कॉकटेल लाउंज : मॅन्गो मार्गारीटा

‘कॉकटेल लाउंज : ग्रीष्म लाउंजोत्सव' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे मॅन्गो मार्गारीटा

पार्श्वभूमी:

आपले गवि यांनी एकदा गोव्याला फिशरमन व्हार्फ मध्ये मॅन्गो मार्गारीटा ट्राय केली होती. त्याने तसे सांगितल्यापासून ते कॉकटेल एकदम मनात भरले होते. आमरस हा माझा जीव की प्राण! माझ्यासाठी, खाण्यात आमरसाचे जे स्थान तेच दारुमध्ये टकीलाचे आहे. त्यामुळे ह्या दोन्ही आवडीच्या गोष्टींचा संगम असलेले कॉकटेल तितकेच कातिल असणार ह्याची खात्री होती.

ह्या मंगळवारी लग्नाचा वाढदिवस होता, तो आणि ग्रीष्म लाउंजोत्सव यांचे औचित्य साधून त्या मॅन्गो मार्गारीटाचा बार उडवायचे ठरवले. सगळे साहित्य घरात होतेच. त्यामुळे खरंच मॅन्गो मार्गारीटाचा बार 'उडाला'!

साहित्य:

टकीला १ औस (३० मिली)
क्वाँत्रो (दुसरा पर्याय - ट्रिपल सेक) १ औस (३० मिली)
अर्ध्या आंब्याचा गर
अर्ध्या मोसंबीचा रस
बर्फ
आंब्याची चकती सजावटीसाठी
ग्लास कॉकटेल ग्लास किंवा मार्गारीटा ग्लास

कृती:

ब्लेंडरमध्ये सर्व साहित्य घालून घ्या. त्यानंतर ब्लेंडरमध्ये अर्धा ब्लेंडर भरेल एवढा बर्फ भरून घ्या.

सर्व मिश्रण एकजीव होइपर्यंत मध्यम गतीने ब्लेंड करा.

आता ते मिश्रण कॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या आणि आंब्याची चकती ग्लासच्या रीमला खोचून घ्या.

झक्कास आणि बहारदार मॅन्गो मार्गारीटा तयार आहे Smile

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मध्यंतरी एकदा मँगो मार्गारिटा ट्राय केली होती, पण शिंदळीच्याने त्यात लाल तिखट घातलं होतं हो!! कोणी शेफ केला यनगुंडूला कोणास ठावूक. पुन्हा मँगो मार्गारीटा पैसे देवून चाखणार नाही असे तेव्हाच ठरवले, मग कधी येऊ तुमच्याकडे? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

