ब्रेड अँड बटर - भाग ५ 'पिझ्झा'

PIZZA-6

चांगला पिझ्झा फक्त चांगल्या रेस्टॉरंटमधेच मिळू शकतो अशी माझी अनेक वर्षे चुकीची धारणा होती. अर्थात त्या काळात 'खरा पिझ्झा' मी कुठेच खाल्ला नव्हता त्यामुळे 'चांगला'च्या माझ्या कल्पना भुसभुशीत बेस, टोमॅटोचा केचपवजा सॉस, त्यावर ओथंबून वहाणारे चीज आणि थोड्या भाज्या इतकाच होता. तसं पाहिलं तर बेस, टोमॅटो सॉस आणि चीज अशीच पिझ्झाची सर्वसाधारण व्याख्या असते पण इटलीतल्या या साध्या, सोप्या, चविष्ट आणि सरळ खाद्यपदार्थाचं अमेरिकन अपहरण झाल्यापासून आपल्या समोर त्याच्या इतक्या आवृत्त्या येतात की त्या मूळ पदार्थाची स्वाभाविक रंगतच निघून जाते. बदल, सुधारणा, इतर खाद्यसंस्कृतीचा प्रभाव हे काही 'खलनायक' नाहीत आणि एखादी गोष्ट जशी मूळ स्वरूपात आहे तशीच कायम रहावी असाही अट्टाहास नाही पण असे करताना त्या मूळ कल्पनेचा आस्वाद घेण्याची कुवतच संपून जात असेल आणि तिचं स्थानच जर धोक्यात येत असेल तर मात्र थोडे थांबून पुन्हा विचार करावा लागतो. गेली अनेक वर्षे वेगेवेगळे प्रयोग करून, वेगवेगळी साधने वापरून, वेगवेगळ्या पाककृती वापरून आता मी या 'चांगल्या' पिझ्झाच्या जवळ जाणारा पिझ्झा घरी बनवू शकले आहे. 'पिझ्झा'चा विषय आल्यावर मला जसा आवडतो तश्या पातळ बेसवाल्या, ताज्या सामुग्रीतून साग्रसंगीत बनविलेल्या पिझ्झा बेसची (सर्वांना आवडेलच याची खात्री नसतानाही) पाककृती देत आहे आणि त्याचबरोबर पिझ्झा बेसची अधिक प्रचलित पाककृतीही देते आहे.

१) सर्वप्रथम बेसबद्दल,
पिझ्झा बेसच्या हजारो प्रचलित पाककृती आहेत पण खाली दिलेल्या दोन्ही पाककृती मी अनेकदा वापरलेल्या असल्याने त्या देत आहे.
अ) फ्रीजमध्ये अधिक वेळ फुगू दिलेल्या पिठाचा बेस: ह्या पिठात यीस्टचे प्रमाण खूप कमी असते आणि हे पीठ थंड वातावरणात रात्रभर फुगू दिले जाते; या पद्धतीने बनणारा पिझ्झा बेस पातळ आणि खरपूस होतो.

साहित्य:

ब्रेड फ्लॉर (मैदा) ३७५ ग्रॅम (साधारण २.५ कप- २५० मिलीचा कप)
साखर १ टेबलस्पून
कोमट पाणी २०० मिली (१८० ग्रॅम)
इंस्टंट यीस्ट १/२ टीस्पून
ऑलिव्ह तेल ३० मिली (साधारण १.५ टेबलस्पून)
मीठ १ टीस्पून
PIZZA-2 PIZZA-3

