हस्तांदोलन

काही दिवसांपूर्वी माझी एका मित्राशी अनेक वर्षांनी, अचानक भेट झाली. 'सध्या काय चाल्लंय’छाप बोलणी झाल्यावर निरोप घेताना त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. 'हस्तांदोलन का करायचं?' हा प्रश्न मला नेहमीच पडतो. पण त्यादिवशी या प्रश्नाच्या बरोबरीने मला आणखी काही प्रश्न पडले.

दोन मुलगे भेटल्यावर त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करण्याची शक्यता बरीच मोठी असते. पण एक मुलगा आणि एक मुलगी भेटल्यावर त्या दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन करण्याची शक्यता तेवढीच असते की त्याहून कमी? आणि अशा वेळी कोणी हात पुढे करण्याची शक्यता जास्त असते: मुलाने की मुलीने? असा विचार करता करता मग दोन मुलींनी एकमेकींशी हस्तांदोलन केल्याचा प्रसंग मी आठवून पाहू लागले. असा एकही प्रसंग आठवला नाही. मुलाशी बोलताना मुलीने हस्तांदोलनासाठी हात पुढे केल्याचेही कधी पाहण्यात आलेले नाही.

मी हा प्रश्न नंतर माझ्या ओळखीतल्या एक-दोघांना विचारला. तेव्हा आपणहून मुलाशी हस्तांदोलन करण्यास हात पुढे करणार्‍या मुलींची ३-४ उदाहरणे सापडली. पण मुलींनी तसे करण्याची शक्यता एकूण कमी असते असेही निरीक्षण ऐकायला मिळाले. यावर अधिक चर्चा केली असता, हस्तांदोलन करणार्‍या/न करणार्‍या दोघांची ओळख कोण करून देत आहे (म्हणजे ओळख करून देणार्‍या व्यक्तीचे वय, लिंग आणि नाते काय), ते दोघे किती पाश्चिमात्य आणि/किंवा कॉर्पोरेट वातावरणात वावरणारे आहेत, त्यांची सापेक्ष वये काय आहेत, भेट कोणत्या परिस्थितीत/वातावरणात झाली आहे या गोष्टींचा हस्तांदोलन करण्या/न करण्यावर परिणाम होऊ शकतो असे लक्षात आले.

त्याचप्रमाणे, मुलींना हस्तांदोलन करायची इच्छाच नसते की इच्छा असूनही ते सामाजिक संकेतांत बसत नसल्याने त्या तसं करत नाहीत हाही एक प्रश्न येथे उभा राहतो आहे.

याखेरीज, मुली किमान स्पर्श करत कसनुसे हस्तांदोलन करतात असेही एक निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

या बाबतीत 'ऐसी...'करांना आलेले अनुभव जाणून घ्यायला आवडेल. त्याचप्रमाणे, यासंबंधात काही मते/विचार/निरीक्षणे असल्यास तीही जाणून घ्यायला आवडतील. का: तर रिकामपणचे उद्योग आणि कुतुहल, आणखी काय?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

मला एखादी इंटरेस्टींग मुलगी भेटली तर मी लगेच हात पुढे करतो, हस्तांदोलनाला. हो म्हणजे पुढचं पुढे, पण... Wink

भारतीय मुलींबाबत माझेही निरीक्षण असेच आहे. खरंतर भारतातही हस्तांदोलन फक्त 'फॉर्मल कनेक्शन' असलेल्या पुरुषांशी व्हायचं/करायच्यो असे आठवते. अमेरीकेत आल्यापासून (मुख्यतः सवयीमुळे) मी सर्वांशी हस्तांदोलन करतो. अमेरीकन मुलींबाबतीत हस्तांदोलन करण्याबाबत मुलांपेक्षा वेगळे असे वर्तणुकीचे निरीक्षण नाही. मात्र प्रसंगानुसार भारतीय मुलींबरोबर कधीकधी टाळतो, नंतर ऑकवर्डं होण्यापेक्षा टाळणं बरं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

संवाद संपल्यावर एक फुलस्टॉप म्हणून हस्तांदोलन केले जाऊ शकते, वयानुसार भेटल्यावर किंवा जाताना हस्तांदोलन, गळाभेट, डॅप, हाय-फाईव्ह, हस्तांदोलन+दंडावर थाप, पाठीवर हात मारणे वगैरे उपचार केले जातात. अमेरिकेत परका माणूस जवळपास दिसला तर हसून 'हाय/हलो' म्हणण्याची पद्धत आहे, त्याचा उद्देश त्या छोट्याशा भेटीतला अवघडपणा कमी करणे हाच असतो. स्पर्शामुळे अनौपचारिकता कमी होण्यास अधिक मदत होत असावी असा कयास आहे.

काही मुली हस्तांदोलन करताना नाजूकपणे करतात तर बर्‍याच मुलींचे पंजे(तळहात) छोटे असल्याने हस्तांदोलन करताना अनपेक्षित गडबड होते, लष्करातल्या लोकांशी हस्तांदोलन करण्याचा अनुभव मात्र फारच थोर असतो, मोठे राकट हात आणि घट्ट पकड आपल्या तळहाताच्या ठेवणीप्रमाणे बरी किंवा त्रासदायक वाटू शकते.

माझ्या एका मित्राच्या हाताला कायम घाम येतो, त्यामुळे त्याच्याशी हस्तांदोलन करायला गेल्यावर हात बर्‍याचदा ओलाच होतो, ते काहींना किळसवाणे वाटते, तर बऱ्याचवेळेला हस्तांदोलनासाठी हात पुढे केल्यावर हा दोस्त आधी हात पुसायला जातो व समोरचा माणूस नुसताच हात पुढे करुन उभा रहातो.

