सुहाना सफर और मै हंसी ; ))

धगधगत्या सूर्यचुलीवर हुगळी नदीच्या पाण्यात कलकत्त्याला माणसं उकडायला घातली होती. आम्ही गीतांजलीची वाट पहात हावड्याला वाफा आणि धापा टाकत होतो. शेवटी एकदाचे दीड वाजता गाडीत शिरलो. गाडी सुटेपर्यंत एसी सुरु होईना तरी घराकडे निघाल्याने शीतल उल्हासाचे चांदणे पडले होते. एक सावळा, स्मार्ट, पंचविशीतला मुलगा लगेच माझा मित्र झाला. आम्ही मस्त गप्पा मारू लागलो. इतक्यात काही धटिंग मारवाडी शिरले. ते एकमेकांना टाकून बोलण्याची पराकाष्ठा करू लागले. ते अधूनमधून दुसऱ्या डब्यातल्या नातेवाइकान्ना आपल्या उर्मट सान्निध्याचा निकट लाभ द्यायला जायचे मग आम्हाला शांततेचा आणि सुसंगतीचा लाभ घेता यायचा. त्यातल्या एका सांडाने आपली कळकट्ट कपड्यांनी भरलेली बेग उघडून त्यातून मळकट्ट कपडे बाहेर काढले आणि तो आंघोळीला गेला. तिथे शॉवर नव्हता म्हणजे त्याने संडासच्या टमरेलाने अभंग्यस्नान उरकले असावे! ओह माय God!! स्वच्छतेचा (!) महामेरू होता तो सांड!

मग तो आला आणि निर्लज्जपणे आपली चड्डी-बनियान त्या मुलाच्या सामानावर वाळत टाकू लागला. मुलगा चिडून मना करू लागला. मग त्याने सीटवर पाठीशी वाळत टाकले आणि ते पुन्हा नाहीसे झाले. मग मी, अमोल, तो मुलगा आणि टीसी हसू लागलो. त्याला म्हटलं, "अरे नशीब त्याने दोर्‍या बांधून कपडे वाळत टाकले नाहीत." मी खिडकीशी बसून होते. शेजारीच ते भीषण कपडे वाळत होते. इतक्यात चड्डी खाली पडली मग आम्ही खूप हसलो. नवरा म्हणे, "दे ती इकडे मी दुसरीकडे वाळत टाकतो." मी म्हटलं "ईईईईईईई मी नाही हात लावणार फेकून दे बाहेर ..."

टीसी आणि तो मुलगा खदखदून हसू लागले ...

नवरा म्हणे, "ही चड्डी बनियान टोळी तुझ्या मागे का लागलीये??"

तेरा पिच्छा ना मै छोडूंगा सोणीये
भेज दे चाहे जेलमे
चड्डी के इस खेलमे...

-----

कलकत्त्याच्या सियालदा स्टेशनवरून न्यू अलिपुरद्वार स्टेशनला जायला तिस्ता तोरसा एक्स्प्रेस हि गाडी आहे. दुपारी १.४० ला सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.१५ ला पोचते .एसी गाडीत दुपारी थोडावेळ शांतपणे झोप काढूया म्हणजे फ्रेश वाटेल मग आरामात पुस्तक वाचू आणि निसर्गशोभा पाहू अश्या साध्याश्या गोड अपेक्षेने मी गाडीत चढले होते. एसी कंपार्टमेंटमध्ये पॅट्री कारवाले सोडले तर इतर फेरीवाले लोकं घुसत नाहीत. क्वचित काही स्टेशनवर चहा कॉफीवाले चढतात. पण या गाडीत जो कुंभमेळा भरला होता त्यामुळे मी भयचकित झाले. भेळवाले, चनाजोरवाले, शेवचिवडावाले यांना एसी डबा आंदण मिळाला होता. अधून मधून काकडीवाला, चहावाला घुसखोरी करायचे. जीवनात विविधता नसेल तर ते अगदी निरस होते म्हणून थोडा चेंज व्हायला लिंबू चहावाला एक लाडिक फेरी मारायचा. प्रवास गोड व्हावा म्हणून एक रसगुल्लावालासुद्धा अल्युमिनियमचे मोठ्ठे पातेले घेऊन डब्याला चार चांद लावत होता. जोडीला तिथले सुप्रसिद्ध मिष्टी दही नसेल तर काय, सगळेच मुसळ केरात. समोसावाला, चिप्स, बिस्किटे, चॉकलेटे विक्रेते डब्याच्या खमंगपणात स्वतःच्या सिंथेटिक कपड्यांच्या घामट, कुबट वासासह अवर्णनीय भर घालत होते. नॉनव्हेजवाल्यांची अडचण होऊ नये म्हणून गरमागरम उकडलेली अंडी सुद्धा हजर होती.

