खजिना (८/८)

~~~मंदार~~~
मला काहीच समजेना. आई, बाबा इथे कुठे आले? मी कांबळेंकडे पाहिले.
ते म्हणाले, "तुला काही गोष्टी समजाव्यात म्हणूनच त्यांना इथे बोलावले आहे."
"म्हणजे?", मला काही कळेना, "हे काय आहे? त्यांचा याच्याशी काय संबंध?"
"आता थेट बोलतो, ते दोघे तुझे आई-वडील नाहीत."
मला कळेचना की हे काय बोलताहेत. त्यांच्या डोळ्यात वेडाची झाक दिसतेय का हे मी बघू लागलो. ते म्हणाले, "नाही मी वेडा नाही आणि तशी झाक माझ्या डोळ्यात शोधूही नकोस. ते खरंच तुझे आई-वडील नाहीत."
"अहो काय बोलताय काय? तुम्हाला काय हवंय ते सांगा. उगाच माझ्यावर भलतेसलते कंडिशनिंग करू नका. तुम्हा सायकॉलिजिस्टांना असं ब्रेन वॉशिंग फार चांगलं येतं हे मला माहीत आहे बरं!"
कांबळे नुसते हसले, आणि जवळच्या एका टर्मिनलकडे वळले. स्क्रीनवरची काही बटणे दाबली. स्क्रीनवर माझी लहानपणीची प्रतिमा समोर आली.
"अरे! माझा लहानपणीचा फोटो?"
कांबळे बोलू लागले, "आता जर मी सांगितलं की हा फोटो तुझा नाही तर?"
"अहो, पण हा फोटो माझाच आहे."
"ऐक मग. हा फोटो पाच-सातशे वर्षांपूर्वी घेतलेला आहे."
"म्हणजे? आता मनात बोलून फायदा नाही तेव्हा प्रकटच विचारतो, तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना?"
कांबळे पुन्हा मंद हसले. आता त्यांच्या त्या हसण्याचा मला राग येऊ लागला होता.
"हे बघ आम्ही कोण आहोत हे तुला माहीत आहेच. मात्र तुला असणारी माहिती फारच जुजबी आहे. आपण काही घटनांकडे बघू. तुझ्या किती लहानपणाचे फोटो तू बघितले आहेस? पाच वर्षांपेक्षा आधीचा फोटो तुला आठवतो?"
मी आठवायचा प्रयत्न केला पण आठवेना. मी नकारार्थी मान हालवली.
"आठवणे शक्य नाही, कारण त्या आधीचा फोटो बाहेरच्या जगात उपलब्धच नाही."
मला काहीच समजेना मी नुसताच ऐकत राहिलो, कांबळे बोलत राहिले. "तुला सविस्तर सांगतो. आम्ही नवरत्न एकेकाळी आपल्या सिंधू खोर्‍यात तयार झालेले ज्ञान जोपासले, वाढवले हे तर तू जाणतोस. तुझ्या माहितीप्रमाणे हे ज्ञान ९ पुस्तकांमध्ये बंदिस्त आहे आणि ती पुस्तके केवळ नवरत्नांनाच वाचता येतील. खरं सांगायचं तर अशी पुस्तकं होती, मात्र त्याची सुरक्षा करणं दिवसेंदिवस जड जाऊ लागलं होतं. वरवर वाटतं तितके आम्ही सुरक्षित नव्हतो. आपले अणू-बॉम्बचे तंत्रज्ञान केवळ विधायक कामासाठी वापरायचे अशी शपथ, मोहेंजोदारोचा उत्पात बघून, नवरत्नांनी केव्हाच घेतलेली होती. अश्या वेळी गुप्तता राखणे, त्या पुस्तकांचे रक्षण करणे यात बराचसा वेळ जाऊ लागला आणि नवरत्नांना नव्या शोधावर म्हणावे तसे लक्ष देणे कठीण झाले होते. त्यात दरवेळी नव्या पिढीकडे ज्ञान सुपूर्त करताना काही ज्ञान गहाळ होण्याचीही भिती होती. अश्या वेळी साधारण इसवीसन १००० च्या आसपासच्या नवरत्नांना एक अत्यंत महत्त्वाचा शोध लावण्यात यश आले."
