेत) यांचा पुन्हा एकदा गोलपिठा हा लेख 'जसाच्या तसा' चोरून चिकटवलेला आहे. ही कसली 'सम्यक समीक्षा'? ही तर 'शर्विलक समीक्षा'!

हा नामदेव ढसाळांच्या भाषेची भलावण करणारा लेख मुळात एका साजूक तूपात घोळल्या गेलेल्या, क्षणोक्षणी नाकातून अनुनासिक उच्चारवात बोलणार्‍या 'कोकणस्थ ब्राह्मणाने' लिहिलेला आहे हे लक्षात घ्यावे. म्हणजे त्यांच्या 'खर्‍या विद्रोही भाषेला केवळ दलितच समजून घेऊ शकतात' या आक्षेपास तिलांजली मिळेल. (हा एक वाक्प्रचार म्हणून घ्यावा.)

मी असे म्हणतो की या निमित्ताने पुन्हा एकदा 'आशिस नंदी' प्रकार सामोरा आला आहे. ज्या दलित विद्रोही भाषेस एका उच्चजातीयाने नावाजावे, त्याच्याच जातीला इतर दलित लेखकांनी त्याचाच लेख वापरून तुडवावे यापरते दुर्दैव ते कोणते? अशाने दलित चळवळीस अनेक उच्चजातीयांचा पाठिंबा हा स्वतःच्या पायावर मारलेला धोंडा ठरत आहे असे त्या जातींमधील इतर लोक म्हणू शकतात.

सतीश वाघमारे यांनी कृपया नोंद घ्यावी आणि त्यांच्या प्रभावळीतील इतर दलित चळवळीच्या कार्यकर्त्यांना ही बाब समजावून सांगावी.

(शिवाय, ढसाळांच्या गोलपिठ्याला (काव्यसंग्रहाला)खरी सम्यक समीक्षात्मक प्रस्तावना देऊन त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणणारे विजय तेंडुलकर हे अगदीच सानुनासिक-तुपाच्या धारेत न्हायलेले नसले तरी दलितांच्या मानाने उच्चजातीयच होते हेही लक्षात घ्यायला हवे. ढसाळ महारांपैकी आहेत याचा लेखी उल्लेख त्यांनी गोलपिठ्याच्या प्रस्तावनेत बिनदिक्कत केला आहे. त्यावर ढसाळांनी अ‍ॅट्रॉसिटी लावली नाही हेही आजच्या दलित कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे.जिथेतिथे ब्राह्मणांवर टीका करणे सोडा आणि स्वतःच्या पायाखाली काय जळत आहे त्याकडे लक्ष द्या. विचारांच्या बाबतीत दलित चळवळ आता भलतीच भरकटत चालली आहे असे वाटते. .)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गलिच्छ वास्तवाविषयी लिहीणं आणि वास्तवाविषयी गलिच्छ लिहीणं यात फरक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या कवितेतल्या अंगाराला, त्या अंगाराच्या धगधगीला समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला बुद्ध आणि बाबासाहेबांबरोबर डोस्टोव्हस्की, मॉक्झिम गॉर्की, अॅरिस्टॉटल, विजय तेंडूलकर, कार्ल मार्क्स, फ्रेडरिक अंजेल, संत तुकाराम, मायकोव्हस्की, शेक्सपिअर, बुकर टी वॉशिंग्टन, मार्टिन ल्युथर किंग सारख्या वैश्विक किर्तीच्या विचारवंताचा, लेखकांचा, साहित्यिकांचा आणि महामानवांचा प्रभाव आणि त्यांचे साहित्य समजून घ्यावे लागेल.

-हे वाक्य इतके घिसेपिटे, प्रचारकी थाटाचे आहे की हसून हसून पुरेवाट झाली. तिथे काही आपल्या आवाक्याच्या बाहेरचे वाटले तिथे असे काही तरी मोठे मोठे शब्द फेकायचे वाचकांच्यावर?

बा लेखक महाशयांनु, (वैभव?)
१. या सर्वांना एकाच माळेत कसे ओवता येईल? ते जरा स्पष्ट करावे.
२. या सर्वांचे लेखन तुम्ही स्वत: तरी समजून घेतले आहे काय? का उगाच इथूनतिथून नावांचीही उचलेगिरी चालली आहे?
३. समजले असल्यास आम्हालाही आपल्या ज्ञानाचा लाभ करून द्यावा ही विनंती.
४. गॉर्की-मार्क्स-अँजल यांचा शेक्सपियर-संत तुकाराम यांच्याशी काय संबंध?
५. इतक्यांना एका माळेत ओवले ते ओवले, मग संत ज्ञानेश्वर -संत एकनाथांनी काय घोडे मारले होते तेही एकदा स्पष्ट होऊन जाऊ दे!
६. बरे, ज्ञानेश्वर-एकनाथ जाऊ देत (ते जन्माने सानुनासिक नसले तरी तूप ओरपणारे ब्राह्मण होते म्हणून आपण त्यांना सुट्टी देऊ) पण छ. शाहू महाराज - म. ज्योतिराव फुले यांना विसरून कसे चालेल? अशाने दलित चळवळीचे केवढे नुकसान होईल? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिअवांतरः हा मायकोव्हस्की कोण बरे? नेहमीच्या लोकांत नाव कधी ऐकलेच नाही या महाशयांचे. बाकीची नावे रिलेव्हंट असोत किंवा नसोत, कुठल्या तरी संदर्भात बघायची सवय तरी आहे.

