अनसंग हीरो

ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ने मागची २ दशक जागतिक क्रिकेट वर वर्चस्व गाजवल. प्रचंड गुणवत्ता, Never say die attitude, आणि मिळालेले कुशल कर्णधार यामुळे ऑस्ट्रेलिया ने इतर टीम्स ना तोंड वर काढण्याची संधी कधी दिलीच नाही. त्यामुळे मागच्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया चे अनेक दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आणि त्यांची जागा घेणारे नवीन खेळाडू तितके चांगले नसल्याने त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळायाला लागला. परवा त्यांचा वेगवान गोलंदाज शॉन टेट म्हणाला की गिलेस्पी, हेडन, वॉर्न ह्यानी इतक्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती. ऑस्ट्रेलिया संघाच्या गळतीची अनेक विश्लेषण वाचली. कोणी म्हणतल की वॉर्न , गिलेस्पी, मॅकग्राक यांची कमी ऑस्ट्रेलिया ला जाणवत आहे. कोणी लिहिल की हेडन, लॅंगर, गिली यांच्या तोडीचे फलंदाज ऑस्ट्रेलिया ला मिळाले नाहीत त्यामुळे त्यांच साम्राज्य लयाला चालल आहे. पण या सगळ्या पोस्टमार्टम मध्ये एका बहाद्दराचा उल्लेख कुठेच आला नाही. पण तो तर ऑस्ट्रेलिया चा राजसूय चालू असताना पण कुठे येत नव्हता. वारंवार योगदान देऊन. अनेक मॅच विनिंग खेळ्या खेळून पण त्याला क्रेडिट कधी मिळालेच नाही. तो खेळाडू म्हणजे डेमीयन मार्टिन. तोच तो डेमीयन मार्टिन ज्याने पॉंटिंग सोबत 2003 मध्ये आपल्या विश्व चषक जिंकण्याच्या मन्सुब्याना सुरुंग लावला होता. 89 धावांची जबरी खेळी करून भारतीय गोलंदाजाना धूळ चारली होती. पण सर्व क्रेडिट घेऊन गेला आकर्षक खेळी करून गेलेला पॉंटिंग. 2004 मध्ये ३० वर्षानंतर ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला त्यांच्याच देशात पराभूत करून बॉर्डर-गावस्कर चषकावर नाव कोरल तेंव्हा मॅन ऑफ द सिरीज होता डेमीयन मार्टिन.46 च्या सरासरीने फलंदाजी करून टीम ला अनेक मॅच जिंकून देण्याची कर्तबगारी गाजवून पण त्याची क्रिकेट चाहतयानी आणि माध्यम यानी कधी हवी तशी दखलच घेतली नाही. त्याची निवृत्ती पण अशीच दुर्लक्ष्याच्या धूक्यात गुर्फूटून गेली. मार्टिन चा दोष असलाच तर एवढाच की तो मैदानावर शांत असायचा. मैदानाबाहेर पण माध्यमांच्या पुढे यायला लाजायचा. एकदा मात्र आपल्याबरोबर जिंकल्यावर जल्लोष करताना त्याने पॉंटिंग सोबत शरद पवारना बाजूला व्हयला सांगताना त्यांच्याशी धक्काबुक्की केली होती त्यावेळेस राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यानी एका गाढवावर मार्टिन असे लिहून त्याची धिंड काढली होती त्यावेळेस मीडीया ने तो 'इवेंट' चांगलाच कवर केला होता. त्या मानी खेळाडूचा प्रसारमाध्यमांशी आलेला हा बहुतेक शेवटचाच सम्बन्ध. बाकी पॉंटिंग, हेडन आणि नंतर हसी आणि क्लार्क यांच्या तारंगणात हा धुमकेतू कायमच हरवून गेला.

असे अनेक अनसंग हीरो प्रत्येक क्षेत्रात असतात. कधी आपल्या अतिप्रकाशित सहप्रवाशामुळे तर कधी स्वतहाचे मार्केटिंग नीट न करता आल्याने हे अनसंग हीरो कधी लोकांसमोर येतच नाहीत.

