सोनई हत्याकांड घटना प्रतिक्रिये वरील प्रतिक्रिया.

सोनई दलित हत्याकांड ही ऎसी अक्षरे वरील पोस्ट एका ग्रुपवर टाकल्यानंतर काही दिवसांनी डिलिट केली. तेव्हा तिथे दिलेली प्रतिक्रिया इथेही लागू होतेय. म्हणुन तशीच देतोय. न ओळखणार्या व्यक्तिँचे संदर्भ लक्षात येणार नाहित तेव्हा ते तसेच टाळून पुढे वाचा ही विनंती.

सोनई हत्याकांडा वरील पोस्ट डिलिट करण्याचं कारण तिच्यातील मुळ मुद्यांना प्रचंड बगल देत पोस्ट भरकटवली गेली हे आहे. क्रुरपणे मारल्या गेलेल्या तीन दलित तरुणांचा मृत्यू हा हिँदु धर्मातील निवडक जाती श्रेष्ठत्वासमोर अत्यंत किरकोळ ठरला गेला. काही सन्मानणीय अपवाद वगळता निषेधाच्या ओळीदेखील न उमटता ब्राह्मण्य मराठा यांचं श्रेष्ठत्व आणि निरपराधीत्व यासाठीच मंडळी कंबर कसून भांडू लागली.जातीयतेच्या नवनव्या व्याख्या जन्म घेऊ लागल्या. त्या तरुणांच्या मृत्यूमागील जातीय विखार हे प्रमुख कारण पध्दतशीर पुसले जाण्याचा आटोकाट प्रयत्न होऊ लागला. हे सर्व भयंकर होतं म्हणुन पोस्ट डिलिट केली. असो.

त्या पोस्टवर चर्चा करताना kunal Yande यांनी Rajan Dandekar यांच्या विषयी एकेरी भाषा वापरली म्हणुन मी त्यांना पातळी राखण्याची विनंती केली. जी त्यांना प्रचंड अन्यायकारक वाटली. दोन व्यक्ती कितीही प्राचीन 'लंगोटिया यार' असले तरी सार्वजनिक ठिकाणी इतरांच्या उपस्थितीत संवाद साधताना इतरांना अवघडलेपण येऊ नये याकरीता काही पथ्य पाळावीत हा सर्वमान्य संकेत आहे. तुमचा परस्पर संवाद भले तुमची लंगोटिया यारी जाहिर करणारा असेल. पण एकूण ती भाषा सार्वजनिक ठिकाणच्या सर्वसमावेशक संवादाचा सुर हरवणारी ठरते हे निश्चित ! या धारणेतून मी तुम्हाला केलेल्या मेसेजला तुम्ही, मी तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य गोत्यात आणतोय अशा समजात विचित्र दांडगाव्याने ऎकसो एक पोस्टा आणि काँमेँटा टाकत गेलात. वास्तविक दांडेकरांचा ऎकेरी उच्चार असलेली काँमेँट वगळता तुमची कुठलीच काँमेँटस मी डिलिट केलेली नसताना देखील ! एकूण चर्चेमध्ये सोनईच्या अमानवी क्रुर घटनेकडे जातीय अंगाने पाहू नये , तो केवळ एक गुन्हा या स्वरुपातच पाह्यला हवा असे तालिबानी स्टाईल विचार हिरिरीने मांडले गेले. हा विचार मान्य केला तर याच विचाराच्या धर्तीवर स्वसंरक्षणार्थ घडलेला गुन्हा आणि बलात्कार करुन मारलेली बाई दोन्हीकडे एकाच न्यायाने बघावे लागेल. कारण मृत्यू समान दुवा. पण सुदैवाने आपल्याकडे गुन्ह्या मागील मानसिकता तपासली जाते. योग्य न्यायाकरीता ते अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

