'चिरकाळोख'

'चिरकाळोख'

ही वेळ जिवाला ऐशी
ओलांडूनी मागे जाई
तिमिराच्या रक्तधुळीने
बावरते सौम्य निळाई

हे पक्षी विनियोगांचे
कोणास्तव गाती गाणी
कोणाच्या भयमोहाने
मेघांना फुटते पाणी

ताऱ्यांच्या ताणामधुनी
हे विश्व तारतो कोणी
नादाने जोगवणारी
वाऱ्याची दुखवे वाणी

अंधार सोबतीसाठी
डोळ्यांतून उजळे पारा
हृदयातून स्त्रवती पुन्हा
नित आवेगाने धारा

निबिड अरण्यामागे
वसलेले तान्हे गाव
घराघरांतून दिसतो
चिरकाळोखाचा भाव

काजळल्या वाटांवरती
अडखळते प्रकाशरेषा
शब्दार्थ शोषता होते
शोकाची गहिरी भाषा

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

... तुझ्या अवस्था, संवेदना, भावना व्यक्त होण्यासाठी तुझी स्वतःची अक्षरे, प्रतिमासृष्टी तुला लवकरात लवकर सापडो, ही मनःपूर्वक शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक,

अत्यंत हुरुप देऊन जाणार्‍या तुझ्या स्वतःच्या अक्षरांनी सजलेल्या आणि आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल अत्यंत आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अमेय मित्रा

अगदी शीर्षकापासून कविता खूप खूप आवडली.

चिरकाळोख हे एक अनोखे पण या कवितेचे समर्पक असे शीर्षक आहे.
पहिल्या कडव्यापासूनच या कवितेचे सौंदर्य खुलत जाते.

जसे

तिमिराच्या रक्तधुळीने
बावरते सौम्य निळाई

अप्रतिम ओळी आहेत या

तसेच

कोणाच्या भयमोहाने
मेघांना फुटते पाणी

हृदयातून स्त्रवती पुन्हा
नित आवेगाने धारा

घराघरांतून दिसतो
चिरकाळोखाचा भाव

शब्दार्थ शोषता होते
शोकाची गहिरी भाषा

शब्दवैभवाने सजलेली व त्याहीपेक्षा गहिर्‍या आशयाने ओथंबलेली अशी ही कविता आहे.
मनापासून आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता तर चांगली आहेच, शिवाय तुमच्या काव्यांत गेयताही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कवितासुद्धा आवडली.

तिमिराच्या रक्तधुळीने
बावरते सौम्य निळाई

वा!!
____
आपल्या अधिक कविता वाचायला मिळोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घराघरांतून दिसतो
चिरकाळोखाचा भाव
शब्दार्थ शोषता होते
शोकाची गहिरी भाषा

आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही वेळ जिवाला ऐशी
ओलांडूनी मागे जाई

आपल्या कल्पनेचे धागे अतिशय लांब आणि सुंदर आहेत...कविता आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0