तुमच्या मायपेक्षा रेल्वे मावशी गाडीत तुमच्या पोटोबाची भरपेट छप्पनभोग सेवा करते. आधी पोटोबा मग विठोबा!! नुसते खात पीत राहून कसे चालेल? काही खरेदी वगैरे कराल की नाही?? आंऽऽ??

पुस्तके, पेपर विक्रेते तर काय सगळीकडेच असतात तसे ते इथेही होतेच. मग वेगळे काय होते ??

टॉवेल पासून सुरुवात करू या का? भडक, हातमागाचे टॉवेल विक्रेता आला. त्यानंतर हातमागाच्या सुती, जरीच्या साड्यावाला आला. ट्रेनमध्ये साड्या कोण घेत असेल या प्रश्नाचा भुंगा माझा मेंदू कुरतडू लागला. असंख्य इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेता आला. तो मला ८ जीबी आणि १६ जीबीचि पेनड्राईव्ह तरी घ्याच म्हणून मागे लागला. आता मी आश्चर्याच्या पलीकडे गेले होते. कीचेन, रुमाल अशा फुटकळ वस्तू काय कुणीही कुठेही विकतातच नाही का? वेडे कुठले! काही कळत नाही तुम्हाला.

सगळ्यात कहर झाला तो लेडीज पँटीज विकायला आलेला माणूस त्या चड्ड्या सगळ्यांपुढे नाचवू लागला तर माझ्या डोळ्यापुढे काजवे चमकू लागले .नवर्‍याला म्हटले, "ट्रेनमध्ये बायकांच्या चड्ड्या कोण घेत असेल बे??" तो म्हणे, "सगळ्या बायका तुझ्यासारख्या बाहेरख्याली (!)नसतात त्यांचे नवरे त्यांच्यासाठी गिफ्ट म्हणून चड्ड्या नेत असतील!"

माझ्या विस्मरणशक्तीमुळे काही विक्रेते सुटले असण्याची शक्यता आहे. तर हि अशी फेरीविक्रेत्यांची पंढरी तिस्ता तोरसा एक्स्प्रेस.

मग करताय ना बुकिंग या गाडीचे तात्काळ?

---

भूतानयात्रा संपवून अत्यानंदात कलकत्त्याला जाण्यासाठी पुन्हा तिस्ता तोरसा एक्स्प्रेस मध्ये चढलो. माझ्या मुखचंद्रावर अवर्णनीय आनंद ओसंडून वहात होता कारण आता फक्त आगगाडीचा प्रवास शिल्लक होता दोन दिवस .

आमच्या कंपार्टमेंटमध्ये एक गोरापान, नाकेला, टकल्या आणि टप्पोर्‍या डोळ्यांचा बंगाली इंजिनिअर चढला. त्याचा असिस्टंट काळाकभिन्न दैत्य होता पण त्याच्या चेहेर्‍यावर प्रेमभावना उतू जात होती. मी खिडकीला टेकून पाय पसरून मजेत बसले होते. तर कभिन्न माझ्या चरणकमलांशी बसून आरामसे सो जाव असा आग्रह करू लागला .