(अज्ञानी) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मायाकोव्ह्स्की हा एक चांगल्यापैकी प्रसिद्ध रशियन कवी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माहितीकरिता धन्यवाद. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मायकोव्हस्की बद्द्ल आणखी थोडे -

मायकोव्हस्की यान्च्या एका मजेदार कविता संग्रहाचा अनुवाद सदानंद रेग्यांनी केलाय - प्यांट घातलेला ढग नावाने. दुर्दैवाने अर्थातच तो आता मिळत नाही. शिवाय मायकोव्हस्की विषयक त्याच्या प्रेयसीच्या काही आठवणी रंगनाथ पठारे यांनी अनुवादित केल्यात - कवीचे अखेरचे दिवस या नावाने. हा संग्रह निरागस इरेन्दिरा आणि कवीचे अखेरचे दिवस ह्या नावाने शब्दालय प्रकाशनाने काढलाय, तो सहज मिळावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसूनानांनी शोधून काढलेला दुवा वाचला. एकदा आपण विद्रोह मान्य केला कि त्यातील अंगीभूत राग द्वेष या भावनाही समजावून घेतल्या पाहिजेत. 'खर्‍या विद्रोही भाषेला केवळ दलितच समजून घेऊ शकतात' या मुद्याला तिलांजली मिळेल असे वाटत नाही.त्याचे कारण 'ज्याच जळत त्याला कळत' हा मुद्दा होय.

ढसाळ महारांपैकी आहेत याचा लेखी उल्लेख त्यांनी गोलपिठ्याच्या प्रस्तावनेत बिनदिक्कत केला आहे. त्यावर ढसाळांनी अ‍ॅट्रॉसिटी लावली नाही हेही आजच्या दलित कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे

मला वाटते या ठिकाणी ही प्रस्तावना विजय तेंडुलकरांनी लिहिली आहे हे त्यांनी लक्षात घेतले आहे.
सानुनासिकतेचा उल्लेख विद्रोहातूनच आलेला आहे. आम्हाला मटनाचा झणझणीत रस्सा हवा आहे हे सांगताना वरण भात तुम्प असल्या मिळमिळत अन्नाचा धिक्कार / द्वेष ही भावना असते. विद्रोहाची गरज संपल्यानंतर त्यातील काही जणांची वाटचाल विवेकाकडे होते.काही कालावधी जावा लागतो. काहींच्या बाबत विद्रोहाची गरज ही त्यांच्या बरोबरच संपते. काही चलाख राजकारणी मात्र लोकांना विद्रोहाच्या आगीत सतत तेवत ठेउन त्या प्रकाशात आपली वाटचाल सुकर करतात. असो या गोष्टी कालौघात घडतच राहणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

तुम्प, मटान आणि बडेका बरबाट हे तीन विचारप्रवाह आहेत हे माहितच आहे.

चारुता सागरांच्या एका (नाव विसरलो, पाहून सांगतो) कथेत बाबासाहेबांनी आपल्या बांधवांस 'जनावरांची प्रेते'(केसु,ज्याचे जळले त्याला कळेलच! ;)) खाण्यास केलेल्या बंदीचा मार्मिक आणि हृद्य उल्लेख आहे.

पण आंबेडकरांपूर्वी रेडकाची चरबी खाणार्‍यांनी फक्त त्याच म्हशीच्या दुधाचे तुम्प खाणार्‍यांवर सतत टीका करावी आणि खापललेल्या बकर्‍यांकडे मात्र दुर्लक्ष करावे हाच काही चलाख राजकारणी लोकांचा डाव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे लिहिणे बंद करण्याची धमकी देणारे अजुन दुसर्‍यांचे लिखाण कॉपी पेस्ट करुन टाकतातच आहेत.

