'भावना दुखावल्या' मराठीत कसं म्हणाल?

भावना दुखावणं अाजकाल फार बोकाळलं आहे असं दिसतं. पण भावना दुखावल्या हे मराठीत किती वेगवेगळ्या पद्ध्तीनं म्हणता येतं? 'राग येणं' ह्या अर्थाचे अनेक शब्दप्रयोग मराठीत दिसतात - जसे अंगाचा तीळपापड होणं, किंवा पायाची आग मस्तकाला पोहोचणं वगैरे. किंवा इतरांना राग येईल असं वागणं ह्यासाठीदेखील मराठीत शब्दप्रयोग आहेत. उदा : खाजवून खरुज काढणं, जखमेवर मीठ चोळणं किंवा डोकं उठवणं. पण साधा राग येणं किंवा आणणं आणि भावना भडकणं किंवा भडकावणं यांत फरक आहे. तर मला पडलेला प्रश्न असा -

कुणीतरी कुणाच्यातरी 'भावना दुखावल्या' हे म्हणण्यासाठी मराठीत कोणते वेगवेगळे शब्दप्रयोग करता येतात?

आपल्याला सुचतील तसे शब्द किंवा वाक्प्रचार सांगा. प्रमाण मराठीतलेच असावेत असा आग्रह नाही. महाराष्ट्रातल्या विविध भागांत बोलल्या जाणाऱ्या स्थानिक भाषांमधले किंवा जातिविशिष्ट भाषांमधलेदेखील चालतील.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

डोक्याला शॉट !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

आता माझी सटकली रे.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे मात्र अति होतय.
वाट्टेल ते बरळलं की आपण फार शहाणे ठरतो नाही का?
कोणाला कशाचं अन बोडकीला केसाचं.
तारतम्य वापर बोलताना.
क्लेशदायक वागाणूक आहे. अशा प्रवृत्तींचा निषेध करावा तितका कमीच.
(भावना तीव्र दुखावल्या असल्यास)तळपट होवो मेल्याचा / सात पीढ्या नरकात जातील.

वरील वाक्यांवरुन बोलणार्‍या व्यक्तीच्या भावन दुखावल्या आहेत असा बोध होतो असे ढोबळमानाने म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोकं फिरवू नकोस.

चक्कीत जाळ झाला.

तो/ती/ते तर डोक्यात गेला/ली/ले.

पाखंडी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

1 ) डोक्याचा भाजीपाला केला अगदी

2) दिमाग का दही

3) जास्त पकवू नकोस

4) माईँड युअर बिझनेस

5) इटस नन आँफ युअर बिझनेस सो बेटर टु कीप युअर माऊथ शट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

डोक्याची मंडई...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

शब्दशः भावना दुखावण्याला बसणारे फार कमी आठवतायत, जवळपास वाटणारे खरडतोय

अबक गेला तेल लावत
कपाळात जाऊ नकोस/नेऊ नकोस
उडत जा
खड्ड्यात गेलास
पागल झाला का बे??
अगदी जवळचा मित्र/मैत्रीण असल्यास एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो देवबाबू? (साल्या कळत कसं नाय बे तुला?)
गझलवाला मित्र असल्यास "हमारे दिलसे मत खेलो खिलौना टुट जायेगा... "

असे काहीपण ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता भावना का दुखावल्या या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला वाटते कुणाच्या 'भावना दुखावल्या गेल्या' असे वाक्य छापील स्वरूपात अधिक आढळते.
बोलताना, 'क्षच्या भावना दुखावल्या गेल्या' पेक्षा 'क्ष दुखावला गेला' असे आपण म्हणतो.

दुखावलेल्या भावना कुठल्या प्रतिक्षिप्त क्रियेकडे नेतात यावरून वाक्प्रचार तयार होतो असे साधारण दिसेल.
उदा.
डोक्याला शॉट लागणे - यात त्रागा अधिक आहे.
खड्ड्यात गेलास - यात बेदरकार वृत्ती आहे.
इ. इ.

दुखावलेल्या भावना रागा / त्रागापेक्षा दु:खाकडे नेणार्‍या असतील तर -
१. मनाला डागण्या देणे
२. जिवाचा चोळामोळा करणे
३. काळिजाला घरे पाडणे
४. जिवावर वार करणे
५. अन्तःकरण पिळवटून टाकणे
६. मर्मावर आघात होणे
७. वर्मी लागणे
८. जिवाला लावून घेणे

इ. इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. काव्य एक जुनं शस्त्र आहे, फार प्रभावी असल्याचं जाणवतं.
शब्द भसाभसा भावना ढसाढसा,
विचार काटेकुटे भावना भळाभळा,
तुझे ते विचार, माझे ते विकार,
तु विचार 'ढ'कार, मी भावना 'भ'कार.

