संख्याशास्त्रातील विश्लेषणासाठी मदत

एका संशोधन प्रकल्पातील सांख्यिकी विश्लेषणासाठी (Statistical Analysis) मदत हवी आहे. मदतकर्त्याला शक्यतो SPSS या संगणकीय आज्ञावलीचे ज्ञान असावे. संशोधनासाठीच्या प्रश्नावलीची छाननी करणे, विदा संकलन करण्यास मदत करणे, जमा झालेल्या विद्याची साफसफाई करणे , विद्याचे विशेषण करणे आणि या सगळ्यांतून निघणारे निष्कर्ष संकलित करणे असे या कामाचे स्वरुप आहे. या व्यतिरिक्त या संशोधनातील परिकल्पनांची / गृहितकांची / गृहितकृत्यांची पडताळणी करणे ( Hypothesis testing) आणि शोधपद्धती (Research Methodology) या विषयावर इंग्रजीतून चार शब्द लिहिणे हेही करता आले तर सोन्याहून पिवळे.
सदर प्रकल्प पुण्यात करायचा आहे, अर्थात मदतकर्ता / ती पुण्यात असला/लीच पाहिजे असे नाही. या कामासाठी योग्य मोबदला व (अर्थातच) कृतज्ञता दिली जाईल. इच्छुकांनी कृपया व्यक्तिगत निरोपांतून संपर्क साधावा. धन्यवाद.
ता.क. एक गंमत म्हणून या आवाहनात काही अपरिचित मराठी शब्द वापरले आहेत. एरवी हे आवाहन आणि हा प्रकल्प हे सगळे खरे आणि गंभीर आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

> विद्याची साफसफाई करणे

मला वाटतं यासाठी विद्याच्या अाईची परवानगी घ्यावी लागेल...

> विद्याचे विशेषण करणे

विशेषनामाचं विशेषण करायचं तर तर्खडकरांचीही परवानगी लागेल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

> विद्याची साफसफाई करणे

मला वाटतं यासाठी विद्याच्या अाईची परवानगी घ्यावी लागेल...

विद्या कायद्याने सज्ञान असण्याची शक्यता आपण लक्षात घेतली आहे काय?

(अर्थात, कायद्याने सज्ञान असो वा नसो, विद्याचा भाऊ (असल्यास) किंवा बाप (असल्यास) प्रस्तावकाची साफसफाई करण्याचा आपला 'जन्मसिद्ध' हक्क बजावण्याची शक्यता 'आपल्या संस्कृती'त लक्षात घ्यावी लागेलच. किंवा, विद्या विवाहित असल्यास कदाचित तिचा नवराही. (बहुधा कोणत्याही संस्कृतीत.))

> विद्याचे विशेषण करणे

विशेषनामाचं विशेषण करायचं तर तर्खडकरांचीही परवानगी लागेल...

याबाबत साशंक आहे. सीतेचे हरण करण्यापूर्वी रावणाने नेमकी कोणाची परवानगी घेतली होती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

R का नाही?

किती डेटा आहे?
किती वेळात काम करणे अपेक्षित आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0