कोमट पाण्यात (पाण्याचं तापमान आपल्या रक्ताच्या तापमानाइतकं असावं असं म्हणता येईल, साधारण ३७ अंश सेल्सियस) यीस्ट आणि साखर मिसळून एकजीव करावी.
मैद्यात मीठ, तेल मिसळावे आणि त्यात यीस्टचे पाणी हळूहळू घालत गोळा बनवून घ्यावा, वाटल्यास थोडे अधिक पाणी घालावे. नंतर गोळा स्वच्छ ओट्यावर घालून पाच-सहा मिनिटे अगदी व्यवस्थित मळावा. गोळ्याचे दोन (किंवा तीन) भाग करून ते वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये किंवा क्लींग फिल्ममधे गुंडाळून रात्रभर फ्रीजमधे ठेवून द्यावेत. पिझ्झा बनवायला घ्यायच्या आधी तासभर गोळे फ्रीजमधून बाहेर काढून ठेवावेत.
प्रथम गोळा हाताने किंवा लाटण्याने थोडा थापून घ्यावा. त्याची एक चकती झाली की ती एका कडेने बोटांत उचलून धरावी आणि तिला बोटांनी एक किनार बनवतानाच ती थोडी थोडी ताणत मोठी करावी. अशी उभी धरल्याने गुरुत्वाकर्षणाने ती आपोआप थोडी ताणली जाईल आणि मोठी होत राहील. बेसची किनार थोडी जाड राहू द्यावी आणि साधारण आठ इंच व्यासाची चकती झाली की ती थोडे पीठ घालून ती ओट्यावर टाकावी व मध्यापासून कडेपर्यंत तळव्याने दाबत साधारण १२ इंच व्यासाची चकती बनवावी. अशा तऱ्हेने तयार झालेला हा बेस आता वापरता येईल. ह्या चकत्या लगेच वापरायच्या नसल्यास फ्रीजरमध्ये टाकून नंतर महिन्याभरापर्यंत वापरता येतात. वापरायच्या वेळेस बाहेर काढून डीफ्रॉस्ट कराव्यात. चकत्यांच्या ऐवजी गोळेदेखील फ्रीज करता येतात.

ब) बेसची कमी वेळात बनणारी अधिक प्रचलित पाककृती:

साहित्य:

ब्रेड फ्लॉर (मैदा) ३५०-४०० ग्रॅम
साखर १/२ टीस्पून
कोमट पाणी २५० मिली
इंस्टंट यीस्ट १ पाकीट (७ ते ८ ग्रॅम)
ऑलिव्ह तेल ३० मिली (साधारण १.५ टेबलस्पून)
मीठ १ टीस्पून

कोमट पाण्यात यीस्ट आणि साखर मिसळून एकजीव करावी. यीस्टच्या पाकिटावर जर अॅक्टीव्ह ड्राय यीस्ट लिहिले असेल तर ते मिश्रण थोडे फसफसेपर्यंत पाच-दहा मिनिटे ठेऊन द्यावे. फास्ट अॅक्शन यीस्ट असेल तर थांबायची जरुरी नाही. मैद्यात मीठ, तेल मिसळावे आणि त्यात यीस्टचे पाणी हळूहळू घालत गोळा बनवून घ्यावा, वाटल्यास थोडे अधिक पाणी घालावे. नंतर गोळा स्वच्छ ओट्यावर घालून पाच-सहा मिनिटे अगदी व्यवस्थित मळावा. एका भांड्याला तेलाचा हात लावून त्यात हा मळलेला गोळा ठेवावा आणि त्यावर एक ओलसर फडके झाकून ठेवावे. तासाभरानं पीठ दुप्पटीपेक्षा अधिक फुगल्यावर ते पुन्हा थोडेसे मळून त्याचे दोन भाग करावेत. वरील कृतीत लिहिल्याप्रमाणे त्याच्या दोन चकत्या बनवाव्यात व त्या पिझ्झा बेस म्हणून वापराव्यात.

आता थोडेसे सॉसबद्दल,

१) टोमॅटो सॉससाठी टोमॅटोशिवाय दुसरा सर्वात महत्वाचा जिन्नस म्हणजे ताजे बेझिल. थोड्या ऑलिव्ह तेलावर बारीक चिरलेला लसूण आणि थोडा कांदा घालून परतावा त्यात थोडी बाजारातली तयार मिळणारी घट्ट टोमॅटोपेस्ट किंवा प्युरी घालावी न नंतर चांगले पिकलेले टोमॅटो चिरून, कुस्करून अथवा मिक्सरवर थोडेसे बारीक करून त्यात घालावे व त्यातील पाणी थोडे कमी होईपर्यंत शिजवावे. बाजारातल्या टोमॅटोपेस्ट वापरण्यामागे मिश्रणाला घट्टपणा यावा हे कारण आहे.

