मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज) : बे रूज (Baie Rouge)

‘मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज)’ मालिकेतील आजचे मॉकटेल आहे 'बे रूज'

पार्श्वभूमी:

बे रूज हा एक फ्रेंच शब्द आहे. त्या अर्थ Red Bay. मोनिन ह्या प्रख्यात फळांचे सिरप बनवणार्‍या फ्रेंच कंपनीचे सिरप रिलायंस मॉल मधे शोधाशोध करताना मिळाले. हे मॉकटेल 'ब्लॅक करंट' ह्या फळाच्या सिरप पासून बनले आहे. त्या बाटलीवर एक कॉकटेल आणि एक मॉकटेल अशी रेसिपी असते. ही रेसीपी त्या सिरपच्या बाटलीवरच मिळाली Smile

फारच सोपी रेसिपी आहे ही, साहित्यही एकदम लिमीटेड.

साहित्य:

मोनिन ब्लॅक करंट सिरप १० मिली
क्रॅनबेरी ज्युस २ औस (६० मिली)
सोडा
बर्फ
स्ट्रॉ
लिंबाची चकती सजावटीसाठी
ग्लास मॉकटेल ग्लास

कृती:

सर्व साहित्य (सोडा सोडून) शेकर मध्ये बर्फ टाकून व्यवस्थित शेक करून घ्या. शेकरला घाम फुटला की मॉकटेल झाले असे समजावे.

आता ग्लासच्या रीमला लिंबाचा काप लावून मॉकटेल सजवा.

लालसर रंगाचे 'बे रूज' तयार आहे Smile

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

वाह! आमच्या (न-पित्या) ब्रीडसाठी काहि दिल्याबद्दल आभार!

प्रख्यात फळांचे सिरप बनवणार्‍या फ्रेंच कंपनीचे

इथे "विशाल महिलांचा मेळावा" झालं आहे का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हम्म. आइसक्रिम, फालुदा, मिल्कशेक किँवा थिकशेक मधे ब्लॅक करंट फार आवडता फ्लेवर! पण ज्युस किंवा मॉकटेल कधी ट्राय केलं नाही... मराठी किँवा हिँदीत काय म्हणतात त्याला? मलबेरीपण थोडं तसंच असतं चवीला, रंगपण तसाच येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्लॅक करंट = करवंद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा