पोलिस - एक छोटासा अनुभव

गोरेगाव येथील एका सिग्नलला थांबलेलो असताना एका पोलिस हवालदाराशी झालेला माझा संवाद...

मी - साहेब, एक विचारू का?
पो.ह. - बोला.
मी - तुमचं हेल्मेट कुठाय?
पो.ह. - तुमाला काय करायचा?
मी - अहो, पोलिसांनीच नियम नाही पाळले तर बाकी जनता काय करणार?
पो.ह. - तुमी तुमचं काम बघा.
मी - नाही, तरी पण सांगा ना.
पो.ह. - ए, तुला काय करायचाय? पोलिस स्टेशनवर हाय.
मी - डोकं सोबत आणलं आणि हेल्मेट पोलिस स्टेशनवर? का डोकं पण तिथेच ठेवलंय?
पो.ह. - ए *सडीच्या, माज चढलाय का?
मी - अहो, मी हेल्मेट घातलंय, तुम्ही नाही. मग सांगा माज कोणाला आहे?
पो.ह. - ए *वड्या, तू घातलंय ना? मग बस गप. आम्हाला कामं असतात, हे सगलं करत रायलो तर कामं नाय होनार.
मी - साहेब, आम्ही अशी कारणं सांगितलेली चालत नाहीत तुम्हाला. आम्हाला कामं असली तरी तुम्ही पावती फाडतातच. तुमची पावती कोणी फाडायची?
(ह्या वाक्यावर आजूबाजूचे चारदोन जण हसायला लागले.)
पो.ह. - तुला फाडाची हाय? फाड.
मी - तेवढं कुठलं भाग्य आमचं? पावती पुस्तक आणि अधिकार असता तर नक्की फाडली असती पावती.
(तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला.)
पो.ह. - ए *डेच्या, तुज्या **ची *ड, घे गाडीचा लंबर लिऊन आन कर कंप्लेन.
मी - कुठे करायची कंप्लेंट?
पो.ह. - ए, *दरचो*, नेऊ का तुला पोलिस स्टेसनवर? तुज्या *डीत बांबू घालतो बग आता.
मी - चला, जाऊयात पोलिस स्टेशनवर. कुठल्या स्टेशनवर जायचं?
पो.ह. - तुज्या आ** *च्ची* माजा *ड. आत्ता काम हाय मनून सोडतोय तुला. परत भेटलास ना, अशी *ड मारतो बग तुजी.
मी - अहो, परत कशाला? आत्ताच बोला ना काय ते. चला की पोलिस स्टेशनवर.
मी - ओ साहेब...
मी - ओ साहेब...

पोलिस हवालदार साहेब भराभर लेन बदलत, दुसऱ्या गाड्यांना कट मारत निघून गेले. घाईत होते ना...

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

असे अनुभव कोणाला न येवोत, असे करून काही फरक पडणारे का??? बदल घडणारे का???

मला पासपोर्ट व्हेरिअशन झाल्यावर अ‍ॅप्रूव करण्याचे पैसे मागितलेले. आता मला मागितलेले पैसे शांतपणे मी देऊन टाकतो. ____देणे घेणे याच्याशी मला मतलब नाही, काम संपवण्याशी आहे...पावती असली नसली तरी मला फरक पडत नाही.. पोलिसांकडे गेले काय आणि सरकारकडे काय दोघेही चोरच ना ...

तुम्हाला असे का करावेसे वाटले हे जाणून घेण्यास उत्सुक आहे .

पुण्यात असताना, एका मित्राचा मोबाईल चोरला गेला. त्याला रितसर तक्रार नोंदवायची होती. तो गुज्जू, मराठी समजते, पण नीट बोलता येत नाही म्हणून मी त्याच्याबरोबर मुद्दामच पोलिस स्टेशनला गेले होते. पोलिसांनी तक्रार लिहून घ्यायला रितसर टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करून शेवटी तक्रार लिहून घेतली. तक्रारीची प्रत हवी आहे म्हटल्यावर "समोरच्या झेरॉक्सवाल्याकडे घेऊन जा आणि येताना पन्नास कागद आणा." असं सांगितलं. आम्ही रितसर आमच्या सरकारी हापिसात परत गेलो, तिथे फुकटात प्रत काढली, पन्नास कागद घेतले आणि पोलिसांना नेऊन दिले.

