रविवार आज रविवार -

रविवार आज रविवार
किती छान छान वार
अभ्यास नाही शाळा नाही
खूप मजेचा आज वार !

मारामारी आणि कुस्ती
येत नाही मुळीच सुस्ती
खेळ खेळण्यांची कमाल
दिवसभर नुसती धमाल !

दिवसभर खाणेपिणे
नाचणे अन् हुंदडणे
गट्टी फू अभ्यासाशी
कट्टी फक्त खेळण्यांशी !

नाही धपाटा आईचा
नाही रट्टा बाबांचा
ताईचे ऐकायचे नाही
दादाशी बोलायचे नाही !

दोस्तमंडळ झिंदाबाद
मौजमस्ती झिंदाबाद
धिंगाणा गाणे गाणी
रंगीत फुग्याची पिपाणी !

रविवार हो रविवार
आमचा आवडता वार
घरात आणि मैदानात
दंगामस्ती चालणार !
.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खूपच छान. (नवीन काळातली मुले असे वागतील असे वाटत नाही. बाबांचा मोबाईल अन टिव्ही आहे की त्यांच्यासाठी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही