कॉकटेल लाउंज : स्मूथ मॅन्गो टॅन्गो

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ स्मूथ मॅंन्गो टॅन्गो

पार्श्वभूमी:

उन्हाळ्याच्या चाहूलीबरोबरच आंब्याची चाहूलही लागली आहे. बाजारात आंब्यांची आवक हळूहळू सुरू झाली असली तरीही घरोघरी आंब्याचा मोहक दरवळ पसरायला म्हणावी तशी सुरूवात अजून झालेली नाहीयेय. ह्या वर्षीचा उन्हाळा, आंबे स्पेशल कॉकटेल्सनी, 'ग्रीष्म ऋतु लाउंजोत्सव' असा दणाणून सोडायचा विचार आहे. त्यातले हे पहिले कॉकटेल, स्मूथ मॅन्गो टॅन्गो.

खर्‍याखुर्‍या आंब्याचे नसले तरीही, आंब्याचे आइसक्रीम आणि आंब्याच्या रस यांचा वोडकाला दिलेला ट्वीस्ट म्हणजे आजचे हे कॉकटेल. हे माझे इंप्रोवायझेशन, 'लेडिज स्पेशल' कॅटेगरीमध्ये बसवायचे होते, त्यामुळे फक्त वोडका एवढाच बेस वापरून हा प्रयत्न केला आहे. त्यात पुढ्च्या कॉकटेल्समध्ये आणखिन प्रयोग करून 'मिक्सॉलॉजी'च्या वेगवेगळ्या खुब्या वापरून चव आणि लज्जत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे.

प्रकार वोडका बेस्ड कॉकटेल, लेडिज स्पेशल
साहित्य
वोडका 1 औस (30 मिली)
आंब्याचा ज्यूस 2 औस (60 मिली)
आंब्याचे आइसक्रीम 2 स्कूप
बर्फ
ब्लेंडर
ग्लास वाइन ग्लास

कृती:

खालच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे ब्लेंडरमध्ये आइसक्रीम, आंब्याचा रस आणि वोडका ओतून घ्या.

ब्लेंडरमध्ये साधारण मध्यम वेगाने हे सर्व मिश्रण व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. खालच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे ब्लेंडरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे.

आता हळूवारपणे ते मिश्रण ग्लासात ओतून घ्या.

आंब्याच्या अफलातून चवीचे स्मूथ अ‍ॅन्ड सिल्की कॉकटेल तयार आहे Smile

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

केवळ लेडीस स्पेशल म्हणून आमच्यावर अन्याव आहे! Wink

(स्वगत: जसं काही तसे लिहिले नसते तर तु लगेच पिणारच होतास! )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ,

पहिला फोटो बारकाइने बघितलास तर त्यात एकच ग्लास आहे. सुरुवातीला वेगळी रेसिपी मनात होती.
पण तयारी बघितल्यावर बायकोने "मी काय घोडे मारलेय?" असा प्रश्न केला आणी मग इंप्रोवायझेशन करून त्या कॉकटेलला 'लेडिस स्पेशल' बनवावे लागले आणि पुढच्या फोटोत २ फोटो आले आणि कॅटेगरी 'लेडिज स्पेशल' झाली Wink

- (साकिया) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा.. मग बरोबर आहे..
याला म्हणतात चतुर इम्प्रोवायझेशन Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"मी काय घोडे मारलेय?"

तुझ्याशी लग्न केल्यानंतरही तिला हा प्रश्न पडतो? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रामो,
त्याचे काय आहे, स्त्री-मुक्ती ही 'पाशवी' झाल्यापासून मी बायकोच्या वतीने निर्णय घेणे बंद केले आहे. नसती पाशवी कटकट डोक्याला लावून घेण्यापेक्षा असले डायलॉक ऐकणे परवडते.
आणि शिवाय 'नवरा कसा मुठीत आहे' ह्या अहंकाराला फुंकर घातली गेल्यामुळे पुढचे सगळे कसे सुरळीत होते. Wink

- (धूर्त आणि चतुर) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पटलं. याला जगण्यातून आलेलं शहाणपण म्हणतात. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आंब्यात भेसळ! हापूस सोडून इतर फळांना आंबा म्हणायचं?

(खत्रूड, "जातीयवादी") अदिती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान दिसतयं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0