जरा आंग्लाळलेले तरुण, गळाभेट, चीक/एअर-किस जास्त करताना दिसतात, त्यात औपचारिकता कमी होण्यापेक्षा वाढतानाच जास्त दिसते, उच्चभ्रु चेकलिस्टचा तो एक भाग असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक चर्चाविषय. आमच्याही दोन (फुटक्या) कवड्या:

बहुतांशी धाग्यात नोंदवल्याप्रमाणेच अनुभव. भारतीय मुली शक्यतोवर आपणहून हात पुढे करत नाहीत. (बाहेरील मुलींचा अनुभवच नाही, सबब मुली=भारतीय मुली) हात पुढे केला तरी करू-की-नको छाप संभ्रमयुक्त हालचालीच जास्त. निळे यांनी म्हटल्याप्रमाणे मीही शक्यतोवर टाळतोच, उगी पोपट होण्यापेक्षा इनिशिएट न केलेलंच बरं असा विचार करून.

त्याचप्रमाणे, मुलींना हस्तांदोलन करायची इच्छाच नसते की इच्छा असूनही ते सामाजिक संकेतांत बसत नसल्याने त्या तसं करत नाहीत हाही एक प्रश्न येथे उभा राहतो आहे.

दुसरा पर्याय जास्त लागू पडावा. मुळात इच्छा आहे किंवा नाही हे सामाजिक संकेतांवरही ठरत असल्यामुळे जरा काँप्लिकेटेड आहे प्रकार. त्यामुळे खरं तर पहिला पर्यायही लागू पडावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्याचप्रमाणे, मुलींना हस्तांदोलन करायची इच्छाच नसते की इच्छा असूनही ते सामाजिक संकेतांत बसत नसल्याने त्या तसं करत नाहीत हाही एक प्रश्न येथे उभा राहतो आहे.

बहुधा दुसरा पर्यायच असावा. आपल्याकडे एक तर हातात राखी नाहीतर थेट 'कर हा करी धरिला शुभांगी' अशा बायनरी हस्तलाघवालाच बव्हंशी सामाजिक मान्यता असल्याने असं होत असावं.

बाकी निळ्या आणि बॅटमॅन ह्या युवा (आणि सेमी-युवा) पिढीतल्या सदस्यांचे अनुभव, 'हातांसह सोन्याची सांज गुंफताना'च्या ऐवजी बरेचसे 'दे हाता, या शरणागता'च्या धर्तीवरचे असल्याचे पाहून अं.ह. झालो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी निळ्या आणि बॅटमॅन ह्या युवा (आणि सेमी-युवा) पिढीतल्या सदस्यांचे अनुभव, 'हातांसह सोन्याची सांज गुंफताना'च्या ऐवजी बरेचसे 'दे हाता, या शरणागता'च्या धर्तीवरचे असल्याचे पाहून अं.ह. झालो

घोर कलियुग तेच्यायला, आमची मार्जारिका येईपर्यंत असेच राहणार. पिटातून एस्केप झाली की मग होणार, त्याला अजून वेळ आहे Smile

संदर्भः गडद उमरावोदय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपल्याकडे एक तर हातात राखी नाहीतर थेट 'कर हा करी धरिला शुभांगी' अशा बायनरी हस्तलाघवालाच बव्हंशी सामाजिक मान्यता असल्याने असं होत असावं.

हॅहॅहॅ अगदी अगदी!
मी शक्यतो एखाद्या स्त्री ने स्वतःहून हस्तांदोलनासाठी हात पुढे केला तरच करतो. अन्यथा हाय हॅलॉ वा नमस्कार. उगाच 'लगट करतोय मेला' किंवा 'नस्ती जवळीक दाखवतोय' असा भाव चेहर्‍यावर नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

>>उगाच 'लगट करतोय मेला'

बसमध्ये एका सीटवर एक बाई बसली आहे. इतर सर्व सीट भरलेल्या आहेत. तेव्हा त्या मोकळ्या सीटवर जाऊन बसले तरी असा भाव त्या बाईच्या चेहयावर येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

याला समांतर अनुभव काल पुन्हा घेतला.

दुपारच्या जेवणाला कॅण्टीनमध्ये बसलो होतो. माझ्या टेबलवर आणखी दोन पुरुष आधीपासून बसले होते. त्यांचे जेवण झाल्यावर ते उठून गेले. तेथे दोन महिला येऊन बसल्या. टेबलवर आणखी दोन सीट रिकाम्या होत्या.

पाचेक मिनिटांनी आणखी दोन महिला तेथे आल्या. त्यांना इतरत्र जागा नव्हती म्हणून त्यांना त्या दोन जागांवर बसायचे होते. त्यांच्या चेहर्‍यावर "या टेबलाबर दोन बायका बसल्या असताना हा पुरुष तिथे बसलाच कसा?" असा भाव मला स्पष्ट दिसला.

मी आधी बसलो होतो ही वस्तुस्थिती त्यांना माहिती नव्हती हे खरे असले तरी पुरुषाने महिलांच्या जवळ येऊच नये हा प्रिजुडाइस त्या दोन महिलांना होता. (आधी माझ्याशेजारी येऊन बसणार्‍या दोन महिलांना तो नव्हता हे स्पष्ट आहे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कदाचीत त्यांच्या अजुन दोन मैत्रीणी येणार असतील. म्हणुन तुमचं जेवण कधी होतय आणि कधी तुम्ही उठुन जाताय असा भाव असु शकेल Smile
कँटीनमधे पीक टायमाला बर्याचदा असं होतं आणि मुलीँना मैत्रीणीँसाठी जागा पकडायची फार सवय असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलीँना मैत्रीणीँसाठी जागा पकडायची फार सवय असते.