काय झाले प्राध्यापक तुमच्या "इथे" लिहिणे बंद करण्याच्या आवेशाचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुराधा ट्रोलच्या पेकाटात आक्रमक वैचारिक लाथा हाणून सहज त्रास न होता राहता येते हे इथल्या काही सन्मानणीय सदस्यांनी पटवून दिलेले पटले. त्यामुळे निवांत इथे राहणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नामदेवाला आणि त्याच्या कवितेला, त्या कवितेतल्या अंगाराला, त्या अंगाराच्या धगधगीला समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला बुद्ध आणि बाबासाहेबांबरोबर डोस्टोव्हस्की, मॉक्झिम गॉर्की, अॅरिस्टॉटल, विजय तेंडूलकर, कार्ल मार्क्स, फ्रेडरिक अंजेल, संत तुकाराम, मायकोव्हस्की, शेक्सपिअर, बुकर टी वॉशिंग्टन, मार्टिन ल्युथर किंग सारख्या वैश्विक किर्तीच्या विचारवंताचा, लेखकांचा, साहित्यिकांचा आणि महामानवांचा प्रभाव आणि त्यांचे साहित्य समजून घ्यावे लागेल.

हे अतिशय बालिश आहे. कोणाची तुलना कोणाशी करतो आहोत ह्याचा सुद्धा विवेक राहिलेला नाहिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसर्‍यांचे लेख ( जरी त्या लेखकाचे नाव दिले असले तरी ) इथे टाकण्याला काय अर्थ आहे.
तुम्ही स्वता काही लिहावे अशी अपेक्षा आहे. नाहितर नुस्ती लिंक दिलित तरी पुरे आहे. ज्यांना वाचायचे ते तिथे जाउन वाचतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारसा वाचनवेडा नसलो तरी मूळ कविता फार मागे वाचलेली आहे. कुणाला तरी स्वतःला होणारा ज्बरदस्त त्रास मांडायचा आहे, इतकं नक्कीच त्यातून समजलं.
काही प्रतिसाद खरच जबराट आहेत. कुणाचे डिट्टेलवार तर कुणाचे थोडाक्यात एक्-दोन वाक्यात काही बोलणारे.
इतकं सगळं वाचायची संधी दिल्याबद्दल धोंडोपंत, वैभव आणि वाघमारे ह्या सर्वांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ब्राह्मण समाजाने आजचा पुरोगामी सोडून सगळीकडे सगळ्या क्षेत्रात फक्त भलच केलं आहे काहो ? चर्चा तुम्ही ब्राहमण्य दुखावण्यावर आणली ते. आपण एक विचित्र वैचारिक खेळ खेळू या का ? तुम्ही जुन्या ब्राह्मण समाजाच्या चार चांगल्या गोष्टी सांगा मी लगेच चार वाईट सांगतो. बघू या कोण दमतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही जुन्या ब्राह्मण समाजाच्या चार चांगल्या गोष्टी सांगा मी लगेच चार वाईट सांगतो. बघू या कोण दमतं.

मला तुमच्या विनयशिल स्वभावाचे खरंच कौतुक वाटते आहे.

अहो, चार काय, चाळीस गोष्टी सांगू शकाल तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

आपल्या कौतुकाच्या भावनेनं मी भारावून गेलो ! आभार Smile हकनाकच मी आपल्यावर दृष्टीदोषाचे आरोप करीत गेलो. Smile Smile :-)जियो भाई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

९०च्या दशकात ढसाळ शिवसेनेच्या कळपात गेले तेव्हा ते ढासळले असे म्हणेन्.ब्राम्हण हरामखोर-ठीक आहे. शेट सावकार्-हरामखोर्-ठीक.
ढसाळांच्याच भाषेत सांगायचे तर हे म्हणतात्-नुसत्या शिव्यांच्या कविता काय करतोस्?**त दम असेल तर बदल घडवून दाखव.
(ढसाळांच्या कविता वाचणारी) रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"शेटसावकारांची आय झवून टाकावी
नात्यागोत्याचा केसाने गळा कापावा
:

:

पण ती पुढे म्हणते -

" नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही गुलाम करून लुटू नये
नाती न मानण्याचा, आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करु नये
आभाळाला आजोबा अन जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत
गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे
चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे"

इथे ही कविता विश्वात्मक होते.
वाह!!!
वेदनेतून विश्वात्मक होणे या प्रवासाला त्रिवार सलाम!!!

यामुळेच काव्य अमर होत, वेदना हळू हळू कमी होतायेत, होत राहतील म्हणून काव्य पण कंटाळवाण वाटायची शक्यता निर्माण होते पण विश्वात्मक वृत्ती मुळे ही शक्यता नाहीशी होते.

जो जे वांछील … भवतु सब्ब मंगलम … सबको सन्मती दे भगवान … विश्वात्मक वृत्तीच ना !!!

नामदेव ढसाळांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नामदेव ढसाळांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पहील्यांदा या कवीबद्दल मिपावर ऐकले होते - http://www.misalpav.com/node/376
अन वाचून फक्त हादरले होते.
हा लेखही तसाच अन तरीही/म्हणून वाचनखूण साठवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...