या सॉसमधे आता भरपूर ताजे बेझिल घालावे. सॉस बेसवर लावताना एखादा मोठा चमचा इतकाच सॉस बेसवर लावावा कारण जास्त सॉस लावल्यास पिझ्झा खरपूस न होता लिबलिबीत, ओलासर होऊ शकतो.

२) तयार सनड्राइड टोमॅटोचा पेस्तो किंवा ताज्या बेझिलचा पेस्तोही सॉस म्हणून वापरायला उत्तम असतो. ताज्या बेझीलचा पेस्तो बनवायचा असेल तर बेझिलची एक जुडी पाने, एक-दोन लसणाच्या पाकळ्या, मूठभर भाजलेले पाईन नट्स, मीठ, मिरपूड, एक-दोन चमचे लिंबाचा रस, अर्धी वाटी किसलेले पार्मेजान चीज आणि पाव वाटी ऑलिव्ह तेल फूड प्रोसेसरमध्ये घालून फिरवावे. साधारण भरड चटणीसारखे झाले की तयार झाले. फूड प्रोसेसर नसल्यास मिक्सरवरही बारीक करता येईल पण फार वाटू नये कारण जर अघिक उष्णता तयार झाली तर बेझिलचा सुगंध उडून जातो शिवाय पेस्तो थोडा भरडच चांगला लागतो. हा पेस्तो फ्रीजमध्ये छान टिकतो आणि मी इतरत्र लिहिल्याप्रमाणे सँडविच किंवा पास्तासाठी वापरता येतो.

PIZZA-4 PIZZA-10 PIZZA-9 PIZZA-8

३) पिझ्झावर घालायच्या भाज्या मी आधी ऑलिव्ह तेलावर थोड्या परतून घेते ज्यामुळे त्यातले पाणी थोडे कमी होते आणि पिझ्झा भाजताना बेस कुरकुरीत रहातो. भाज्यातही त्याच त्या भाज्या न वापरता, पालक, आर्टीचोक, अॅस्परॅगस, ऑलिव्हज, झुकीनी, सनड्राइड टोमॅटो, बेझीलची पाने अशा अनेक निरनिराळ्या भाज्या वापरता येतील.
४) आवडत असेल तर, सॉसेजचे (शक्यतो इटालियन) तुकडे, प्रोशितो, कोलंबी, स्क्विड, कोंबडी असे काही मांसाचे प्रकारही वापरता येतील .

५) पिझ्झावर घालायच्या चीजासाठी उपलब्धता असेल तर ताजे (बफेलो) मोत्सरेल्ला वापरावे. हे चीज पांढऱ्या रंगाचे आणि थोडे कमी चिवट असते त्याचा स्वादही अधिक चांगला असतो. याशिवाय रिकोटा, फेटा अगदी ब्लू चीजही वापरून पिझ्झा बनवता येतो. घरी बनवलेले ताजे पनीर तर पिझ्झासाठी उत्तम आहे. त्यामुळे पिझ्झा म्हणजे बाजारात मिळणारे किसलेले मोत्सरेल्ला अशा समीकरणापलीकडे जाऊन वेगेवेगळ्या प्रकारचे चीज आपल्याला आवडतील तश्या प्रकारे वापरता येतील.

