Skip to main content

!! नालायक !!

व्यस्त या जगात कोणास वेळ आहे
कौतुक का करावे नालायक हेच आहे,

असुर महागाईचा गरिबास खात आहे
नालायक सेवकांचे भरलेच ताट आहे,

शतक पूर्वी जेव्हा होऊन गेले राजे
त्या महाराष्ट्रात आज नालायाकांचे राज्ज्य आहे,

ना-लायकी कुणाची हा देश चालवायची
प्रत्येक माणसाचा कर्जत जन्म आहे,

नालायक राज्यकर्ते अन जन तसेच आहे
या सुवर्ण भूमी मध्ये टाकलेत विष आहे,

जर परत आले राजे तरी त्यांचे कोण आहे
या लाचार जगात मावळेच चोर आहे,

जर घडवली क्रांती तुम्ही इथे राजे
तुम्हा पकडण्या हि सरकार सज्ज आहे,

या दुष्ट जगात राजे नका घेऊ जन्म
नालायक जगामध्ये तुमचे न कोण आहे.....

- गौरव खोंड
९०२८४३१०६२/८८०५९८९८९५