मी पाय आखडून झोपायचा प्रयत्न करू लागले तर तो म्हणे अजून पाय सरळ करा काही हरकत नाही. मी हसू दाबायचा आटोकाट प्रयत्न करू लागले. कभिन्नचि प्रेमभावना पाहता तो लवकरच माझे चरणकमल आपल्या मांडीवर घेऊन चेपायला सुरूवात करेल असे वाटत होते. किंवा पाकिजा सिनेमातला प्रसिद्ध डायलॉग "आप के पाव बहुत हसीन है, इन्हे जमीन पर मत रखिये। मैले हो जायेंगे।" असे म्हणेल अशीही शंका येऊन मी पुन्हा एकदा माझी पावले पाहिली ती एज युज्वल ओबडधोबडच होती. माझा जीव भांड्यात पडला.

नंतरच्या स्टेशनवर एक चतुर स्त्री नवर्‍यासह आली. खिडकीसमोर मी आणि टकलू आमने सामने त्याच्या बाजूला कभिन्न आणि माझा नवरा आणि माझ्या शेजारी चतुर स्त्री अन तिचा नवरा असे बसलो होतो .कभिन्न माझ्या नवर्‍याला मोबाईलवर गाणी ऐकवायचा आग्रह धरे. ते दोघे संगीताच्या दुनियेत बुडून गेले होते.

टकल्याने सोबत झाडे घेतल्याने माझे कुतूहल जागृत झाले. (त्याला झाडातले काहीच कळत नव्हते. बायकोच्या लिस्ट प्रमाणे आणली होती.) कसली झाडे आहेत अशी चौकशी करायचीच देरी होती त्याने बडबड सुरू केली. लगेच माझ्यावर ताबा घेत मला इतरांशी बोलू देईना. माझ्याकडे एकटक पहायचा विक्रम नोंदवू लागला. माझ्या डोळ्यात डोळे घालून त्याच्या मराठी नातेवाईक बाईचे गुणगान करू लागला. ".आप जैसा बात करती है वैसाही वो
हमारे साथ बात करती है।" म्हणे. "वो हमसे बहुत प्यार करती है।" असे डोळ्यात आणखी खोल शिरत म्हणे (???) म्हणताना त्याने स्वतःची छाती दोन्ही हातांनी ठोकली मी इतकी दचकले. मला निसर्गशोभासुद्धा निवांत बघू देईना. कुठलीही झाडे दाखवत म्हणे अननसाची आहेत. चतुर स्त्री हळूच म्हणायची "अननसाची नाहीत".

मग एका स्टेशनवर त्याला कुणी आणखी एक झाड दिले अन पाण्याची(!) बाटली दिली. तो आणि कभिन्न मुरमुरे, शेव असे खात पाणी पीत बडबड करू लागले. कभिन्न सगळ्यांना आग्रहाने खाऊ घालू लागला. मी नाही म्हणायचा क्षीण प्रयत्न केला पण तो हिरीरीने हात धरू धरू खाऊ घालत होता. टकलू मात्र माझ्यावर संपूर्ण केंद्रित होता. मला हळूच काजू देत होता हात धरून. मला हसू येऊ लागले. मी त्यांनी पुन्हा हात धरू नये म्हणून चुपचाप ते पदार्थ खाऊ लागले. एक विशिष्ट वास दरवळत होता. प्रवासातला आनंद तुझ्यासारख्या सहप्रवाश्यांवर अवलंबून आहे असे टकलू व्याकूळ कटाक्ष टाकून म्हणे. तो आता पुढे काय बरळेल अशी मला धास्ती वाटू लागली.