PIZZA-5 Pizza

६) पिझ्झा भाजण्यापूर्वी, ओव्हनच्या सर्वात अधिक तापमानावर तो तापवून घ्यावा. नेहमी पिझ्झा बनवत असल्यास पिझ्झा स्टोन विकत घेतल्यास उपयोग होईल. पिझ्झा स्टोन म्हणजे खरेतर फक्त एक टेराकोटाची लादी असते, त्यामुळे जर अशी लादी (ग्लेज न केलेली) मिळाली तर तीही पिझ्झा स्टोन ऐवजी वापरता येईल. ज्यावर पिझ्झा भाजायचा आहे ती थाळी अथवा पिझ्झा स्टोन वगैरे ओव्हनबरोबरच तापवून घ्यावा. यामुळे बेस खरपूस होतो खरा पण वेगळ्या पृष्ठभागावर बनबलेला पिझ्झा ओव्हनमधल्या गरम थाळीवर टाकायचे काम फार कौशल्याने करावे लागते. त्यासाठी एखाद्या जाड (आणि पट्कन न जळणाऱ्या) पुठ्ठ्यावर थोडे पीठ घालून त्यावर पिझ्झा तयार केला आणि तो मग हळूच ओव्हनमधल्या थाळीवर सरकवून पुठ्ठा काढून घेतला तर काम जमून जाते. वरच्या छायाचित्रात वापरलेले काळ्या रंगाचे साधन आणण्यापूर्वी मी असाच पुठ्ठा वापरत असे.

७) चीज वितळेपर्यंत आणि पिझ्झाचा खालचा पृष्ठभाग खरपूस होईपर्यंत पिझ्झा भाजावा, यासाठी ओव्हनच्या तापमानाप्रमाणे सात ते तेरा मिनिटापर्यंत कितीही वेळ लागू शकतो.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

तुमचे कष्ट, पदार्थाविषयीचा जिव्हाळा, आवड, केलेला पदार्थ साङ्गण्याची पद्धत, माण्डणी, रङ्गसङ्गती, चित्रे सर्वांसाठी __/\__.

इतालियात जो पीत्सा खाल्ला त्याची सर कुठल्याच बाहेरच्या पीत्साला आधी किंवा नन्तर आली नाही. काट्यासुरीने सहज कापता येईल असा तो पातळ पीत्सा..
तुमचे हे पीत्से पाहून अमिताभच्या 'चीनी कम' मधल्या "खाना बनाना कोई पेशा नही, बल्की दुनिया की सबसे बडी कला हैं |", या संवादाची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे कष्ट,
पदार्थाविषयीचा जिव्हाळा, आवड,
केलेला पदार्थ साङ्गण्याची पद्धत,
माण्डणी, रङ्गसङ्गती, चित्रे
सर्वांसाठी __/\__.
>>>
+१
खूप छान! मस्त! अप्रतिम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिलाच फोटो सुंदर आहे. पुढचं काहीही वाचलं नाही; तडक तुझ्याकडे येण्याचं तिकीट शोधते आहे.

(नाही तरी पुढचं वाचलं. एक कप पीठ २५० ग्रॅ असेल तर ३७५ म्हणजे २.५ नाही १.५ कप होईल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक कप पीठाचे वजन २५० ग्रॅम होत नाही, साधारण १४० ते १६० ग्रॅम भरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाहवा. गरमागरम चीजने निथळत असणारा पिझ्झा खाऊन लई दिवस झाले. वर्णनाने आणि छायाचित्रांने खाल्लेल्या काही उत्तमोत्तम पिझ्झांची आठवण झाली. 'कलकत्तेका जो जिक्र किया तूने हमनशीं, इक तीरे मिरे सीनेमें मारा के हाय हाय'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आला रे आला!
या पाकृची अत्यंत उत्कटतेने वाट पाहत होतो. तो पर्यंत आधी म्हटलेल्या थातूरमातूर पद्धतीने पिझ्झा करत होतो (तोही आवडतो हा भाग वेगळा)

आता यापुढील काही विकांताला हरेक प्रकारे पिझ्झा नक्की! Smile (सध्या इथे व्यापार्‍यांचा संप चालु असल्याने नवे जिन्नस मिळणे कठीण आहे नाहितर आजच करून बघितला असता)

बाकी,

तुमचे कष्ट, पदार्थाविषयीचा जिव्हाळा, आवड, केलेला पदार्थ साङ्गण्याची पद्धत, माण्डणी, रङ्गसङ्गती, चित्रे सर्वांसाठी __/\__.