कोणी शेफ केला यनगुंडूला कोणास ठावूक.
......हे 'यनगुंडू' दाक्षिण भारतीय माणसास उद्देशून असेल तर साम्भाळून हो Nile राव. हे वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेफ कोण होता हे माहितही नाही मला. पण यनगुंडू दक्षिणी माणसाला उद्देशून आहे असं का वाटलं? (इतरांनाही वाटलं आहे पूर्वी, पण का चं समाधानकारक उत्तर कोणी दिलं नाही अजून). हा शब्द मी पुण्यात असताना 'निर्माण' केला होता, पुढे मद्रासला असताना सढळपणे वापरलाही होता, तेव्हा कोणी दाक्षिणात्य मित्राने कधी नाराजी दाखवली नाही (तसं म्हणायला भारतात अशा 'शुल्लक' कारणावरून कोणी नाराज होत नाही म्हणा).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अमुकावस्की, अमुकोविच्, अमुकोपाध्याय, अमुकझांग, अमुकत्सोंगा, अमुकगुंडम् असे वगैरे शब्द ऐकले की ज्या निगडीत प्रदेश वा गोष्टीञ्ची आठवण ज्या कारणाने होते त्याच कारणाने. आता 'अमुककुंची' म्हटल्यावर नाही पण 'अमुकविंची' म्हटल्यावर इतालियाची आठवण झाल्याशिवाय राहील का ?
प्रदेशच नव्हे तर, अमुक्टिरियागस् म्हटल्यावर जीवशास्त्र आणि प्रीअमुक्सिलेशन् म्हटल्यावर काहितरी वैज्ञानिक/तान्त्रिक गोष्टीशी सम्बन्ध आहे असे वाटतेच ना ? (श्रेय : 'थ्री इडियट्स्' मधील प्रसङ्ग)
शब्दाचा नाद आणि आपल्या डोक्यात असलेले निगडीत सन्दर्भ, गोष्टी याञ्ची आपोआप साङ्गड घातली जाते हे मला तरी वरवर असलेले / ढोबळ असे कारण दिसते.
आता इथल्या 'यनगुंडू' शब्दाचा विचार केला तर इतराञ्चे माहीत नाही पण माझ्या डोक्यातल्या निगडीत गोष्टी म्हणजे - 'यन्न' हा तमिळ शब्द आणि 'गुंड' हे 'मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया' या कन्नड व्यक्तीच्या नांवातला भाग अशी साङ्गड घातली गेली. ती तशी का याचे कारण, माझ्या पूर्ण जीवनचक्रातून तुम्ही गेलात, तर तुम्हाला कदाचित शब्दात न साङ्गताच कळेल. एक ठळक कारण म्हणजे माझ्या लहानपणी 'आण्डू-गुण्डू-ठण्डा-पाणी' असे शब्द 'दक्षिणेतली कुठली तरी भाषा' म्हणून वापरले गेलेले ऐकले आहे.
(आणखी -
१. 'मेदूवडा' असे सरळ नांव असूनही अनेक लोक 'मेंदूवडा' असे म्हणतात. आपल्याला ते विचित्र का वाटते ?
२. "व्हॉट् द् फ्रॅक् !" असे उद्गार ऐकल्यावर 'फ्रॅक'सोबत आणखीही एक शब्द कानामागून येऊन तिखट होतो. तो का ऐकू यावा ?
३. चौपाटीवरचा खारा वारा नाकात शिरला की भेळपुरी/ पाणिपुरीची भूक कशी लागते ?
४. भरगोस पाऊस पडत असता भारताबाहेर असूनही कान्दाभजी-कडक चहासाठी भारतात का पळावेसे वाटते ?, इ. इ. इ.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिन चाँग (http://en.wikipedia.org/wiki/Ching_chong) हा 'एशिअन' लोकांसाठी रेशियली (जसा 'निगर' वापरला जातो?) वापरला जातो. त्या अर्थाने यनगुंडू आक्षेपार्ह का वाटावा असा खरंतर प्रश्न होता. अनेक शब्दां विषये असे संदर्भ जोडले जाऊ शकतात, पण ते नेहमी गंभीरपणे घेतले जात नाहीत. उदा. holy smokes, holy mackarel, mother of god जसे गंभीरपणे आक्षेपार्ह मानले जात नाहीत तसे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हा दोघांनाही शुभेच्छा.
रंग छान आलाय आणि ग्लासपण छान आहेत.
मी एकदा निळ्या रंगाची मार्गारिटा ट्राय केलेली (फ्लेवर माहीत नाही). ती काही आवडली नव्हती. लिँबु मीठाच वावडं आहेच, त्यात ती फारच लवकर (१/३ संपेपर्यँतच) चढायला लागली. त्यामुळे सध्यातरी परत मार्गारीटाच्या वाटेला जाण्याचा विचार नाही. तसाही आंबा फार आवडत नाहीच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!

ती निळ्या रंगाची मार्गारीटा म्हणजे क्वांत्रोच्या जागी ब्लु कुरास्सो वापरून बनवलेली असते त्याने निळा रंग येतो.
हो झटकन चढते हे मात्र खरे आहे. ह्या वेळीही विमान लवकर वर गेले होते. Wink

- (साकिया) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास! एकदा ट्राय करायला पाहिजे.
मोसंबी नसेल तर त्याऐवजी काय घालता येईल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोसंबी नसेल तर भले थोरले अमेरिकन लिंबू चालेल.

- (साकिया) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला, टकीला, क्वांत्रो घालायची आणि वर मोसंबी पण घालायची? विमान लवकर उडणार नाही तर काय!

एप्रिल अर्धा झाला की निवासी लोकं अनिवासींना आंबा, आंबा म्हणून; फोटोबिटो दाखवून जळवतात. ही प्रथा सोत्रिंनीही चालू ठेवल्याबद्दल त्यांचा जोरदार निषेध. आंब्याशिवाय कशी करायची ते सांगा आधी.

जोक्स असाइड, हे पेय फारच आकर्षक दिसतंय. त्यात मार्गारिटा म्हणजे सर्व कॉकटेलांची राणी. मग तीत फळांचा राजा घातल्यावर काय बिशाद वाईट लागण्याची!

फळं घालून करायच्या मार्गारिटांसाठी मी ती आधी फ्रीझ करतो. त्यामुळे ब्लेंडरमधून काढल्यावर ते पेयापेक्षा खाद्य होतं. एक एक चमचा जिभेवर हळूहळू विरघळू द्यायचा. मग जीभ जड झाल्यावर निदान 'गार आहे' अशी सारवासारव करता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे कॉम्बो रोचक आहे. एकदा करून पहायला हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0