खालील प्रयोग "कट्ट्यावरचे शब्दप्रयोगा"तून साभार

२. आज १५ किलो भावना दुखावल्या.

३. हीच ती वेळ, हेच ते शब्द, तेच ते दुखणं.

४. तुला विचार-जंत झालेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यु ठेचिंग माय इमोशन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

यु ठेचिंग माय इमोशन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

>>>कुणीतरी कुणाच्यातरी 'भावना दुखावल्या' हे म्हणण्यासाठी मराठीत कोणते वेगवेगळे शब्दप्रयोग करता येतात? <<<

१. अमुक गोष्टीमुळे तमुकला/तमुकांना वेदना झाल्या.
२. अमुक गोष्टीमुळे तमुकच्या/तमुकांच्या अस्मितेचा अंगार फुलला/अस्मितेची ठिणगी पडली.
३. अमुक गोष्टीमुळे तमुकच्या/तमुकांच्या हृदयाला घरं पडली.
४. अमुक गोष्टीने तमुकच्या/तमुकांच्या हलो हलोला हलकट उत्तर दिल्यासारखं झालं.
५. अमुक गोष्टीमुळे तमुकच्या/तमुकांच्या कोवळ्या फुलांसारख्या भावनांचं निर्माल्य झालं.
६. अमुक गोष्टीमुळे तमुकच्या/तमुकांच्या भावनांवर केवल शेणसडा पडला.
७. अमुक गोष्टीमुळे तमुकच्या/तमुकांच्या भावनांची चोंदी झाली.
८. अमुक गोष्टीमुळे तमुकच्या/तमुकांच्या भावनांचं ठसठसणारं गळू फुटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अमुक या शब्दाचा वाआपर ऐसी अक्षरेवर जपून करावा अशी अनाहूत विनंती. Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यातला पंच - किंवा पञ्च - बरोबर कळला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सदस्याञ्च्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून घेतलेल्या अतोनात काळजीबद्दल दोघां व्यवस्थापकाञ्चे आभार.
तरी बरे; 'भावना' नामक कुणी सदस्य अजून तरी आलेले नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऊं ऊं ऊं
सगळे वाईट्ट लोकं सतत 'भंजाळलेली अस्मिता' वगैरे म्हणत असतात तेव्हा आमच्या भावना दुखावतात/डोक्याला शॉट/चक्कीत जाळ वगैरे वगैरे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राग येणं/आणणं हे व्यक्तिगत पातळीवर होऊ शकतं..पण भावना दुखावल्या हे मुख्यत्त्वे एखाद्या समूहाच्या बाबत म्हटलं जातं (मला तसं वाटतं...शब्द्कोश वगैरे मी पाहिलेले नाहीत). अमक्यांच्या भावना दुखावल्या म्हणजे, अमक्यांच्या श्रद्धेचा/श्रद्धास्थानाचा अवमान/अपमान (?) झाला असं म्हणता येईल. अमक्यांच्या 'नाकाला मिरच्या झोंबल्या' असेही विशिष्ट परिस्थितीत म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आतापर्यंत आलेल्या प्रतिसादांबद्दल आभार. बऱ्याचशा प्रतिसादांमध्ये बोलीभाषांतले प्रयोग आहेत आणि ते रोचकच आहेत. त्या व्यतिरिक्त अधिकृत किंवा प्रमाणभाषेत काय काय म्हणता येईल याबद्दलदेखील मला कुतुहल आहे. उदाहरणार्थ, भारतीय दंडविधानातल्या '२९८' आणि '२९५ अ' कलमांमध्ये धार्मिक भावना दुखावण्याबद्दलची तरतूद आहे. '१५३ अ'मध्ये दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याबद्दलची तरतूद आहे. ह्या सर्वाचं अधिकृत (सरकारी) मराठी भाषांतर जालावर कुठे मिळेल का? त्यात वापरलेली भाषा नेमकी काय आहे ते मला हवं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मुळात 'भावना दुखावल्या जाणे' ही संकल्पनाच आधुनिकोत्तर असल्याने त्याबाबत फारसे (प्रचलित) शब्दप्रयोग सापडतील याबाबत साशंक आहे. अर्थात आधुनिकोत्तरतेचा आव आणणारे काहीतरी शब्दप्रयोग बनवून समोर सांडतील पण... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

शिवाय आधुनिकोत्तर संवादाची भाषा इंग्रजी असल्याने मराठी शब्दप्रयोग मिळणे अवघडच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.