मी ऐकत होतो. मला याचा माझ्याशी काय संबंध हे कळेना; पण मी मध्ये न अडवता ऐकत राहायचं ठरवलं. कांबळेंनी स्क्रीनकडे नजर टाकली. आई-बाबा, साळवी आणि रक्षक विमानाच्या जवळ पोचले होते. कांबळे पुढे सांगू लागले, "हा महत्त्वाचा शोध होता, एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती बनवायचा. इतकंच नाही तर आधीच्या व्यक्तींकडे असलेले ज्ञान नव्या जन्मलेल्या बाळाच्या मेंदूत आपोआप दडलेले असे. ते वयाच्या २१व्या वर्षी जागृत केले की तीच व्यक्ती आपले काम पुढे चालू करू शकत असे. थोडक्यात माझ्या बाकी शरीराचा जन्म इ.स.१००० पासून अनेकदा झाला असला तरी माझ्या मेंदूचा मृत्यू एकदाही झालेला नाही, आणि हेच इतरही नवरत्नांबद्दल आहे."
माझ्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह बघून कांबळे म्हणाले, "याचा संबंध काय ते सांगतो. त्याआधी वीस एक वर्षांपूर्वी घडलेली घटना सांगतो. भूतानमध्ये एक 'ताख्संग मॉनेस्ट्री' नावाची एक दुर्गम मॉनेस्ट्री आहे. ही मॉनेस्ट्री पारंपरिकरित्या आम्हा नवरत्नांचे प्रसूतिगृह आहे. आम्हा नवरत्नांपैकी पाच स्त्रिया तर चार पुरूष आहेत. मात्र आता इतके नवनवीन प्रयोग आम्ही करत असतो की अनेक प्रयोगांकडे लक्ष देणे जमतेच असे नाही. त्यात आता अनेक नवीन क्षेत्रे निर्माण झाली आहेत ज्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. अशावेळी आम्ही एक निर्णय घेतला. दहावे रत्न जन्माला घालायचा. डी एन ए वर योग्य ते संस्कार करून 'हवे तसे' मूल जन्माला घालणे आम्हाला अठराव्या शतकात जमू लागले होते. आता त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही एक मुलगा जन्माला घालायचे ठरवले. आम्ही तो घातलाही, मात्र त्यानंतर काही दिवसांत भूतानमध्ये राजवट बदलली आणि नव्या उत्साही राजाने लोकशाही आणली. पहिली ३-४ वर्षे चांगली गेली, मात्र पूर्वी मोजकेच पर्यटक असणारी ही 'ताख्संग मॉनेस्ट्री' पर्यटकांचा अड्डा बनून गेली आणि आम्ही ते ठिकाण सोडायचे ठरवले. मात्र दरम्यान परिस्थिती इतकी फिरली की आम्ही अजून एक धाडसी निर्णय घेतला, या मुलाला 'आम जनतेत' वाढवायचा. तो निर्णय का घेतला हे आता सांगू शकत नाही, कारण त्यासाठी तुला बराच मोठा इतिहास सांगावा लागेल."
"निर्णय घेतला पेक्षा घ्यावा लागला असे म्हणा", मी चमकून पाहिले तर माझी आई बोलत होती, "होय, तो निर्णय घ्यावा लागला. मग नवरत्नांनी माझी आणि तुझ्या बाबांची निवड केली 'त्या' मुलाला वाढवायला."
"म्हणजे!" मला शब्द सुचत नव्हते, पण आईच बोलली, "होय, म्हणजे तूच ते दहावे रत्न आहेस!"