भारतीय राजकारणमधला असाच एक सध्याचा अनसंग हीरो म्हणजे मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज चौहान. याने सतत दोन वेळा भाजप ला राज्यात सत्तेवर आणले. पण हे त्यांचे सगळ्यात मोठे यश नाही. बिमारु राज्यात गणना होणार्‍या मध्य प्रदेश सारख्या राज्याला या अपमानास्पद जागेवरून बाहेर काढण्याचा चंग यानी बांधला आहे. सध्या मध्य प्रदेश साडे अकरा टक्के ह्या दराने विकास दर नोंदवत आहे. मध्य प्रदेश लवकरच बिमारु मधून बाहेर पडेल अशी चिन्ह दिसायला लागली आहेत. पण हा शालिन मुख्यमंत्री कुठलाही गाजावाजा न करता आपले काम करत आहे. त्याने कधी मध्य प्रदेशी अस्मितेचे ढोल बडवले नाहीत किंवा कुणावरही खालच्या पातळीवर टीका करण्याच्या लोकप्रिय मार्गाचा अवलंब केला नाही. त्याच्या राज्यात अल्पसंख्य पण सुरक्षित आहेत हे विशेष. आता पण पुढच्या निवडणुकीत पण भाजप मध्य प्रदेश ची सत्ता टिकवेल असेच दिसत आहे. पण शालीनता, अभ्यासुपणा आणि पडद्या आड राहून काम करण्याची वृत्ती असल्याने बहुतेक पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ते कधीच नसतील.

मराठ्यानी मोगली जुलुमी सत्तेविरूद्ध दिलेला दीर्घ लढा इतिहासात अजरामर आहे. पण या इतिहासाचे गोडवे गाताना राजाराम महाराजना त्याचे फारसे श्रेय मिळालेले दिसत नाही. संभाजी महाराज शत्रू च्या हाती पडून मारले गेल्यावर मराठ्यांचा प्रतिकार पूर्णपणे मोडून पाडण्याची शक्यता होती. पण राजाराम महाराजनी दूर जिंजी ला जाऊन हा लढा चालू ठेवला. नुसता लढा चालू ठेवला नाही तर औरंगझेब च्या नाकी नौ आणले.

असे खूप जन आहेत. माझी लिस्ट. टेनिस मध्ये पॅटरिक रॅफटर आणि गोरान इवन्सेवीच. राजकारणात मनमोहन सिंघ (लोकांच्या शिव्या खायला तयार यासाठी), अभिनेत्यांमध्ये संजीव कुमार आणि आपला आवडता इरफान. आणि सगळ्यात महत्वच माझी आई. भले आपल्याला श्रेय मिळो ना मिळो आपल्यावर पडलेली जबाबदारी पार पाडणे एवढेच या अनसंग हीरो ना माहीत असते. भले याना माइक वर जबरदस्त भाषण ठोकाता येत नसतील, भले यांचे व्यक्तिमत्व आकर्षक नसेल किंवा स्वतहाचे मार्केटिंग करता येत नसेल पण या अनसंग हीरो मुळेच देशाचा गाडा नीट चालत असतो. हा अनसंग हीरो कुठेही आढळू शकतो. दमवणारी नौकरी करून घर संभालणारी एखादी गृहिणी, तुमच्या बाजूच्या खुर्चिवर बसणारा तुमचा मीतभाषी ऑफीस मधला सहकारी किंवा सकाळी उठून आरशात बघितले तरी तो दिसेल तुम्हाला. तुमचा अनसंग हीरो कोण आहे?