मला आता तो सगळा प्रकार असह्य होऊ लागला. इतक्यात ते दोघे सिगारेट प्यायला बाहेर गेले आणि माझ्याबाजूच्या चतुर बाईने बाटलीकडे बोट दाखवून विशिष्ट स्पिरिचुअल वासाचा उगम दाखवला. ती म्हणे, "कभिन्न त्याला रीलेक्स हो, असे बंगालीत म्हणतोय अन तो त्याला चूप करतोय". मला माझ्या भोळसटपणाचा अचंबा वाटू लागला. मग मी शिताफीने जागा बदलून टकलूकडे सपशेल दुर्लक्ष करत नवर्‍याशी गुलुगुलू बोलत बसले. नेहेमीप्रमाणे यातले काहीही त्याच्या लक्षात आले नव्हते. चतुर बाईचा नवरा म्हणे, "दारू चढ गयी है लेकीन अब वो सो जायेंगे।"

ते माझ्याकडे करुण नजरेने बघत होते कि काय? दारूच्या आधीपासून टकलूला कसली नशा चढली होती? मला स्पिरिचुअल लोकं कधी ओळखू येतील?

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

हा हा!
ऐसीवर स्वागत!
असेच खुमासदार लेखन येत राहुदेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुमच्या खजिन्याच्या कथेतल्या सखूला उसन्त मिळालेली दिसतेय !! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile कयामततक उसन्त आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन लैच खुमासदार!!!! बाकी उत्तर भारतात टिरेन चा प्रवास म्हंजे दिव्यच-जण्रल कोटा तर इचारू नगा. नरक हाय त्यो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Biggrin या सफरी पश्चिम बन्गाल मधल्या आहेत .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आओ समदा उत्तरापथ तसाच बगा. खंडीभर लोकं अन एकेकाच्या एकेक तर्‍हा. लै डॉक्शात जातेत. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मजा आली. लेखनशैली आवडली.

कंसातली उद्गारवाचक चिन्हे पाहून हे सारे मीच लिहिले आहे की काय? अशी शंका आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किस्से मजेशीरच आहेत. ट्रेनचा प्रवास म्हणजे किमान एक तरी किस्सा ठरलेला.

परंतु बर्‍याच वेळा किस्से मजेशीर नसतात असाच अनुभव आहे. दुर्दैवाने असे अनुभव उत्तर भारतीयांकडूनच जास्त आलेले आहेत.
आधी मी बंगलोरला नोकरी करत होते. त्यामुळे अनेक वेळा एकटीने ट्रेनचा लांब प्रवास करण्याची वेळ आली आहे. अश्यावेळी अनेक तरुण पुरुष तर सोडाच पण काका लोकांच्या नजरा, उगाच दाखवलेली अति-सलगी यामुळे सगळा प्रवास विषण्ण मनस्थितीत जाई. हे सगळे फक्त नॉन-एसी डब्यात होते हा मोठा गैरसमज पुसला गेला. मुळात फटकळपणे कुणाला तोडून टाकणे हे माझ्या स्वभावातच नसल्याने कितीही ठरवले तरी प्रवासात कोणी असे वागायला लागले तर अगदीच स्पष्टपणे तोडून टाकणे जमेना आणि सौम्य निषेध त्यांच्या खिजगणतीतही नसतात. एकूण अनुभवांवरून माझ्या मनात रेल्वे प्रवासाचा धसका आहेच Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

समोर घडतय असं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेखनशैली आवडली!
ऐसी वर स्वागत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंतं खुमासदार लेखन.... आवडलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

खुसखुशीत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजेदार मजेदार लेखन. शैलीतला बेरकी निरागसपणा फारच आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेरकी निरागसपणा झकास विशेषण आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्लासच.
असाच काहिसा भाव द मा मिं च्या गुळमट चलाख नि प्रसंगी बुद्धू पात्रांमध्ये दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेखन आवडले. रेल्वेचा प्रवास तसा जिव्हाळ्याचा (एसी डब्यात तेव्हा तरी एव्हढी मजा नव्हती, स्लिपर मध्ये सर्वात जास्त धमाल, जनरलमध्येही धमाल असायची पण त्रासही जास्त), अनेक आठवणी ताज्या झाल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

... माणसं उकडायला घातली होती

पहिल्या वाक्यापासूनच मज्जा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खुसखुशीत लेख आवडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

ऐसी अक्षरेवर स्वागत.