मुली मैत्रिणींसाठी जागा पकडतात हे सत्य आहे. कित्येक मुलेही त्यांच्या मैत्रीणींसाठी जागा पकडतात.
बरं मुले हे मुळींना स्त्रीदाक्षिण्य का chivellary का काय ते म्हणून जागा पकडतात म्हणावे तर काही मुली इतर मुलींना स्त्री दाक्षिण्य कशाला दाखवतील हा ही प्रश्न पडला.
शिंचे मुलांसाठी(मित्रांसाठी) कुणीच जागा का पकडत नाही?
सारे मैत्रिणींचाठीच कसे/का जगा धरतात?
पुरुषप्रधान संस्कृती म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

शिंचे मुलांसाठी(मित्रांसाठी) कुणीच जागा का पकडत नाही?

तुम्ही तुमच्या मित्रांना वा मैत्रिणींना सांगता का तुमच्यासाठी जागा पकडायला?
आमचे मित्र आम्हाला तसं करायला सांगतात तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी जागा पकडून ठेवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

शमत हाय!

(उभयपक्षी दाक्षिण्य दाखवणारा) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आमच्या निरिक्षणानुसार काही पुरुष लोकांमध्ये स्त्री दाक्षिण्य दाखवायची स्पर्धा लागलेली असते. याचा अर्थातच फायदा काही चतुर स्त्रिया घेतात. नंतर थ्यांकू चा कटाक्ष टाकला तरी अशा पुरुषांना कृतार्थ झाल्यासारखे वाटते. असो.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आमच्या निरिक्षणानुसार काही पुरुष लोकांमध्ये स्त्री दाक्षिण्य दाखवायची स्पर्धा लागलेली असते.

भयंकर सहमत. या र्‍याट रेसमध्ये नसल्याचा साधार आनंद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"याचा अर्थातच फायदा काही चतुर स्त्रिया घेतात. "
एका मुलीने तिचा पोस्ट ग्रॅजुएशनच्या दरम्यानचा जवळ जवळ सगळा खर्च (हॉस्टेल, पुस्तके,ट्यूशन फी, पॉकेटमनी,..वगैरे) चतुराईने स्त्री दाक्षिण्य-स्पर्धेतून 'वसूल' केलेला पाहिला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा चतूर मुलींना उगाचच वाईट असे लेबल लावले जाते हे पाहून माझं काळीज हेलावतं. वास्तविक गनिमीकाव्यासारख्या गोष्टींना आपण गौरवाने सांगतो. तसं एखादी मुलगी/स्त्री वागली तर ती लगेच वाईट काय? मला तर कौशल्याने लोकांच्या लंपटगिरीचा फायदा घेणार्‍या या पोरीं विषयी कौतुकचं वाटतं. (हे ऋता किंवा घाटपांडेकाकांना उद्देशून नाही, 'इन जनरल'.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

नेहेमीचंच शॉव्हनिझम. तू नको मनावर घेऊस. जलनेवाले चाहे जल जल मरें।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>> स्त्री दाक्षिण्य-स्पर्धेतून 'वसूल' केलेला पाहिला आहे. <<<

ज्या मुलग्यांनी या स्त्री दाक्षिण्य-स्पर्धेत भाग घेतला असेल त्यातल्या हरलेल्यांचे वर्णन "अ‍ॅट द शॉर्ट एंड ऑफ द स्टिक" असे करावे लागेल Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

नै म्हंजे बाकी ठीके, पण ट्यूशन फी?????? इतकं दाक्षिण्य पदरात पाडायचं म्हंजे लोकोत्तर चातुर्य झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अशा मुलींकडून या खर्चाची नेमकी वसुली करणारी चतुर मुलेही पाहिली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे म्हंजे उदाहरणार्थ अशक्य थोर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

__________/\__________

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

वसुली? नेमकी? अशक्य आहे, कारण त्या प्रक्रियेत तिलाही आनंद मिळालेला असतोच. त्यामुळॅ ती वसुली नेमकी आणि पूर्ण नव्हे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फुकट असं या जगात काही नाही. आणि मिळालं तर ते वर्थ (पात्रतेचं) नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुषप्रधान संस्कृती म्हणे.

ही पुरुषप्रधान संस्कृतीच आहे मणोबा. पुरुष हा प्रधान असतो तर बायकांचं राजेपण, कालपण, आजपण, उद्यापण Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मित्र बरोबरच असतात, त्यांच्यासाठी जागा पकडायला आधी जाणारा बकरा/चम्या असतो, मुलींच्या बाबतीत स्कोअर करण्यासाठीच जागा वगैरे पकडतात, ते चिव्हिलरी की काय तो घंटा खोटारडेपणा आहे.

ज्यावेळेपासुन मुले गॉसिपिंगसाठी उत्तम श्रोते होतील त्यावेळेपासुन बर्‍याच मुली इतर मुलींना 'हाड' करुन फक्त मुलांसाठी जागा पकडतील असं शपथेवर बर्‍याच मुलींनी सांगितलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मन्या लेका काड्या सारतोस काय रे Wink
कोण कोणासाठी जागा पकडतं महत्वाचं नाहीय. मला एवढंच म्हणायचं होतं की 'लोचट/ लगट करतोय मेला', 'नस्ती जवळीक दाखवतोय', 'हा पुरुषमाणुस दोन बाईमाणसांजवळ बसलाच कसा' असा प्रिज्युडाइसवालाच लुक दिला असेल असे नाहीय. कदाचीत पुर्ण वेगळे कारणही असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसरे पूर्ण वेगळे कारण काय बरे असेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एक शक्यता लिहीलीय की वर 'कदाचीत त्यांच्या अजुन दोन मैत्रीणी येणार असतील. म्हणुन तुमचं जेवण कधी होतय आणि कधी तुम्ही उठुन जाताय असा भाव असु शकेल'...
अर्थात हा अंदाजच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१.