असेच म्हणतो / _/\_ करतो.

आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पिज्झासाठी ते भले मोठे शॉवेल (फावडं) आवडलं, मागे बागेत वूड फायर ओव्ह्न बांधला का? Smile

पिज्झा हा थिन क्रस्टच हवा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिज्झा हा थिन क्रस्टच हवा!

ज्जे बात!

लेख ज ह ब र द स्त!

- (थिन क्रस्ट पिझ्झाच् आवडणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थिन क्रस्ट पिझ्झाच खरा! पिझ्झाझोपडी अन डॉमिनोज आणि धूरसोड्या जो इथे पिझ्झा या नावाखाली मिळणारी मैद्याची इंचभर जाड लादी खाऊन दिवस काढले आणि नंतर एकदा कधी हा खाल्ला तेव्हा साक्षात्कार झाला Smile

रुची यांच्या ब्रेडविषयक धाग्यांमुळे ब्रेडबुभुक्षा जागृत झाली एकदम. मिपावरच्या सानिकास्वप्निल आणि ऐसीवरच्या रुची यांचे पाकृविषयक लेख म्हंजे व्हिज्युअल ट्रीट एकदम. "अन्नपूर्णिसिआक" (अफ्रोडिसिआक च्या चालीवर) आहे एकदम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खूप आवडली पाककृती आणि त्याचं प्रेझेंटेशन ! फोटो सुंदर आहेत सगळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटोच जास्त आवडले. मस्त!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या वीकेंडला पिझ्झा केला होता. आरोग्यास पोषक करण्यासाठी मैदा व गव्हाचे पीठ समसमान घेतले होते. कसलातरी घोळ झाला असावा. कदाचित दुप्पट पीठ घेतले गेले व यीस्टचा अंदाज चुकल्याने भरमसाट फुगला, त्यामुळे जास्तच (सुमारे १ ते दीड इंच ;)) थिक क्र्स्ट झाला होता. शनिवार व रविवारची तीन जेवणे (दोन माणसांची) पोट भरून झाली. Biggrin . पिल्सबरी वगैरेंचे फ्रोजन डो आणण्यापेक्षा हा प्रकार निश्चितच चविष्ट होतो.

असो... घरून परवानगी मिळाली तर या नवीन पाककृतीचा प्रयोग आता योग्य प्रकारे करण्यात येईल. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा! जास्त ठिक आहे. चवीला चांगला होण्याशी मतलब Smile (तसेही पिझ्झा हटमधील पॅन पिझ्झा नावाखाली पावाची जाडजूड लादीच देतात बेस म्हणून Wink )

बाकी, कोणती कृती/प्रमाण वापरले होते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पॅन पिझा हा प्रकार म्हणजे पीठ जास्त आणि मुख्य मालमसाला कमी असाच प्रकार असतो. पिझाच्या जन्मभूमीत काय देतात माहित नाही; पण पश्चिम युरोपमधले काही देश, यूएस या देशांमधेही पॅन पिझा म्हटल्यावर चांगल्या भाकरीच्या निदान तिप्पट-चौपट जाड बेस येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गूगलवर काही कृती शोधून आणि या संकेतस्थळावरील फोकाचियाची कृती वाचून थोडी सरमिसळ केली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंग आमाली बी सांगा ते परमान!
मला कधी काय आवडेल सांगता येत नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या विकांताला बनविण्याचा मानस आहे.
काही शंका:
बेझिल उपलब्ध नसल्यास काय वापरावे? कोथिंबीर हा पर्याय होऊ शकेल का?
घरी केलेले पनीर म्हणजे ते दुध नासवून (लिंबु पिळून) आठवून करतात तेच का दुसरी अधिक प्रभावी कृती आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>बेझिल उपलब्ध नसल्यास काय वापरावे? <<