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

हवे तसे 'श्रेय' न मिळणे, 'उपेक्षित' राहणे, यातले 'श्रेय', 'उपेक्षा' या फार व्यक्तीसापेक्ष गोष्टी. कुणाला-कश्याबद्दल-कोण-काय महत्त्वाचे वाटेल साङ्गता येत नाही. त्यामुळेच हा धागा खरे तर रोचक आहे. प्रतिसादान्तून अपेक्षा हीच, की काही माहीत असलेल्या व्यक्तीञ्चे उपेक्षित पैलू दिसतील किंवा सर्वस्वी नव्या व्यक्तीञ्ची, कार्यक्षेत्राची ओळख होईल. (उदा. - 'संवाद' ही राजू परुळेकर याञ्ची प्रदीर्घ मालिका.)
जसे जमेल तशी मी भर घालेन.
तूर्तास -
अभिनेता - चंदू पारखी ('लाईफ लाईन' या विजया मेहतान्नी दिग्दर्शित केलेल्या मालिकेतला वॉर्डबॉय, 'चाळ नावाची वाचाळ वस्ती'तील दारुच्या आहारी गेलेला नवरा आणि 'बोमकेश बक्षी' मधील 'रास्ते का कांटा', इ. इ. फार जबरदस्त भूमिका होत्या.)
सङ्गीतकार - कानू रॉय ('अनुभव', 'गृहप्रवेश', इ. बासू भट्टाचार्य याञ्च्या चित्रपटान्ना सङ्गीत.)
रेखाचित्रकार - प्रभाशङ्कर कवडी (प्रचण्ड ताकदीचे रेखाटन असलेल्या या रेखाचित्रकाराने वास्तववादी आणि व्यङ्गचित्रात्मक शैली, याञ्च्या सीमारेषेवर असलेली अनेक व्यक्तीरेखाटने केली. 'किशोर' या अङ्कात याञ्चे काम भरभरून दिसेल.)

व्यक्तीम्प्रमाणेच 'अन्-सङ्ग् वर्क'ही असू शकते. उदा. - लहान मुलांसाठीच्या वैचित्र्यपूर्ण कविता असलेला आरती प्रभू याञ्चा 'गोपाळगाणी' हा काव्यसङ्ग्रह.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक धागा, इतरही प्रतिसाद वाचायला उत्सूक आहे.

राजकारणात मनमोहन सिंघ

यांना अंडरडॉग म्हटल्यावर त्यांचे वर्णन कोण्या एका अग्रलेखात 'ओव्हर एस्टिमेटेड अ‍ॅज इकोनॉमिस्ट आणि अंडरएस्टिमेटड अ‍ॅज पॉलिटिशियन" असे केल्याचे आठवून गेले Smile

त्याच्या राज्यात अल्पसंख्य पण सुरक्षित आहेत हे विशेष.

हे खटकले. यात विशेषत्त्वाने उल्लेख करण्यासारखे एकच राज्य आहे का? (आणि हे सत्य आहे का?) असा प्रश्न पडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रोचक धागा, इतरही प्रतिसाद
वाचायला उत्सूक आहे.
>> +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोरान इवानसेविचबद्दल वाचायला आवडेल. पहिला क्रश असा सहज थोडीच विसरता येणार?

पण इरफान हा मात्र दुर्लक्षित नट आता वाटत नाही. गुणी आहे, मलाही आवडतो आणि किंचित उशीरा का होईना त्याची दखल घेतली जाते आहे. अलिकडच्या काळात महाराष्ट्र टाईम्समधे इरफानच्या मुलाखतीचं शीर्षक 'बेडसीन्स करण्यात अडचण वाटत नाही' असं काहीसं होतं हे पाहिल्यानंतर तर इरफार हीरो असला तरी अनसंग वाटत नाही.

ऋषिकेशः

यात विशेषत्त्वाने उल्लेख करण्यासारखे एकच राज्य आहे का? (आणि हे सत्य आहे का?) असा प्रश्न पडला

खरं आहे असं मानल्यास, आणि/किंवा गुजराथशी तुलना केल्यास विशेष उल्लेख करण्याचं कारण समजतं. विशेषतः नरेंद्र मोदी आणि शिवराज चौहान अशी तुलना केल्यास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.