असे प्रिजुडाइस बघितले आहेत कैकदा. व्हॅनिटीचे नामकरण कैकदा होते की काय असे वाट्टे ते बघून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या स्त्रिया "सिस्टिम बदलण्याची* ताकद आमच्यापाशी नाही...... म्हणून सिस्टिम आपोआप / कुणीतरी दुसरा बदलेपर्यंत सिस्टिमशी अगदीच फटकून राहू नये" असा विचार करत असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह घेतले. पण चारातल्या कोणत्या दोन स्त्रियांविषयी बोलता आहात हे कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दुसर्‍या दोन, "हा कोण 'लांबोडा' या टेबलावर बसलाय" अशा नजरेने बघणार्‍या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह घेतले. पण चारातल्या कोणत्या दोन स्त्रियांविषयी बोलता आहात हे कळले नाही.

इतकंही हलकं घ्यायचं कारण नव्हतं!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बाकी निळ्या आणि बॅटमॅन ह्या युवा (आणि सेमी-युवा) पिढीतल्या सदस्यांचे अनुभव, 'हातांसह सोन्याची सांज गुंफताना'च्या ऐवजी बरेचसे 'दे हाता, या शरणागता'च्या धर्तीवरचे असल्याचे पाहून अं.ह. झालो

हाहा, 'हाती आले धुपाटणे' असे होऊ नये म्हणून काळजी घ्यावे लागते बाबा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

धुपाटण्याबद्दल सहमत एकदम! पोरींचं काय बॉ, त्यांना शेकहँडसाठी लय पोरे मिळतात, व्हाइसे व्हर्सा होत नै कधी. तस्मात केअरफुल राहणे तर मष्टच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आमच्या ग्राज्वेट शाळेतल्या प्रोफेश्वराने एकदा पाच मिन्टं नुसती सगळ्यांना योग्य रितीने हस्तांदोलन कसं करावं ते शिकवण्यात घालवली होती. ते म्हणे (या देशात) यशस्वी होण्यासाठी फार्फार आवश्यक अस्तं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्याच मुलींचे पंजे(तळहात) छोटे असल्याने हस्तांदोलन करताना अनपेक्षित गडबड होते, >>>
सहमत आहे.

लष्करातल्या लोकांशी हस्तांदोलन करण्याचा अनुभव मात्र फारच थोर असतो, मोठे राकट हात आणि घट्ट पकड आपल्या तळहाताच्या ठेवणीप्रमाणे
बरी किंवा त्रासदायक वाटू शकते.>>>
फार्फार सहमत.

एकंदर मी जेवढ्यांदा पुरुषांशी हस्तांदोलन केलंय, त्यातला एकही अनुभव 'छान' असा आठवत नाही.
स्त्रियांशी 'फॉर्मल' हस्तांदोलन कधी केल्याच आठवत नाही. पण टाळी देणे, पाठीवर थाप मारणे, कअॅज्युअल हग वगैरे बाबतीत नक्कीच जास्त कंफर्टेबल वाटतं. कदाचीत हातांचे आकार, राकट दणकट फिल, उंची वगैरेमुळे फरक पडत असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकंदर मी जेवढ्यांदा पुरुषांशी हस्तांदोलन केलंय, त्यातला एकही अनुभव 'छान' असा आठवत नाही.

तुमचा स्वभाव राकट हस्तांदोलनंच लक्षात ठेवायचा आहे असे दिसते आहे! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बरेचदा अप्रिय अनुभव आले आहेत Sad . माझा एक कलिग काही वर्षांच्या अंतराने भेटला
असता हस्तांदोलनास उत्सुक होता , त्याने मला ऑकवर्ड होईपर्यंत हात घट्ट धरून ठेवला होता .
शेवटी हात खेचून घ्यावा लागला .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या पांढर्‍या केसांकडे बघून समस्त स्त्रिया आमच्याशी निर्धास्तपणे हस्तांदोलन करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही खास मराठी मध्यमवर्गीय समस्या आहे की काय, असं वाटतं. कारण दोन पुरुषांनी हस्तांदोलन करणंसुद्धा उत्तर भारतात चांगलंच फॉर्मल समजलं जात असावं. तिथे दोन पुरुष एकमेकांना चांगले ओळखत असतील, तर सरळ गळाभेट घेतात. बाईशी ते सभ्यतेच्या मर्यादेत शक्य नसल्यानं शरीरस्पर्श टाळला जातो, पण आताचे उत्तर भारतीय तरुण-तरुणी खुशाल गळाभेटी घेतात असं दिसतं. हा संकेत मध्यपूर्वेत आणि दक्षिण युरोपातही सर्रास दिसतो, आणि शरीरसंबंधांबाबतीत अधिकाधिक मोकळेपणा जसजसा येत गेला, तसा तो भिन्नलिंगी जोड्यांमध्येसुद्धा पसरला असं दिसतं.