आमच्या दोघांच्या "निरागस" चेहेर्‍यांकडे पाहून पोलिसांनी जे हातात आलं ते निमूटपणे स्वीकारलं.

---

पासपोर्टच्या वेळेस पोलिसांनी मला बरेच कागद आणायला पिटाळलं. मी शांतपणे सगळे कागद नेऊन दिले. "चहापाण्याचं काय" विचारल्यावर, "शेजारची टपरी आत्ता बंद होताना पाहून आले" असं उत्तरही तेवढ्याच "निरागस"पणे दिलं होतं. लेट करंट असण्याचा फायदा होतो तो असा!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही अशी संभाषणे करायच्या वेळी तुम्ही तुमचा सेलफोन क्यामेरा - किमान ऑडियो रेकॉर्डर - चालू ठेवता का ? किंवा मिडियामधे तुमची काही ओळख वगैरे आहे/नाही याचा काही विचार करता का ?

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

गंमतीशीर संवाद आवडला.
काल्पनिक असावा.
पो हे कॉं खाकीवाले होते की पांढरे हे संवादातून समजत नाही.
जर खाकीवाले असतील आणि असे निघून गेले असतील तर नक्कीच खरे कॉं नसावेत.
कुणी तोतया पोलिस किंवा बहुरूपी असल्याने निघून गेले असावेत. तुम्ही वाचलात.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मन्दार,

१. सहा वर्षांपूर्वी पुण्यात मी घर भाड्यावर घेऊन राहत असताना माझ्या घरी चोरी झाली होती; त्यात माझा कॅमेरा चोरीला गेला. घरमालक शेजारच्या फ्लॅटमध्येच राहायचे. घरमालकांची एकही वस्तू चोरीला गेली नाही. त्या रात्री मी मुंबईत होतो. दुसर्‍या दिवशी घरमालकांसोबत मी पोलिस स्टेशनात चोरीची तक्रार करायला गेलो असता तिथल्या पोलिसाने माझ्यावरच चोरीचा कट रचल्याचा आळ आणला आणि आज ज्याप्रकारे अपशब्दांचा वर्षाव केला तसाच (किंबहुना थोडासा जास्तच) तेव्हा देखील केला. घरमालकांनी 'आम्ही ह्याला गेली चार वर्षे व्यवस्थित ओळखतो' अशी खात्री देऊन आणि मी माझे मुंबईचे यायचे-जायचे तिकिट दाखवून देखील तो पोलिस सरळ बोलेना तेव्हा माझ्या घरमालकांनी वरिष्ठ पोलिसनिरीक्षकाला मध्ये पडण्याची विनंती केली आणि तो पोलिस गप्प बसला.
२. तीन वर्षांपूर्वी माझे पदवीचे प्रमाणपत्र हरवले होते. त्याची दुसरी प्रत मिळण्यासाठी पोलिसांच्या एफायारची आवश्यकता होती. त्यावेळी देखील 'हे लोक कशा खोट्या तक्रारी करतात' हे ऐकण्यायासोबत थोडा अपशब्दांचा फराळ मला करावा लागला होता. त्या पोलिसाच्या हातावर शंभर रुपये ठेवल्यावर त्याने तक्रार नोंदवून घ्यायला लेखणी उचलली.

पोलिसांच्या माजाचा असा अनुभव आल्याने आज संधी आली होती, त्यामुळे राहावले नाही.

मनोबा,

हा संवाद काल्पनिक नाहीये. आजच दुपारी घडलेला आहे. हे पो.ह. खाकीवाले होते, पांढरे नव्हे. बहुरूपी होते की नव्हते हे कळायला मार्ग नाही. हा संवाद गर्दीच्या ठिकाणी झाला असल्याने कदाचित ते निघून गेले असावेत. 'पावती फाडण्याच्या' माझ्या टिप्पणीवर शेजारच्या दोनचार बाइकवाल्यांनी माना डोलावून आणि 'हो हो' म्हणून मला पाठिंबा दर्शविला होता; कदाचित त्याचा देखील परिणाम असावा.