वृत्तात बसण्यासाठी शीर्षक 'सुहाना सफर और मै खुदकन् हसी' असं बदलावं ही सूचना.

'धगधगत्या सूर्यचुलीवर हुगळी नदीच्या पाण्यात कलकत्त्याला माणसं उकडायला घातली होती.' या पहिल्या वाक्यापासूनच धमाल आली ती शेवटपर्यंत. तुम्हाला अशीच चमत्कारिक माणसं भेटोत आणि गमतीदार प्रसंग तुमच्या आसपास घडोत ही शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वृत्तात बसण्यासाठी शीर्षक 'सुहाना सफर और मै खुदकन् हसी' असं बदलावं ही सूचना.

मला वाट्टं ते हसी असं नसावं.. हंसी म्हणजे हंसाची बायडी.. मिसेस हंस ते असावं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नाव चान्गले सुचवले आहे पण ते बदलण्याचे कष्ट Blum 3 कोण करेल प्रभो ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा नुभव पुन्हा वाचला आत्ताच.
ह्यावेळी हसू आलच. पण एका गलिच्छ अनुभवाला न दचकता/घाबरता/बावचळता दिलेला प्रतिसाद मनाचा ठाव घेउन गेला.
थोडक्यात, शैलीमुळं हसू आलच; पण घटनेतलाअ विचित्रपणाही जाणवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मैं भी हंसी....भारतीय रेलने एकटीने ~२४ -३० तासांचे प्रवास अनेक वेळा आणि एकदा ~५० तासांचा प्रवास करण्याचा अनुभव असल्याने कथन केलेले लगेच अपील झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्याच आठवड्यात दक्षिण कोंकणातल्या एका गावी एका मेळाव्यानिमित्त जाण्याचा योग आला. गाडी होती दादरहून सुटणारी राज्य राणी. एसी चा एकच डबा. त्यामुळे( आधी आरक्षण करूनसुद्धा) जातायेता स्लीपर मिळाला हे भाग्यच समजलो. जाताना तोबा गर्दी होतीच. कुठलीशी जत्रा होती म्हणे गुरुवारी. आम्ही गुरुवारी रात्री निघालो होतो आणि रविवारी रात्री परत येणार होतो. त्यामुळे वुई डिड नॉट बॉदर.आम्ही कम्यूनिस्ट नव्हतो,आम्ही ज्यू नव्हतो,आम्हाला घाबरण्याचे कारण नव्हते. पण ते आलेच. ते आमच्यासाठीच आले. रविवारी रात्री डब्यात हलकल्लोळ माजला. मुले,पिशव्या,चटया,बेडिंग्स्,होल्डॉल सगळ्यासकट ते आले. कुठे मिळेल तिथे बसले. सामानाची फारकत झाली. चपलांची फारकत झाली.आयालेकरांची फारकत झाली. कुटुंबेच्या कुटुंबे विखुरली गेली. आक्रोश आणि किंकाळ्यांनी डबा भरून गेला. सामान दृष्टिआड झाले म्हणून बायांनी गोंधळ घातला. बाप्ये ढिम्म होते कारण ते त्या सामाना वर बसले/झोपले/पहुडले होते.