याउलट महाराष्ट्रात, विशेषतः शहरी मध्यमवर्गीय भागांत, शरीरस्पर्श हे अगदी पुरुषांतसुद्धा टाळले जातात. जवळचे मित्रदेखील एकमेकांना स्पर्श करत नाहीत, मग भिन्नलिंगी कुठून करणार? मला कधीकधी असं वाटतं की ब्रिटिशांसारख्या थंड लोकांनी आपल्यावर राज्य केलं आणि मराठी मध्यमवर्गानं त्यांची व्हिक्तोरियन नीतिमत्तेची संकल्पना उचलली, म्हणून आज ही समस्या आहे. फ्रेंंचांनी आपल्यावर राज्य केलं असतं, तर उपरोल्लेखित युवा (आणि सेमी-युवा) पिढीतल्या सदस्यांना हस्तांदोलनापेक्षा जास्त काही पहिल्या भेटीतच कदाचित मिळालं असतं Wink

१ - ह्याला अपवाद विशिष्ट क्षेत्रांचा - उदाहरणार्थ नाटका-सिनेमांच्या क्षेत्रातले मराठी लोक मजेत एकमेकांच्या गळाभेटी घेतात, अगदी स्त्रिया-पुरुषसुद्धा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मराठीच का, सौथमध्येही हेच आहे. उत्तर भारत जर्रा-पण जर्रासाच मोकळा आहे. त्यातही हुच्चभ्रू लोकच जास्त मोकळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>शरीरस्पर्श हे अगदी पुरुषांतसुद्धा टाळले जातात. जवळचे मित्रदेखील एकमेकांना स्पर्श करत नाहीत१, मग भिन्नलिंगी कुठून करणार? <<

हे दक्षिणेत खरं आहे का? मला अनुभव नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आय मीन इन जण्रल भिन्नलिंगी मोकळेपणा सौथमध्ये बराच कमी आहे. बाकी पुरुषा-पुरुषांतला मोकळेपणा नॉर्थपेक्षा कमीच असावा. यात वर्गाचा फरक असावा असेही एक निरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

महाराष्ट्रात, विशेषतः शहरी मध्यमवर्गीय भागांत, शरीरस्पर्श हे अगदी पुरुषांतसुद्धा टाळले जातात. जवळचे मित्रदेखील एकमेकांना स्पर्श करत नाहीत

असहमत.
तरूण मुलगेही रस्त्यातून जाताना गळ्यात गळे घालून जाताना दिसतात. परदेशी लोकं हमखास या पोरांना समलिंगी समजतात.

बहुसंख्य भारतीय पुरुष माझ्याशी हस्तांदोलन करत नाहीत असा अनुभव आहे; इतर स्त्रियांशी बहुदा असेच वागत असावेत. मी हात पुढे केला तर घाबरतच हात पुढे करतात असं हस्तांदोलन करताना जाणवतं. उसंत सखूंना आहे तसा एकही अनुभव मला नाही. मात्र थोडी ओळख, मैत्री असणारे अगदी सहजच हस्तांदोलन करतात. संशोधनक्षेत्रातले, विशेषतः पाश्चात्य देशात काही वर्ष राहून आलेले मित्र, ज्येष्ठ कलीग्जही बर्‍यापैकी (वाट्टेल तेवढा दंगा, मस्करी करण्याइतपत) मैत्री असेल, बर्‍याच दिवसांनी भेट झाल्यानंतर किंवा बरेच दिवसांसाठी लांब जाणार असल्यास गळाभेट घेतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तरूण मुलगेही रस्त्यातून जाताना गळ्यात गळे घालून जाताना दिसतात. परदेशी लोकं हमखास या पोरांना समलिंगी समजतात.
....................हे खरे आहे. माझी एक स्लोवाक् मैत्रीण २०११ साली एका आन्तरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने प्रथमच भारतात (मुम्बईत) आली होती. त्यावेळी तिने मला अगदी हेच विचारले होते की, इथे मुले हातात हात घालून, खान्द्यावर हात ठेवून वगैरे हिण्डताना आढळतात. ते सर्व 'गे' आहेत का ? तिने तसे विचारले, कारण तिला दिसलेल्या अश्या 'जोडप्या'ञ्ची संख्या इतकी होती की तिला विश्वास बसेना की मुम्बईत इतके गे लोक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्याच्या भेटीला आलेल्या मुख्यमंत्र्यांपुढे हस्तांदोलनासाठी हात केला आणि चार खडे बोल ऐकून घेतल्याचे पाहिले आहे.

स्त्री आणि सीनियर यांनी स्वतःहून हात पुढे केल्याखेरीज हस्तांदोलनाचा बेत आखू नये असा एक संकेत ऐकून आहे. तो मी मुकाट पाळतो. ओरीसामध्ये दोन्ही हात जोडून नमस्कार करण्याची विनयशील पद्धत आहे. ती मला आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्री आणि सीनियर यांनी स्वतःहून हात पुढे केल्याखेरीज हस्तांदोलनाचा बेत आखू नये असा एक संकेत ऐकून आहे. तो मी मुकाट पाळतो.

मीही हेच ऐकले आहे आणि पाळतो.
स्त्री स्वतःहून हसली/बोलली तरच हसावे/बोलावे असाही नियम पाळतो. बहुतेकवेळा असा अनुभव आला आहे की मी एकटा असताना तोंडओळख असलेला माणूस त्याच्या कुटुंबासह भेटला तर तो बायकोची ओळख करून देत नाही. मीही मग ती तिथे नाहीच अशा अविर्भावात बोलतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या दहा-बारा वर्षांच्या (भारतातल्या) अनुभवातून आलेलं शहाणपणः मुलींची वानवा असलेल्या क्षेत्रात असाल तर मुलींनी मुलांशी हस्तांदोलनच काय पण नुसती 'हाय' 'हॅलो' असं म्हणून ओळख दाखवतानासुद्धा सावधगिरी बाळगावी- मुलं एखादेवेळी दाखवलेल्या पुसटशा ओळखीतूनसुद्धा कायच्या काय अर्थ काढतात.

भारताबाहेर आपोआपच हस्तांदोलन केलं जातं.