~~~मानकामे~~~
समोर जे काही चालले होते, त्याने मला वेड लागायची पाळी आली होती. मंदारच्या आईला, किंवा खरंतर त्या बाईंना म्हणायला हवं, मी कॉलेजात दोन-तीनदा भेटलोही होतो. त्यावेळी एकदा "बघू त्याला किती काळ ठेवता येतंय ते!" असे म्हणाल्याचे मला आठवायला लागले. त्यावेळी काय बोलल्या ते अजिबात कळले नव्हते. आज अंदाज येऊ लागला होता. त्या आता बोलत होत्या, " विसाव्या शतकात रसायनशास्त्रींनी आपले नाव धारण केले होते डॉ.राधा बोस! तर डॉ. बोस यांच्याकडे आम्ही दोघेही, मी आणि तुझे बाबा, संशोधन सहाय्यक म्हणून काम करत होतो. भारत सरकारतर्फे अश्या कामांसाठी BARC, TIFR इत्यादी संस्थांमधून थेट आणि गुप्तपणे नेमणूक होते. आमच्या उत्तम कामावर डॉ. बोसच नाही तर बहुतेक नवरत्ने खूश असत. त्यादरम्यान माझा आणि राजनचा विवाह झाला आणि कालांतराने मला डॉ. बोस यांच्या वैयक्तिक सहाय्यकाच्या जागी बढती मिळाली. आमचा बेस त्यावेळी 'समुद्र टापू व्हॅली'ला होता. एके दिवशी मला डॉ. बोस यांनी परिस्थितीची कल्पना दिली, या क्लोनिंगची कल्पना दिली. तोपर्यंत मीही अशा समजुतीत होते की नवरत्नांची ९ पुस्तके आहेत. पण ते असो. तर मी या निर्णयाने हुरळून गेले. तू माझ्याकडे आलास तेव्हा पाच-साडेपाच वर्षांचा असशील. काही दिवसांतच तू रुळलास आणि मी तुझ्यात गुंतत गेले. जरी मी तुझी बायॉलॉजिकल आई नसले तरी तुला वाढवताना मला एक आनंद मिळत होता. त्याच वेळी तुला कधीतरी 'परत करावे' लागेल ही जाणीवही होतीच. मग एकदा मी ठरवले की तुला लपवायचे, मी तू साधारण ८ वर्षाचा असताना बोर्डिंगमध्ये घातला आणि घरी अजून एक तशाच उंची, वजनाचा, वयाचा मुलगा दत्तक घेतला. तुम्ही दोघे दोन समांतर जगांत वाढत होतात. तुम्ही दोघेही २१ वर्षांचे झाल्यावर तू म्हणून मी तो मुलगा नवरत्नांना परत केला. अर्थात हा तो मुलगा नाही हे पहिल्या महिन्याभरातच सिद्ध झाले आणि मग मला तुझ्याबद्दल सांगावेच लागले."

आता कांबळे बोलू लागले, "आम्ही लगेच तुझ्या कॉलेजला भेट दिली, तर तू एका मुलीत गुंतलेला आम्हाला दिसलास. असे बदल आम्हाला परवडणारे नव्हते. आम्ही काय करावे या विचारात होतो. वेळ वाया जात होता. तुझे कॉलेज संपतेवेळी तू डॉ. मानकामेंना या किल्ल्यात यायचेही कबूल केलेस आणि आम्हाला मार्ग दिसला. आम्हाला नागरी लोकांत मिसळायची परवानगी नाही आणि आमची विमाने नागरी वस्तीत उतरवून तुला उचलणे तर कल्पनेच्या पलीकडे आहे. तू या किल्ल्यात येणार हे निश्चित झाले, तेव्हा आम्ही ही संधी साधायचे ठरवले. सखुच्या अंतर्मनावर कंट्रोल ठेवून तिला रात्री संमोहित करून तिने दिवसभरात ऐकलेल्या गोष्टी आम्हाला समजत होत्या. खरंतर हा किल्ला आमचा एकेकाळी तात्पुरता बेस होता, जो आता आम्ही निकोबारला हालवला आहे. मात्र तुला पुन्हा मिळवायसाठी आम्ही इथे आलो आहोत."

मी स्तिमित होण्यापलीकडे काय करू शकत होतो. मी मंदारकडे पाहिले तो स्तब्ध उभा होता. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. मी मात्र माझ्याही नकळत विचारता झालो, "पण मग आम्हाला तुम्ही कसे येऊ दिलेत?"
कांबळे म्हणाले, " आम्ही येऊ देण्याचा प्रश्नच नव्हता. मंदारने तुमच्या बरोबर येण्याचे कबूल केले होते. वाटेतील धोके मंदारला माहितीचे नसले तरी त्याच्या मेंदूचे प्रोग्रॅमिंग त्याला यापासून वाचवेल अशी आम्हाला खात्री होती. मात्र तुम्ही तिघे यातून वाचाल की नाहि हे सांगता येत नव्हते."

मला अचानक भिती वाटू लागली, "मग आता?". कांबळे खिन्न हसले.

~~~ मंदार ~~~

मला समजेना. मला अत्यंत राग आला होता. "हे काय चालू आहे? मला मिळवण्यासाठी तुम्ही फातिमाचा खून केलात? होय खूनच! आणि आता मानकामे, साळवी, आई, बाबा सार्‍यांना संपवायचा विचार तुम्ही करूच कसा शकता?"
