साई भक्त आणि अनिर्बंध पालख्या

ह्या महिन्यात रामनवमीच्या आधीच्या आठवड्यात नाशिक महामार्गावरून प्रवास करताना साई भक्तांच्या अनोख्या पालख्या बघायला मिळाल्या.
सर्वसाधारणपणे सर्व पालख्यांचे स्वरूप हे एक ट्रक / टेम्पो , त्यात उभे केलेले मोठे मोठे स्पीकर्स , आणि मागेपुढे चालणारे सुमारे ७० ते १०० भाविक असे होते.
अतिशय कर्णकर्कश आवजात वाजणार्‍या भजन व भक्ति संगितावर एक मोठी मिरवणुक महामार्गावरुन जाणार्‍या वाहनांची पर्वा न करता चालत होती. अनेक ठिकाणी या मिरवणूकीचे संचालन करण्याची जबाबदारी उचललेले स्वयंसेवक दुचाकी वर मोठे झेंडे लावून वाहतुकीच्य विरूद्ध दिशेने सैरावैरा गाड्या पळवत होते. परिणामतः महामार्गावरून जाणारी सर्व वाहतुक विस्कळीतपणे चालू होती. मोठे ट्रक, ट्रेलर वगैरे वाहने पहिल्या रांगेतून जात होती. मधुनच मनमर्जीप्रमाणे रस्ता ओलांडणार्‍या साई भक्तांना घाबरुन वाहने हाकावी लागत होती. एका ठिकाणी तर ह्याच स्पीकर्सवर चित्रपट संगीत लावून केलेला हिडीस नाचदे़खील पहायला मिळाला. सर्वच्या सर्व पालख्या कोणत्यातरी नगरसेवक अथवा नेत्यांनी प्रायोजित केलेल्या होत्या ... अतिशय संतापजनक असा हा प्रकार बघून खालील प्रश्न मनात आले -

१. साई दर्शनाला चालत जाण्याने भक्तीला काही वेगळी परिमाणे मिळतात काय ?
२. साई दर्शनाला चालत जाताना कर्णकर्कश आवजात भजन व भक्ति संगीत लावण्याने काय साध्य होते ?
३. ज्याप्रमाणे यजमानांकडून दक्षिणा घेउन देवपूजा जरी दुसर्‍याने केली तरी पुण्य यजमानांच्या गाठी लागते त्याप्रमाणे प्रायोजित पालखीबरोबर चालणार्‍या सर्वांचे पुण्य प्रायोजकाला मिळायला हवे ... त्यामुळे कोणत्यातरी नगरसेवक अथवा नेत्यांनी प्रायोजित केलेल्या या पालख्यांबरोबर चालून पुण्य नक्की कोणाला मिळते ?
४. रस्त्यावरून चालताना घ्यायच्या प्राथमिक काळजीविषयी प्रायोजक आणि भक्तमंडळी उदासीन का ?
५. महामार्गावरुन पायी प्रवास करायला परवानगी असते का ? (मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर अशी परवानगी नाही.)
६. वाहनांकडून टोल वसुली करताना महामार्गावर सुरक्षित प्रवास करता यावा अशी सोय टोल वसुली करणार्‍या कंपनीने करणे अपेक्षित नाही काय ?
७. अशाप्रकारे अनिर्बंध चालणार्‍या मिरवणूकांमुळे अपघात झाल्यास सरकार अथवा महामार्गावर टोल वसुली करणारी कंपनी वाहन चालकांना आणी प्रवाशांना नुकसान भरपाई देईल काय ?
वरील प्रश्नांवर ऐ.अ. च्या सदस्यांची मते / विचार / अनुभव / निरीक्षणे जाणून घ्यायला आवडेल ...

- बाबा बर्वे

" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

देवाधर्माच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंधीत कुठलीही गर्दी जमली मिडिया त्याला भाविक असे म्हणतो.
अशा ठिकाणी पारंपारिकता, गतानुगतिकता, यातून प्रेरित झालेली समूह मानसिकता ही झुंडशाही सारखीच असते. म्हणतात ना जमावाला धड असते डोके नसते.
सर्वधर्मसमभाव व धर्मनिरपेक्षता या गोंधळात धर्मवेडेपणा बाजी मारुन जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

संजोपरावांच्या शिर्डिचा समूहउन्माद लेखाची आठवण झाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

बरोबर.

आणि अनिल अवचटांच्या शिर्डीवरच्या आणि अन्य ठिकाणांवरच्या लिखाणाचीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

धार्मिक गोष्टींना इतकं डोक्यावर चढवलेलं आहे की "'तुमच्या अमक्या धार्मिक कृत्याने गैरसोय होत्ये (किंवा एवढच काय, अगदी कुणाचा जीव जात असेल)' हे समजून जरा शिस्तीत वागा" ही गोष्ट कुणाच्या गळी उतरवणं महाकठीण आहे.

अवांतरः धार्मिक कार्यांना (एकूणातच 'प्रायोजित' कार्यक्रमांना) मिळणार्या पैशांचा स्त्रोत जाहिर करायला लावला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0