मी नातेवाइकांशी (पुरूष-बायका दोन्ही आले यात) हस्तांदोलन करत नाही- तशी परिस्थितीच आलेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण नुसती 'हाय' 'हॅलो' असं म्हणून ओळख दाखवतानासुद्धा सावधगिरी बाळगावी- मुलं एखादेवेळी दाखवलेल्या पुसटशा ओळखीतूनसुद्धा कायच्या काय अर्थ काढतात.
+ १००. यापुढे जाउन मी असेही म्हणेन की भारतामधे असताना स्त्रियांनी कोणत्याही पुरुषाकडे पाहून हसणेसुद्धा टाळले पाहिजे. ऑफिसात मीटिंगमधे असतानासुद्धा शक्यतो केबिनच्या काचेकडे पाहून बोलावे. कोणत्याही पुरुष सहकार्‍याला मेल लिहिताना हाय,हॅलो, डिअर सो अ‍ॅन्ड सो असे लिहिणे टाळावे. शक्य असल्यास बुरखा वापरावा. अन्यथा भारतीय पुरुष उगाचच काहीच्या काही अर्थ काढतात.
पूर्वी मुलींची आणि मुलांची जशी वेगवेगळी शाळा असे तशी व्यवस्था कॉलेजेस आणि ऑफिसात असली तर अधिक उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पूर्वी मुलींची आणि मुलांची जशी वेगवेगळी शाळा असे तशी व्यवस्था कॉलेजेस आणि ऑफिसात असली तर अधिक उत्तम.

बरोबर. मी तर म्हणेन की मुलींनी/स्त्रियांनी नोकर्‍याच कशाला कराव्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

यग्झॅक्टली.
स्त्रियांनीच काय पुरुषांनीही नोकरी करुच नये ह्या मताचा मीही बनत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>पूर्वी मुलींची आणि मुलांची जशी वेगवेगळी शाळा असे तशी व्यवस्था कॉलेजेस आणि ऑफिसात असली तर अधिक उत्तम.

आप्पासाहेब, तुम्हाला एक गंमत सांगतो. पुण्यात एक सीए फर्म आहे ज्यात फक्त महिला आहेत. त्या फर्मच्या एक भागीदारीणबैंनी स्त्रीशक्ती, पुरुषांचा दृष्टिकोन, 'नजर' चांगली नसणे, एका स्त्रीला दुसरी स्त्रीच समजू शकते वगैरे भेटल्या भेटल्या ऐकवलं होतं. पुरुष क्लायंट चालतात का हा प्रश्न विचारणार होतो, पण म्हटलं अजून अर्धा तास तत्त्वज्ञान ऐकवायच्या. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पुरुष क्लायंट चालतात का हा प्रश्न विचारणार होतो, पण म्हटलं अजून अर्धा तास तत्त्वज्ञान ऐकवायच्या.

विचारायचा होतात हा प्रश्न, मजा आली असती ROFL ROFL ढोंगीपणा आहे झालं सगळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुलींची वानवा असलेल्या क्षेत्रात असाल तर मुलींनी मुलांशी हस्तांदोलनच काय पण नुसती 'हाय' 'हॅलो' असं म्हणून ओळख दाखवतानासुद्धा सावधगिरी बाळगावी- मुलं एखादेवेळी दाखवलेल्या पुसटशा ओळखीतूनसुद्धा कायच्या काय अर्थ काढतात.

असे अनुभव मला फार नसले तरी काही प्रमाणात आहेत. नसती लचांडं मागे लागलीच आणि आपल्याला काहीही न करता लोढणं सोडवायचं असेल तर गळाभेट-मित्र या कामात फार उपयुक्त ठरतात असा अनुभव आहे.

मात्र एखादा उच्चपदावरचा पुरुष आणि खालच्या पदावरची स्त्री* यांच्यात कळत-नकळत काही गैरसमज उत्पन्न झालेच तर स्त्रीच्या नोकरीवर गदा आली हा नियम कितपत बदललेला आहे हे बघायला हवं. त्या स्त्रीशी सहानुभूतीपूर्वक वर्तन करणार्‍या इतर स्त्री-पुरुषांनाही झळा बसल्याची उदाहरणं आहेत.

*उच्चपदस्थ पुरुष आणि खालच्या पदावरची स्त्री असं वेगळं लिहीण्याची आवश्यकता आहे का? अजूनही तेच दिसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>विशेषतः पाश्चात्य देशात काही वर्ष राहून आलेले मित्र, ज्येष्ठ कलीग्जही बर्‍यापैकी (वाट्टेल तेवढा दंगा, मस्करी करण्याइतपत) मैत्री असेल, बर्‍याच दिवसांनी भेट झाल्यानंतर किंवा बरेच दिवसांसाठी लांब जाणार असल्यास गळाभेट घेतात.<<

चला आता पुढच्या वेळेस भेटू तेव्हा गळे पडू Wink

>>तरूण मुलगेही रस्त्यातून जाताना गळ्यात गळे घालून जाताना दिसतात. परदेशी लोकं हमखास या पोरांना समलिंगी समजतात.<<

हे बरोबर आहे, पण माझं असं निरीक्षण आहे की ही पोरं क्वचितच मराठी मध्यमवर्गातून आलेली असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतूंनी नोंद्वलेले निरीक्षण (आणि जोजोकाकूंनी व्यक्त केलेली टिका) बरोबर आहे, पण असे फक्त जवळच्या मित्र-मैत्रिणींमध्येच होते, आणि विशेषतः बर्‍याच दिवसांनी भेटल्यावर किंवा काही विशेष भेटीवेळी होते. कॉलेजमध्ये किंवा त्यापेक्षा लहान असताना गळ्यातगळे घालणे बर्‍यापैकी सर्वच ठिकाणी दिसते, पण मला वाटतं चर्चेचा विषय त्यावयापलीकडच्यांकरता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

चिंजंच्या निरिक्षणाशी सहमत आहे.
ज्या मुलींबरोबर (व मुलांबरोबर) हस्तांदोलन किंवा गळाभेटीचे प्रसंग आले आहेत त्यापैकी क्वचितच कोणी मराठी मध्यमवर्गीय आहेत.
किंबहुना माझ्या मित्र-मैत्रिणमंडळीत मराठी टक्का फारच कमी असल्याने हस्तांदोलनातील किंवा एकूणच शारिरैक जवळकीतील फरक प्रकर्षाने जाणवतो.