पुण्यात बेसिल अनेक ठिकाणी मिळते. ताजी न मिळाली तर सुकी वापरता येते. ताजी बेसिल 'दोराबजी'त मिळेल. अन्यथा 'फाइन फूड्स' (कर्वे रस्त्यावरच्या स्वातंत्र्य चौकातून शारदा सेंटरकडे जाणारी गल्ली; आयसीआयसीआय बॅंकेसमोर; अश्वमेध / सिद्धार्थ हाॅल वगैरेजवळ).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अर्रर्र गेल्याच आठवड्यात दोराबजीपर्यंत दरमजल केली होती. Sad
अर्थात तेथून चांगले चीज मिळवले आहे, पण बेझिल लक्षात राहिले नाही.

फाईन फुड्स ट्राय करतो. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाझिलला पर्याय म्हणून कोथिंबीरीपेक्षा तुळस अधिक जवळची असेल असं वाटतं. ही झाडं एकाच जातीची आहेत, उपजात निराळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो ॠषिकेश, लिंबू पिळूनच केलेले पनीर. ते बाहेरच्या पनीरइतके घट्ट नसते पण चव आणि पोत पिझ्झासाठी अधिक चांगला असतो. मात्र वापरताना त्यावर थोडे मीठ शिंपडायला विसरू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिला फोटो, उपकरणं, स्वच्छ ओव्हन वगैरे गोष्टी पाहून हे स्पष्ट आहे की ही 'प्रोफेशनल' लोकांची रेसिपी आहे, आम्हाला हौशी लोकांची हवी आहे! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विकांताला शक्य झाले नाही पण कालची सुट्टी साधली आणि बनवला.
अतिशय आवडला. पनीरच्या वड्या झाल्या नाहित मात्र छोट्या चकत्या केल्या होत्या त्याही मस्त लागत होत्या.

घरी सदस्य संख्या बरीच असल्याने तीन मोठे पिझ्झे करावे लागले. तिसरा पिझ्झा अगदी "कुरकुरीत" झाला होता Wink बहुदा पहिले दोन पिझ्झा करून झाल्यावर तिसरा कमी वेळ ठेवायला हवा होता.

अवांतरः वरच्या पाकृप्रमाणे केलेला सॉस मला नीटसा जमला नाही त्यामुळे वापरला नाही. पुढच्यावेळी तो ही आरामात करून बघणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काल अजून एका पद्धतीने पिझ्झा बनवला,
३०० ग्रॅम मैदा
१ छोटा चमचा यीस्ट
१ छोटा चमचा मीठ
२०० मिली पाणी
२ मोठे चमचे ऑलिव्ह तेल.

या प्रमाणात कणीक बनवली, पिझ्झाचा छान पातळ बेस तयार केला(त्यासाठी अगदी हवेत झेलण्याचेही खेळ केले). वर थोडा ताजा पेस्तो, इटालियन दुकानातून आणलेली चविष्ट सलामी, ताजे बफेलो मोत्सरेल्ला चीज आणि पार्सलीची पाने पसरली. ऑव्हनच्या सर्वात जास्त तापमानावर पाच मिनिटे पिझ्झा भाजला.पिझ्झाबरोबर खायला बीटरूट-सफरचंद-पेकन नट्स-बाल्सामिक व्हिनेग्रेटचे सॅलड बनविले होते. जनता तृप्त जाहली.
पीठ फुगण्याच्या वेळ वगळता हे सर्व बनवायला चाळीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागला नाही, घरी पिझ्झा बनविणे लोकांना वेळखाऊ का वाटते कोण जाणे!
pizza-11

pizza-12

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिझ्झाचा छान पातळ बेस तयार केला(त्यासाठी अगदी हवेत झेलण्याचेही खेळ केले).