दोन बाकांमध्ये माणसे,बाकाखाली माणसे. मधल्या बर्थवर माणसे-अर्थात पायांशिवाय-त्यांचे पाय खाली लोंबत होते. आम्ही आमच्या बर्थ वर झोपू/बसू पहात होतो पण आमच्या उशापायथ्याशी,कुशीशी माणसेच माणसे. डब्यांच्या जोडणीवर माणसे,दरवाज्यात माणसे,दरवाजाबाहेर माणसे,प्रसाधनकूपाबाहेर खच्चून माणसे. कूपातही दरवाजा अर्धवट बंद करून एक दोन माणसे.(हे अर्थात आधी माहीत नव्हते.) जे प्रयत्न करूनही साध्य होणार नव्हते त्या प्रसाधनाकडे वळण्यात अर्थ नव्हता.टीसी नामक मुंगीलाही शिरायला जागा नव्हती.दर एकदोन तासांनी एखादी बाई आपल्या पिशवीच्या नावाने केकाटू लागे. दूरवरून कुठूनतरी 'आहे,आहे,उगाच ओरडू नको' असे स्थानिक भाषेतून अर्थात शिवीसह उत्तर येई. शेवटी रत्नागिरीला कहर झाला. ऐन वसंतातल्या मध्यरात्री (शिमगा आलाच ना)तिला तिची पिशवी किंवा ती उशाशी घेऊन झोपलेला एक बाप्या मिळाला.आणि नंतर जे काही घडले ते तुम्ही ऐकू नये, मी सांगू नये.त्या पिशवीत म्हणे तिच्या आईने मेहनतीने केलेले आणि प्रेमाने दिलेले पापड होते. असो. समोर एक वृद्ध आजी अंग चोरून बसल्या होत्या.त्यांची बराच वेळ चुळबूळ चालू होती. बहुधा प्रसाधनाकडे जायचे असावे. पण गर्दीमुळे जागच्या हलू शकत नव्हत्या.पुरुष माणसे येत-जात होती.दरवाजातूनच कार्यभाग उरकीत असणार. त्यातला एक परत आला तेव्हा आजींना वाटले की आपणही जाऊ शकू.त्या नेटाने उठल्या.लगेच आजूबाजूला चैतन्य पसरले.'आजी कशाला उठताय? बसा बसा.'आजी, उठू नका, जागा जाईल'. पण त्यांना जायलाच हवे होते हे कळल्यावर लगेच अनेक पुरुष पुढे झाले. 'आजी, या, इथून या, मी तुमचा हात पकडतो' 'आजी घाबरू नका, मी धरलंय तुम्हाला' सगळीकडून विशेषतः पाठून अनेक आधार मिळाले.इतक्या आधारांची गरज नसलेल्या त्या बाई आपोआप ढकलल्या जाऊन इच्छित स्थळी पोचत्या झाल्या.आता आत कसे जायचे? आत एक माणूस होता,त्याला बाहेर यायला जागा हवी होती.तिथे एक ग्रूप डिस्कशन झाले.आतल्याने खाली बसून वा वाकून बाहेर पडण्याच्या पोझ मध्ये रहावे आणि आज्जींचा झोळणा अथवा गणपतीबाप्पा करून त्या बाप्याच्या वरतून त्यांना आत सोडावे (तितकाच अधिक पुरुषांचा हातभार)असले काहीतरी सोल्यूशन निघण्याच्या बेतात होते. मात्र आजींनी निग्रहाने त्याला विरोध दर्शवला आणि त्या आल्या पावली परत फिरल्या. नको नको म्हणतानाही परतीच्या वाटेवर अनेकांची मदत त्यांना लाभली.आज्जींच्या बाबतीतही इतके स्त्रीदक्षिण्य पाहून आम्ही थक्क झालो. इतके दाक्षिण्य लोकांच्या अंगी असूनही त्यांना नीट बसायला मिळाले नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दर एकदोन तासांनी एखादी बाई आपल्या पिशवीच्या नावाने केकाटू लागे.