मी एकूणच केवळ मध्यमवर्गीय मराठी गट असेल तर बुजून/अवघडून/सांभाळून असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शारिरिक जवळिकीबद्दल अजून एक मुद्दा:

माझे सगळ्यात जवळचे मित्र बह्वंशी मराठी आहेत, विशेष वेस्टर्नाळलेले नाहीत पण तरीही अवघडणे हा प्रकार आमच्यात वट्ट नसतो. इथे थोडाफार जात-वर्ग म्याटर करत असावा काय? त्यांपैकी बहुतेक सगळे मित्र ब्राह्मणेतर आहेत. ब्राह्मण मित्रांत हे अवघडणे मीही पाहिले आहे, ते ह्या वर्गात आजिबात दिसत नाही. लोकांचे याबद्दल काय म्हण्णे आहे?

ता.क.:- हे सगळेजण वयाने पंचविशीच्या आसपास आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्म्म असेलही.. जी मराठी मंडळी / ग्रुप डोळ्यासमोर आले होते त्यातील बव्हंशी ब्राह्मणच होते (आडनावावरून तरी असावेत हा अंदाज, मात्र याबाबतीत माझी जाण अत्यल्प आहे हे आधीच सांगतो)(आणि ही तुझा प्रतिसाद वापरून आलेली पश्चातबुद्धी Lol

तरी माझ्या परिचयातील अनेक काळाने भेटणारे मराठी मित्र हा गट इतका लहान आहे की काहीच निष्कर्ष काढायला पुरेसा नाही हे पुन्हा एकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओक्के, धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझा अनुभव असा आहे की परदेशांतही स्त्री-पुरुषांच्यातले हस्तांदोलन फक्त औपचारीकपणे (त्यातही नोकरी-व्यवसायाशी संबंधित)वापरले जाते. अनौपचारीक भेटींमध्ये स्त्रीपुरुषांत गालाजवळ गाल नेऊन 'खोटे मुके' घेण्याची पद्धत अधिक रूढ आहे पण असे करताना शक्यतो समोरच्या व्यक्तीच्या देहबोलीवरून असे करणे अप्रस्तुत वाटणार नाही याची बरेच जण खात्री करून घेतात असा अनुभव आहे. माझा नवरा अगदी परिचयाच्या स्त्रियांनाही अशी गळाभेट/खोटे मुके वगैरे देण्यास बिचकतो जे त्याच्या चेहेर्यावरून अगदी स्पष्ट दिसत असल्याने या मैत्रिणी मग त्याऐवजी हस्तांदोलनासाठी हात पुढे करतात हे मी अनेकदा पाहिले आहे. माझ्या चेहेर्यावर असली काही भीडभाड दिसत नसल्याने असेल पण माझी परदेशी स्त्री-पुरुष मित्रमंडळी मला मात्र गळभेटी / खोटे मुके देतात. भारतीय पुरुष मात्र हस्तांदोलन करणे काय पण कधीकधी साधे नमस्कार-हाय-हॅलो करणेही विसरतात, मी तिथे असूनही न भेटल्यासारखे करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीय पुरुष मात्र हस्तांदोलन करणे काय पण कधीकधी साधे नमस्कार-हाय-हॅलो करणेही विसरतात, मी तिथे असूनही न भेटल्यासारखे करतात.

घाबरत तर नाहीत ना? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

शक्य आहे... Smile पण बायकांशी बोलायचे टाळणे वगैरे गोष्टी काही पुरुषांच्या 'सभ्यतेच्या' कल्पना असतात असे वाटते. एक मनुष्य तर मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माझ्या नवर्याकडे बघून द्यायचा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो. माझ्या धारवाडी पेढ्यांच्या चित्रावरली यांची प्रतिक्रिया बघून मी जो घाबरलो तो अजून थार्‍यावर नै आलो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारतीय पुरुष मात्र हस्तांदोलन करणे काय पण कधीकधी साधे नमस्कार-हाय-हॅलो करणेही विसरतात, मी तिथे असूनही न भेटल्यासारखे करतात.

स्त्रीसौंदर्याचा अद्भुत अवतार पाहून त्यांची बोलती बंद होत असेल. (कोणीतरी नको का रुचीच्या बाजूने बोलायला!)

---

हे असं गालावर गाल टेकवून हवेत मुके घेणं पहिल्यांदा पाहिलं तेव्हा दोन पुरुष असं करत होते. मला वाटलं प्रेमिक असतील. विमानतळावरून इप्सित स्थळी पोहोचपर्यंत ट्रेनमधे बर्‍याच ठिकाणी असं दिसलं तेव्हा ही पद्धत सगळ्यांचीच असं लक्षात आलं. कॉन्फरन्सस्थळी पोहोचले तेव्हा आयोजकांपैकी एक भेटला. तेव्हा विद्यार्थी असल्यामुळे त्याने त्याच्या अखत्यारीत मला प्रवेश फी माफ केली होती. मुद्दाम त्याला शोधून, भेटून त्याचे आभार मानले तेव्हा त्यानेही माझ्या गालाला गाल लावून हवेत मुके घेतले. तेव्हा पूर्ण खात्री पटली, हाच नॉर्म असणार. सुरूवातीला मलाही किंचित अवघडल्यासारखं झालं. पण कॉन्फरन्स संपेपर्यंत सवय झाली. दाढीचे खुंट वाढवून असं करण्यावर बंदी आणली पाहिजे.