कांबळे म्हणाले, "आम्ही जे कार्य करतोय त्यात आम्हाला फक्त तुझा जीव महत्त्वाचा आहे. तुला अत्यंत वेगळेपणाने घडवलेले आहे. मधली काही वर्षे वाया गेली असली तरी तुझ्या डीएनएला असे बनवले आहे की काही काळात तुला बर्‍याच गोष्टी शिकता येतील, समजू लागतील. बाकी राहिला प्रश्न इतरांच्या जीवांचा. हे सत्य आहे की तू इथे पोचायच्या आत मध्येच त्यांचे बरेवाईट झाल्यास आम्हाला चालणार होते. आणि तसे फातिमाच्या बाबतीत झालेही. मात्र आता इथे पोचल्यावर आम्ही त्यांना मारणार नाहियोत."
"मग काय करणार त्यांचे?"
"त्यांना गरजेपेक्षा बरीच अधिक माहिती आहे. मात्र तुला हे ही माहिती असेल की आमचा मेंदूतील तरंगांवर कंट्रोल आहे. इतकेच नव्हे तर गेल्या ४८ तासांतील माहिती आम्ही मिटवू शकतो. आम्ही साळवी आणि मानकामेंच्या मेंदूतील ही माहिती काढून टाकणार आहोत. तुझ्या आई-बाबांना बरीच माहिती पुष्कळ आधीपासून आहे, ती मिटवता येणार नाही, पण त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा मिळेलच, पण तो मृत्युदंड नसेल याची खात्री बाळग. उद्या सकाळी जेव्हा मानकामे आणि साळवी शुद्धीवर येतील तेव्हा त्यांच्या समोर किल्ल्याबाहेर जायचा दरवाजा असेल, इतरही काही गोष्टी असतील सोबत सखु असेल, डोक्यात "आत काय झाले" याची सर्वस्वी वेगळी कहाणी असेल. मात्र तुझा फातिमासारखाच नंतर या दुसर्‍या दाराजवळच्या दलदलीत बुडून मृत्यू झाल्याचे त्यांना आठवत असेल. हे बघ मंदार, तुम्ही इथे एक खजिना शोधायला आला होतात, आणि माझ्यामते तूच त्या खजिन्याचा भाग आहेस. फातिमा वगैरे जखमा येणार्‍या शतकांत सहज भरून निघतील. मात्र तू सत्याची, विज्ञानाची जी सेवा करणार आहेस त्याचा फायदा देशाला होणारच आहे."

मला हे पटत होते. मी आई-बाबांकडे पाहिले, त्यांच्या चेहर्‍यावर समाधान आणि त्यांच्यापासून दुरावल्याचे दु:ख असे दोन्ही दिसत होते. फातिमाची आठवण येत होती, पण ती नाही हे सत्य स्वीकारावे लागणार होते. आता माझे आयुष्य एक अकस्मात तरीही रोचक असे वळण घेत होते. मी साळवी, मानकामेंकडे पाहिले. त्यांना हे सारे पचत नसले तरी ते गप्प उभे होते. मानकामे सरांनी आपला अंगठा वर करून "गो अहेड" अशी खूण केली.

मी एक दीर्घ श्वास घेतला कांबळेंकडे वळलो आणि म्हणालो, "चला, वाट कसली बघताय?"
ते हसले, त्यांनी एका खोलीत नेले. खोलीत जाताना त्याच्यावरच्या पाटीवर लावलेली पट्टी काढली, त्यावर नाव होते "मंदार गोडसे" आणि त्यांनी आपल्याकडील एक बिल्ला मला दिला आणि तसाच एक बिल्ला स्वत:च्याही शर्टावर लावला, तो बिल्ला अर्थातच नवी संख्या दाखवत होता .. दहा!

(समाप्त)

इतर भागांचे दुवे: - - - - - - -
श्रेयअव्हेरः सदर कथेतील पात्रे, स्थळे ही पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष व्यक्ती अथवा स्थळांशी संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा
===========
सदर कथा मंदारला नायक म्हणून उभी करून इथे संपते. मात्र या नव्या नायकाच्या कर्तबगारीच्या काही कथा डोक्यात आहेत. सदर प्रकारचे लेखन वाचकांना आवडले असेल तर या कल्पनेचा विस्तार करून, मंदार या नायकासोबत काही कथा लिहायचा विचार आहे. बघू कसे, कधी जमतेय ते! मात्र तुमच्या या दृष्टीनेही प्रतिक्रिया जरूर कळावा!