सोनईमधील घटने मध्ये त्या तीन तरुणांचं दलित असणं हेच गुन्हेगारांना जबरदस्त चिड आणणारं आहे. हे त्यांनी ज्या क्रुरपणे त्या तिघांची हत्या केली त्यातून थेट स्पष्ट होतं. मेहतर समाजाऎवजी इतर उच्चवर्णिय किँवा बारा बलुतेदारातील इतर कुणी , किँवा गेला बाजार किमान ९२ कुळी असते तर त्यांना निश्चितच मारले गेले नसते ! सोनईमधील घटनेकडे सामाजिक अंगाने पाहण्याचा एक भलताच भंपक दृष्टीकोन चर्चेत दिसून आला. सफाई कर्मचार्याला कोण बाप मुलगी देईल ? तिच्या भवितव्याची काळजी म्हणुन तिच्या बापाच्या भूमिकेकडे पाहवं . अशी उदारमतवादी दृष्टीकोनाची मागणी करणारी काही बुद्धीवादी मंडळी घटनेमागील जातीयता पुसण्याचा जड प्रयत्न करुन गेली. मला आश्चर्य वाटतं, आजही अवती भोवती अर्धवट शिक्षण सोडलेली, अल्पभूधारक, कोरडवाहू जमीनधारक ९६ कुळी मराठा समाजातील मुलं मी पाहतो . ती माँल, मल्टीप्लेक्स, काँलसेँटर मधे सफाई कर्मचारी म्हणुन काम करतात. (त्यात संडास धुणं ही येतं) रिक्षा चालवतात. सिक्युरीटी गार्ड म्हणुन काम करतात. त्यांची लग्न झालीत काहीँची होतील. त्यांना मुलीचा बाप मुलगी देतोच की ! इथे फक्त जात हा मुद्दा पाहिला जातो. हेच कडवट विदारक वास्तव आहे. सोनईमध्ये जातच पाहिली गेली ! जी घटनाच जातीय द्वेषातून घडली आहे.तिला मुद्दाम जातीय रंग देण्याची दलितांना गरजच काय ? जातीयवाद (या घटनेबाबत तरी) जोपासण्याचा आरोप दलितांवर करता येत नाही. अस्तित्त्व राखण्याकरीता एकत्र येऊन काही विचार करणे यालाच जर जातीयवाद समजले जात असेल तर हा शुध्द जहरी अडाणचोटपणा आहे. हिता करीता एकत्र येण्याचा अधिकार हा संविधानानेच सर्वाँना दिलेला आहे. उलट अजुनही 'वेगळ्या' पातळीवरच एकत्र यावं लागतं यासारखं स्वतंत्र भारतातलं दुर्दैव कुठलं ? इथे गट करुनच राहवं लागतं यासारखं वाईट काय ? एक उदाहरण देतो. पुण्यातली एक नामचिन प्राध्यापक संघटना तिचं एकतरी आंदोलन मागासवर्गियां करीता झालंय का ? वेतनवाढ, सेट, नेट मुक्ती बस्स ! मराठा सेवा संघ, छावा, ब्रिगेड, मनसे कोण गेलंय खैरलांजीत किँवा सोनईत ? कुठले प्रश्न महत्त्वाचे यांना वाघ्या, दादोजी, रामदास ? महालक्ष्मीला एक कोटी , किँवा यु.पी. बिहारी हाकला. हे प्रश्न ! दिवसा ढवळ्या कापली जाणारी माणसं यांच्यासाठी कचरा ! निव्वळ राजकिय स्टँड म्हणुन परजातीतील संत महात्म्यांची जयंती साजरी करणं म्हणजे आपण पुरोगामी झालोय का ? दलितांना त्यांच्या हितासाठी सोडा निव्वळ अस्तित्वा करीताच संघटना उभाराव्या लागतात. भांडावं लागतं झगडावं लागतं. आज प्रत्येक क्षेत्रात मागासवर्गिय आणि ओपन दोन्हीँचे मुलभूत हक्कच चिरडले जातात. घटनेच्या मुलभूत तत्त्वांची पायमल्ली करणार्या या उच्चवर्णिय धेँडासमोर भांडणाकरीता उच्चवर्णियातले किती उभे राहतात ? जातीय शिवी देणारा उच्चवर्णिय जातीयवादी ठरतो आणि त्याच्या जवळ शिवी न देता मुक्यानं उभा राहणारा उच्चवर्णियही जातीवादीच ठरतो. ही स्पष्ट धारणा दलित समाजाची होणं अजिबात गैर नाही. सोनई वरच्या पोस्टमधे जातीय विखार फार गलिच्छ पाह्यला मिळाले. झुंडीने एकत्र येणं आणि नाहक ब्राह्मण समाजाला झोडपणं हा त्यातलाच प्रकार ! बरं ब्राह्मण समाजाची खोड अशी की उच्चवर्णिय म्हटलं कि हेच सरसावतात बाह्य सावरत आणि लगेच भांडणाला तयार ! अरे तुम्ही नाही समजत तुमच्या इतकं श्रेष्ठ कुणाला कबुल पण तुमच्या समजण्याला इथे अर्थ आहे काय ? दलित विचारवंताना तर साँल्लीड पढवलेलं आहे. काहीही फट्ट झालं तरी ब्राह्मण ! कारण शाहू, फुले, आंबेडकरांचा निव्वळ जयघोष यांच्या कानापर्यँत पोचवायची खबरदारी घेतली गेलीच आहे इथल्या तथाकथित ब्राह्मणेतर उच्चवर्णिय समाजाने. त्यामुळे खुप खोटं प्रेम करणार्या नवर्याने केलेला जबरी संभोग अशी इथल्या दलितांची गत. मेलेली पोरं मसनात केव्हाच गेलीत आता कुठे घालवावी ?