मुसु,

सेलफोन रेकॉर्डर सुरू केला पाहिजे होता; पण हे त्यावेळी सुचलं नाही. आणि मी एकटाच होतो, माझ्या मागे कुणीतरी बसलं असतं तर कदाचित रेकॉर्डिंग करता देखील आलं असतं. पुढल्या वेळी नक्कीच प्रयत्न करेन. ह्यापूर्वी सेलफोन कॅमेराने फोटो बरेच काढले आहेत.

चैत रे चैत.

सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे

>>सेलफोन रेकॉर्डर सुरू केला पाहिजे होता; पण हे त्यावेळी सुचलं नाही. आणि मी एकटाच होतो, माझ्या मागे कुणीतरी बसलं असतं तर कदाचित रेकॉर्डिंग करता देखील आलं असतं. पुढल्या वेळी नक्कीच प्रयत्न करेन. ह्यापूर्वी सेलफोन कॅमेराने फोटो बरेच काढले आहेत.

माझ्यामते फोटोजपेक्षा व्हिडिओ रेकॉर्डींग अधिक चांगलं - किंबहुना आवश्यक - ठरावं.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मोबाइलवरून वीडिओ रेकॉर्डिंग कितपत चांगलं होईल ही शंका आहे. त्यात तो रस्ता इतका गर्दीचा होता की तेव्हा आवाज किती चांगल्या प्रकारे रेकॉर्ड झाला असता ही दुसरी शंका.

सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे

अवघड आहे..
पण थोडं त्यांच्या दृष्टीकोनातून पण पाहता येईल का?
पेपरमधल्या, खास करुन खून वगैरेच्या बातम्या वाचल्यावर आपल्यावरच एवढा परीणाम होतो.. ते सगळं प्रत्यक्ष हँडल करणार्या पोलिस, डॉक्टरांवर किती मानसिक परीणाम होत असेल..
आणि पगार कितीसा असतो हो त्यांचा?
ट्रेफिक पोलीस केवढे तास उन्हात उभे असतात..
परत राजकारणी, वरीष्ठ यांचा त्रास आहेच..

===
Amazing Amy (◣_◢)

*** च्या सगळ्या शिव्या झटकन ओळखता आल्या त्यामुळे आत्मविश्वास वाढला.

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !

बरोबर आहे तुमचं. जावे त्याच्या वंशा.
आपण भारतात राहतो अन हामेरीकेनांसारखे नियम पाळण्याचा प्रयत्न करतो. कदाचित त्याच्या जागी कुणी आपल्यापैकी असते तर त्याने देखील हेल्मेट घातले नसते.
बाकी त्या पोलीसाचे शिव्या देणे पटत नाही. तो सबुरीच्या भाषेतही बोलू शकला असता.


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

तुमच्या चिकाटीला आणि सहनशक्तीला सलाम !

माझ्या एका मित्राने तीन आठवड्यापूर्वी केलेला कारनामा: सीट-बेल्ट न लावल्याबद्दल तो काँन्ट्रॅन्टवाला हवालदार असतो नं (पांढराशर्ट, निळी पँट गणवेशवाला) तो त्याच्या गाडीचा दरवाजा उघडून बाजुच्या सीटवर येऊन बसला. तर या पठ्ठ्यानआपल्यात्याचा हात पोचेल अश्या अंतरावरचे आपले आयकार्ड, मोबाईल व इतर महत्त्वाचा दस्तैवज बॅगेत भरला आणि मग त्याच्यासकट गाडी घेऊन भरधाव चालु लागला. त्याला काय करावे कळले नाहि. "थांबव.. थांबव + काहि शिव्या या व्यतिरिक्त तो काहि बोलु शकत नव्हता". मित्र गाडी थांबवेना तेव्हा त्याने त्याच्या 'साहेबां'ना याला खडसवण्यासाठी स्पीकरवर फोन लावला तर साहेबही हसून बेजार, शिवाय रोजचे बकरे सोडून इत्तक्या लांब त्याला घ्यायला येइनात.. मित्रानी हा प्रसंग अश्या मराठवाडी ढंगात सांगितले की हसून बेजार झालो होतो!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रकाटाआ