बाकी कथेत काही स्थळे, व्यक्ती, चित्रे, प्रसंग वगैरेंचे उल्लेख आहेत ते श्रेयअव्हेराच्या दृष्टीने काल्पनिकच आहेत. मात्र तरीही कथा वाचून झाल्यावर वाचण्यासाठी काही रोचक दुवे देतो आहे, त्याचा थोडी गंमत म्हणून जरूर लाभ घ्यावा:

ब्राह्मी लिपी (पीडीएफ)
चार प्राण्यांची तिबेटी गोष्ट
वैमानिक शास्त्र
शिवकर तळपदे
मोहेन्जोदारो आणि रेडियोअ‍ॅक्टिव्हिटी
नऊ अज्ञात व्यक्ती (नॉवेल) अर्थात नवरत्ने Wink
पोप सिल्व्हेस्टर
समुद्र टापू व्हॅली, UFO

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

भारतीय मसाला टाकून झणझणीत "कर्री" बनविण्यात लेखकाला यश आलेले आहे. हा प्रकार लै आवडतो आपल्याला. मस्तच!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अप्रतिम _/\_ मस्त!
खूप आवडली कथा!
बाकी सिरीज करायचा विचार अत्यंत रोचक आहे. पण खरं सांगु का? हे फुकटात नेटवर टाकु नका. अत्यंत कमर्शिअल व्हेल्यु जाणवतेय मला यात. मी काही प्रकाशक वगैरे नाही आणि मराठी पुस्तकांच मार्केटही मला माहीत नाही. पण तरीही आय सजेस्ट यु एक्स्प्लोअर देट ऑप्शन. फक्त मराठीच का मी तर म्हणेन की इंग्रजीत लिहायचा विचार करा. तिकडे नवलेखकांना जास्त संधी + मार्केट मिळेल असं वाटतय. खरंच या सजेशनचा गांर्भियाने विचार करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटी देशाच्या कल्याणाऐवजी मानवजातीचे चालले असते..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अश्या रहस्यकथा भारतीय पात्रांना घेवून आणि भारतीय (अगदी मराठमोळ्या) बाजात याआधी कधी वाचल्या/पाहिल्या नसल्याने ही कथा पटायला थोडी जड गेली. गरज नसतांना मनात सत्य-शक्यतांबद्दल तुलना होत होती.
पण हे पूर्वग्रह बाजून ठेवून वाचले तर एक काल्पनिक रहस्यकथा म्हणून खरोखरंच खूप रोचक आहे. मंदारचे कारनामे वाचायला आवडतील. ते नक्की लिका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

'टी. लोब्साङ्ग राम्पा' या लेखकाची 'The hermit' , 'Cave of the Ancients' ही पुस्तके वाचावीत असे सुचवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शालेय काळात मी लोबसंग राम्पाची तीन पुस्तके वाचली आहेत. तृतीय नेत्र, तिबेटी डॉक्टर आणि एक कुठलेसे. ती वर दिलेल्या पुस्तकांचेच भाषांतर होते का माहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ती अनुक्रमे The Third Eye आणि Doctor from Lhasa या पुस्तकाञ्ची भाषान्तरे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच
एकदम गुंगवून ठेवलं

पूर्ण कथा वाचून जयंत नारळीकरांची वामन परत न आला आठवली
अर्थात दोन्ही कथेचा परस्पर संबंध नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मस्त रे ऋ 'ओक'. पुढच्या कथेचा विचार मनावर घेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उत्तम दीर्घकथा!
आधीच्या भागांच्या मानाने शेवट थोडा सपाट वाटला. विशेषतः फातिमाला वाचवू शकत असतानाही त्यांनी तिला मरू दिले हे कळूनही मंदारचा फार काही तिळपापड न झाल्याने निराशा वाटली.
सगळं कळल्यावर आणि स्वतःच्या इंजिनिअर्ड असल्याची जाणीव झाल्यावर मंदार स्वत्व जपण्यासाठी नकार देतो असा शेवट मला कदाचित जास्त आवडला असता.
पण एकूण कथा आवडलीच. पुलेशु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'हअॅरी पॉटर अँड फिलॉसॉफर्स स्टोन' च्याधर्तीवर 'मंदार गोडसे आणि खजिन्याचा शोध' असं शिर्षक पाहीजे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0