लेखक:सतीश वाघमारे

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

तुम्ही ज्या चर्चेचा निर्देश केलेला आहे ती वाचायला न मिळाल्यामुळे विशेष काही बोलता येत नाही, पण तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत त्यावरून ऐसी वर तशीच चर्चा झाली हे म्हणणं पटत नाही.

सफाई कर्मचार्याला कोण बाप मुलगी देईल ?

एकूण चर्चेमध्ये सोनईच्या अमानवी क्रुर घटनेकडे जातीय अंगाने पाहू नये , तो केवळ एक गुन्हा या स्वरुपातच पाह्यला हवा

अशी मतं ऐसीवर मांडली गेल्याचं आठवत नाही.

सोनई वरच्या पोस्टमधे जातीय विखार फार गलिच्छ पाह्यला मिळाले. झुंडीने एकत्र येणं आणि नाहक ब्राह्मण समाजाला झोडपणं हा त्यातलाच प्रकार !

हेही ऐसीवर झालं नाही. किंबहुना मूळ पोस्टमध्ये अनाठायी आलेला 'ब्राह्मण' शब्दावरच बरंच चर्वितचर्वण झालं. चर्चा दुर्दैवाने भावनिक पातळीवर सुरू झाली आणि सगळ्यांच्या मनोभावनांत काही बदल होण्याऐवजी त्या अधिक कठोर होऊन हमरीतुमरीत डिसइंटिग्रेट झाली.

या सगळ्याच्या कारणपरंपरांची 'मेटाचर्चा' करून काही आपल्या अनुभवात, ज्ञानात, दृष्टिकोनात भर पडेल असं वाटत नाही. या चर्चांचे संदर्भ काढून 'या हत्याकांडाला जातीय स्वरूपात न बघणं कसं चुकीचं आहे' असा संदेश असलेला निव्वळ लेख अधिक चांगला झाला असता. इतिहासात घडलेल्या घटना, त्यांवरून दिसणारे ट्रेंड्स, त्यामध्ये ही घटना कशी बसते यावर ऊहापोह होऊ शकला असता. हा कदाचित भावनाविरहित कोरडा दृष्टिकोन वाटेल, पण अशा गंभीर प्रश्नांवर गरम डोक्यांनी वादविवाद करण्यापेक्षा दोन पावलं मागे हटून काहीशा तटस्थपणे मांडणी व चर्चा झाली तर अंततः ती अधिक परिणामकारक होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तुमचे 'सोनई हत्याकांडावरचे' सगळे लेख वाचल्यानंतरही हेच वाटते की ह्या गोष्टीला जातीय अंगाने पाहू नये. ह्या पुर्ण प्रसंगाला दोन कुटुंबांमध्ये असलेले आर्थिक, सामाजिक (जातिय नव्हे) अंतर हे पण विचारात घेण्यासारखे आहे. प्रत्येक जाणार्या जिवाला जातिय अंगाने पाहिले तर अवघड आहे.

या धारणेतून मी तुम्हाला केलेल्या मेसेजला तुम्ही, मी तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य गोत्यात आणतोय अशा समजात विचित्र दांडगाव्याने ऎकसो एक पोस्टा आणि काँमेँटा टाकत गेलात.