पीठ फुगण्याच्या वेळ वगळता हे सर्व बनवायला चाळीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागला नाही,

चाळीस मिनिटांच्या हिशेबात पाच सेकंदांचे एक वा अधिक कालखंड अंतर्भूत आहेत काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
असे काही कालखंड तयारच झाले नव्हते (म्हणायला काय जातंय, कोण येणार होतं तपासायला?) त्यामुळे हिशोबात धरले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थ्यांक्स फॉर द कन्फर्मेशन. (दृष्टीआड सृष्टी.)

(याचा अर्थ, नवशिक्यांनी हा वेळेचा अंदाज गरजेप्रमाणे बदलून घ्यावयास हवा तर.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल माझ्या आवडत्या ब्लॉग वरची एक पीत्झाची रेसिपी करून पाहिली. जिम लेही ने प्रसिद्ध केलेला "न-मळलेला" डो वापरून केला.

इथे उन्हाळा कडक असल्याने पाच-सहा तासातच कणीक चांगलीच फुगली. या आधी मळून फुगवलेल्या डो चा पातळ क्रस्ट करून पाहिला होता, पण या डो ची चव जास्त आवडली. वर रंगीबेरंगी ढब्बू मिर्च्या, कांदा आणि मशरूम वापरले. चीज वर्ज्य असलेल्या व्यक्ती साठी केला, त्यामुळे कसा निघेल जरा शंका होती, पण चांगलाच चविष्ट निघाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो कोठे आहे? तो ब्लॉग माझाही आवडता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ फटु मस्ट! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मोबाइल वरचा फोटो घाईघाईत काढला, फारच बेकार निघाला. शब्दांवरच विश्वास ठेवा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल रात्री डो बनवला आणि नंतर हा धागा वाचायला घेतला. त्यामुळे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर माझ्याकडे क्लिंग फिल्म नव्हती आणि बेत आजचा असल्यामुळे (रात्री भूक नसल्यानेही) डो तसाच ठेवून देण्याशिवाय पर्याय नव्हता. गोळा रात्रीच दुप्पट फुगला होता, पण सकाळी वरून ओलं कापड झाकूनही कोरडा पडला होता. जाळी मात्र भारे पडली होती. मग ऋ ला साद घातली, त्याने आणखी मळून गोळा पुन्हा फुगायची वाट पाहा म्हणून सांगितले. तसं केलं, पण आधीइतकं पीठ पुन्हा फुगलं नाही. पिझ्झा बेस बनवून ट्रान्सफर करण्यासाठी कागदी पुठ्ठा घरात नव्हता. सबब तो प्रीहिटेड बेकिंग पॅनमध्ये ठेवायला महत्प्रयास पडले. भाकरी दोन्ही हातात उचलून तव्यावर टाकतात त्याप्रमाणे जसा जाईल तसा जाऊ दे म्हणून टाकला आणि वरच्या भाज्या सारख्या केल्या.

हा पहिला:- ३०० डिग्रीवर दहा मिनिटं बेक केला. मधून जरासा ओलसर राहिला होता, पण डोमिनोजच्या कृपेने तसेही पिझ्झाच एकदोन वेळेस खाल्ले गेले असल्याने काही वाईट वाटले नाही. उलट चवीला हा त्याहून चांगला होता.
बेस म्हणून ताजी टोमॅटो प्युरे+कांदा लसूण मसाला+चवीपुरतं मीठ हे एकत्र शिजवून घेतलं होतं, किसलेले चीज.

नंतरच्या वेळेस थोडा पोळपाटावर लाटून थिन क्र्स्ट करायचा प्रयत्न केला. ३०० डिग्रीवर १५ मिनिटे बेक केला. कडा खरपूस झाल्या होत्या पण मध्ये पुन्हा ओला राहिला.
बेस म्हणून ताजी टोमॅटो प्युरे+कांदा लसूण मसाला+चवीपुरतं मीठ हे एकत्र शिजवून घेतलं होतं, किसलेले चीज आणि विकतच्या शेजवा सॉस पण हलकाच लावून घेतला होता
.