एका स्पॅनिश मैत्रिणीलाही अशीच 'खोट्या मुक्यांची' सवय होती. ती मुलगीही तशी स्वभावाने अघळपघळ. त्याच ग्रूपमधला एक ब्रिटीश मित्र कायम हात पुढे करायचा. खोटे मुके घेण्यासाठी तो साफ नकार देत असे. त्यावरून छेडलं असता त्याचं उत्तर मजेशीर होतं, "मी ब्रिटीश जंटलमन आहे.. मी असं काहीही करणार नाही. ही आमची पद्धत नाही."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>"मी ब्रिटीश जंटलमन आहे.. मी असं काहीही करणार नाही. ही आमची पद्धत नाही."<<

पाहा मी म्हटलं नव्हतं? ह्या ब्रिटिशांच्या नादाला लागून आपली ही पंचाईत झाली आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे गाल-मुका प्रकरणं आपल्याला फारसं माहित नाही, पण मध्यंतरी स्पॅनिश शिकताना "नविन लोकांच्या गालाला गाल लावायला जाऊ नका" असा पहिलाच धडा एका गोड शिक्षिकेने आम्हाला दिला होता. आमचं स्पॅनिश कच्चंच राह्यलं अन गालाला गाल लावायच्या आमच्या अनेक संध्या 'मुक'ल्या, हे अलाहिदा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

दाढीचे खुंट वाढवून असं करण्यावर बंदी आणली पाहिजे.

मस्त घोटिव दाढी केली तरी कोण गालाला गाल लावणार म्हणून आम्ही सभ्य लोक दाढी करणे टाळतो.स्वस्थ सुखासुखी राह्तो.
पण ह्या वाढलेल्या खुंटांमुळच कुणीच तसे गालाला गाल लावण्यास येत नाही/नसावे.
आधी दाढी की आधी गालाला गाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

थोडंसं आत्मपरि़क्षण करताना मीही हस्तांदोलनासाठी स्वतःहून हात पुढे करत नाही हे जाणवलं, परंतु ते करताना अवघडलेपणही येत नाही. कॉलेजमध्ये कलीग्ज नक्कीच हस्तांदोलन करत नाहीत, पण कारणपरत्वे टाळी देतानाही काहीजण बिचकतात असं साधारण चित्र आहे.
मी कॉलेजच्या *प्लेसमेंट टीममध्ये असल्या कारणाने आणि आमचे मुख्य प्लेसमेंट को-ऑर्डिनेटर इतर कामांत व्यग्र असल्याने त्यांची कामेही बर्‍याचदा मीच सांभाळते. अशा वेळेस स्वागत आणि निरोपाचे नारळ यावेळेस दोन्ही बाजूंकडून सहज हस्तांदोलन होते असा अनुभव आहे. यात पुन्हा समोरची व्यक्ती स्त्री आहे की पुरूष याने काही फरक पडत नाही.

*याचंही मराठीकरण करणं म्हंजे लैच होईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

>> यात पुन्हा समोरची व्यक्ती स्त्री आहे की पुरूष याने काही फरक पडत नाही.>>

अगदी अस्सेच!!! किंबहुना हस्तांदोलनाच्या मेंगळट्पणातून अथवा फर्मनेस मधून काही आडाखे बांधता येतात.
निदान मी बनवते.
(फर्म हंस्तांदोलन करणारी व आवडणारी)
सारीका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात कधी हस्तांदोलन करायचा प्रसंग आला नाही पण अमेरिकेत आल्यापासून कुणाशीही हस्तांदोलन करायला कधीही प्रोब्लेम वाटला नाही. कधी जुन्या कंपनीतले सहकारी भेटल्यावर किंवा ऑफिसमध्ये कुणी सुट्टीवरून आल्यावर किंवा काही आवडती आणि मनमोकळी मित्रमंडळी भेटल्यावर गळाभेट होणेही खूप नैसर्गिक वाटते. पण काही लोक (अगदी कमी.. पण आहेत) हस्तांदोलनाच्या निमित्ताने हात जोरात दाबतात (किंवा पटकन सोडत नाहीत) किंवा सारखेच (जेव्हा भेटेल तेव्हा ) हस्तांदोलन करायला बघतात, त्या लोकांपासून मी सावध राहते आणि त्यानाही तशी कल्पना देऊन ठेवते Biggrin .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्थल, काल आणि समोरील व्यक्तिपरत्वे हस्तांदोलनाचे ठोकताळे आपोआप पडले गेलेत -
१. मोठ्ठ्या (अधिकाराने) व्यक्तिने किंवा स्त्री ने आधी हात पुढे करणे अपेक्षित
२. 'करु की नको' अशा स्थितीत हस्तांदोलन करता उपयोग नाही. करयचं नसेल तर थोडं मान्/कंबरेत झुकवून (हात जोडून) नमस्कार किंवा मग क ड क हस्तांदोलन. त्यात तुमचा कॉन्फिडन्स दिसलाच पाहिजे. हस्तांदोलन करताना नजर समोरच्या व्यक्तिच्या डोळ्यात (शक्यतो).
उरकल्यासारखा शेक हँड करण्यात मजा नाही त्याचवेळी तो खूप वेळ करण्यातही नाही.
- उपास

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- प्रशांत उपासनी