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

तुमच्या मित्राचा जोरदार निषेध...
एक तर सीट-
बेल्ट लावला नाही, दुसर म्हणजे तो हवलदार लाच मागत होता का? सरळ चुक मान्य करुन पावती फाडायची ना.
उगाच काँन्ट्रॅन्टवाला हवालदार पाहुन अगाउपणा करायचा.
एकतर काँन्ट्रॅन्ट काम म्हणजे नोकरीची शाश्वती नाही, पगारदेखील कमी, उन्हातान्हात पुण्यासारखं गचाळ ट्रेफिक कंट्रोल करायच...
कधी नीट पाहीलय का ट्रेफिक पोलीस, बस ड्रायव्हर, कंडक्टर ना? बरेचसे हडकुळे असतात बिचारे, २ वेळ नीट जेवायला मिळत असेल की नाही सांगता येत नाही, परत घरी चार तोँड खाणारी असतात.
चुक नसताना पकडलं त्यांनी तर समजु शकते..
पण चुक असताना उगाच एसी कार मधे बसून आयटीत काड्या करायच्या..
निषेध.

===
Amazing Amy (◣_◢)

आवडला! तुमच्या धैर्याचे अन हजरजबाबीपणाचे कौतुक आहे.

आम्हालाही एकदा असंच पोलिसांनी (हफ्ता वसुली आठवड्यात) पकडला होता. नो यु टर्न-ला यु टर्न घेतला म्हणून दंड भरा. पण तिथे नो यु टर्न असं कुठे लिहलेलंच नव्हतं, आम्ही हवालदाराला म्हणालो नो यु टर्नचा बोर्ड दाखव दंड भरतो. त्यालाही बहुतेक माहित नव्हतं बोर्ड नाहीए, आम्ही त्याच्याबरोबर जाऊन कुठे बोर्ड दिसतोय का पाहिलं, पण बोर्ड नव्हताच. मग लगेच त्याने तुम्ही 'रेड सिग्नल तोडलात' वगैरे चालूगिरी सुरु केली. मग आम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे (ज्या तिथेच एका मोटरसायकलवर निवांत बसल्या होत्या) गेलो, त्यांना म्हणलं असं असं आहे, अन हा थापा मारतोय.) पाच दहा मिनिटे वादावादी झाली आणि यांच्याकडून काही वसुली व्हायची नाही हे कळल्यावर त्यांनी आम्हाला सोडून दिले.

एकदा तर भारीच गंमत झालेली. बादशाही बोर्डिंगपासून उजवीकडे जाणारा वनवे आहे, आम्हाला खात्री नव्हती (अन बोर्डही दिसत नव्हता), म्हणून तिथेच उभ्या(त्याच बोळाच्या तोंडापाशी) असलेल्या पोलिसाकडे थेट गेलो विचारयाला. त्याने लगेच वनवेत गाडी घुसवली दंड भरा म्हणून टेप लावली. आम्हाला गाडी लावून चहाच्या दुकानात बोलावले, मग आम्ही तिथे जाऊन नेहमीप्रमाणे हुज्जत घालू लागलो. (तसे आम्ही दमड्या सहजी मोजत नाही!) तेव्हढ्यात बहुतेक त्यांचा दुसरा बकरा आला, आम्ही पण 'चान्स पे डान्स' करून फुकटात सुटका करून घेतली. हवालदारही हुशार होता, त्याला माहित होतं आमच्याकडून काही सुटायचं नाही आणि आमची हुज्जत पाहून तो दुसराही हुज्जत घालायचा, म्हणून त्यानेही आम्हाला सोडून दिलं असावं.

असं खरंतर न विचारता गाडीत जाऊन बसणं बरोबर आहे का? (तसे झाले आहे असे समजून)

तुम्ही म्हणता तसे असतीलही हडकुळे अनेक, पण आमच्या अंगावरही चरबी अशीच थोडीच चढलीए. (नाही म्हणजे सद्ध्याचं सोडा.. अमेरीकेत मेले सगळ्यात चीझ घालतात म्हणून हो... )

blockquote>काँन्ट्रॅन्टवाला

ही काय भानगड आहे? दोघांनीही काँट्रॅक्टचा टायपो केल्याची शक्यता कमी आहे म्हणून विचारतोय.

उन्हात थांबुन दमला होता तो बिचारा म्हणुन एशी कारमधे २ ५ मिन्ट बसावं असं वाटलं त्याला.
अरे वा वा चढली का चरबी अंगावर एटलास्ट. अभिनंदन.
काँन्ट्रॅन्टवाला >> ही कॉपीपेस्टची भानगड आहे..