पहिल्या प्रयोगाच्या मानाने भारीच प्रकरण झालं होतं. यथावकाश कणिक्+मैद्याचा करून पाहण्याचा विचार आहे. कुणाकडे तयार मापं असतील तर द्या प्लीज.

बादवे, पिझ्झा चांगला बेक झाला की नाही हे पाह्ण्याची केकमध्ये सुरी खुपसून पाहण्यासारखी काही युक्ती नाही का?

व्यवस्थापकः width="" height="" हटवले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

ही पोस्ट आत्ताच पाहिली - मस्त दिसतोय पीत्झा! कणकेच्या बेसच्या कृती नेटवर पुष्कळ आहेत, पण मी अजून करून पाहिली नाही. मैदाच वापरला आहे.
गेल्या आठवड्यातले दोन प्रयोग - पुन्हा "नो-(क)नीड" कृतीचा डो वापरून. शिळा टोमॅटोचा रस्सा होता त्यात अजून एक टोमॅटो घालून बेस तयार केला, आणि वर मिर्ची, कांदा, आणि हिरव्या पपईचे बारीक काप घालून पार्मेजान चीज पसरले. योगायोगाने इथे खूप चांगले (आणि महागडे, पण वर्थ इट) पार्मेजान मिळाले.

P1030719

P1030722

दुसरा तयार सॉसेज घालूनः
P1030740

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या विकांताला मी ही पिझ्झा बनवला होता.
मात्र पीठ फारसे फुलले नाही, उलट काहिसे चिकट झाले होते. (मी हल्ली किमान दोन-तीन आठवड्यातून एकदा याच मापाने पिझ्झा बनवतो, तेव्हा प्रमाण चुकण्याची शक्यता नाही)

यापैकी काही कारण असु शकेल काय?:

-- पावसाळी हवा आहे.
-- आईने "पावसाळी हवेत हे सगळे बाहेर नको बै" अश्या अचानक झालेल्या जाणीवेने यीस्ट थेट फ्रीजरमध्ये टाकले (लॉजिक विचारू नका Smile ). फ्रिजरमध्ये यीस्टचा दर्जा खालावतो/मरते असे काही आहे का?
-- रात्रभर नीट ठेऊनही न फुगल्याने पीठात अणखी थोडे यीस्ट घालून झाकले तर दुपारपर्यंत अतिशय चिकट गोळा झाला होता.

तसाच थापून व बेक करून पाहिला पण कच्चा राहत होता. जाळीही पडत नव्हती Sad

काय असावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फ्रेश (बेकर्स) यीस्ट फ्रीजर मधे ठेवले, तर मरत नाही, उलट मी फ्रीजर मधेच ठेवत असते. पण बाहेर काढल्यावर मी चमचाभर साखर घातलेल्या कोमट पाण्यात १०-१५ मिनिटं त्याला "प्रूफ" करते. त्यात थोडे बबल्स दिसायला लागले की मग तेच पाणी कणकेत वापरायचे. चांगला फरक पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे फ्रेश यीस्ट नाहीये
ड्राय अ‍ॅक्टीव्ह यीस्ट आहे. ते गरम पाण्यात घोळवूनच वापरतो. याहीवेळी तेच केलं होतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वर्णनावरून यीस्ट मेलेलं दिसतंय. ड्राय यीस्टच्या पाकिटाबाहेर एक्स्पायरी डेट दिलेली असणं अपेक्षित आहे. काळानुसार त्याची परिणामकारकता कमी होत जाते. आणून बरेच दिवस झाले असतील, तर वर रोचना म्हणाली तसं प्रूफ करून पाहणं हा एक चांगला पर्याय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओह म्हणजे ते यीस्टचे खोके जपायला हवेत किमान एक्सपायरी डेट बघुन ठेवायला हवी.
मी यीस्ट काढून एका घट्ट झाकणाच्या डबीत भरून ठेवतो - आता ते टाकून देतो, नवे आणून बघतो पुढल्या आठवड्यात प्रयोग करून

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!