झुक झुक गाडी -

मित्रांनो या, मैत्रिणीनो या
एकामागे एक उभे राहूया -

दंगामस्ती कमी करूया
झुकझुकगाडी खेळ खेळूया ,

दादा ड्रायव्हर पुढे नेहमी
सर्वामागे गार्ड हजर मी -

हिरवी निशाणी दाखवली
दादाने कुकशिटी वाजवली -

भाकचुक भाकचुक
भाकचुक भाकचुक !

धुराविना ही धावते गाडी
रुळाविना ही पळते गाडी -

जिथून निघालो तिथे जाणार
सांगा आणखी कोण येणार ?

इथेच सगळयाना फिरवीन
गोलगोल चकरा मारीन तीन -

भाकचुक भाकचुक
भाकचुक भाकचुक !

सिग्नल नाही- स्टेशन नाही
गाडी चकरा मारत राही -

छान छान आवाज गाडीचा
गोंगाट सगळ्यांच्या आवडीचा ,

आपल्या तीन चकरा झाल्या
सगळे तयारीत रहा.. उतराया ,

फुर्रर्रर्र शिट्टी मी वाजवली
झुकझुकगाडी ही थांबवली -

भाक चूक भाक चूक
भाक चूक भाक चूक !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

झुक झुक गाडी हा लहान मुलांचा आवडीचा विषय. या विषयावरच्या अनेक बालकविता अनेकांना माहिती असतील. माझ्या आईच्या तोंडून ऐकलेली ही कविता. संपुर्ण कविता आता आठवत नाही, कोणाला आठवत असेल, तर पूर्ण करा.

गाडी आली, गाडी आली, झुक झुक झुक
शिट्टी कशी वाजे बघा कुक कुक कुक

इंजीनाचा धूर निघे भक भक भक
चाके पाहू तपासून ठक ठक ठक

तिकिटाचे पैसे काढा छन छ्न छन
गाडीची ही घंटा वाजे घण घण घण

नका पाहू डोकावून शुक शुक शुक
गाडी आता निघालीच झुक झुक झुक

जायाचे का कोठे तुम्हा दूर दूर दूर
चला जाऊ गाडीतून भूर भूर भूर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती वर्षांनी हे गाणे नजरेस पडले ! धन्यवाद. दुर्दैवाने मलाही इतकेच आठवत आहे.

माझे आवडते आगगाडीचे गाणे पुढील - आशीर्वाद चित्रपटातील (बहुधा भारतीय चित्रपतातील पहिले रॅप-गाणे Lol

रेल गाडी ....

रेल गाडी - रेल गाडी
छुक छूक छुक छूक - छुक छूक छुक छूक
बीच वाले स्टेशन बोले
रुक रुक रुक रुक - रुक रुक रुक रुक
थडक - फडक लोहे की सडक
थडक - फडक लोहे की सडक
यहाँ से वहाँ - वहाँ से यहाँ
यहाँ से वहाँ - वहाँ से यहाँ
छुक छूक छुक छूक - छुक छूक छुक छूक

छाती फुलाती - पार कर जाती
बालू - रेत , आलू के खेत
बाजरा - धान, बुढ्ढा किसान
हरा मैदान, मंदीर मकान , चाय की दुकान...
फुल, पगडंडी, टीले पे झंडी,
पानी का कुंड, पंछी का झुण्ड
झोपडी - झाडी - खेती - बाडी
बादल - धुँआ, मोट - कुँवा
कुँवे के पीछे बाग़ बगीचे
नदी का घाट, मंगल की हाट
गाँव में मेला, भीड़ - झमेला
टूटती दीवार, टट्टू सँवार ......

रेल गाडी - रेल गाडी
छुक छूक छुक छूक - छुक छूक छुक छूक
बीच वाले स्टेशन बोले
रुक रुक रुक रुक - रुक रुक रुक रुक

धरमपुर- भरमपुर , भरमपुर - धरमपुर
बंगलौर- मंगलोर , मंगलोर - बंगलौर
खांडवा - मांडवा , मांडवा - खांडवा
शोलापुर - कोल्हापूर , कोल्हापूर - शोलापुर
जयपुर - रायपुर , रायपुर - जयपुर
गोरेगाव - कोरेगाव , कोरेगाव - गोरेगाव
उत्कल - डंडीगल , डंडीगल - उत्कल
मछलीपक्कम - इमलीपक्कम , इमलीपक्कम - मछलीपक्कम
अहमदाबाद - महमदाबाद , महमदाबाद - अहमदाबाद

छुक छूक छुक छूक - छुक छूक छुक छूक
थडक - फडक लोहे की सडक
यहाँ से वहाँ - वहाँ से यहाँ
छुक छूक छुक छूक - छुक छूक छुक छूक
कूssssss

गीतकार - हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय (तेच ते - 'बावर्ची' चित्रपटातील घरातले सर्वात ज्येष्ठ सदस्य)

अवान्तर : दिलेल्या दुव्यातील दुसरे गाणे - 'नाव चली, नानी की नाव चली' हेदेखील भन्नट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कविता नै जमलिये Sad
विषय अतिपरिचयाचा असल्याने वर सानिया यांनी दिलेली कविता, कशासाठी पोटासाठी वगैरेंशी नकळत तुलना होते हे मान्य

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!