माझ्या डोक्यात भलतंच आलं. पण पुढे पापड वगैरे वाचल्यानंतर ट्यूब पेटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कुणीतरी प्रतिसादांना वाचनखुणेत टाकायची सोय करा रे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क-ह-र आहात बाई आपण. इतके दिवस कुठे होता? एकेका वाक्यावर हसले.
भारीच.

अवांतरः

बाकी ट्रेनमधे साड्या कोण घेत असेल, या प्रश्नावर मला एकदम माझ्याकडेच लोक रोखून बघत असल्यासारखं वाटून वरमायला झालं. कारण मी एकदा घेतली होती.
एक तर लई दिवसांनी लोकल ट्रेन मधून प्रवास करत असल्यानी मला एकदम नॉस्टॅल्जिक प्रेमळ लोकसन्मुख वगैरे झाल्यासारखं वाटत होतं, नि एकूणच येईल त्या प्रत्येक विक्रेतीकडे मी प्रेमभरानी पाहत होते. साडीवाली पहिल्यांदाच पाहिली मी त्या दिवशी. पण इतक्या बायका साड्या घेत होत्या, की असतील बा चांगल्या असं स्वत:लाच समजावून एक बरीशी मीपण घेतली. मैत्रिणीच्या घरी जाऊन तिला ट्रेनमधून एक साडी आणलीय असं सांगितलं तर ती गडबडा लोळून हसली. मग 'बघू, कशीये' अशा सुरात ती काढून आम्ही आळीपाळीनी गुंडाळून पाहिली, तर एक निरी जेमतेम कशीबशी येई, इतकीच साडी. आमच्या विस्ताराची कल्पना आम्हांला आहे, पण निदान तीन तरी निर्‍या याव्यात की नाही? नाहीच, कशीबशी एकच. मग घरी जाऊन लाजत आईला सांगितलं, तर तिलाही हसण्याचा अटॅक, आल्यागेल्यासमोर माझ्या अकलेच्या दिवाळखोरीचं टिंगलवजा प्रदर्शन, साडीचं उजेडात धरून निरीक्षण, त्याला एक ब्लाउजपीस आतून जोडून ती साडी नेसून माझ्यावर पुरेसे उपकार केल्याची जाणीव... असं सगळं यथासांग झालं. आता ती साडी भाजीच्या पिशव्यांच्या अवतारात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ट्रेनमध्ये साडी घेतल्याबद्दल तुमचा ट्रेनमधेच खरीदलेले नऊवारी लुगडे
अन चोळी देउन रेल्वे मंत्र्यांकडून तुमची ओटी भरण्यात येत आहे . Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच भारी शैली आहे हो तुमची! रेल्वेतल्या गर्दीप्रमाणेच हास्याचा दारुगोळा ठासून भरलाय वाक्यावाक्यात.
वाचताना फार मजा आली. आता तुमचे नांव दिसले की धागा उघडणारच बघा.(घाबरु नका, मी टकलू ही नाही आणि कभिन्नही!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin
आयडी, शीर्षक आणि किस्सा, सगलंच ब्येष्ट. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुभव तसा ड्यांजर आहे. पण त्याला इतक्या समतोल पध्दतीने सामोरं गेला आहात तुम्ही, की मजा आ गया!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जबराच.वर कोणी म्हटल्याप्रमाणे निरागस निरीक्षण आणि लेखन शैली आवडली.
रेल्वेने प्रवास करण्याचे प्रसंग अनेक वेळा येतात.अनेक किस्से आहेत. मुंबईत महिलांचा डबा हे एक दुकान किंवा मॉलच असतो. खाण्यापिण्याचे पदार्थ,हरप्रकारचे लेखन-शिवण-भरतकाम-विणकाम-घरकाम-बागकाम-रांधपकाम-प्रसाधनसाहित्य,खेळणी,चादरी,टॉवल्स्,पायपुसणी,हातपुसणी,साड्या,सलवारकमीझ कापड,अंतर्वस्त्रे,डिस्पोजेबल अंतर्वस्त्रे,रुमाल.पर्सेस,पिशव्या,मोबाइल कवर्,फ्रिज-वॉ.म.-टी.वी.-रेल्वे पास कवर,अनंतप्रकारचे कंगवे,पिना,माळा,मंगळसूत्रे,बांगड्या,कानातले,टिकल्या,मेंदीशंकू,पाचक चूर्णे,दंतमंजने,घरगुती लेप,उटणी,,मसाले,पापड.लोणची,पुरणपोळ्या,भाज्या,फिश,असा सर्व माल घेऊन विक्रेते सराईतपणे चढउतार करताना दिसतात.लेडीज डब्याच्या आसपास रेंगाळण्याचा थोडासा धोका (धोका कसला म्हणा,थ्रिलच ते)पत्करला तर हा अजब ऩजारा नजरेस पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0