===
Amazing Amy (◣_◢)

उन्हात थांबुन दमला होता तो बिचारा म्हणुन एशी कारमधे २ ५ मिन्ट बसावं असं वाटलं त्याला.

एकाच जागी थांबलेल्या कारपेक्षा चालणार्‍या कारचा एशी जास्त थंड हवा देतो. शिवाय चारचाकीची चक्करही मिळाली!

अरे वा वा चढली का चरबी अंगावर एटलास्ट. अभिनंदन.

एटलास्ट? लास्टिंग दिसतीए अन एटलासही बदलतोय. पण एटलास्ट बद्दल खात्री नाही. Wink

Smile निषेध +१
तरीही किस्सा ऐकताना हसून हसून बेजारच झालो होतो.. "पाशवी आनंद" का काय म्हंटात ते हेच असावं Wink

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"पो.ह. - ए *डेच्या, तुज्या **ची *ड, घे गाडीचा लंबर लिऊन आन कर कंप्लेन."
ही 'धमकी' देऊ शकणं हेच आपल्या कमकूवत न्याय व्यवस्थेचं लक्षण आहे.

सामान्य नागरिकांनी तुम्ही दाखवली तशी जागरूकता दाखवली तर फायदाच होईल.

खर्या धेंडांना शिक्षा देऊ शकण्याची कूवत (?) नसल्यामुळे ऋषिकेश यांनी वर्णन केलेल्या सारखा 'पाशवी आनंदच' घेऊ शकतो.

जावे त्याच्या वंशा.

खरंय. पण तरीही कामचुकारपणा, लाचखाऊपणा, माज, सामान्य नागरिकांना उगीच छळणे, इत्यादी गोष्टींचे समर्थन करता येत नाही हो. उद्या 'माझं माझ्या बायकोशी भांडण झालं म्हणून मी वेगाने गाडी चालवली आणि २-३ लोकांना उडवलं' असं म्हटल्यावर एखाद्याची शिक्षा कमी नाही होणार!

आपण भारतात राहतो अन हामेरीकेनांसारखे नियम पाळण्याचा प्रयत्न करतो.

हे काही कळलं नाही बुवा. हामेरिकेनांसारखे नक्की काय? नियम, पाळणे का पाळण्याचा प्रयत्न? आणि ते काहीही असलं तरी (आणि कोणाही सारखं असलं तरी) नियम का नाही पाळायचे ते कळत नाही. हेल्मेट न घालता दुचाकी चालवणारा हामेरिकेन मरेल पण भारतीय नाही मरणार काय?

नियम न पाळणार्‍या लोकांकडून दंड वसूल केल्याने सरकारी महसूल वाढतो म्हणून सरकारने नियम बनवले आहेत, असं वाटतं बर्‍याच लोकांना. गमतीचा भाग असा की हेच महाभाग स्वत: वाहतूककोंडीत अडकले की मध्येच घुसणार्‍यांना (त्या पोलिसासारख्याच) शिव्या घालतात.

असो...

सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे

ही 'धमकी' देऊ शकणं हेच आपल्या कमकूवत न्याय व्यवस्थेचं लक्षण आहे.

अगदी खरं बोललात.

सामान्य नागरिकांनी तुम्ही दाखवली तशी जागरूकता दाखवली तर फायदाच होईल.

खरंय. पण अडचण एकजुटीची येते. हा प्रसंग घडला त्यावेळी रस्त्यावर बरीच वाहतूक होती. हा रस्ता जरा कमी वर्दळीचा असता तर वर काही जणांनी व्यक्त केलेल्या शंकेप्रमाणे माझी काही धडगत नव्हती. 'तुज्या *डीत बांबू घालतो बग आता.' ही बत्तिशी त्याने नक्कीच खरी करून दाखवली असती. पुन्हा मी काही प्रतिकार केला असता तर गणवेषातल्या पोलिसाला मारहाण केल्याचा आरोप माझ्यावर झाला असता. आजूबाजूची गर्दी पाहून मी ही हिम्मत दाखवली.

सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे

किस्सा वाचून हसू आले.