अंतरजालावर्च्या चर्चेतला प्रतिसाद आवडला नाही म्हणुन तुम्ही मेसेज केला??? कहर आहात . कोणालाच नाही आवडणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या ग्रुपवर मी अँडमिन असल्याने सर्वाँसमक्ष समज देणे योग्य नसल्याने मेसेज केला. काय जी अनुकूल प्रतिकूल मते असतील ती अवश्य मांडा. पण समोरच्याला एकेरी बोलून नको. मेसेज मधुन संवाद साधनं ही ग्रुपची पाँलीसी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही "मेटा चर्चा" वाटली तरी हा एक स्वतंत्र विषय आहेच. लेखकाला डोके थंड ठेऊन विचार करण्याचा सल्ला देण्याऐवजी जे काही विचार त्याने मांडले आहेत, गरम किंवा थंड डोक्याने, ते रॅशनल आहेतच हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. गुन्हा हा गुन्हाच असतो, त्याला जात लावू नये हा मुद्दा वरकरणी योग्य वाटला तरीही गुन्हा ज्या कारणामुळे घडला हे अतिशय महत्वाचे आहे. गुन्हा जातीच्या कारणामुळे घडलेला आहे असे सकृत्दर्शनी दिसत असताना चर्चा ही जातीय द्वेष या मुद्द्याभोवती राहणे साहजिक आहे. तो मुद्दा उठवणार्‍यांना जातीयवादी म्हणणे योग्य ठरणार नाही. उलट जे लोक जातीय द्वेषाचा मुद्दा टाळून या घटनेकडे पाहतील, त्यांच्यावरच जातीयवादी असण्याचा ठपका ठेवता येऊ शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तंतोतंत ! थेट मांडणी. सहमत !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे, पण जातीय द्वेषाचा मुद्दा न टाळता आणि फक्त सहानुभूती न दर्शवता ह्यावर सकारात्मक चर्चा कशी करता येईल हे बहूदा कोणाच्याच लक्षात नीटसं येत नाहीये. गुन्हा जातीच्या कारणामुळे घडला आहे असं दिसतं आहे, वर तपासामधे राजकीय हस्तक्षेपामुळे टाळाटाळ किंवा दिरंगाई होताना दिसते आहे.

मी सतीश ह्यांना विनंती करतो की त्यांनी ह्या घटनेशी संबंधीत मुद्द्यांवर जातीय द्वेषाचा मुद्दा न टाळता पण त्याच वेळेस अतिरिक्त अभिनिवेश शक्यतो टाळून सकारात्मक चर्चा होईल ह्या उद्देशाने त्यांचे मत मांडावे, त्यावर इथल्या वाचक वर्गाकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळेल अशी मला आशा वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण वाघमारे सर का ?

नमस्कार नमस्कार __/\__

मेलेली पोरं मसनात केव्हाच गेलीत आता कुठे घालवावी ?

हा प्रश्न अतिशय हळवा करून गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

कुठले प्रश्न महत्त्वाचे यांना वाघ्या, दादोजी, रामदास ? महालक्ष्मीला एक कोटी , किँवा यु.पी. बिहारी हाकला. हे प्रश्न !

You said it.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अर्थात !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे झाले ते वाईट्च. दोषींना शिक्षा झालीच पाहीजे आग्रही मागणी.

भिन्न वर्गातील युगलांचे प्रेमविवाह झाले आहेत, होत आहेत व होत रहातील. एकाच वर्गातील प्रेमीयुगलांच्या विवाहात विरोध्/हत्या झाली आहे, होत आहे व होत रहातील. आपण फक्त प्रमाण कमीत कमी ते शून्य होईल इतपत आपल्या आसपासच्या लोकांच्यात प्रबोधन, चर्चा करु शकू. कोणतीही कृती अथवा कायदा हे संपूर्णपणे थांबवण्यात अक्षम (सक्षम च्या विरुद्ध??) आहे. आक्रस्ताळेपणा न करता प्रबोधन / चर्चा केली तर फायदा होईल असे वाटते.

कोणाच्याही व्याख्येतला "जातीभेद" १००% संपला तरी "मनुष्य जात" अशी आहे की भेदभावाचे, दुसर्‍याला हिणवायचे अन्य मार्ग शोधेलच.

आता पुढे नेमके काय करायचे असे आपल्याला वाटते, वाघमारे सर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रश्नावरच्या माझ्या मतात अजूनही फरक नाही

झालं हे अत्यंत वाईट झालं. निषेध करावा तितका कमीच!
मात्र, आता प्रकरण कोर्टात आहे तेव्हा जनाअंदोलनाइतकेच किंबहुना त्याहुन बरेच अधिक महत्त्व योग्य ते साक्षी-पुरावे गोळा करणे, साक्षीदारांचे संरक्षण वगैरेला द्यायला हवे असे वाटते.

बाकी ब्राह्मण्य, जातीय अश्या अंगाने चर्चा वगैरे योग्य आणि आवश्यक असल्या तरी दुय्यमच! प्राथमिकता ती "केस" कायद्याच्या न्यायालयातही तशीच - तितक्याच ताकदिने- लढणे यालाच मिळाली पाहिजे. नाहीतर अश्या लेखांमुळे/चर्चेमुळे लोकांची सहानुभुती व पाठिंबा मिळूनही, मुजोर पक्ष धाकपटशहाच्या जोरावर मुख्य लढाई पुराव्या अभावी अथवा साक्षी-पुरावे दाबून जिंकून जायची शक्यता आहेच! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!